मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| देवादिकांच्या ओव्या ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - देवादिकांच्या ओव्या मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी देवादिकांच्या ओव्या Translation - भाषांतर आधी नमन करुदेव गणपतीशारदा सरस्वतीमोरावरी ॥१॥मोरया रे देवातुला दुर्वांची आवडीएकविसांची जुडीबाळासाठी ॥२॥मोरया रे देवालाडू घे सोंडेवरीपुत्र दे मांडीवरीउषाताईला ॥३॥मोरया देवालाकेले दुर्वांचे आसनझाला मोरया प्रसन्न भाईरायाला ॥४॥मोरया रे देवातुला लिंपीन शेंदूरपुत्र दे सुंदरउषाताईला ॥५॥मोरया रे देवातुला जास्वंदीचे फूलमांडीये देई मूलउषाताईला ॥६॥मोरया रे देवासारी विघ्ने ही हाकावीतान्हे बाळाला राखावी दूरदेशी ॥७॥मोरया रे देवासारी विघ्ने कर दूरनिर्विघ्न माझा करसंवसार ॥८॥आणा गणेशालागणेशचतुर्थीलादेईल सुदबुद्धीलातान्हे बाळ ॥९॥आणावा गणेशविघ्ने तो करी दूरसुखाला येवो पूरगोपू बाळाच्या ॥११॥आणावा गणेशत्याला वाहू हिरव्या दुर्वाप्रार्थू मनोरथ पुरवागणराया ॥१२॥आणावे नारळकरीन एकवीस मोदकदेव सिद्धिविनायककृपा करो ॥१३॥संकष्ट चतुर्थीआहे माझा नेमभाचा सांगेन ब्राम्हण गोपू बाळा ॥१४॥संकष्ट चतुर्थीचंद्र दिसतो हिरवासखी वेचते दुरवापूजेसाठी ॥१५॥सर्वांच्या मागूनशिवाची करिती पूजाभोळ्या सांबालागी माझाप्रणिपात ॥१६॥खोलामध्ये नांदेनाही त्याचा गाजवाजाभोळ्या सांबा माझानमस्कार ॥१७॥रानीवनी वसेमाझा कैलासीचा राजाभोळ्या सांबालागी माझाप्रणिपात ॥१८॥स्मशानी वसतीअंगाला विभूतीपती तो पार्वतीवरीतसे ॥१९॥सर्पाची वेटाळीज्याच्या गळा वेढे देतीपती तो पार्वतीवरीतसे ॥२०॥भैरव भुतांचीनाचे मंडळी सभोतीपती तो पार्वतीवरीतसे ॥२१॥हातात डमरुत्रिशूळ दुज्या हातीपती तो पार्वतीवरीतसे ॥२२॥नंदीचे वाहनचंद्रमा माथ्यावरतीपती तो पार्वतीवरीतसे ॥२३॥जगाचे कल्याणाहलाहल सुखे पीतीपती तो पार्वतीवरीतसे ॥२४॥जगाच्या कल्याणाविषाचा घोट घेतीनीळकंठ झाली कीर्तीशंकराची ॥२५॥भोळा महादेवया भोळा म्हणू नयेत्याच्या जटेमध्येगुपित गंगा वाहे ॥२६॥भोळा महादेवभोळे याचे देणेत्याने मला दिलेत्याच्या विभूतीचे सोने ॥२७॥भोळा महादेवक्षणी प्रसन्न होतसेदुष्ट असो सुष्ट असोवर मागे तो देतसे ॥२८॥भोळा महादेवत्याला वाहा शिवामूठमग संसारी सुखाचीउषाताई तुला लूट ॥२९॥चिलू माझा वेसारापापड पसारानिघाला वेसवाराकैलासात ॥३०॥चिलू माझा दाणीयाभांगी भरल्या गोणीयानिघाल्या पेणीयाकैलासात ॥३१॥त्रिश्चरण चेतवलीमहानंदा घाली उडीआला धावूनी तातडीमहादेव ॥३२॥कुक्कुट मर्कुटमहानंदेने पाळीलेभद्रसेनेकडे आलेपुत्र दोन्ही ॥३३॥पतिव्रता मोठ्यापार्वती सावित्रीपवित्री धरित्रीत्यांच्यामुळे ॥३४॥योगिनी सावित्रीयमापाशी गेलीपति घेऊनिया आलीस्वर्गातूनी ॥३५॥पतिव्रता सावित्रीप्रतिज्ञा करुनी गेलीपति घेऊनिया आलीस्वर्गातूनी ॥३६॥योगिनी सावित्रीसंतोषवी यमराणामागते चुडेदानात्याचेपाशी ॥३७॥सासू - सासर्यांच्याआज्ञे गेली अरण्यातजाहली कृतार्थदोघेजण ॥३८॥यमाचे पाशातूनपति सोडवी सावित्रीजगती तिची कीर्तीनारी गाती ॥३९॥पति असे पाशीधैर्य बसे त्याच्यापाशीनाही झाली गोष्ट अशीभूमंडळी ॥४०॥सावित्री सावित्रीजरी म्हणतील ओठसौभाग्य नाही तुटभूमंडळी ॥४१॥सावित्री सावित्रीजरी म्हणतील नारीत्यांचे या संवसारीवज्रचुडे ॥४२॥सावित्री सावित्रीम्हणती ज्या नारीमंगळसूत्र दोरीअक्षै त्यांची ॥४३॥सावित्रीचे व्रतकरील जी नारीजन्म सावित्री संसारीहोईल ती ॥४४॥सावित्रीचे व्रतकरावे पवित्रएकावे चरित्रसावित्रीचे ॥४५॥यमधर्माला आडवीपतिव्रता किती मोठीअपूर्व केल्या गोष्टीसावित्रीने ॥४६॥सावित्रीचा महिमाअमर भूमंडळीअबला झाली बळीयमाहून ॥४७॥सतीच्या प्रभावेकाळही मणी खचेनाव घ्या सावित्रीचेसंसारात ॥४८॥रामाची गं सीतालक्ष्मणाची ग वयनीदशरथाची पहिलीज्येष्ठ सून ॥४९॥पाचा वरुषांचे रामअडचा वरुषींची सीताधन्य तुझी दशरथासून आली ॥५०॥सीतेला सासुरवासकैकयीने केलारामासारखा भ्रतारतिला नाही भोग दिला ॥५१॥अहिल्या शिळा झालीगौतमाची कांतारामराये वनी जाताउद्धरली ॥५२॥अहिल्या शिळा झालीपतीच्या श्रापानेदशरथाच्या लेकानेउद्धरिली ॥५३॥आश्चर्य आश्चर्यरामरायाच्या पायाचेशिळेतून वर येईरुप अहिल्या सतीचे ॥५४॥रामरायाच्या चरणाचाभूमीला गं लागे कणअहिल्या गं प्रगटलीन लागता एक क्षण ॥५५॥राम लक्ष्मणभरत शत्रुघ्नचौघांमध्ये कोणराज्य करी ॥५६॥राम लक्ष्मणगेले की काननातभरत मनातदुःखी कष्टी ॥५७॥रामसीता वनीमाय कैकयी पाठवीमनी भरत आठवीनित्य त्यांना ॥५८॥जटाधारी झालानिजतो सुखे भुईभरत जणू होईवनवासी ॥५९॥नको म्हणे राज्यभरत कैकयीलाबंधू नाही असा झालाजगत्रयी ॥६०॥नंदिग्रामी राहीसदा रामनाप जपेतपश्चर्या घोर तपेभरत बंधू ॥६१॥धन्य रे भरताधन्य रे तू भाऊतुझी कीर्ती राहूचिरजीव ॥६२॥धन्य रे भरताधन्य रे तुझे मनतुझ्या स्मरणे लोचनभरुनी येती ॥६३॥धन्य रे भरताधन्य रे तुझी भक्तीआलेले राज्य हातीसोडिले तू ॥६४॥धन्य रे भरताधन्य रे तुझी निष्ठाआलेले राज्य हातासोडियेले ॥६५॥राम चाले रथीलक्ष्मण चाले पायीएवढ्या पृथ्वीवरअसा बंधू झाला नाही ॥६६॥राम चाले वाटेलक्ष्मण झाडी खडेअसे बंधू झाले थोडेपृथ्वीवर ॥६७॥राम चाले वाटेलक्ष्मण झाडी काटेअसे बंधू नाही कोठेसंसारात ॥६८॥राम चाले वाटेलक्ष्मण झाडी पालाअसा बंधू नाही झालाभूमंडळी ॥६९॥ राम चाले वाटीलक्ष्मण झाडी मातीअसे बंधू झाले कितीकोण सांगा ! ॥७०॥राम सीता वनीलक्ष्मण फळे आणीअसा बंधू त्रिभुवनीभाग्य भेटे ॥७१॥रामकुंडावरीहिरवा मंडप जाईचाआंघोळीला आलापुत्र कौसल्याबाईचा ॥७२॥रामाच्या आंघोळीलापाणी नाही विसाणालाअमृताचे झरेलाविले गं पाषाणाला ॥७३॥रामकुंडावरीरामरायाची आंघोळीसावळी सीताबाईतेथे काढिते रांगोळी ॥७४॥रामकुंडावरी रामराया संध्या करीसावळी सीताबाईअमृताने तांब्या भरी ॥७५॥रामकुंडावरीरामरायाची आरतीसभामंडपातहात जोडून मारुती ॥७६॥रामकुंडावरीकुंवारणींची झाली दाटीपरकर चोळ्या वाटीसीताबाई ॥७७॥रामकुंडावरीब्राह्मणांची झाली दाटीधोतरजोडे वाटीरामराया ॥७८॥रामकुंडावरीसवाष्णीची झाली दाटीहळदीकुंकू वाटीसीतादेवी ॥७९॥रामकुंडावरीरामरायाची बिछाईतेथे पाय चेपीसावळी सीताबाई ॥८०॥रामकुंडावरीरामरायाची बिछाईतेथे विडा देतेसावळी सीताबाई ॥८१॥रामाला आला घामसीता पुसते घोळानेपाहातसे तिच्या मुखारामराया गं प्रेमाने ॥८२॥रामराया आला घामसीताबाई घाली वारापतिसंगतीत प्रेमेवनवास कंठी सारा ॥८३॥रामरायाला पडसेसीता देते त्याला आलेपंचवटीमध्ये त्यांचे पर्णकुटी घर झाले ॥८४॥रामराया लावीजाई मोगर्यांची फुलेसावळी सीताबाईशिंपीतसे त्यांना दळे ॥८५॥रामाला पुसतेसीता पाखरांची नावेरामरायाने हसावेकौतुकाने ॥८६॥सीता रागावलीरानी रुसून बैसलीरामराये हसविलीस्पर्शमात्रे ॥८७॥लक्ष्मण आणिसीतामाईला मोरपीसेसावळी सीताबाईत्यांचे करीतसे पंखे ॥८८॥राम लक्ष्मणजसे मोतियांचे बाणमध्ये शोभे सूर्यपानसीताबाई ॥८९॥राम लक्ष्मणमोतियांची जोडीमध्ये शोभती लालडीसीताबाई ॥९०॥राम लक्ष्मणजसे धनुष्य बाणमध्ये लावण्याची खाणसीतादेवी ॥९१॥राम लक्ष्मणजसे मोतियांचे हारशेवंती सुकुमारसीताबाई ॥९२॥सीता वनवासीझाडांशी सांगे गोष्टदुष्ट ग रावणतेथे ठेवी पापी दुष्टी ॥९३॥सोन्याच्या चोळीचामोह सीतेला सुटलाकोण प्रपंची विटलीसर्व सुखा ॥९४॥सीतेला लोभ जडेरामराया मोह पडेहोणार ते ते घडेलल्लाटीचे ॥९५॥ जटायू तो पक्षीरामासाठी मेलामरुन धन्य झालासंसारात ॥९६॥शबरीची बोरेउष्टीमाष्टी खाशीतू रे दिसशी अधाशीरामराया ॥९७॥शबरीची बोरेउष्टीमाष्टी खाशीशतजन्माचाउपाशी रामराया ॥९८॥शबरीची बोरेएकटा राम खाईसीतेचे त्याच्याशीमग गोड भांडण होई ॥९९॥शबरीची बोरे अमृताहून गोडकोण ठेविल त्यांना खोड त्रैलोक्यात ॥१००॥शबरीची बोरेरामे मटकावीलीशबरी मुक्त केलीसंसारात ॥१०१॥सीतेच्या शोधासाठीरामाने दिली सरीमारुती गं रायामग पडला विचारी ॥१०२॥सीतेच्या शोधासाठीरामाने दिली माळसमुद्र लंघुनीगेले अंजनीचे बाळ ॥१०३॥अशोकाचे खालीसीता रडतसेमारुती देतसेआश्वासन ॥१०४॥अशोकाचे खालीसीताबाई शोक करीहनुमंते खूण दिलीरामरायाची ॥१०५॥अशोकाचे खालीसीतेची गळेसरीतेथे मारुतीची फेरीरात्रंदिस ॥१०६॥अशोकाचे खालीसीतेचा कमरपट्टातेथे मारुती झपाटारात्रंदिस ॥१०७॥अशोकाचे खालीसीतामाईचे कांकणतेथे मारुती राखणरात्रंदिवस ॥१०८॥अशोकाचे खालीसीताबाईची ही नथतेथे मारुतीचा पथरात्रंदिवस ॥१०९॥अशोका फुलेशेंदरी रंगाचीफार आवडीचीजानकीच्या ॥११०॥अशोकाच्या झाडाफुलांचा नित्य बहरसीतादेवीच्या डोळ्यांचात्याला मिळतो पाझर ॥१११॥अशोकाची फुलेझुबके झुबकेपाहते कौतुकेदुःखी सीता ॥११२॥अशोकाच्या झाडासीता घाली पाणीनेत्र येतात भरोनीरात्रंदिस ॥११३॥अशोकवचनीका हो सुकुमार फुलेजानकीच्या नेत्रातीलपोसली ती नित्य जळे ॥११४॥अशोकवनींच्याफुलांना का गोड वासजानकीच्या त्यांना लागेनित्य श्वासोच्छवास ॥११५॥अशोकवनातफुलांचा सडा पडेपरंतु सीता रडेरात्रंदिस ॥११६॥सागरावरतीसेतू बांधिला बाणांचादशरथाच्या पुत्राचापराक्रम ॥११७॥सागरावरतीसेतू बांधला वानरीतुझ्यासाठी ग सुंदरीसीताबाई ॥११८॥राम टाकी शिळापरि बुडाल्या त्या तळीरामाच्या नावाचीशिळा परि तरे जळी ॥११९॥हसून मारुतीम्हणे राम रघुनाथादेवा, तुमच्याहीपेक्षातुमच्या नावाची योग्यता ॥१२०॥रामाच्या नावानेशिळा सिंधूत तरतीआणि शिवाशंकराच्याविषवेदना थांबती ॥१२१॥रामाच्या नावानेशिळा सागरी तरतीसंसारी त्याच्या नावेजडमूढ उद्धरती ॥१२२॥राम चाले वाटेलक्ष्मण झाडी वाळूरामाचे बाण हळूलंकेवरी ॥१२३॥हस्ती झाले मस्तगगनी उडे राखरामाचे बाण लाखलंकेवरी ॥१२४॥हस्ती झाले मस्तगगनी उडे वाळूरामाचे बाण हळूलंकेवरी ॥१२५॥ हस्ती झाले मस्तगगनी उडती दगडरामाचे बाण रगडलंकेवरी ॥१२६॥हस्ती झाले मस्तगगनी उडे रेतीरामाचे बाण येतीलंकेवरी ॥१२७॥हस्ती झाले मस्तगगनी उडे चुनारामाचे बाण पुन्हालंकेवरी ॥१२८॥हस्ते झाले मस्त गगनी उडे गोळारामाचे बाण सोडालंकेवरी ॥१२९॥हस्ती झाले मस्तगगनी उडे सूपरामाचे बाण खूपलंकेवरी ॥१३०॥हस्ती झाले मस्तआकाशी काळोखरामाचे बाण लाखलंकेवरी ॥१३१॥हस्ती झाले मस्तगगनी अंधाररामाची बाणधारलंकेवरी ॥१३२॥हस्ती झाले मस्तगगनी उडे मातीरामाचे बाण येतीलंकेवरी ॥१३३॥इंद्रजीत मारीलक्ष्मण ब्रह्मचारीरडते त्याची नारीसुलोचना ॥१३४॥बारा वर्ष राहीनिराहार ब्रह्मचारीम्हणून सौमित्ररावणाच्या पुत्रा मारी ॥१३५॥मारिला इंद्रजितदिली दऊत देखणीलक्ष्मुणे घात केलाभुजा दाखवी लिहुनी ॥१३६॥रामाचे ह्रदयकठिण वज्राचेअग्नीत सीतेचेसत्त्व पाही ॥१३७॥रामाचे ह्रदयजणू कठिण पाषाणफूल आगीत घालूनबघतसे ॥१३८॥पुष्पक विमानीरामाच्या जवळीशोभली सावळीसीताबाई ॥१३९॥शोभली जानकीरामरायाच्या मांडीवरीसीतेच्या तोंडावरीप्रसन्नता ॥१४०॥भरता भेटलाभेटला ह्रदयालारामरायाने न्हाणीलानेत्रजळे ॥१४१॥भरताच्या पाठीवरराम फिरवितो हातबारा वरसांचे कष्टदूर केले ॥१४२॥बारा वरसांनीकौसल्या भेटे रामाह्रदयी दाटे प्रेमामाउलीच्या ॥१४३॥कौसल्या माउलीरामाला धरी पोटीउमटेना शब्द ओठीकाही केल्या ॥१४४॥वाजंत्री वाजतीवाजती माळावरराज्य अभिषेककौसल्याच्या बाळावर ॥१४५॥वाजंत्री वाजतीचला सख्यांनो पाहायलारामाची आरतीजाते मारुतीरायाला ॥१४६॥राम लक्ष्मणअर्धांगी सीता नारीसेवेशी ब्रह्मचारीमारुतीराय ॥१४७॥राम लक्ष्मणअर्धांगी सीता शोभेसेवेशी दास उभेमारुतीराय ॥१४८॥सतरंज्यांना ठसेलोडांना आरसेरामरायाच्या सभे बसेमारुतिराय ॥१४९॥सतरंज्यांना ठसेशोभती कमानीरामरायाच्या दिवाणीमारुतीराय ॥१५०॥शिंदेशाही तोडेसीताबाईच्या हातातरामरायाच्या रथातउजेड पडे ॥१५१॥शिंदेशाही तोडेराम सीतेला देणाररामरायाच्या रथातत्याचा उजेड पडणार ॥१५२॥चला जाऊ पाहूरामरायाची बिछाईशेजारी रत्न टीकसीताबाई ॥१५३॥चला जाऊ पाहूरामरायाची बैठकहसून विडा देईसीताबाई ॥१५४॥नदीपलीकडेकोणाची पालखीरामरायाची जानकीउतरली ॥१५५॥मोठी मोठी मोतीरामरायाच्या सदर्यालाराणी मागते गजर्यालासीताबाई ॥१५६॥मोठी मोठी मोतीरामरायाच्या कोटालाराणी मागते गोटालासीताबाई ॥१५७॥मोठी मोठी मोतीरामरायाच्या पगडीलाराणी मागते बुगडीलासीतादेवी ॥१५८॥शिंदेशाही तोडेसीताबाई कधी केलेराम इंदूरला गेलेत्याच्यासाठी ॥१५९॥शिंदेशाही तोडेराम सीतेला देणारापंचवटीचे सोनारकारागीर ॥१६०॥मोठी मोठी मोतीरामरायाच्या पलंगालाराणी मागे लवंगालासीतादेवी ॥१६१॥मोठी मोठी मोतीरामरायाच्या जोड्यालाराणी मागते तोड्यालासीतादेवी ॥१६२॥राम रथामध्येलक्ष्मण घोड्यावरीमधून जाते डोलीजानकीची ॥१६३॥सीतेला डोहाळेरामाला काय कळेनिंबोणी रस गळेशेल्यावरी ॥१६४॥सीतेला डोहाळेरामाला सांगावेरुमाली आणावेबाळ आंबे ॥१६५॥सीता वनवासीदगडाची केली उशीअंकुश बाळ कुशीवाढतसे ॥१६६॥सीता वनवासीदगडाची केली उशीएवढ्या अरण्याततिला झोप आली कशी ॥१६७॥सीता वनवासीवनी कंटकांची दाटीपाच महिन्यांचाअंकुश बाळ पोटी ॥१६८॥सीता वनवासीदगडाची करी गादीएवढ्या अरण्याततिला झोप आली कशी ॥१६९॥सीता वनवासीदगडाची केली बाजअंकुश बाळ नीजवनामध्ये ॥१७०॥पाच महिन्याचाअंकुश असे पोटीघोर अरण्यातसीतामाई केर लोटी ॥१७१॥बाणामागे बाणबाण येतील मागे पुढेरामाच्या बाणांचेलवांकुश कडी - तोडे ॥१७२॥बाणांमागे बाणबाण येती ग पिवळेरामाशी लढतीलवांकुश ग कोवळे ॥१७३॥बाणामागे बाणबाण येती झराझरारामाच्या बाणांचालवांकुश ग कडदोरा ॥१७४॥सीतेला सासुरवासअसा केला केसोकेसीसीता गेली निजघामातिने वाटला देशोदेशी ॥१७५॥सीतेला सासुरवासअसा केला परोपरीसीता गेली निजधामातिने वाटला घरोघरी ॥१७६॥सीतेला वनवासकैकयीने नेली फणीतिने बारा वर्षे वेणीवर्ज्य केली ॥१७७॥सीतेला सासुरवासकैकयीने केलाबारा वर्षे दिलावनवास ॥१७८॥सीतेला डोहाळेकैकयीने केलेराम नाही दाखविलेबारा वर्षे ॥१७९॥सीता सांगे कथाआपुल्या कर्माचीपापिष्टा रावणाचीलंका जळली ॥१८०॥राम गेल वनामारिले रावणाराज्य दिले बिभीषणासोनियाचे ॥१८१॥सीता सांगे स्वप्नऐक रे शहाण्यासवतीवरी कन्यादेऊ नये ॥१८२॥सीता सांगे स्वप्न ऐक मंदोदरीराम लंकेवरीस्वार झाले ॥१८३॥सीता सांगे स्वप्नऐक मंदोदरीइंद्रजीत मारीलक्ष्मण ॥१८४॥सीता सांगे स्वप्नऐक मंदोदरीराक्षस वानरीसंहारिले ॥१८५॥सीतेच्या श्रापानेडोंगर जळतीवानर म्हणती रामनाम ॥१८६॥सीतेच्या श्रापानेलंकेची झाली होळीतोंडे झाली काळीवानरांची ॥१८७॥आधी नमन करुअंजनीच्या सुतामारुती हनुमंतारामभक्ता ॥१८८॥आधी नमन करुअंजनीबाईलामग मारुतीरायालातिच्या पुत्रा ॥१८९॥अंजनीबाई म्हणेबाळ माझा बळिवंतद्रोणागिरी पर्वतउचलिला ॥१९०॥घडीत आणीलापर्वताचा चेंडूहनुमंत वंदूरामदूत ॥१९१॥मनाचाही वेगमारुतीच्या मागेलंकेला रागे रागेजाळीतसे ॥१९२॥एकाच उडीतसमुद्र ओलांडीजाऊनी सीता बंदीरामदूत ॥१९३॥रामाचा सेवकमारुतीराया तो मानाचाविडा पिकल्या पानांचासुकुनी गेला ॥१९४॥पहाटेच्या प्रहर रात्रीमला वेशीकडे जाणेत्याचे दर्शन आहे घेणेमारुतीरायाचे ॥१९५॥राम राम म्हणतदारावरुन कोण गेलारामराया तुझा चेलामारुतीराय ॥१९६॥राम राम म्हणुनीनदीत कोण गेलारामराया तुझा चेलामारुतीराय ॥१९७॥माझा गं दयाळूवेशीच्या बाहेर उभामारुतीरायाचाशेंदरी लाल झगा ॥१९८॥रामाच्या बैसलीअर्धांगी सीता नारसेवेला ब्रह्मचारीमारुतीराय ॥१९९॥ध्यान गं यशोदानेसली कशीदामांडिये मुकुंदान्हाणीयेले ॥२००॥दैवाची यशोदानेसली पिवळेमांडिये सावळेपरब्रह्म ॥२०१॥दैवाची यशोदानेसली शेलारीबैसली श्रीहरीदूध पाजू ॥२०२॥दैवाची यशोदानेसली पातळमांडीये घननीळानाचतसे ॥२०३॥कृष्णाची यशोदानेसली जरतारीमांडिया मुरारीदूध पीई ॥२०४॥यशोदेचे निर्याकृष्ण धरुन उभा राहीचंद्रमा म्हणे देईखेळावया ॥२०५॥गायींना चारितोयमुनेच्या तटीभक्तांना संकटीसांभाळितो ॥२०६॥कृष्ण टाकी उडीकळंब कडाडलाशेष दणाणलापाताळात ॥२०७॥कृष्ण उडी टाकीकळंबाच्या मेजेयमुने पाणी तुझेगढूळले ॥२०८॥गायीगुरे चारीवाजवितो पावागोपाळकृष्ण घ्यावागोकुळीचा ॥२०९॥ खांदिये घोंगडीअधरी धरी पावागोपाळकृष्ण गावागोकुळीचा ॥२१०॥हाती शोभे काठीगवळे सवंगडीखांदिये घोंगडीकृष्णजीच्या ॥२११॥मोरमुगुट माथागळा वनमाळास्मरावा सावळागोकुळीचा ॥२१२॥गोपाळकाला करीयमुनेच्या तीरीहोऊन गोवारीनंदजीचा ॥२१३॥दैवाचा तू नंदधन्य दैवाची यशोदाआनंदाच्या कंदाखेळविले ॥२१४॥ज्याच्या नावे होतीसंसारात मुक्तयशोदा बांधीतत्याला दावे ॥२१५॥राक्षस संहारीकाळिया विहारीयशोदा त्याला मारीवेताटीने ॥२१६॥तोंडात दाखवीविश्व ब्रह्मांड सगळेतेव्हा यशोदे कळलेबाळरुप ॥२१७॥कृष्णे काळियाचीमर्दियेली फणीकाढीयला मणीमस्तकींचा ॥२१८॥गोविंद गोविंदगोविंद ध्यानी मनीगोविंद गोपांगणी क्रीडा करी ॥२१९॥वाजवून पावावेध लावी सर्वांगोपाकृष्ण घ्यावागोकुळीचा ॥२२०॥दही, दूध, लोणीचोरुन वाटितोकौतुक करितोबाळकृष्ण ॥२२१॥का गं सखी तुझेडोळे लाल धुंदकाननी गोविंदवाजवितो ॥२२२॥गोवर्धनगिरीबोटाने उचलीवाढतो गोकुळीकंस शत्रू ॥२२३॥गायी गोवर्धनीचरती बारा रानेपावा जनार्दनेवाजविला ॥२२४॥यशोदा म्हणतेकृष्ण माझा वरसाचाकसा तो गोरसाचानाश करी ॥२२५॥कृष्णनाथ काळाजसा उडीदाचा दाणासोळा सहस्र गोपांगनाभुलविल्या ॥२२६॥माझ्या दारावरुनरंगीत गाडी गेलीकृष्णाने राधा नेलीगोकुळात ॥२२७॥वाढता वाढतासुटे द्रौपदीची चोळीगोविंद सांभाळीतिची लाज ॥२२८॥चतुर्भुज केलीद्रौपदी निज सखीभक्ताची लाज राखीभगवंत ॥२२९॥दोन हाती वाढीदोन हाती बांधीसावळी द्रौपदीमांडवात ॥२३०॥राजसूय यज्ञीदुर्जन हसलेचतुर्भुज देवे केलेद्रौपदीला ॥२३१॥राजसूय यज्ञीद्रौपदीचे तुटे बिरडेचतुर्भुज की गोविंदेतिला केले ॥२३२॥जाहले कौतुकटकमक पाहतीपाठीराखा कमळापतीद्रौपदीचा ॥२३३॥पाठीची बहीणसुभद्रा होती जरीप्रीती द्रौपदीची वरीगोविंदाची ॥२३४॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी मीठनथीतील टीकझळाळती ॥२३५॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी ताकतिच्या दंडातील वाकझळाळली ॥२३६॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी मठ्ठाकमरेचा कमरपट्टाझळकला ॥२३७॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी भातनाकातील नथझळकली ॥२३८॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी खिरीगळ्यातील सरीझळकली ॥२३९॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी वडेहातातील तोडेझळकले ॥२४०॥राजसूय यज्ञीद्रौपदी वाढी लोणचेकृष्णाचे पान कोणचेविचारिते ॥२४१॥राजसूय यज्ञीघंटानाद झालाकृष्ण सांगे अर्जुनालाशुकमहाराज आला ॥२४२॥राजसूय यज्ञीपूजा झाली ग कोणाचीझाली गोपाळकृष्णाचीगोविंदाची ॥२४३॥द्रौपदीबाई म्हणेनव्हे माझा सख्खा भाऊमायेचा कृष्णनाथकिती त्याची वाट पाहू ॥२४४॥द्रौपदीमाई म्हणेजळो देवा माझे जिणेकौरवांच्या सभे दुष्टगांजियले दुर्योधने ॥२४५॥वस्त्र फेडी दुर्योधनपहिला पितांबरपाठीशी दामोदरद्रौपदीच्या ॥२४६॥वस्त्र फेडी दुर्योधनदुसरी पैठणीपाठीशी चक्रपाणीद्रौपदीच्या ॥२४७॥वस्त्र फेडी दुर्योधनतिसरी वल्लरीपाठीशी मुरारीद्रौपदीच्या ॥२४८॥वस्त्र फेडी दुर्योधनचवथा ग शेलापाठीशी सावळाद्रौपदीच्या ॥२४९॥वस्त्र फेडी दुर्योधनपाचवे अमोलपाठीशी घननीळद्रौपदीच्या ॥२५०॥वस्त्र फेडी दुर्योधनसहावे जरतारीपाठीशी कंसारीद्रौपदीच्या ॥२५१॥वस्त्रे फेडूनीयापापी चांडाळ दमलाकैवारी कृष्ण झालाद्रौपदीचा ॥२५२॥तुळशीपानांच्यालाविल्या पत्रावळीजेविले वनमाळीद्वारकेत ॥२५३॥देव भावाचा भुकेलाविदुराच्या कण्या खातोअर्जुनाचे घोडे धुतोनारायण ॥२५४॥देव भावाचा भुकेलाविदुराच्या कण्या भक्षीअर्जुनाचे घोडे रक्षीनारायण ॥२५५॥पांडवांची घरेसोनियाच्या भिंतीएवढ्या इमारतीसोडून गेले रात्री ॥२५६॥चक्रव्युही शिरेपुत्र प्रतापी पार्थाचाभाचा प्रत्यक्ष कृष्णाचाअभिमन्यू ॥२५७॥चक्रव्यूही शिरेलाडका अर्जुनाचापती उत्तराबाईचाअभिमन्यू ॥२५८॥अभिमन्यू बाळसिंहाचे ग पिलूलागले सारे पळूकौरवांचे ॥२५९॥अभिमन्यू बाळगरुडाचे ग पिलूलागले सारे पळूकौरवांचे ॥२६०॥अभिमन्यू बाळसर्व मिळून मारितीअधर्मयुद्ध करितीद्रोणादीही ॥२६१॥उत्तरेचा कंथलढून पडलापाय त्याला हो मारिलाजयद्रथे ॥२६२॥गोविंद गोविंदमुखाने म्हणतरणांत पडत अभिमन्यू ॥२६३॥गोविंद गोविंदमंजुळ मुखी वाचापती पडे उत्तरेचारणांगणी ॥२६४॥दुरुन दिसतोसोन्याचा कळसकृष्ण - अर्जुनांचा रथयेत असे ॥२६५॥कळीचा नारदत्रैलोक्यात हिंडेदुष्टांचे धिंडवडेकरीतसे ॥२६६॥कळीचा नारदउभारितो शेंडीविणा तो खाकुंडीशोभे सदा ॥२६७॥कळीचा नारदउडते त्याची शेंडीउच्चार सदा तोंडीरामनामाचा ॥२६८॥कळीचा नारदत्याचे रुप कोणा कळेदुष्टांचा गर्व गळेत्याच्यामुळे ॥२६९॥वाल्याचा वाल्मिकीनारदाने केलाअसा कोण आहेसंती नाही उद्धरिला ॥२७०॥तुळशी करु पूजातुळशीला आल्या शेंगापतिव्रता माझी गंगाउषाताई ॥२७१॥तुळशी गं बाईहिरवा तुझा पालासत्यभामेने गोविंदालादान दिले ॥२७२॥तुळशीला पाणी घालीतुळस कोवळीपुत्र मागते सावळीउषाताई ॥२७३॥तुळशी गं बाईतुझा जन्म रानीवनीबैस अंगणातजागा देते वृंदावनी ॥२७४॥तुळशीला पाणी घालीतुळशीखाली बसेप्रत्यक्ष गंगा दिसेमायबाई ॥२७५॥सकाळी उठोनीतोंड पाहिले एकीचेमाझ्या जीवाच्या सखीचेतुळशीबाईचे ॥२७६॥तुळस पिकलीतिला आल्या शेंगातिला पाणी घालीमाउली माझी गंगा ॥२७७॥तुळशी गं मायेतुझ्या मंजुळ्या झळकतीतेथे कृष्णनाथ खेळतीसारीपाट ॥२७८॥काशी काशी म्हणूनलोक जाती गं धावतकाशी माझ्या अंगणाततुळसादेवी ॥२७९॥तुळशी ग बाईतुझे वाळून झाले फाटेपलंगाला केली गातेगोविंदाच्या ॥२८०॥तुळशी ग माईहिरवा तुझा पालाशेल्याला रंग दिलाभाईरायांनी ॥२८१॥तुळशी ग बाईतुझी कातर कातर पानेयेता जाता गोविंदानेविडा नेला ॥२८२॥काशी काशी म्हणूनीलोक जाती दुरीकाशी माझ्या घरीतुळसादेवी ॥२८३॥संध्याकाळ झालीवाजले गं साततुळशीला हातजोडीयेले ॥२८४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP