मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| बहीण भाऊ ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - बहीण भाऊ मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी बहीण भाऊ Translation - भाषांतर दसर्यापासून दिवाळी विसा दिशीमज माघारा कधी नेशी भाईराया ॥१॥माझ्या दारावरनं रंगीत गाडया गेल्याभावांनी बहिणी नेल्या दिवाळीला ॥२॥भाऊबिजेच्या रे दिवशी लोकांचे भाऊ येतीवाट तुझी पाहू किती भाईराया ॥३॥ मुले पुसताती केव्हा मामा गं येईलकाय उत्तर देईल बहिण तुझे ॥४॥मुले पुसताती येईना का गं मामागुंतला काही मामा माय बोले ॥५॥कोणत्या कामांत भाईराया गुंतलासीबहिणीची कासावीशी होत आहे ॥६॥शेजी मला पुसे येऊन घडीघडीकधी माहेराची गाडी येणारसे ॥७॥पूर ओसरले नदीनाले शांत झालेअजून का न भाई आले बहिणीसाठी ॥८॥नवरात्र गेले दसरा दूर गेलानेण्याला का न आला भाईराया ॥९॥असेल आजारी काय माझा भाऊआयुष्य त्याला देऊ देवराया ॥१०॥दूरच्या देशीचा शीतळ वारा आलासुखी मी अईकीला भाऊराया ॥११॥दूरच्या देशीचा सुगंधी येतो वातअसेल सुखात भाईराया ॥१२॥लागेल घालावी फार मोठी ओवाळणी चिंता काय अशी मनी भाईराया ॥१३॥पान फूल पुरे पुरे अक्षता सुपारीनको शेला जरतारी भाईराया ॥१४॥नको धन नको मुद्रा नको मोतियांचे हारदेई प्रेमाश्रूंचीधार भाईराया ॥१५॥दादा बाळपणी तुला चावा मी घेतलात्याचा काय राग आला आज तुला ॥१६॥दाणे भातुकलीचे खाशी म्हणून बोलल्येतेच काय मनी धरिले आज दादा ॥१७॥अपराध पोटी प्रेम थोरांचे घालीत येई धावत धावत भाईराया ॥१८॥पाठच्या बहिणीवरी भाऊ कसा रागावेलचंद्र आग का ओकेल काही केल्या ॥१९॥पाठच्या बहिणीवरी भाऊ का संतापेल कस्तुरी का सोडील निज वास ॥२०॥पाठच्या बहिणीवरी भाऊ कसा हो रुसेलकधी सोने का कुसेल काही केल्या ॥२१॥पाठच्या बहिणीवरी भाऊ का रागावेल रंग का बदलेल आकाशाचा ॥२२॥पाठच्या बहिणीवरी जरी रागावेल भाऊ तरी म्हणेल कोण राहू संसारात ॥२३॥सोड सारा राग रुसवा टाक सारापुसाव्या माझ्या धारा लोचनीच्या ॥२४॥सोड सारा राग तुला राग ना शोभतयेई धावत धावत भाईराया ॥२५॥सोड सारा राग रागाचे होवो हसू डोळयांचे माझे असू दादा पूस ॥२६॥ताईच्या बाळांचे येऊन घेई मुकेखेळव कौतुके भाचेयांना ॥२७॥येरे येरे माझ्या बाळे बोलती अंगणी डोळयांना माझ्या पाणी येते बघ ॥२८॥येईल आता मामा आणील आम्हा खाऊमुले सांगती मुलांना रडे येते मला भाऊ ॥२९॥येरे येरे मामा मुले बोलती नाचत प्रेमे भरे माझे चित्त कोणा सांगू ॥३०॥मागे त्यांनी तुला रागे कागद लिहिलात्याचा काय राग आला भाईराया ॥३१॥न्यावया आलास नाही पाठविली त्यांनीअढी काय त्याची मनी धरिलीस ॥३२॥आपलेच ओठ दादा आपलेच दातथोर सारे विसरत मागील रे ॥३३॥नको काही मनी ठेवू भाऊ येईल लगबगमायबापांची ती बघ आण तुला ॥३४॥मायबाप मेल्यावरी मग कोठले माहेर काय खरे हे होणार शब्द दादा ॥३५॥शेवटील शब्द आई तुला जे बोललीकाय विस्मृती पडली त्यांची दादा ॥३६॥ताईला प्रेम देई तिला रे तूच आतामाय बोले मरता मरता दादा तुला ॥३७॥ताईला प्रेम देई तुला ती तिला दूचनको कधी विसंबूस माय बोले ॥३८॥नको ताईला विसरु बाबा बोलले आठवमला गाडी तू पाठव भाऊबीजे ॥३९॥कोणापुढे रडू कोणापाशी बोलूकधी येईल मायाळू भाईराया ॥४०॥येरे येरे भाऊ किती झाले दडपणकधी ह्रदय उघडनी तुझ्यापुढे ॥४१॥येरे येरे भाऊ किती पाहावी रे वाटपाण्याचा चाले पाट डोळयांतून ॥४२॥येरे येरे भाऊ भेटीला वर्षे चारपाहू नये अंत फार बहिणीचा ॥४३॥येरे येरे भाऊ किती वरसं नाही भेटीकधी पडशील दृष्टी भाईराया ॥४४॥जिव्याच्या जिवलगा प्रेमाच्या सागरासुखाच्या माहेरा येई भाई ॥४५॥जिवाच्या जीवना अमृताच्या सिंधूयेई गा तू बंधू उठाउठी ॥४६॥पावलोपावली किती करु आठवणडोळे येतात भरुन भाईराया ॥४७॥वार्या वार्या सांग भाईरायाची खुशालीधार संतत लागली माझ्या डोळा ॥४८॥अरे वार्या वार्या करिशी भिरीभिरीभावाच्या कानावरी हाक घाली ॥४९॥अरे वार्या वार्या धावशी लांबलांबबहिणीचा निरोप सांग भाईरायाला ॥५०॥का रे सकाळीच कावळ्या का का करिशीकाय न्याया येतो मशी भाईराया ॥५१॥कावळया कावळया लांब जाई रे उडूनदेई निरोप सांगून भाईरायाला ॥५२॥दाणे मी घालीते नित्य तुम्हा अंगणातभावाची आणा मात चिमण्यानो ॥५३॥नाही हाकलीले कधी अंगणामधूनयावे निरोप सांगून भाईरायाला ॥५४॥डोळे फडफडे घास गळे तोंडातूनकाय येतसे दुरुन भाईराया ॥५५॥उचकी लागली मला सकाळपासूनकाय येतसे दुरुन भाईराया ॥५६॥काय वयनीने भूल फार रे पाडलीम्हणून नाही झाली आठवण ॥५७॥वाट मी पाहात्ये डाक रे मार्गाचीसख्या तुझ्या रे पत्राची दादाराया ॥५८॥दुपारचे ऊन घाटीडोंगर कोण घेतोबहिणीसाठी भाऊ येतो भाऊबीजे ॥५९॥दुपारचे ऊन लागते सणसणशेला घेतो पांघरुन भाईराया ॥६०॥दुपारचे उन लागते शेल्यांतूनघोडी काढी बागेतून भाईराया ॥६१॥सूर्यनारायणा तापू नको फारयेतसे सुकुमार भाईराया ॥६२॥तांबडे पागोटे उन्हाने भडक्या मारी सुरुच्या झाडाखाली भाईराया ॥६३॥तांबडे पागोटे सोडीतो बांधतोचाल पुण्याची काढीतो भाईराया ॥६४॥कावळा का का करी दहीभात मागेपाहुणा येतो सांगे भाईराया ॥६५॥कावळा कोकावे घराच्या आढ्यावरीपाहुणा येतो घरी भाईराया ॥६६॥दिवस मावळला केळीच्या कोक्यातमला माघारा सोप्यात भाईराया ॥६७॥ दिवस मावळला कण्हेरी आड गेलामला माघार काल आला भाईराया ॥६८॥आई आली आली मामाची गाडी आलीमुलांची हाक झाली अंगणात ॥६९॥मामाची गाडी आली बहीण आनंदलीआनंदे वोसंडली चित्तवृत्ती ॥७०॥भावाला पाहून बहीण गहीवरेडोळियांचे झरे वाहताती ॥७१॥पूर ओसरतो बहिणीच्या डोळियांचा बोलते गोड वाचा बहीण भावा ॥७२॥तुला आळवीत बैसल्ये होत्ये दादाकाय वयनीच्या नादा गुंतलास ॥७३॥तुल आठवीत बैसल्ये दादा देखकाय ऐकलीस हाक भाईराया ॥७४॥आहेस खुशाल खुशाल वैनीबाईसांग सांग सारे भाई भूकेलेली ॥७५॥काय होतासे आजारी डोळे तुझे गेले खोलबोल रे सख्या बोल भाईराया ॥७६॥किती दिवसांनी भेटशी तू रे मलाअमृताचा रस भाईराया चाखवीला ॥७७॥प्रकृतीची दादा नको करु हेळसांडबहिणीशी बोल मनीचे दुःख सांड ॥७८॥प्रवासाचा शीणे नाही ताई मी आजारीहळूवार चित्तभारी ताई तुझे ॥७९॥ताईला पाहून पळाला सारा शीणभावाला बहीण अमृताची ॥८०॥पाहूण बहीण सारी दुःखे दुरावतीह्रदयी भरती प्रेमपूर ॥८१॥दिवाळीच्या सणादादा सासुरवाडी जावेभाऊबीजे भाई यावे बहिणीकडे ॥८२॥बहिणीची मुलेभाऊ खेळवू लागलाजरी थकला भागलाप्रवासाने ॥८३॥शेजारिणी बाईउसने द्यावे गहूपाहुणे आले भाऊफारां दिशी ॥८४॥शेजारिणी बाईउसने द्यावे लोणीभाऊ माझा गं पाहुणात्याला शिरा मेजवानी ॥८५॥जिरेसाळी गहूखिरीला किती घेऊजेवणार माझे भाऊपाचजण ॥८६॥सोनसळे गहूरवा येतो दाणेदारफेण्यांचे जेवणारभाईराया ॥८७॥सोनसळे गहूत्यांत तुपाचे मोहनभाऊबीजेचे जेवणभाईरायाला ॥८८॥माझ्या घरी पाहुणाभाजीभाकरीचाजेवणार साखरेचाभाईराया ॥८९॥चंदनाचे पाटमांडीले हारोहारीआज आहे माझ्या घरीभाऊबीज ॥९०॥भाऊबीज केलीबहिणीने कालभाईराया हिरवी शालपांघुरला ॥९१॥भाऊबीज केलीबहिणीने रातोरातीभाईराये चंद्रज्योतीउजळील्या ॥९२॥भाऊबीजेच्या रे दिवशीका रे भाई रुसलासीतुझा शेला माझ्यापाशी आठवण ॥९३॥सोन्याची साखळीदेत्ये मी बजावूनतू भाऊ मी बहीणभाईराया ॥९४॥भाऊबीजेच्या दिवशीकरीन कवतूकओवाळीन पालखीतभाईराया ॥९५॥भाऊबीज करुआपण दोघीतीघीशाल घेऊन मनोजागीभाईरायाला ॥९६॥भाऊबीजेच्या दिवशीभाऊ बसला न्हाऊनचल सखे ओवाळूनताईबाई ॥९७॥भाऊबीजेच्या दिवशीओवाळीन तुलाजरीचा खण मलाभाईराया ॥९८॥भाऊबीजेच्या दिवशीओवाळीत जातेताटी घाला मोत्येभाईराया ॥९९॥हात भरला कांकणानेकान भरला चाफाने केले माहेर भावानेबहिणीला ॥१००॥माझ्या दारावरुनहरदासी मेळा गेलात्यात मी ओळखीलाभाईराया ॥१०१॥हजाराचा घोडाबाजारांत उठे बसेबहिणीचे घर पुसेभाईराया ॥१०२॥माझ्या दारावरुनकोण गेला गं सुरंगीहाती रुमाल पंचरंगीभाईराया ॥१०३॥अंबारीचा हत्तीरस्त्याने उठे बसेमाझा भाईरायाबहिणीचे घर पुसे ॥१०४॥मुंबई शहरातगल्लोगल्ली चिरेत्यांतून सखा फिरेभाईराया ॥१०५॥भाऊबीजेकारणेतुम्ही यावे भाईसंगे आणा वैनीबाईउषाताई ॥१०६॥माझ्या दारावरुनटपालवाला येतोमाझ्या गं भाईरायाचेखुशालीचे पत्र देतो ॥१०७॥निरोप धाडित्येनिरोपासरशी चिठ्ठीसत्वर याचे भेटीभाईराया ॥१०८॥दळण मी दळीकाढीते रवापीठी धाडित्ये तुम्हा भेटीभाईराया ॥१०९॥निरोप धाडित्येनिरोपासरसे यावेभेटून मला जावेभाईराया ॥११०॥वाईट हा रस्ताटाकी लावून फोडावाछकडा रंगीत पाठवावाभाईरायाला ॥१११॥नदीच्या पलीकडेकोणाचे शेले भालेमातृभक्त माझे आलेभाईराज ॥११२॥चांदीच्या घंगाळातचंद्र सूर्य डोलेसखा कचेरीत बोलेभाईराया ॥११३॥काशीतले कागदआले डब्यातूनवाचले सभेतूनभाईरायाने ॥११४॥माझा आहे भाऊशहाणा सुरतात्याच्या लौकिकाची वार्ताचोहीकडे ॥११५॥मोठेमोठे डोळेहरीण पाडसाचेतसे माझ्या राजसाचेभाईरायाचे ॥११६॥गोड गोड बोलेहसणे किती गोडजगत्री नाही जोडभाईरायाला ॥११७॥हाताचा उदारतसा मनाचा खंबीरगुणाने गंभीरभाईराया ॥११८॥कुणा ना दुखवीलहसून हासवीलसार्यांना सुखवीलभाईराया ॥११९॥माझा भाईरायासर्वांना हवा हवाआहे मथुरेचा खवाभाईराया ॥१२०॥दांडपट्टा खेळेकरी तरवारीचे हातघोडा नेई दौडवीतभाईराया ॥१२१॥हत्तीच्या सोंडेवरीमोहनमाळा लोळेतालीमपट्टा खेळेभाईराया ॥१२२॥हत्तीच्या सोंडेवरीठेवील सुपारीस्वारी निघाली दुपारीभाईरायाची ॥१२३॥ माझे दोघे भाऊदेवळाचे खांबअभंग प्रेमरंगमला ठावे ॥१२४॥ माझे दोघे भाऊबिल्लोरी आरसे देवळी सरीसेलावीयेले ॥१२५॥माझे पाच भाऊते गं मला बहूईश्वरावरी गहूवाहियेले ॥१२६॥माझे पांच भाऊदेवळाच्या भिंतीगिलावा देऊ कितीआयुष्याचा ॥१२७॥माझे दोघे भाऊमला ते वाणीचेदेवाच्या दारीचेकडुलिंब ॥१२८॥अंगणात उभाजन म्हणे राजामी म्हणे भाऊ माझाआला भेटी ॥१२९॥माझा भाईरायाकसा का असेनात्याच्यासाठी प्राणाटाकीन मी ॥१३०॥माझा भाईरायामनी मी आठवीनपोटात साठवीननिरंतर ॥१३१॥माझा भाईरायाओव्यांत गायीनह्रदयी स्मरेनरात्रंदिस ॥१३२॥ध्यानी मी पाहीनस्वप्नी मी पाहीन प्रेमाची मी बहीणभाईरायाची ॥१३३॥बहीणीला भाऊएक तरी गं असावापावल्याचा खणएका रात्रीचा विसावा ॥१३४॥आवड मला बहूलुगडे नको घेऊअंतर नको देऊभाईराया ॥१३५॥माझे दारावरुननको जाऊ मुक्यामुकीनको घेऊ साडीचोळीमी रे शब्दाची हो भुकी ॥१३६॥भाऊ चोळी शिवीशिवी आपुल्या रुमालाचीधन्य तुझ्या इमानाचीभाईराया ॥१३७॥माझ्या आयुष्याचाभाईराजा तुला शेलाउरल्याची चोळी तुलावयनीबाई ॥१३८॥माझ्या आयुष्याचीभाईराया तुला कंठीउरल्याची तुला अंगठीवयनीबाई ॥१३९॥माझे की आयुष्यकमी करुन मारुतीघाल शंभर पुरतीभाईरायाला ॥१४०॥जीवाला देत्ये जीवन जीवन देईन आपुलाचाफा कशाने सुकलाभाईराया ॥१४१॥पिकला अननस हिरवी त्याची छायाबहिणीवर करी मायाभाईराया ॥१४२॥पाऊसपाण्याचे कोणी येईना जाईनामाझा निरोप जाईनाभाईराजाला ॥१४३॥ओळी ओळी घर मोजीत मी गेल्येएक घर विसरल्ये भाईरायाचे ॥१४४॥दूरदेशी पेण कोणी येईना जाईनामाझा निरोप सांगेना भाईरायाला ॥१४५॥दूरदेशी पेण महिन्याची वाटकागदी तुझी भेट भाईराया ॥१४६॥चोळी माझी ग फाटलीचिंता नाही ग वाटलीदुसरी पाठवीलीभाईरायांनी ॥१४७॥चोळी माझी गं फाटलीफाटली फाट जाऊघेणाराचे मन पाहूभाईरायाचे ॥१४८॥चोळीयेची घडी कुंकवावीण धाडीअसे नाही पडली पुडी कोठेतरी ॥१४९॥चोळीयेची घडी कुंकवाची पुडी निरोपावीण धाडी भाईराया ॥१५०॥शब्दांचे निरोप बोलले संपतातीमुके निरोप धाडीती भाईराया ॥१५१॥चोळीयेची घडी कुंकवाची पुडीत्यातून भाऊ धाडी अंतरंग ॥१५२॥चोळीयेची घडी कुंकवाचा मासाचोळी जाते दूरदेशा बहिणीला ॥१५३॥चोळी शिव रे शिंप्या चोळी शीव पाटावरीचोळी जाते घाटावरी बहिणीला ॥१५४॥चोळी शिव रे शिंप्या मोती लाव शिवणीलाचोळी जाते बहिणीला दूरदेशा ॥१५५॥एकापुढे एक माझ्या माउलीबाईचेभाऊ चालती सोयीचे चौघेजण ॥१५६॥एकापुढे एक चालती शिवूमिवूनको पापिणी दृष्ट लावू भाईरायांना ॥१५७॥माझ्या अंगणात चिमण्या पाणी पीतीबहिणी तोंडे धुती भाईरायाच्या ॥१५८॥सरले दळण उरले पाच गहूं आम्ही बहिणी ओव्या गाऊ भावंडांना ॥१५९॥माझ्या दारावरुन गाडया गं धावतीवर रुमाल उडती भाईरायांचे ॥१६०॥दादाराया अप्पारायातुम्ही बसा एकीकडेदिवाळीचे वाकी तोडेमला द्यावे ॥१६१॥दादाराया अप्पारायातुम्ही बसा एके ओळीदिवाळीची साडी चोळीमला द्यावी ॥१६२॥दिवाळीचा सणभाऊबीज आनंदाचीकरु सख्या गोविंदाचीभाईरायाची ॥१६३॥बीजेच्या दिवशीमाझ्या ताटामध्ये मोतीओवाळीन तुझा पतिवयनीबाई ॥१६४॥शेजी ती पुसतेतुला भाऊ गं कितीकपृथ्वीचा चंद्र एकभाईराज ॥१६५॥शेजी गं पुसतेतुला भाऊ कोण कोणचंद्रसूर्य दोघेजण भाईराज ॥१६६॥पड रे पावसापिकू दे दाणापाणीभाईरायाला बहीणीआठवीती ॥१६७॥पाऊस की पडेमृगाआधी रोहिणीचाभावा आधी बहिणीचासंवार ॥१६८॥माझ्या दारावरनं गेलामाझ्या घरी नाही आलाकाय अपमान झालाभाईरायाचा ॥१६९॥हाका मी मारीत्येउभी राहून गल्लीलामशी अबोला धरीलाभाईरायाने ॥१७०॥माझे दारावरुनकोण गेला पगडीचाकळा माझ्या बुगडीचाभाईराया ॥१७१॥तांबडे पागोट्याचापदर लोंबे पाठीवरीकंठी शोभे छातीवरीभाईरायाचे ॥१७२॥सासुरवाडी गेलासासू पाहे तोंडाकडेतुझ्या विडयाला रंग चढेभाईराया ॥१७३॥माझ्या दारावरनंमुलांचा मेळा गेलात्यांत मी ओळखीलाभाईराजा ॥१७४॥माझ्या दारावरनंहळदीकुंकवाचा नंदी गेलाखडा मारुन उभा केलाभाईरायांनी ॥१७५॥दसर्याचा खणदिवाळीचा रस्ताओवाळीन तुझ्या कंथावैनीबाई ॥१७६॥मानीयला भाऊजातीचा मुसलमानदिवाळीची चोळीत्याचा कागदी सलाम ॥१७७॥मानीयला भाऊजातीचा मुसलमानदिवाळीची चोळीघरी आलासे घेऊन ॥१७८॥मानीयला भाऊजातीचा मुसलमानहस्तीदंती चुडेमला आलासे घेऊन ॥१७९॥मानीयला भाऊजातीचा मुसलमानसख्खा भावा गं परीसत्याचे आहे गं इमान ॥१८०॥मानीयला भाऊजातीचा मुसलमाननका गं त्याला हसूदुःखे जाईल त्याचा प्राण ॥१८१॥दरसाल येईबहिणीला आठवूनजातीचा मुसलमानप्रेमासाठी ॥१८२॥तुझा माझा भाऊपणाजगजाहीर नसावालोभ अंतरी वसावाभाईराया ॥१८३॥आपण गूज बोलूडाळिंबीसमानतू भाऊ मी बहीणजडे नाते ॥१८४॥मानीयला भाऊतुला तो काय देतोदिवाळीची चोळीघेऊनीया घरी येतो ॥१८५॥माय तो माहेरबाप तो येऊ जाऊपुढे आणीतील भाऊलोकलाजे ॥१८६॥माय तो माहेरबाप तो माझी सत्तानको बोलू भाग्यवंताभाईराया ॥१८७॥गोर्ये भावजयीनको करु फुणफुणसांगेन तुझे गुणभाईरायांना ॥१८८॥गोर्ये भावजयी नको बोलू रागे फारआल्ये मी दिवस चारमाहेराला ॥१८९॥वयनीबाई भावजयीनको बोलू ये गं जा गंमाज्या पेटार्याचा नागभाईराया ॥१९०॥वयनीबाई भावजयीनको बोलू इडीतिडीमाझी पाटावाची घडीभाईराया ॥१९१॥वयनीबाई भावजयीतुझा भांग गं सरसामाझा कल्याणी आरसाभाईराया ॥१९२॥ भावजयांमध्येवयनीबाई गोरीकपाळी शोभे चिरीकुंकवाची ॥१९३॥गोरी भावजयगर्विष्ठ बोलाचीमला गरज लालाचीभाईरायाची ॥१९४॥वैनीबाई भावजयीनको उभ्याने कुंकू लावूनवसाचा माझा भाऊकिती सांगू ॥१९५॥भाऊ गं आपलावैनीबाई ती लोकांचीमने राखावी दोघांचीताईबाई ॥१९६॥दादाराया बाजारातवैनीबाई मारी हाकाउंची खण घेऊ नकावन्संबाईंना ॥१९७॥गोर्ये भावजयीकिती उर्मट बोलणेमन दुखवीशीभाईरायाचे कोवळे ॥१९८॥गोर्ये भावजयीकिती बोल अहंतेचेफुल कोमेजलेभाईराय ममतेचे ॥१९९॥गोर्ये भावजयीकितीबोल गं रागाचेफूल कोमेजलेदेवा शिवा शंकराचे ॥२००॥गोर्ये भावजयीनको बोलू टाकामेकीहळुवार भाईरायाचंद्र गं कोमेजे एकाकी ॥२०१॥भाऊ गं म्हणतीआल्या बहीणी भेटायाभावजया गं म्हणती आल्या नणंदा लुटाया ॥२०२॥ भाऊ गं म्हणतीबहिणीला द्यावा पाटभावजया गं म्हणतीधरा नणंदा अपुली वाट ॥२०३॥भाऊ गं म्हणतीबहिणीची घाल वेणीभावजया गं म्हणतीउंदराने नेली फणी ॥२०४॥भाऊ म्हणे गं बहिणीबहिणी येई गं घरातभावजय रागे म्हणेबर्या आहेत उंबर्यात ॥२०५॥भाऊ गं म्हणतीबहिणीची भरा ओटीभावजया गं म्हणतीउंदराने नेली वाटी ॥२०६॥भाऊ गं म्हणतीबहिणीची भरा ओटीभावजया गं म्हणती गहू जमिनीच्या पोटी ॥२०७॥भाऊ म्हणे चोळी शिवीभावजय दे ना दोरानको हो वैनीबाईचोळीचा तो काय तोरा ॥२०८॥भाऊ चोळी शिवीभावजय डोळे मोडीनको हो वैनीबाईचोळीची ती काय गोडी ॥२०९॥पिकलेले लिंबूझाडाला तोलेनागर्व झालेली बोलेनावैनीबाई ॥२१०॥माउलीची मायाकाय करील भावजयीपावण्यावीण जाईजुईसुकवील ॥२११॥आईबापांच्या राज्यांतखाल्ल्या दुधावरच्या सायीभावजयांच्या राज्यांतताक घेण्या सत्ता नाही ॥२१२॥अति प्रीत बहुप्रीतीची दोघेजणविडा रंगे कातावीणभाईरायाचा ॥२१३॥कपाळीचे कुंकूकरिते ढळढळातुला लक्षुमीची कळावैनीबाई ॥२१४॥कपाळीचे कुंकूघामाने भिजलेतुझे दैव ग चांगलेवैनीबाई ॥२१५॥वडील भावजयआईच्या समानपित्याचा तुला मानभाईराया ॥२१६॥दसरा दिवाळीवरसाचे दोन सणनको करु माझ्यावीणवैनीबाई ॥२१७॥भाईरायाच्या शेजारीनये राहू गं वयनीकोपतील सार्या मनीभावजया ॥२१८॥वैनीबाई भावजयीतुझी रात्र गे सोयरीकोंबडा परी वैरीआरवला ॥२१९॥आमच्या वैनीबाईगंगाबाई कोठे गेल्याउन्हाने कोमेजल्याजाईजुई ॥२२०॥भावजयांमध्येवैनीबाई रंभासोन्याचा तुळंबाभाईराया ॥२२१॥नाकीची गं नथखाली बस गं पाहू देवज्रटीक गं लावू देवैनीबाई ॥२२२॥भाऊ माझे गोरेआम्ही बहिणी सावळयामखमाली त्या पीवळयाभावजया ॥२२३॥भावजयांमध्येवैनीबाई शांतभाऊ माझे सूर्यकांतउगवले ॥२२४॥चैत्रमासीच्यारांगोळया प्रकाराच्यानणंदा झणकार्याच्यावन्सबाई ॥२२५॥नणंदा वन्संबाईआपुला मान घ्यावाआशीर्वाद मला द्यावाचुडेयांचा ॥२२६॥भावा गं परीसभावजय फार भलीकोणा अशीलाची केलीवैनीबाई ॥२२७॥भावा गं परीसभावजय गं रतनसोन्याच्या कारणेचिंधी करावी जतन ॥२२८॥वळवाचा पाऊस पडून ओसरलाभावाला झाल्या लेकी मग बहीण विसरला ॥२२९॥आम्ही चारी बहिणी चार डोंगरांच्या आडमाझ्या भाईराय खुशालीचे पत्र धाड ॥२३०॥आम्ही चौघी बहिणी चारी गावीच्या चिमण्यासख्या भाईराया आम्ही घटकेच्या पाहुण्या ॥२३१॥आम्ही तीघी बहिणी आम्ही आपुल्या आईच्याकळया फुलती जाईच्या बागेमध्ये ॥२३२॥चांदांत चांदणी मृंगांत रोहिणीतशा तुझ्या रे बहिणी भाईराया ॥२३३॥अहेवा मरण सोमवारी आले भाऊ म्हणती सोने झाले बहिणीचे ॥२३४॥अहेवा मरणाचा आहे मला वाटाचोळी पातळ कर साठा भाईराया ॥२३५॥जीव जरी गेला कुडी ठेवावी झाकूनयेईल सर्वही टाकून भाईराया ॥२३६॥जीव माझा गेला जर काळोख्या रे रात्रीसख्या लाव चंद्रज्योती भाईराया ॥२३७॥संसारी असती उदंड नातीगोतीनिराळी पडती बहीणभाऊ ॥२३८॥संसारी कितीक असती नातीगोतीमोलाची माणिकमोती बहीणभाऊ ॥२३९॥जन्मून जन्मून संसारात यावेप्रेम ते चाखावे बहीण भावांचे ॥२४०॥बहीण भावंडांचे प्रेम निर्मळ अनुपमअमृताहून उत्तम संसारात ॥२४१॥भावा ग बहिणीच्या प्रेमाला नाही सरीगंगेच्या पाण्यापरी पवित्रता ॥२४२॥भावा ग बहिणीच्या प्रेमाला नाही तोडलाभेल ज्याला तोड धन्य धन्य ॥२४३॥भावा ग बहिणीचे किती गोड असे नातेकळे एका ह्रदयाते ज्याच्या त्याच्या ॥२४४॥बहिणभावांच्या प्रेमाला नाही सीमाद्यावी कोणती उपमा जगनत्रयी ॥२४५॥बहीणभावांचे प्रेम ते शुद्धबुद्धअपुरे होती शब्द वर्णनाला ॥२४६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP