मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|लघु आत्मकथन| षष्टम पद लघु आत्मकथन मंगलाचरण प्रथम पद द्वितिय पद त्रितिय पद चतुर्थ पद पंचम पद षष्टम पद सप्तम पद पिंड ब्रह्मांड निवारण - षष्टम पद श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले. Tags : kavyapoemकाव्यबांदकर षष्टम पद Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनम: ॥ श्रीआदिपुरुषायनम: ॥माझा मीचि सदा असें तेथें कैंचें द्वैत पिसें ।नाहीं आहे कल्पीतसें । मज माझी मी जाणे ॥१॥द्वैत अद्वैत कालविलें । आपणा आपण नाहीं ह्मणे ।आपण आपणा आहेपणें । आहे ऐसें माझें भान कदा नाहीं नाहींसें ॥२॥द्वैत अद्वैत कल्पिलें । सत्यासत्य मीचि केलें ।आलें नाहीं गेलें आलें । सकळ माझी कल्पना ॥३॥मुंगी पासूनि ब्रह्मादिक । लोक कल्पिले अनेक ।स्वर्ग नर्क अवश्यक । भोग ते ही कल्पिले ॥४॥अवस्था चारी अभिमानी । मंत्रा चारी चारी गुणी ।मज माजी मी कल्पोनी । जैसा आहे तैसा मी ॥५॥पिंड ब्रह्मांडाचा साक्षी । कार्य कारण मी लक्षी ।स्थान मान मी परिक्षी । करूनि कर्ता मी ॥६॥विराट हिरण्यगर्म माया । चवथी जे कां मूळ माया ।स्थूळ सूक्ष्म कारण माया । महाकारण कल्पिलें ॥७॥उत्पत्ति स्थिति संहारण । सर्व साक्ष चवथें जाण ।जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तूर्या तेही कल्पना ॥८॥ब्रह्मा विष्णु महेश्वर । चवथा जाण सर्वेश्वर ।विश्व तेजस प्रत्यक् पर । आत्मा तेही कल्पिलें ॥९॥परा पश्यंती मध्यमा । चवथी वाचा वैरवरीरवा ।ऋक् यजुर्वेद सामा । अथर्वण कल्पिलें ॥१०॥स्थूळ प्रविक्त आनंद । चवथा भोग अवभासानंद ।अकार उकार मकार मात्रार्ध । चारी स्थानें कल्पना ॥११॥काय भाग्य वर्णूं माझें । मजसीं सांपडलों आज ।शून्य कारणासी पूज्य । पडिलें काय वर्णूं मी ॥१२॥धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं धन्य आम्हीं ।धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं आम्हांसी ॥१३॥धरितां सद्नुरुचे पाय । कृत कृत्य झाली माय ।सद्नुरुसी उतराय । होऊं जातां होईना ॥१४॥ऐसें सांगू जातां फार । कैसा लागे मी पामर ।वैष्णवानें दिला कर । वाचा दुर्बळ बोले मी ॥१५॥कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य कृत कृत्य ।कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य झालों मीं ॥१६॥धन्य माता पिता धन्य । धन्यवंश तो स्वजन ।धन्य बंधू की बहिण । माझा संग असे ज्यां ॥१७॥माझ्या वंशा झाली गती । माझ्या पेटी जगत्पती ।माझ्या वंशीं झाले होती । धन्य धन्य माझ्यानें ॥१८॥ऐसे टांकितां उद्नार । वेडे मज म्हणती नर ।होऊं तयांचा उद्धार । माझी निंदा करूनी ॥१९॥स्वजनाहूनि निंदक जन । जरी सुरव त्यां माझे न ।मज विपरीत करणें । निंदकांसी आधार ॥२०॥आम्हीं देहासी निंदितों । जरी निंदक साह्य होतो ।आम्हीं गुरुचि मानितों । हितोपदेशी ते झाले ॥२०॥इति शीलघुआत्ममथने । गुरुशिष्य कथने । जिवन्मुक्ती निरूपणनाम षष्टम पद समाप्त: ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP