मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|लळित| पदे २१ ते ३० लळित पदे पद आणि श्लोक पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ४९ पदे ५० ते ५५ लळित - पदे २१ ते ३० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaपदरामदाससमर्थ पदे २१ ते ३० Translation - भाषांतर ॥२१॥ देह दंडिसी मुंड मुंडिसी । भंड दाविसी नग्र उघडा ॥ध्रु०॥ भस्मलेपनें तृण आसनें । माळभूषण सोंह हें मूढा ॥१॥अन्नत्याग रे हदयोग रे फट कायरे हिंडसी वनीं ॥२॥ऐक सांगतों रामदास तो । ज्ञानयोग रे साधितां बरें ॥३॥॥२२॥ हें काय तें काय । योग काय भोग काय ॥ध्रु०॥ बाहेर जटाभार काय अंतरीं संसार काय ॥१॥बाहेर काषाय दंड काय । आंत अवघें मंड काय ॥२॥बाहेर सात्विक ध्यान काय । आंत मद्यपान काय ॥३॥रामदास म्हणे पाहे । व्यर्थ भगल करून काय ॥४॥॥२३॥ मिश्रित सारासार । अरे निवडी तोचि चतुर ॥धृ०॥ ब्रह्मनिरंजन अद्वय सत्य । माया जनपर द्वैत अनित्य ॥१॥मेळविलें जळ अमृत दोनी । हंस जसा पय घे निवडोनि ॥२॥पा:खीविण खरे निवडेंना । मूढ कसें जनहित कळेना ॥३॥दास म्हणे निजकौतुक मोठें । अनुभव बोलती शाब्दिक खोटें ॥४॥॥२४॥ पळापळा ब्रह्मपिसा येतो जवळी । रामनामें हांक देउनी डोई कांडोळी ॥ध्रु०॥ वृत्तिसेंडी बंधनेविन सदा मोकळी । संसाराची धुळी करूनि आंगीं उधली ॥१॥प्रपंच- उकरडयावरी बैसणें ज्याचें । भोंवता पाळा फिरोनि पाहे जन हे अविद्येचे ॥२॥धांडनि बैंसे उठोनि पळे द्रुश्य वाटतें । अदृश्य याचें राहणें घेतां नवचे कवणाचें ॥३॥ आउत हात गन नवा ठाईं उतळले । दहावा ठाव म्हणऊन तेथें ठिगळ दिधलें ॥४॥ऐसें मन हें चंचळ निवृत्तीसी गुंतलें । परतूनियां आलें म्हणऊनि जीवेंचि मारिलें ॥५॥मीपणाचें शहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धी वस्रांचं ओझें ॥६॥नलगे आम्हां मानअपमानाचें ओझें । तुझी शुद्धि घेतां गेलें मीपण माझें ॥७॥आम्ही जन धन देखुनि विचार करितों । आपण ऐसे पिसे म्हणऊनि उमज धरितों ॥८॥अर्थें भेटों येती त्यांस वेड लवितों । रामीं रामदास ऐसें अबद्ध बोलतो ॥९॥॥२५॥ कल्याणधामा । रामा कल्याणधामा ॥धृ०॥ दु:खनिवारण नायक सखा । सुखमूर्ति गुणग्रामा । रामा० ॥१॥दास उदास करी तव कृपा । अभिनव नामगरिमा । रामा० ॥२॥॥२६॥ तूं येरे रामा । काय वर्णूं महिमा ॥ध्रृ०॥ सोडविले देव तेतीस कोटी । तेवीं सोडवी आम्हां ॥१॥राम लक्षुमण भरत शत्रुघन । पुढें उभा हनुमान ॥२॥दास म्हणे भवबंध निवारीं । राम गुणधामा ॥३॥॥२७॥ हे राघव देई तुझें भजन ॥धृ०॥ अनुताप त्यावरी भक्तियोग । मानिती हे सज्जन ॥१॥कीर्तन करावें नामें उद्धरावें । अंतरीं लागो ध्यान ॥२॥दास म्हणे मन अत्मनिवेदन । सगुण समाधान ॥३॥॥२८॥ नाम मंगळधाम हरीचें हो । संतसज्जना विश्राम ॥धृ०॥ सकळ धर्म अचळ अर्थकाम । स्मरणें स्वानंदाभिराम ॥१॥गरळचाळशम शिवमनोरम । दास उदास पूर्णकाम ॥२॥॥२९॥ संगत साधूची मज जाहली । अक्षय पदवी आली ॥धृ०॥ सर्व मी सर्वात्मा ऐसी । अंतरीं दृढमति झाली । जागृतीसहित अवस्था तुया । स्वरूपीं समूळ विराली ॥१॥बहुजन्मांची जपतपसंपती । विमळ फळेंसि आली । मी माझें हे सरली ममता । समुळीं भ्रांति निमाली ॥२॥रामीं अभिन्न दास ऐसी हे जाणीव समूळही गेली । नचळे न ढळे अचळ कृपा हे । श्रीगुरुरायें केली ॥३॥॥३०॥ अणुपासूनि जगदाकारा । ठाणठकार रघुवीर ॥धृ०॥ रामाकार जाहली वृत्ति । दृश्यादृश्य न ये हातीं ॥१॥रामीं हारपलें जग । दास म्हणे कैंचें मग ॥२॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP