॥ रामा तुज कल्याण मागणें । तुज कल्याण मागणें ॥धु०॥ तूं जगजीवन तूं मन- मोहन । कोण आहे तुजविण । रामा० ॥१॥
आम्ही हरिजन तूं जनपावन । बोलती वेद-पुराणें । रामा० ॥२॥
देवही आले भक्त मिळाले । आनंदें तुझे गुणें । रामा० ॥३॥
भक्त सुखी ऋषि सुखी । दास म्हणे तुझें देणें । रामा० ॥४॥

॥ जय हो महाराज गरीब नवाज । बंदकमीना कहना के तूं साहेब तेरीही लाज । हो महाराज० ॥१॥
मैं सेवक बहु सेवा मागूं । इतना है सब काज । हो महाराज० ॥२॥   
छत्रपती तुम शेकदार सिब । इतना हमारा अर्ज ॥ हो महाराज० ॥३॥

॥ कपि सकळही प्रयाणकाळीं । प्रेमें वोसंडिती दोहीं डोळीं । नित्य आठवे सुखाची नव्हाळी । म्हणती रामा तुझी सवे लागली । रामा०॥१॥
जो तूं अगोचर ब्रह्मादिकां । ध्यानीं नातुडसी पंचमुखा । तो तूं आम्हाम झालासी निजसखा । प्रेम दिधलें वायुसुता । रामा०॥२॥
तुझ्या ओळगे सुरांसी न लगे हो ठावो । आम्ही वानरें निकट उभीं राहों । न्याहार धरूनि वदन तुझें पाहों हो । परि धाला नाहीं आमुचा भावो । रामा०॥३॥

॥ रामा कृपा बहुत असों देणें । आम्ही धन्य जाहलों तुझें गुणें ॥ध्रु०॥ रामा गोड लागती तुझ्या गोष्टी । हर्षें गदगुल्या होताती पोटीं । जणुं सांपडली चणियाची मुठी । वाटे धरावी तुझी हनुवटी । रामा० ॥१॥
आलिंगोनी सप्रेमें बोले । तुम्हीं मजलगिं हे कष्ट केले । सुखी करोनि सर्व गौरविले । रामदासीं  हनुमंत ठेले । रामा० ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP