गोरक्ष प्रवाह - भाग ७

मनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.


१९ कलिंगा कलावती

॥ केदारी तपासी । जातां गोपीचंद । स्त्रीराज्यीं सीमेसी । गोरक्षू तो ॥३८॥
॥ तेची मार्गी तेथें । कलिंगा ती येई । नाटयी गानी सिद्धा । कलावंती ॥३९॥
॥ गोरक्षासी भेटे । गोरक्षु तियेसी । परस्परें मैत्री । जडो लागे ॥४०॥
॥ गोरक्षु पुसे तो । ‘मज संगे न्याहो’ । कलिंगा तै पुसे । ‘कला ज्ञाता’ ॥४१॥
॥ ‘नाटयें गानें धनें’ । विपुलें साधनें । ‘मैनाकिनी दानें । करीतसें’ ॥४२॥
॥ गोरक्षु तो प्रार्थी । ‘मी तो पर मार्थीं’ । ‘नाटयादि प्रसंगी । सेवूंजाणें ॥४३॥
॥ ‘मज नसो वावो । पुरुष जातीसी । ‘स्त्रीरूपू देवीनि । संगे न्यावे ॥४४॥
॥ ‘जाणसी कां ताल, । गीत, नृत्य,काल । आंदोल संगीत । आलापादि?॥४५॥
॥ विचारी कलिंगा । गोरक्षु-मलंगा । निसर्गु संगीतें । साग्रे दावी ॥४६॥
॥ हाती घेवोनियां ॥ सारंगी मलंगू । सप्त स्वरें ध्वनी ॥ छेडू लागे ॥४७॥
॥ वृक्ष वेली गाती । वायु ताल देती । लोलु डोलु पुष्पें । मंदु नाटयु ॥४८॥
॥ गोरक्षाची शिष्या । होत कलावंती । मारुतीहि तोचि युद्धार्थीये ॥४९॥
॥ अस्त्रांतें वर्षोनी । युद्धिं गोरक्षानें । केला परभूत । हनुमंत ॥५०॥
॥ ‘रामा ! लक्ष्मणा ! । बाहे बिभीषणा । ‘संरक्षका ! राणा ! । धांवा, ध्याहो ॥५१॥
॥ राम राणा धांवे । लक्ष्मण साह्यासी । ताता तो मारुत । तैसा येई ॥५२॥
॥ सख्र्यें त्या सर्वानी । दिली सांधोनीयां । आपुलाल्या स्थानी । शीघ्र-गति ॥५३॥

२० माया - मुक्ति

॥ सिंहलु द्वीपासी । कन्या कीलोतला । हासली वसूला । योगायोगे ॥५४॥
॥ वसू-शापें तीसी । हेलापट्टणासी । स्त्रियांच्या राज्यासी । राज्ञी-मीषें ॥५५॥
॥ हत्तीणीने ईसी । अर्पीली मालीका । राज्यीं स्थापीयेली । सर्व जनी ॥५६॥
॥ ऐशी राणी होतां । हनुमंती सेवी । वरू तेणें तीतें । दुजा दीला ॥५७॥
॥ ‘मिच्छिंदरू तूज । वरू-पुत्रु, मीना ‘देईल जाणून । सेवी त्यासी ॥५८॥
॥ गोरक्षु येतांचि । सावधू त्वां व्हावे । सांगाया हनुमंत । आतां धांवे ॥५९॥
॥ पराभूत होतां । गोरक्षाच्या हाती । हनुमंत पुढे । सेवी कोठे ॥६०॥
॥ ‘सावधानी शिष्यें । जाईल तो योगी । ‘योगीयांच्या संगी । सावधान’ ॥६१॥
॥ हनुमंते ऐसें । खासें मैनाकीतें । राणी जी राज्यातें । निवेदिले ॥६२॥
॥ पुढें सभास्थानी । राजे मैनाकीनी । मच्छिंदरू, मीनी । कलावंती ॥६३॥
॥ ताफा तो कलिंगी । नाटयें रंजवीत । मृदंगु नादत । गोरक्षाचा ॥६४॥
॥ गोरक्षु तो आया । चालो मच्छिंदरू । ‘नटवरू शंकरू । क्या है माया ॥६५॥
॥ चालो मच्छिंदरो । गोरक्षु है आया । तालबद्ध शब्दु । कानीं ध्वनी ॥६६॥
॥ सभेसि मृदंगु । निनाद ते माया । ठायी मच्छिंदरु । गर्जतसे ॥६७॥
॥ ऐकतांचि ताल । मच्छिंदर भाल । मुद्रा, नि कपोल । होई लाल ॥६८॥
॥ मुरूदंगु-ध्वनी । मैनाकिनी कानी । मुद्रा तिची मानी । खिन्ना दिसे ॥६९॥
॥ उभये ती पुसे । कलिगेसी कैसे ? । निजें जें मानसे । उदेलें तें ॥७०॥
॥ सांगे कलावंती । कां हो येणे केले ? । कालिंगी-अंगुले । निर्दिशीले ॥७१॥
॥ मृदंग्यासी दावी । गोरक्षु तै सेवी । निज रूपें भावें । मिळणी तै ॥७२॥
॥ सर्वासी मिळणी । गुरु शिष्य धणी । अलिंगीती खाणी । स्वर्णवर्णी ॥७३॥
॥ भस्माची चिमूटी । गोरक्षु तै उठी । माया मच्छिंदरी स्वर्ण सृष्टि ॥७४॥

२१ शाप मुक्त मैनाकिनी

॥ विलासु योगीयां । हानी-पंथ नेई । प्राणियां सर्वाहि । योगी मुक्ति ॥७५॥
॥ योग युक्तां जीवां । उद्योगानें मुक्ति । तयांची शक्ति ती । वाखाणीती ॥७६॥
॥ जीवू वरकडू । बरडू जाणावे । दु:खी-स्वप्नी-दंगी । झुरती जे ॥७७॥
॥ योगीयांनी व्हावे । निर्भयू, निष्कामू । क्रोधू, मोहू माया । निरसावे ॥७८॥
॥ वैराग्ये पिचतू । मच्छिंदरु, मीनू । गोराक्षो लक्षूनी । उपदेशू ॥७९॥
॥ मैनाकिनीनें धनें । भोग दावीयेले । परी ना आतळे । राज-योगी ॥८०॥
॥ गोरक्षा सकळा । शापीती कमळा । नारी, शैल्य, बाळा, । सुवासिनी ॥८१॥
॥ योगियां शापांचे । वरांचेही तेवी । भय वा आनंद । तथा तथा ॥८२॥
॥ मच्छिंदरू, मीनू । गोरक्षाच्या सवें । गांवाचें बाहेरी । येते झाले ॥८३॥
॥ मैनाकीनी धरी । पाय त्या सार्‍यांचे । दु:खे ठायी धायी । आक्रंदे ती ॥८४॥
॥ पुत्रार्थी आत्मेया । कळवळे ह्रदी । मीननाथु ‘आई’ । हांक देता ॥८५॥
॥ गाई समा माया । हंबरडा फोडी । नारी जन हाय । हाय करी ॥८६॥
॥ आकाशांत वरी । नारायणू वसू । मोचना शापांती । देऊ, येई ॥८७॥
॥ शाप-मुक्ता राणी । योगीमाया-मुक्त । भोगी कलावंत । आनंदो हा ॥८८॥
॥ हे चि कीं किमया । शाबरी सरिता । योग-छन्दु जाया । येथें वरु ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP