मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|षड्रिपुविवेचन| मदनिरूपण षड्रिपुविवेचन कामनिरूपण कोपनिरूपण मदनिरूपण मत्सरनिरूपण दंभनिरूपण प्रपंचनिरूपण षड्रिपुविवेचन - मदनिरूपण समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ मदनिरूपण Translation - भाषांतर क्रोध तो बोलिला मागें मद तो आइका पुढें । मदाचीं गुप्त हीं कामें अंतरींचा कळेचिना ॥१॥मद हा वोखटा मोठा मद हा खेदकारक । मदानें पद लाधेना मद शोध करी भला ॥२॥देहाचा मद शक्तीचा द्रव्याचा मद अंतरीं । विद्येचा मद राज्याचा मद रूप बहूविधा ॥३॥मदानें थोकली विद्या पुढें आणिक होइना । सर्वां माने मना येना आपुले होरटी कडे ॥४॥कळेना सृष्टि देवाची बहुरत्ना वसुंधरा । मदाला नावडे कांहीं सर्वही तुच्छ होतसे ॥५॥मदानें भुलला प्राणी विचारें उमजेचिना । पराचें सत्य मानेना विवरेना कदापिही ॥६॥वेदशास्त्रादि हो चर्चा नीति हो न्याय हो नव्हे । आपणा पाहणें नाहीं विरंचि बोलिला तरी ॥७॥इतरा कोण तो लेखा संत साधु महंत हो । आपणें न्याय केला तो आपुलें बोलणें बरें ॥८॥चालणें थोर तें माझें माझा मीच बहु भला । न्यायाची गोष्टि मानेना नीतीनें कोप येतसे ॥९॥आपणापरतें नाहीं सर्व कांहीं भुमंडळीं । गुणग्राहकता नाहीं पराचें तुच्छ होतसे ॥१०॥कैसेनी उमजावा तो हेंकाड आंधळें गुरूं । दिसेना नाकळे कांहीं वळिताम न वळे कदा ॥११॥ऐशाचा संग तो खोटा हित तेथें असेचिना । स्वहित आपुलें नाहीं परहित कसें घडे ॥१२॥थोर आयुष्य मोलाचें मदें व्यर्थचि नाशिलें । पापी हा उमजों नेदी शेवटीं दूर होतसे ॥१३॥मारतां मद कैशाचा पुसे कोण तया मदा । पूर्वींच कळला नाहीं तर्हेनें जन्म नाशिला ॥१४॥देहही बळही गेलें द्रव्य गेलें वृथाचि तें । डंब गेल स्तोब गेलें एकला जातसे खळ ॥१५॥इतिश्री मदरिपु । जेणें वाढविला भवरिपु । तो हा टाकितां साक्षेपू । समाधान पावला ॥१६॥॥ मदनिरूपण समाप्त ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP