मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोरक्ष प्रवाह| भाग १० श्री गोरक्ष प्रवाह ग्रंथाच्या पारायणाची माहिती भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ गोरक्ष प्रवाह - भाग १० मनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते. Tags : bookgorakshagranthanavanathpustakगोरक्षग्रंथनवनाथ भाग १० Translation - भाषांतर २८ भर्तृहरी नाथ॥ स्मशानी धांवला । गोरखु बोधला । दत्त नाथें तेथें । पाठविला ॥६५॥॥ नाण्याचे मडके । घेवोनिया हाती । रंगांनी नटवी । नाना वर्णी ॥६६॥॥ भर्तरी समीपू । ठेंचा खाऊनिया । गोरक्षु मूर्च्छनी । पडे तंव ॥६७॥॥ सांवरोनी पुन्हां उठोनियां शोके । आकाशु फोडोनी । टाहो करी ॥६८॥॥ देखोनियां योगी । नोळखे गोरक्षु । विचारीता ‘मूर्खा ! । शोकी कां तूं ? ॥६९॥॥ योगी त्यासी सांगे । ‘फुटले मडकें-पिंगलेच्या सरी । प्रिय माझें ॥७०॥॥ उमगला राया । शोकू बुझाविला । गोरखु म्हणाला । पहा, राया ! ॥७१॥॥ पहा या पिंगला । बोलावती तूज । ‘राखिताती बूज । सदा तूझी’ ॥७२॥॥ भर्तरी शरणू । नाथ-पंथीयांसी । दीक्षा तंव त्यासी । गोरक्षु दे ॥७३॥॥ भर्तरी लोहासी देतां स्वर्ण-वर्णु । परीसू गोरक्षू । मालू गणी ॥७४॥२९ चौरंगीनाथ ॥ कोणे एके गांवी । शशांगरु राया । तपें करी, काया कृशांगारी ॥७५॥॥ कृष्णा तुंगभद्रा । तीहीसी मिळणी । तपें तेथें करी । रामेश्वरी ॥७६॥॥ लाभे त्यासी पुत्रु । नामें कृष्णांगरू । मदनाचा वर्णू । रूपू त्याचे ॥७७॥॥ रुपें तारुण्यानें । मुसमुस वयू । द्दष्टी नारी जनी । नेघे कदा ॥७८॥॥ राया शशांगरा । शरयू ते भार्या । एकाएकी आर्या । निवर्तली ॥७९॥॥ भुजावंती अन्या । स्वरुपाची खाणी । शशांगरा राणी । मिरविते ॥८०॥॥ भुजावंती माता । सापत्नता भावे । कृष्णांगरा पुत्रा झळंबिते ॥८१॥॥ पितळेचे कानी । फुंकोनीयां राणी । कृष्णांगरा केले । शासनाते ॥८३॥॥ हस्तपाय त्याचे । चारी तोडूनीयां । चौरंगी टाकीला । सुवर्णाच्या ॥८३॥॥ कौंडिण्या पुरीची । ऐशी वार्ता होतां । तातें पुत्रा स्वतां । घातु केला ॥८४॥॥ मच्छिंदरु गोरक्षु । दत्त दर्शनार्थी । मिरवीत येती । ग्रामातु या ॥८५॥॥ कृणांगारू तया । चौरंगीचा नेला । गव्हरी ठेवीला । तपस्येसी ॥८६॥॥ पर्वती चामुण्डा । फळें त्यासी देती । तपस्वी परी तो । उपवासी ॥८७॥॥ पर्वती चामुण्डा । फळें त्यासी देती । तपस्वी परी तो । उपवासी ॥८७॥॥ मुखी नाम जपे । नेत्र उर्ध्व द्दष्टी कंठी प्राण आले । भरोनियां ॥८८॥३० काया - प्रवेश॥ दत्तत्रेय नाथु । मच्छिंदरु गोरक्षु । त्रयी चाले यात्री । प्रयागासी ॥८९॥॥ रायु तेथें एकू । कोंणी मृत झाला । शोकाकुली देखे जनू सारे ॥९०॥॥ गोरक्षु बोलला । ताता ! मच्छिंदरा । रायासी जीववा । संजीवनें ॥९१॥॥ मच्छिंदरे केला । कायेत प्रवेश । रायु तो स्मशानी । उभा राही ॥९२॥॥ रायासी जे कांता । नामें जे रंवती । झाली गर्भवती । कांही काळे ॥९३॥॥ पर्वती गव्हरी । मच्छिंदरू कायु । रक्षूनि गोरक्षु । राहीयला ॥९४॥॥ त्रिविक्रमू राजा । रेवती त्या राणी । धर्मनाथा पुत्रा । प्रसवली ॥९५॥॥ कामाठी घेवोनी । गव्हरी जावोनीज । देही तो शोधोनी । मच्छिंदरू ॥९६॥॥ तोडोनी देहातें । कोल्ही, कुत्री जेथे । मांसान्नात त्यातें । तोषविले ॥९७॥॥ सांबालयी शिवू । उमा कैलासासी । बोलावीती गणां । मांच्छिंद्रार्थी ॥९८॥॥ हरी नारायणू । हरू नारायणू । एकीकृतू गणां । आज्ञापीती ॥९९॥॥ ‘गण ! कण करा । मातीचा चाकोरा । देही तो विकारा । मच्छिंदरू ॥४००॥॥ आज्ञा म्हणोनीयां । मच्छिंदरू देह । गणी तो शिवाच्या । जमा केला ॥४०१॥॥ वीरभद्रा हाती । मच्छिंदरू देहू । संरक्षूना राही । कैलासीतो ॥४०२॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP