मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|लळित| पदे ३१ ते ४० लळित पदे पद आणि श्लोक पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ४९ पदे ५० ते ५५ लळित - पदे ३१ ते ४० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaपदरामदाससमर्थ पदे ३१ ते ४० Translation - भाषांतर ॥३१॥ शतशतकरवंशीं अवतरणा । दशमुखकुळसंहरणा । दशशतवदनाग्रजरूप मदना । दशरथनृपनंदन गुनसदना ॥ध्रु०॥ कौसल्यात्मज निजसुखकरणा । कौशिमकमख-पालन शिवस्मरणा । राजीवलोचन जानकीरमणा । भवचिंताहरणा ॥१॥निजचरणीं अहल्याउद्धरणा । भार्गवीरक्षितीपाळाहरमर्दना । वालीकार्मुकधरणा । अंजनिसुतसेवित तव चरणा ॥२॥दशदिशाव्यापक गुणसगुणा । आत्माराम समस्ताभरणा । जीवकदंबकपोप-संस्मरणा । रामदास वंदित तव चरणा ॥३॥॥३२॥ रामा विसरावें मग काससया जियावें । स्वहित दुरी तेव्हां दु:ख पालवीं घ्यावें । रौरव कुंभीपाक अहोरात्र भोगावे । तेधवां कोण सोडी धर्म न पडे ठावें ॥ध्रु०॥ भजनीं कानकोडें राम न म्हणे तोंडें । आदळे दु:ख आंगीं भोग भोगितां रडे । कतृत्व आपुलेंचि कैसे नाठवे एवढें । देवासी बोल ठेवी केवीं स्वसुख जोडे ॥१॥विषयीं चित्त गोवी हदयस्थ नाठवी । कामक्रोधलोभसंगें त्रास नुपजे जीवीं । ममता दु:ख परी आपणातें वाहवी । विनवी रामदार भवसागर तरवीं ॥२॥॥३३॥ साजिरें हो रामरूप साजिरें हो ॥ध्रु०॥ रूप प्रगटलें लावण्य लजिलें मानसीं बैसलें ॥१॥सर्वंगिं सुंदर ठाण मनोहर । दासाचा आधार ॥२॥।॥३४॥ देखिला हो राघव देखिला ॥ध्रु०॥ रूप रामाचें लावण्य साचें । ध्यान विश्रा-माचें ॥१॥चंचळ मानस वाहे वास । रामीं रामदास ॥२॥॥३५॥ शरण मी राघवा हो ॥ध्रु०॥ अंतरध्याना गुणनिधाना मज । पहा हो ॥१॥भजन कांहीं घडत नाहीं । हें साहा हो ॥२॥रामदास धरून कास । एक भावो ॥३॥॥३६॥ रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हां ध्यानीं भेटिची शिराणी ॥ध्र०॥ नरापरीस वानर भले । जिहीं डोळां राम देखियेलें । ज्यासी रघुराज हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटले ॥१॥रामीं मिनले ते असो नीचयाती । त्यांच्या चरणाची वंदीन माती । नित्य नव्हाळी गाऊनि करूं किती । तेणें रघुनाथीं उपजेल प्रीती ॥२॥रामीं राम-दास म्हणे ऐका करूं । थोर आम्ही तैसाचि भाव धरूं । भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारू । तेणें आम्हां भेटेल रघुवीरू ॥३॥॥३७॥ कैचें घर कैंचें दार । मिथ्या सकळही व्यापार । अंतीं सोइर रघुवीर । कां भुललासी ॥१॥ कोणी नव्हेति रे कोणीचीं । सकळही सांगातीं दैवाचीं । धरीं साई त्या रामाची । कां भुल० ॥२॥बहु अवघड आहे घाट । कैसी न कळे उरकेल वाट । होंई रघु-वीरजीचा भाट । कां भुल० ॥३॥फिर माघारां परतोन पाहें । एकधर्मचि होउनि राहे । धन जोडिल न राहे । कां भुल० ॥४॥ ऐंसी करावी बा जोडी । राहे एथें तेथें गोडी । सोडी मिथ्या प्रपंचावोढी । कां भुल० ॥५॥केव्हां जाईल न कळे श्वास । राहे तें घर पडेल वोस । बे कुडीया उपजेल त्रास । कां भुल० ॥६॥सावध होईरे बा ऐसा । वोढी जळत घरिंचा वासा । स्मर माझ्या रमाधीशा । कां भुल० ॥७॥संसार पाण्याचा बुडबुड । याचा नको करूं ओढा । तूं समजेसी ना मूढा । कां भुल० ॥८॥करीं सीताराम मैंत्र । होईल देह तुझा पवित्र । वरकड भिंतीवरील चित्र । कां भुल० ॥९॥कां रे बैसलास निश्चळ । करि-शिल अनर्थास मूळ । सांडुनी विश्रांतीचें स्थळ । कां भुल० ॥१०॥मुख्यं असूं द्यावी दया । नाही तर सर्वही जाईल वायां । मिठी घाली रामपायां । कां भुल० ॥११॥करिशील डोळ्याचा अंधार । पाहे जनासी निर्वैर । सांडि धनसंपत्तीचें वारें । कां भुल० ॥१२॥अंगीं धनसंपत्तीचे वारें । खाया मिळतील भुतें पोरें । कामा नयेत रे निर्धारे । कां भुल० ॥१३॥रामदासाचें जीवन । तूं कां न करीसी साधन । राम तोडिल भवबंधन । कां भुललासी ॥१४॥॥३८॥ चातुर चातुरसे चटका ॥ध्रु०॥ एकएकगुणपरवडी डारूं । तन मेरी तोरींगचे तटका ॥१॥सुनत देखत गुण प्रगत लोकनमें । अजब लागे चटका ॥२॥रामदास साही सब घटव्यापक । आनंदकी घटका ॥३॥॥३९॥ बाई मी हो मी हो जाहली खरी । खरी गुरुदास । अखिल पदार्थीं उदास ॥ध्रु०॥ इह पर नश्वर जाणुनि हदयीं । आलासे बहु त्रास ॥१॥नित्यानित्य विवेक विचा-रुनि । सेवितों ब्रह्मरसास ॥२॥ तुर्या उल्लंघुआने उन्मनी सेउनी । स्वस्वरूपीं निजवास ॥३॥निजतृप्तीसी देउनि तृप्ती । केला अनुभवग्रास ॥४॥रामदास प्रभु नित्य उदास । सच्चरणीं विश्वास ॥५॥॥४०॥ आवडतो प्रिय परी गवसेना ॥ध्रु०॥ स्वजनाहुनि प्रिय देह आपुला । तोहि विटे परी आपण दिसेना ॥२॥श्रीगुरु दास्य अनन्य घडे जरी । अनुभवतंतु कधीं तुटेना ॥३॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP