मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य| दिवटा श्री रामदासस्वामींचे साहित्य स्फुट अभंग पंचक पंचीकरण षड्रिपुविवेचन प्रासंगिक कविता मानपंचक पंचमान स्फुट श्लोक युद्धकान्ड अन्वयव्यतिरेक नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान मानसपूजा अंतर्भाव आत्माराम पंचसमासी करुणाष्टकें निरनिराळ्या वारांची गीतें लळित प्रासंगिक कविता रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें पंचीकरणादी अभंग श्री रामदासांचे अभंग श्री स्वामी समर्थ सप्तशती श्रीवनभुवनी सुकृत-योग किष्किन्धा कांड गोसावी अभंग भाग १ अभंग भाग २ अभंग भाग ३ दिवटा पिंगळा राममंत्राचे श्लोक सुंदरकांड श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना रामदासांची आरती दिवटा समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ दिवटा Translation - भाषांतर हुशार भाई हुशार । अवघीं असावें खबरदार । काळोखें पडतें फार । एकाशीं एक दिसेना ॥१॥चोराचे कळप फिरती । अवचित दगा करिती । निजों नका जागविती । मी दिवटा साहेबाचा ॥२॥मी हराम नव्हें साहेबाचा । नफर इतबाराचा । मज रातीं जागावयाचा । हुद्दा दिधला ॥३॥मी सारे रात जागतों । अठरा महालांची खबर घेतों । साही नजरेनें राखतों । मनीं धरितों चहूंचे गुण ॥४॥मी सकळिकांचें करितों बरें । परि मज मानिती अहंकारें । घोरों लागती झोंपेच्या घोरें । ते समूल नागविती ॥५॥जे मजला मानिती । माझ्या विचारें वर्तती । तरि हरगीस्त झोला न पवती । ते नाडेनात जी ॥६॥जे जे झोपेनें पिडले । ते ते अवघेचि नाडले । यमयातनेशीं जुडले । पाहुणेर द्यावयाकारणें ॥७॥जे मदभरें जडले । जन्ममरणा रहाटीं जोडले । सुटिका नव्हती पाडिले । बांधोनियां जी ॥८॥अरे जागा स्वरूपी जागा । मुक्तीचा सोहोळा भोगा । कर्म आपलें अंगा । लागोंव नेदावें ॥९॥अरे हुशार । झोपेनें नाडले थोर थोर । म्यां जे जे केले खबरदार । ते कडेशीं पडिलेजी ॥१०॥महादेव निजेनें भ्रमला । विषें तळमळों लागला । मग म्यां खबरदार केला । तो वांचला दों अक्षरीं ॥११॥स्वामी कार्तिक निजेनें भ्रमला । बळोंचि परस्री भोगूं लागला । मातृगमन पडावें त्याला । तो म्यां खबरदार केला ॥१२॥विष्णु निजेनें भ्रमला । परस्त्रीचे मोहें जोगी झाला । तो म्यां खबरदार केला । मोहो दवडिला शक्तीचा ॥१३॥ब्रह्मा निजेनें भ्रमला । चोरांनीं समूळ नागविला । सकळ धर्म बुडविला । दुकाळ पडला मोठी जी ॥१४॥मग म्यां खबरदार केला । तो बाबातें स्मरला । तेणें जाऊनि चोर मारविला । लेकाचें वित्त दिधलें ॥१५॥नारद निजेनें भ्रमला । बायको होउनी साठ लेक व्याला । तो म्यां खबरदार केला । मग पावला पहिला वेष ॥१६॥इंद्रें मानिलें नाहीं मजला । सहस्त्र भोकें पडलीं त्याला । शुक्रें डोळा फोडोनि घेतला । न मानी मजला म्हणवूनी ॥१७॥चंद्रें नाहीं मानिलें मजला । चंद्रें नाहीं मानिलें मजला । अभिमानें सुखें निजला । तो क्षयरोगी जाहला । नाडला आपले करणीनें ॥१८॥दक्ष निजेनें भ्रमला । मानिलें नाहीं मजला । पूर्वशिराशीं मुकला । जाहला जी तो बोकडमुखी ॥१९॥गुरूनें नाहीं मानिलें मजला । बाईल गमवुनी बैसला । यम निजेनें व्यापिला । झाला केवळ दासीपुत्र ॥२०॥रावण निजेनें भ्रमला । कुलक्षय करूनि शोकीं पडला । मग म्यां खबरदार केला । मग जाला रामरूपी ॥२१॥ऐसे ऐकोनि दृष्टांत । सावध करोनी करा स्वहित । तरि आपुलें फल भोगा समस्त । मी सांगतों जी ॥२२॥मी सांगतों उतराइ । कोणापाशीं कांहीं मागत नाहीं । परोपकारास्तव पाहीं । हुशार करितों ॥२३॥ऐसें दिवटा जाय बोलोनि । घरटीं घाली हांक देवुनि । दास म्हणे दिवटय मानी । तोचि तरला मोहरनीं ॥२४॥ऐसा हा दिवटा । समर्थाचा जाणावा सुभटा । जे अनुभवती संसारचोहटा । न येता समर्था ॥२५॥ N/A References : N/A Last Updated : November 07, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP