मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन Translation - भाषांतर पाऊस पडेनापडेना एक थेंबफुटेना एक कोंबधरणीला ॥१॥पाऊस पडेनासुकले नद्या नालेगुरावासरांचे झालेभारी हाल ॥२॥पाऊस पडेनासुकली सारी तळीसुकल्या वृक्षवेलीरानीवनी ॥३॥पाऊस पडेनादेव कोपलासे भारीदेवावाचून कोण तारीत्रिभुवनी ॥४॥पाऊस पडेनासुकली सारी तोंडेराग का गोविंदेकेला आहे ॥५॥पाऊस पडेनापिकेल कशी शेतीहोईल सारी मातीसंसाराची ॥६॥पाऊस पडेनाप्राण येती कंठीकधी तो जगजेठीकरील कृपा ॥७॥पडेल पाऊसबघा झाले मेघ गोळाआला हो कळवळादेवबाप्पा ॥८॥पावसाची चिन्हेदिसती आभाळीमेघांची गर्दी काळीजाहलीसे ॥९॥मेघांची आकाशीगर्दी झालेली पाहूनमोर नाचे आनंदूनवनामध्ये ॥१०॥मोर नाचतानामोर अश्रु तो गाळितीलांडोरी चाखितीआनंदोनी ॥११॥पड रे पाऊसापिकू दे दाणापाणीभाईरायाला बहिणीआठवितो ॥१२॥पाऊस पडतोपडतो काळाकुट्टधरणीमाता हिरवी जोटपांघुरली ॥१३॥पाऊस पडतोथांबेना पागोळीधरणीमाय हिरवी चोळीघालीतसे ॥१४॥पडतो पाऊसओल्या झाल्यात कामिनीभाकरीच्या पाट्याशेतात जातात घेऊनी ॥१५॥पाऊस पडतोओल्या झाल्यात जमिनीया ग पेरणीच्यासाठीशेता जाती सुवासिनी ॥१६॥पाऊस पडतोपागोळ्या पाणी गळेमाणिक दारी खेळेउषाताई ॥१७॥पाऊस पडतोपडतो मुसळधारगंगेला आला पूरदोन्ही थडी ॥१८॥पाऊस पडतोगरजे पाणी पडेआकाश जणू रडेरात्रंदिस ॥१९॥पाऊस पडतोपडतो सारखासूर्य झालासे पारखाचार दिवस ॥२०॥पाऊस पडतोविजांचा चमचमाटधरणीमाता हिरवा थाटमांडीतसे ॥२१॥मेघ गडगडेकडाडते वीजकुशीमध्ये नीजतान्हेबाळा ॥२२॥झाडे झडाडतीवीज कडाडतीधरणीमाये तुझा पतीयेत आहे ॥२३॥मेघ गरजतोपाऊस वर्षतोकुशीत निजतोतान्हे बाळ ॥२४॥पाऊस थांबेनाराऊळी कशी जाऊत्रिदळ कसे वाहूशंकराला ॥२५॥पाऊस थांबेनादेऊळी कशी जाऊबाळाला कशी नेऊकडेवरी ॥२६॥पाऊस थांबेनापाखरे गारठलीआईच्या पदराखालीतान्हे बाळ ॥२७॥पाणी पाणी झालेसार्या अंगणातनको जाऊ तू पाण्याततान्हे बाळ ॥२८॥येईल पडसेपाण्यात नको जाऊमायेला नको जाचूतान्हे बाळा ॥३०॥ पावसाच्या भारीजणू डोंगर वाकलेहिरव्या रुमाले झाकलेत्यांनी तोंड ॥३१॥पाऊस पडतोपडतो थुईथुईभिजल्या जाईजुईविठ्ठलाच्या ॥३२॥पाऊस पडतोपडतो कोंडाकोंडाभिजला राज्यगोंडाविठठलाचा ॥३३॥पाऊस पडतोपडतो भिरिभिरीभिजली अब्दागिरीविठ्ठलाची ॥३४॥पाऊस पडतोभरले नद्या नालेभाई माझे अडकलेपैलतीरा ॥३५॥पाऊस पडतोनद्यांना आले पाणीदेवा सुखरुप आणिभाईराया ॥३६॥थंडी पडे भारीपाठीत निघती कळाकुशीत तान्हे बाळागाई करी ॥३७॥थंडी पडे भारीपाणी झाल जसे कालनिजली तान्ही बाळेकुशीमध्ये ॥३८॥थंडी पडे भारीफुलती ना कळ्याआखडून गेल्याझाडावर ॥३९॥थंडी आज भारीताटी निखारे भरुनदेऊ शेकाया नेऊनबाप्पाजींना ॥४०॥थंडी पडे भारीमळे करपलेओठ ते फुटलेतान्हे बाळाचे ॥४१॥थंडी पडे भारीफुटले तुझे ओठकोकमतेलाचे तू बोटलाव बाळा ॥४२॥थंडी पडे भारीतुला बंडी मी घालीनराही बाळा तू निजूनअंथरुणात ॥४३॥थंडी पडे भारीतारे थरारतीकरी तू गुरंगुटीतान्हे बाळा ॥४४॥दुपारचे ऊनदगडाच्या झाल्या लाह्यातोंड कोमेजे देसायाभाईराया ॥४५॥दुपारचे ऊनलागते रे तुलामाझ्या गुलाबाच्या फुलागोपूबाळा ॥४६॥दुपारचे ऊनझळा झळाळा लागतीबाळे माझी कोमेजतीसुकुमार ॥४७॥दुपारचे ऊनपाय गं भाजतीत्यात बाळ कडेवरतीमाउलीच्या ॥४८॥दुपारचे ऊननको जाऊ तू बाहेरतू रे राजा सुकुमारफुलावणी ॥४९॥दुपारचे ऊनबाळ खेळायला गेलेकोकंबासारखेतोंड लाल लाल झाले ॥५०॥दुपारचे ऊनकोण ग साहीलसमुद्र आटेलअशा ऊने ॥५१॥दुपारचे ऊनपाखरे शांत शांतआईच्या मांडीवरीतान्हे बाळ निवांत ॥५२॥दुपारचे ऊनबाहेर बघवेनाबाहेर निघवेनाघडीभर ॥५३॥दुपारचे ऊनइंगळांची वृष्टीहिरवी सारी सृष्टीजळून गेली ॥५४॥कडक उन्हाळारानात नाही पाणीदेव आश्चर्य करितोझाडा पल्लव फोडूनी ॥५५॥कडक उन्हाळापाण्याचा नाही पत्तादेव आश्चर्य करीतोझाडा फुटे नवा पत्ता ॥५६॥छत्र धरी शिरीत्याचा लखलखाट पडेसूर्यनाथ चढेरथावरी ॥५७॥उगवले सूर्यदेवआधी उगवे माझ्या दारीमग पृथ्वीवरीउजेड पडे ॥५८॥सूर्य वर आलाअंधार गेला दूरदरीत करी घरभांबावोनी ॥५९॥सूर्य उगवलाकिरीट किरणांचापाखरा फुटे वाचाझाडावरी ॥६०॥सविता संप्रूण झाल्यामग करावे पारणेवाचीले रामायणबाप्पाजींनी ॥६१॥सविता संप्रूण झाल्यादिव्याला भरणवाचील रामायणमामंजींनी ॥६२॥सविता संप्रूण झाल्यापदांची पोथी सोडीगुरुला हात जोडीभाईराया ॥६३॥उगवला भानूशेंदराच्या माथाआयुष्य मागे बाप्पागोपूबाळ ॥६४॥सोनेरी किरणडोंगराच्या माथानमन सूर्यनाथाउजाडत ॥६५॥सूर्य नारायणातापू नको फारबाहेर सुकुमारभाईराया ॥६६॥सूर्य नारायणातापू नको फारगावा गेले छाया करभाईराया ॥६७॥सूर्य नारायणागगनी तापशीलोकांचे पाहशीपापपुण्य ॥६८॥उगवला भानूभानु नव्हे हा भास्करत्याला माझा नमस्कारदोन्ही हाती ॥६९॥आंबे मोहरलेआनंद कोकिळेलावसंताच्या स्वागतालाकरितसे ॥७०॥समुद्राच्या पाण्यास्वच्छता अणु नाहीनाचते हालतेसदा खाली वर होई ॥७१॥कोठलेही असोपाणी समुद्र घे पोटीउन्हाळा पावसाळात्याला नाही कधी तुटी ॥७२॥समुद्रा रे बापाकिती टाहो तू फोडशीपुत्र तुझा गोरागोराजाऊन बसला आकाशी ॥७३॥समुद्राच्या लाटाफेस उधळितीगोड त्या चंद्रालाफुले अर्पिताती ॥७४॥समुद्रा गं मध्येलाटांचे उभे शेतफेसाचे पीक येतअपंरपार ॥७५॥भरली कृष्णा बाईजशा दुधाच्या उकळ्याजटा ठेविल्या मोकळ्यादत्तात्रेयांनी ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP