मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य| अभंग भाग १ श्री रामदासस्वामींचे साहित्य स्फुट अभंग पंचक पंचीकरण षड्रिपुविवेचन प्रासंगिक कविता मानपंचक पंचमान स्फुट श्लोक युद्धकान्ड अन्वयव्यतिरेक नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान मानसपूजा अंतर्भाव आत्माराम पंचसमासी करुणाष्टकें निरनिराळ्या वारांची गीतें लळित प्रासंगिक कविता रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें पंचीकरणादी अभंग श्री रामदासांचे अभंग श्री स्वामी समर्थ सप्तशती श्रीवनभुवनी सुकृत-योग किष्किन्धा कांड गोसावी अभंग भाग १ अभंग भाग २ अभंग भाग ३ दिवटा पिंगळा राममंत्राचे श्लोक सुंदरकांड श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना रामदासांची आरती अभंग भाग १ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ अभंग Translation - भाषांतर ॥१॥राम गावा राम ध्यावा । राम जीवींचा विसांवा ॥१॥कल्याणाचें जें कल्याण । रघुरायाचें गुणगान ॥२॥मंगळाचें जें मंगळ । राम कौसल्येचा बाळ ॥३॥राम कैवल्याचा दानी । रामदासा अभिमानी ॥४॥॥२॥छत्रसुखासनीं अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥माझा मायबाप त्रैलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडलें वर्म थोर भाग्यें ॥४॥थोर भाग्य ज्यांचें राम त्यांचे कुळीं । संकटीं सांभाळी भावबळें ॥५॥भावबळें जेणें धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंबेना ॥६॥विसंबेना कद आपुल्या दासासीं । रामीं रामदासीं कुळस्वामी ॥७॥॥३॥रत्नजडित सिंहासन । वरी शोभे रघुनंदन ॥१॥वामांगीं ते सीताबाई । जगज्जननी माझे आई ॥२॥पश्चाद्भगीं लक्षुमण । पुढें अंजनीनंदन ॥३॥भरत शत्रुघन भाई । चौरे ढाळिती दोन्ही बाहीं ॥४॥नळ नीळ जांबूवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ॥५॥देहबुद्धी नेणों कांहीं । दास अंकित रामापायीं ॥६॥ ॥७॥॥ भजन ॥ रघुपि राघव राजाराम । पतीतपावन सीताराम ॥ N/A References : N/A Last Updated : April 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP