मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य| पिंगळा श्री रामदासस्वामींचे साहित्य स्फुट अभंग पंचक पंचीकरण षड्रिपुविवेचन प्रासंगिक कविता मानपंचक पंचमान स्फुट श्लोक युद्धकान्ड अन्वयव्यतिरेक नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान मानसपूजा अंतर्भाव आत्माराम पंचसमासी करुणाष्टकें निरनिराळ्या वारांची गीतें लळित प्रासंगिक कविता रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें पंचीकरणादी अभंग श्री रामदासांचे अभंग श्री स्वामी समर्थ सप्तशती श्रीवनभुवनी सुकृत-योग किष्किन्धा कांड गोसावी अभंग भाग १ अभंग भाग २ अभंग भाग ३ दिवटा पिंगळा राममंत्राचे श्लोक सुंदरकांड श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना रामदासांची आरती पिंगळा समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ पिंगळा Translation - भाषांतर ॥ भाकणूक ॥ वरि हनुमंतासी दुवा । महंमायासी दुवा । संतांचें सभेची दुवा । धर्मांचे सभेशीं दुवा । राजमुद्रा देवमुद्रा । ज्ञानमुद्रा ते धुरेशीं दुवा हो । वेदांत सिद्धांत दुवा । धादांत तें मज पिंगळ्याचें बोलणें गायरायनहो ॥१॥ऐसें सर्वही सरेल । परि अविनाशी वस्तु एक उरेल । तें सज्ञान जाणतील । गायरायनहो ॥२॥या पृथ्वीस प्रळय होईल । महाकाल पडेल । सकळ जीवन आटेल । हा मी पिंगळा बोलूनि जातों ॥३॥शत वरुषें पाऊस जाईल । तेणें जीवसृष्टि मरेल । सूर्यो बारा कळीं तपेल । तेणें पर्वतासहित पृथ्वी जळेल । गाय० ॥४॥पोळती शेषाचिया फडा । तो विष वमी भडभडा । पाताळ जळती धडधडा । ऐशी ब्रह्मांडींची राखोंडी होईल । गायरायनहो ॥५॥पाऊस पडेल शुंडाधारीं । तेणें बुडेल धात्री । अग्रि प्रगटेल अंबरीं । तो करील बाहरी तया पाणियाची । तेथें सुटेल वावधान । तेणें विझेल तो आग्र । वारियासी गिळितां गगन । गगनासी राहे खाऊ । तो तामस अहंकार गायरायनहो ॥६॥राजस बुडवील तामस अहंकारास । सात्विक बुडवील राजस अहंकाराल । गुणमाया गिळिल गुणास । अहंमाया करील गायरायनहो ॥७॥गुणक्षोभिणी माये पोटीं । माया मूळमाया पोटीं । मूळमाया स्वरूपा पोटीं । लीन हो गायरायनहो ॥८॥विघ्र मोठें गायरायनहो । कांहीं शांति करा हो । कांहीं त्याग करा हो । उत्तम पाहा राजा गायरायनहो ॥९॥धुरेची रासी कोण । बापाची राशी कोण । म्यां खबर खोब मिथुन । कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धन मकर कुंभ मीन ॥१०॥मीनाचा मी रोग बरा । लाभ आहे गायरायनहो । थोरल्या पुस्तकाचा शकुन पाहें । मज पिंगळ्याचे हातेन गाय० ॥११॥बुद्धि कांडी खोविली वरी । निघाली रंकाशीं राज्यपदवी । तुझी हरपली सांपडेल ठेवी । तरी मज पिंगळ्याला विसरोन । रामीं रामदास सर्वदा भाकून गेला निजपदा । त्याचिया नेमाची शब्द । जतन करा गायरायनहो ॥१२॥॥ जोगीच्छंद ॥ काळ बहिरी ससाणा बंधु तुलज्याचा जाणा । काळ पिळियेला घाणा । बहिरी हुर्मुजी नाणा । बहिरी जोग बोलणीं बोलती ॥१॥निळया घोडयाचा रावुत । हातीं त्रिशूळ संगीत । कांवे घेतो लखलखित । उंच कास तखतखीत । ताघडोबेडसति ॥२॥ तेथें बहिरीची प्रचीति । नागखंडें झोंबती । तेथें बहिरीची प्रचीति । नागखंडें झोंबति । तेथें बहिरीची प्रचीति ॥३॥॥ पहिला देव तो बद्धाचा । दुसरा देव तो मुमुक्षूचा । तिसरा देव तो साधकाचा । चवथा देव तो वेगळा । अगम्य त्याची लीळा ॥१॥पहिला गुण महेशाचा । दुसरा गुण तो ब्रह्मयाचा । तिसरा गुण तो विष्णूचा । चौथा गुण तो वेगळा । अगम्य त्याची लीळा ॥२॥पहिला भक्त तो कायेचा । दुसरा भक्त तो वाचेचा । तिसरा भक्त तो मनाचा । चौथा भक्त तो वेगळा । अगम्य त्याची लीळा ॥३॥॥ दोहरे ॥ कानफाटया । आलेख जागे । आलेख आलेख सब कोहु कहे । आलेख आलेख सो न्यारा । जैसी कीणीही वैसी रहणी । सोई नाथका प्यारा ॥१॥आलेख जागे । साई आलेख जागे आलेख पायाकहणी आया उसकी बात झुटी ॥२॥गोरख गोरख सब कोहु कहे । गोरख नबुजे कोये । जोगींद्रकु जो कोई रखे सोई गोरख होय ॥३॥नवाकके नवतुकरे ज्योरे प्राण लियो हेगा । कंथा छोड कंठ लगाय जोगी रहता नंगा ॥४॥जनमी सीगी मनमो त्यागी जनमो बद्धा जनमो मुक्ता । कथनी कहते लोक टफावे सोहि ज्ञानका अंधा ॥५॥जोगी भींतर मडिया पैठे करवे भींतर बाई । जीवनमें जीय देखन गया जोगीकी सुरत पायी ॥६॥फेरी करते घरघर फीरे कीनरी बज्याई तारा । कंथा आवे कंथा जावे जोगी रहाता न्यारा ॥७॥सिंगी बाजे बाबगाजे माईरसंडी बाडे । नाथ नबुझे गुतगुत-मेर नाथ बुझे सो छुटे ॥८॥मुद्रा फारी कानमो डारी आपसे न फारी कोये । आपसे फोर मुद्रा पैठी सोई गोरख होय ॥९॥जोगे न जानु जुगुत न जानु न जानु आसन ध्यान । रामकी कृपा दास न पाई आलख हुवा परिपूर्ण ॥१०॥ ॥ गीतसंखा ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : April 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP