मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोरक्ष प्रवाह| भाग ९ श्री गोरक्ष प्रवाह ग्रंथाच्या पारायणाची माहिती भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ गोरक्ष प्रवाह - भाग ९ मनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते. Tags : bookgorakshagranthanavanathpustakगोरक्षग्रंथनवनाथ भाग ९ Translation - भाषांतर २५ विक्रम भर्तृरी॥ गोरक्षाची खरी । किमयागीरी दूरी । भर्तृरी चरित्री । देखा पुन्हां ॥२८॥॥ पूर्वी एका काळी । कौलीकाचे मेळीं । झळाळी भर्तृरी । जन्मा आला ॥२९॥॥ तारा ध्रुवू-मीनू । नवा नारायण । येतां स्वर्गीहून । भूमी भागी ॥३०॥॥ हरीणी पाजोनी । भर्तरीसी दूध । वर्षे पांच परी । वाचा - हीन ॥३१॥॥ अप्रबुद्ध बाळा । जैसिंगू नेतसे । काशी-वाशी-ईशें । संबोखीले ॥३२॥॥ जैसिंगू देवाज्ञें । स्वर्गवासी होतां । वाण्यासंगे जातां । होई बुद्ध ॥३३॥॥ रानी राहोनीयां । वाणी कोल्ही यांची । भर्तरी जाणाया । शिकलासे ॥३४॥॥ वाण्यांचा उदीम उज्जैनीसी चाले । संगे त्यांच्या आले । भर्तृहरी ॥३५॥॥ कोल्हा-कुई बोले । तस्करें चाहूलें । जागें सर्वा करी । वाणीयांसी ॥३६॥॥ वाणीये पुसतां । भर्तृहरी बोले । ‘कोल्होबांची भाषा । जाणीतली ॥३७॥॥ आणिक कोल्होबा । सांगती येताहे । रत्नें चतुर्धरी । राक्षसो तो ॥३८॥॥ ‘त्यांतें जो मारीलू । राजा उज्जैनीसी । रत्नें माणकेसी । भूषवील ॥३९॥॥ विक्रमु द्वारांतु । वाणीयांचा दूतू । ऐके तो हे मातू । शूरशाली ॥४०॥२६ विक्रमेतिहास॥ कुंभारू कुलालू । कोणी उज्जैनीसी । कन्या सत्यवती । स्नुषा झाली ॥४१॥॥ कुलालाचा दास । गर्दभू गंधर्वू । शापभ्रष्टा आसा । होय त्यासी ॥४२॥॥ गंधर्वे वरीले । राजयाच्या कन्ये । शापें मुक्ता होतां । पुत्रत्यांतें ॥४३॥॥ विक्रम तो जाणा । सत्यवती पुत्रू । गंधर्वाचा सुतू । कुंभा-गेही ॥४४॥॥ दुर्गाचा रक्षकू । क्रमी वृत्ति ऐसी । मारोनी राक्षसु । रत्नें आणी ॥४५॥॥ दुर्गाचिये द्वारी । हत्ती मालाधारी । विक्रमु वरीला । राज्यकर्ता ॥४६॥॥ विक्रमु कुलालु । गंधर्वाचा पुत्रू । भर्तरी रानीलु । भ्राता मानी ॥४७॥॥ वाडीयांत राजा । विक्रमु जो दूतु । मंत्रीयांत शोभे । भर्तरी तो ॥४८॥॥ मंत्रियाची कन्या । भर्तरीची । भार्या । पिंगला नामे या । शोभतसे ॥४९॥॥ भर्तरी विद्येसी । विक्रमु शौर्येसी । जनीं आदरेंसी । वागविती ॥५०॥॥ मेधावती कन्या । स्वयंवरु मांडी । राजयाची लेक । विक्रमासी ॥५१॥॥ राज्य वोपी राजा । जामातासी प्रेमे । भर्तरी तयाचा । मंत्री होई ॥५२॥२७ पिंगला सती॥ विक्रमू राजया । भर्तॄहरी तेंवी । क्रिडनाची गोंवी । दोघांसीहि ॥५३॥॥ मृगया क्रीडना । भर्तूहरी जाई । शिणवीली काया । घोरा रानी ॥५४॥॥ तृषार्तू फिरे तो । रानां वनांतूनी । जलावीणू मीनू । तळमळे ॥५५॥॥ दत्त गुरु त्यासी । रानी दिसूं लागे । ‘तपस्येसी भागे । क्रीडा सोडी ॥५६॥॥ सांगे गुरु राणा । भर्तृहरी मना । नच कांहीं येना । जलावीणू ॥५७॥॥ आणा भाका घेई । ‘बारा वरुषांनी । तपांसी येईनू । तुझ्या पायीं ॥५८॥॥ राज्यीं परतोनी । पिंगलेसी भेटे । दिनीं दिनीं तेथें । प्रेमा दाटे ॥५९॥॥ फिरोनी निघाला । मृगया क्रीडना । मृगी थोरू घाला । घालीताहे ॥६०॥॥ माथा मुगुटीचा । रक्ती मिजवोनी । पिंगलेसी दूतू । घाडियेला ॥६१॥॥ पिंगलेसी वाटे । नाथावरी धाडी । मृत्यु पंथे पडे । सती जाई ॥६२॥॥ मस्करी कुस्करी । भर्तंरीसी भोवे । दु:खासी तयाच्या । पार नसे ॥६३॥॥ स्मशानी तो जाई । रक्षेपाशी बैसे । पिंगलेच्या ध्यानी । दु:खी कष्टी ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP