मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोरक्ष प्रवाह| भाग ३ श्री गोरक्ष प्रवाह ग्रंथाच्या पारायणाची माहिती भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ गोरक्ष प्रवाह - भाग ३ मनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते. Tags : bookgorakshagranthanavanathpustakगोरक्षग्रंथनवनाथ भाग ३ Translation - भाषांतर ७ गोरक्ष दर्शन॥ अयोध्या, मथुरा । उज्जयिनी सारी । यात्राहि काश्मीरी पूर्ण केली ॥९३॥॥ दयाळ ग्रामासी । वंगी परतला । समाचारा गेला । चंद्रगिरी ॥९४॥॥ द्वादश वर्षान्ती । अंगणी ठाकला । ‘बाळू कोठें बोला भस्मींचा तो ॥९५॥॥ आर्या सरस्वती । भार्या दयाळाची । स्मरे उत्कीरीं ते । भस्म गेलें ॥९६॥॥ नाथें हांक-भाकें । गोरक्ष उदेला । पायीं मर्च्छिद्राच्या । स्वये रीघ ॥९७॥॥ सुंदरू तें ध्यानू । बारा वरूषांचे । जटा भुरुभुरु । नील नेत्रा ॥९८॥॥ गोजीरे तें मुखूं । सानुलीं पाउलें । उभें नेटुकें तें । गुरु-प्रिय ॥९९॥॥ येथूनियां आतां । जगन्नाथा जाऊ । कथा करूं बाळा कनक-ग्रामी ॥१००॥॥ गुरु पुढें प्रेरी । भिक्षान्न आणी तू । जेववी तापसी । उपवासी ॥१॥॥ डोळा उकलोनी । वडे आणीयेले । गुरुसी वाढीले । गुरु बोले ॥२॥॥ डोळां डोळा पाहू । हरे? नारायणा । मंत्रू मृत्युंजयू । जपीन मी ॥३॥॥ मंत्राचा उच्चारू । दशावर करी । गोरक्षासी नेत्रू । त्र्यंबकाचा ॥४॥॥ शाबरी जा मंत्रू । तत्रू त्यासी देई । संथा शस्त्रास्त्रीची चालू ठेवी ॥५॥८ गहिनी जन्म ॥ पृथ्वीवरी जन्मु । गहनु देखावा । ज्ञाता ‘कर्दमी हा । खेळू ह्मणे ॥६॥॥ चिक्लीतू, कर्दमू । उत्कीरीहि जन्म । गर्भी जीवा स्थान । महा-भूतीं ॥७॥॥ गोरक्षी मानसी । चाले हा विचारू गार्गामाजी मंत्रू । मृत्युंजयू ॥८॥॥ जपी, तपी, कर्मी । हीच संजीवनी । अहो ! येतां जातां । बैसा उठा ॥९॥॥ खेळतां बाळासी । कर्दमू पुतळा । निर्मियेला तेणें । बाल-भावें ॥१०॥॥ मंत्र आंतरी तो । प्रभावीत होई । टाहौ ध्वनी होई । बालवाचा ॥११॥॥ गोरक्षु सुगंधू । जाणी मच्छिंदरू । शाबरी किमया । तीच गूढू ॥१२॥॥ माय आवाहिली । बाळासी वोपीले । आशीर्वाद दिले । सांभाळी हें ॥१३॥॥ करभंजा होई । नारायण जाणी । गहीनी नामांनी । संबोखी तू ॥१४॥॥ ‘गोरक्षानुग्रहें । बाळु मान्य होई । ‘धन्य माय तूही तैशी होशी ॥१५॥॥ मधु-विप्रस्त्रीतें । बाळासी सोंपवी । ‘गहिनी चिरंजीवो । होवो’ म्हणे ॥१६॥॥ कीर्त चिरंजीवी । करील बालक । मोक्ष-सुख तूज । देवो बाल ॥१७॥॥ अमर तो जाणा । कींर्त जो दिगंती । सुगंधी पसरी । पुष्टि दाता ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP