मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्त्रीजीवन| सुखदुःखाचे अनुभव ओवी गीते : स्त्रीजीवन बहीण भाऊ मायलेकरे मुलगी सुखदुःखाचे अनुभव देवादिकांच्या ओव्या तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व्रत व सण ऋतुवर्णन व सृष्टी वर्णन पहिली माझी ओवी सुभाषिते संकीर्ण संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ स्त्रीजीवन - सुखदुःखाचे अनुभव मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह. Tags : ganegeetoviओवीगाणीगीतमराठी सुखदुःखाचे अनुभव Translation - भाषांतर सासरी सासुरवासमाहेरी माहेरवाससत्तेचा परी घाससासर्यास ॥१॥सासरचे बोलकडू कारल्याचा पालागोड बोलून दिली मलाबाप्पाजींनी ॥२॥सासरचे बोलजसे कारल्याचे वेलगोड कधी का होईलकाही केल्या ॥३॥सासरचे बोलजशा रेशमाच्या गाठीसैल कर माझ्यासाठीभाईराया ॥४॥सासरचे बोल जशारेशमाच्या गाठीमाने बसल्या न सुटतीकाही केल्या ॥५॥सासरचे बोलजसा वळचणीचा वासालागतो ठसाठसायेता जाता ॥६॥सासरचे बोलजसे पाण्याचे शिंतोडेपाहावे माझ्याकडेभाईराया ॥७॥सासरचे बोलकडू काडेकिराईतजरी नाही गिळवतगोड मानी ॥८॥सासरचे बोलकडू विष्याचे गं प्यालेतुझ्यासाठी गोड केलेमायबाई ॥९॥सासरचे बोलजसे निवडुंगाचे घोसजातीवंताच्या मुली सोसउषाताई ॥१०॥सासरचे बोलजसे मिरियांचे घोसशीलवंताच्या गं लेकीतू सारे सुख सोस ॥११॥सासरचे बोलभाऊ ऐकतो चोरोनीनेत्र आले गं भरोनीभाईरायाचे ॥१२॥दीर बोलती दीरपणीनणंदा बोलती टाकूनीवाग पायरी राखूनीउषाताई ॥१३॥सासूचा सासुरवासनणंदाबाईची जाचणीकशी कोमेजून गेलीमाझी शुक्राची चांदणी ॥१४॥सासूचा सासुरवासरडवी पदोपदीलेक थोराची बोलेनाकोणाशी परी कधी ॥१५॥बापे दिल्या लेकीकामाच्या खळाळ्यालाहिरवी लवंग मसाल्यालाचला कुटू ॥१६॥बापे दिल्या लेकीवाटेवरच्या गोसाव्यालापालखीत बैसायालादैव तिचे ॥१७॥बापे दिल्या लेकीनाही पाहिले घरदारपाहणार परमेश्वरदुसरे कोण ॥१८॥बापे दिल्या लेकीनाही पाहिले धनबीनएक पाहिले निधानकुंकवाला ॥१९॥बापे दिल्या लेकीआपण बसले सुखे ओटीमायेला चिंता मोठीवागण्याची ॥२०॥माझे ग मायबाईनको करु माझा घोररत्न दिलेस तू थोरलेकीहाती ॥२१॥बाप्पाजी हो बाप्पामी तुमच्या पोटीचीमला कोणत्या गोष्टीचीचिंता नाही ॥२२॥बाप्पाजी हो बाप्पाआम्ही तुमच्या की पोटालेकासारखाच वाटाआम्हा द्यावा ॥२३॥चंदनासारखीदेह मी झीजवीनलेक तुमची म्हणवीनबाप्पाराया ॥२४॥चंदनासारखीदेह घालीन करवतीतुमच्या नावासाठीबाप्पाजी हो ॥२५॥इवलाही बोलमला लागू न देईललेक तुमची म्हणवीनबाप्पाराया ॥२६॥माझे ग मायबाईनका करु माझी चिंतादिलीस भाग्यवंतालेक तुझी ॥२७॥सासुरवाशिणीचेतोंड का कोमेजलेकोण कडू हो बोललेउषाताईला ॥२८॥भूक लागे माझ्या पोटावरवंटा देत्ये गाठीतुमच्या नावासाठीबाप्पाजी हो ॥२९॥लेकीचा हा जन्मदेव घालून चुकलाबैल घाण्याला जुंपलाजन्मवेरी ॥३०॥स्त्रियांचा हा जन्मनको घालू सख्या हरीपरक्याची ताबेदारी जन्मवेरी ॥३१॥स्त्रियांचा हा जन्मनको घालू सख्या हरीरात्र ना दिवसपरक्याची ताबेदारी ॥३२॥सासुरवाशिणीतू गं वाड्यातला बैलकधी रिकामी होशीलउषाताई ॥३३॥नाचण्याचा कोंडानाही कशाच्या काजाकामामुलगीचा जन्म रामादेऊ नये ॥३४॥सकाळी उठूनकाय म्या काम केलेवृंदावन सारवीलेतुळशीचे ॥३५॥सकाळी उठूनकाम सडा - सारवणदाराशी राहती उभेदेव सूर्यनारायण ॥३६॥सकाळी उठूनलागल्ये कामालापवित्र नाव घ्यावेगोविंदाचे ॥३७॥सकाळी उठूनलागल्ये कामालामाझा निरोप रामालानमस्कार ॥३८॥सकाळी उठूनमुख पाहावे गायीचेदारी तुळशींमाईचेवृंदावन ॥३९॥सकाळी उठूनदेवापुढे सारवीलेरांगोळीने काढीयेलेरामनाम ॥४०॥सकाळी उठूनसडा घालू गोमूत्राचामाझ्या गं कंथाचावाडा आहे पवित्राचा ॥४१॥सकाळी उठूनकाम करित्ये घाईघाईमाझ्या गं दारावरनंमंदिराची वाट जाई ॥४२॥सकाळी उठूनसूर्याला हात जोडीकपाळी रेघ ओढीकुंकवाची ॥४३॥सकाळी उठूनकामधंद्याला लागल्येसूर्याला विसरल्येनमस्कार ॥४४॥सकाळी उठूनसूर्याला नमस्कारमग करिते संसार उषाताई ॥४५॥ मला शिकवीलेबयाबाई माउलीनेअसे उभे राहू नयेपरक्याच्या साउलीने ॥४६॥मी ग शिकलेलीबयाबाईच्या शाळेलाकाम आपुले करावेसदा वेळच्या वेळेला ॥४७॥माळ्याने मळ्यातपेरीले उगवलेमाय ग माउलीनेशिकवीले कामा आले ॥४८॥मला शिकवीलेबाप्पाजी ज्ञानवंताभरल्या पाणवठाजाऊ नये ॥४९॥मला शिकवीलेमाय त्या माउलीनेपरक्याच्या साउलीनेजाऊ नये ॥५०॥दळण सडणनित्य माझे गं खेळणंमाझ्या मायेने वळणलावीयेले ॥५१॥दळण मी दळीमाझ्या बाह्या लोखंडाच्यामाय ग माउलीनेमुळया चारिल्या वेखंडाच्या ॥५२॥दळण सडणनित्या माझे ग खेळणंदूर पाणी याला जाणंअवघड ॥५३॥दळण दळतानाअंगाच्या झाल्या गंगामाय गं माउलीनेमला चारिल्या लवंगा ॥५४॥दळण दळावेजसा चंदन खिसावामाउलीला गं पुसावेकसा परदेश कंठावा ॥५५॥नाकीच्या नथीलानको लावू टीकफूलआपण गृहस्थाच्या मुलीउषाताई ॥५६॥परके पुरुषाचानये घेऊ कातचुनाआपण गृहस्थाच्या सुनावैनीबाई ॥५७॥परके पुरुषाशीनये बोलू एकाएकीआपण गृहस्थाच्या लेकीउषाताई ॥५८॥किती मी सांगू तुलाएवढा पदर घे अंगावरपरक्या ग पुरुषाचीनजर असते दूरवर ॥५९॥किती तू नटशीलएवढे नटून काय होतेरुप सुंदर कोठे साजेउषाताई ॥६०॥सोनाराच्या साळेखुट्टू खुट्टू वाजेनवा बिंदीपट्टा साजेवैनीबाईला ॥६१॥पायात तोरडयानवी नवरी कोणाचीसखा शाळे जातो त्याचीगोविंदबाळाची ॥६२॥हातीच्या पाटल्यामागे पुढे सारीबोटांना जागा करीउषाताई ॥६३॥हाती गोट पाटल्याहातरीच्या वांकीआपण गृहस्थाच्या लेकीउषाताई ॥६४॥आले हो वैराळबसू घालावा कांबळाचुडा भरावा जांभळाउषाताईला ॥६५॥आले हो वैराळबसू घालावी घोंगडीचुडा भर नागमोडीसूनबाई ॥६६॥आले आले पटवेकरीपटवाया काही नाहीपटव सूनबाईतुझ्या पेट्या ॥६७॥आले आले पटवेकरीपटवाया काय देऊबाजूबंदा गोंडे लावूसूनबाईच्या ॥६८॥आले आले पटवेकरीनको घेऊ मुली छंदपटव बाजूबंदसूनबाई ॥६९॥आले आले पटवेकरीनको घेऊ मुली चाळापटव तुझ्या माळाउषाताई ॥७०॥माझ्या अंगणातसासूबाईंचा ठेवारेवासीतेसारख्या आम्ही जावाचौघीजणी ॥७१॥गोटपाटल्यांच्याया मुली गं कोणाच्यामाझ्या ग मायबाईच्यालेकीसुना ॥७२॥घराची घरस्थिती कायकाय पाहशी परक्यालेकीसुना त्या सारख्यामाझ्या घरी ॥७३॥लेकी - सुना घेऊननको बसू तू अंगणीदृष्ट लागेल म्हणूनीअक्काबाई ॥७४॥माझ्या दारावरनंहत्ती गेले एकदोनपालखीत लेकसूनमायबाईची ॥७५॥माझ्या अक्काबाईचीवडील सून कोणकारल्याची खूणशांताबाई ॥७६॥सासूबाई तुम्हीएक हो बरे केलेकपाळीचे कुंकूरत्न माझ्या हाती दिले ॥७७॥सासूचा सासुरवाससारा मनात गिळीतेकंथाशी हासतेउषाताई ॥७८॥माझे सारे दुःखमी गं मनात ठेवीनकंथाला पाहूनगोड गोड मी हसेन ॥७९॥होवो माझे काहीमला नाही त्याची पर्वामाझा कंथ गं राहावाआनंदात ॥८०॥होवो माझे काहीमला नाही त्याची चिंतामिळू दे गं माझ्या कंथासमाधान ॥८१॥होवो माझे काहीमला नाही त्याचे दुःखमाझ्या कुंकवालामिळू दे ग परी सुख ॥८२॥आतून जळतेमनात रडतेपरी वरुन हासतेउषाताई ॥८३॥पावसावाचूनपीक नाही जमिनीलाकंथा गं वाचूनसुख नाही कामिनीला ॥८४॥पावसावाचूनकसा भरारेल मळाकंथा गं वाचूनकामिनीला नाही कळा ॥८५॥सुनेला सासुरवासनको करु माझे आईआपल्या घरी चाफापरक्याची आली जाई ॥८६॥सुनेला सासुरवासनको करु माझे गंगाआपल्या घरी चाफापरक्याची आली रंभा ॥८७॥ जावयाची जातजसा पेटार्याचा नगत्याच्या मर्जीने तू वागउषाताई ॥८८॥जावयाची जातजात खायाची जायाचीपुत्राची गं बोलीअस्थि गंगेला न्यायाची ॥८९॥जावई देइल मानजाऊन बैसेल लोकांतआपला गं पुत्रपाणी घालीत तोंडात ॥९०॥जावयाची जातमाजोरी मस्तवालआता मी उषाताईतुझ्यासाठी आल्ये काल ॥९१॥जावयाची जातरागीट तामसीत्याच्या मर्जीने वागसी उषाताई ॥९२॥भ्रताराचा रागजसा विस्तव इंगळत्याची मर्जी तू सांभाळउषाताई ॥९३॥देवाच्या देऊळीनंदीला घाली माळमागते तान्हेबाळउषाताई ॥९४॥शिवाची केली पूजानंदीला कोरा शेलापुत्रासाठी नवस केलाउषाताईने ॥९५॥देवाच्या देवळीपुत्राची फळ - वाटीशालूची कर ओटीउषाताई ॥९६॥वडाच्या झाडाखालीसदा प्रदक्षिणा घालतेतान्हेबाळाला मागतेउषाताई ॥९७॥तिन्ही गं त्रिकाळपूजा करिते गायीचीआस तान्ह्या गं बाळाचीउषाताईला ॥९८॥देवाच्या देऊळीसहज गेल्ये होत्ये कालप्रसाद दिला मलादोन मोती एक लाल ॥९९॥देवाच्या देऊळीसहज गेल्ये गाभार्यातप्रसाद दिला मलादोन मोती अंगार्यात ॥१००॥देवाच्या देऊळीउभी मी केव्हाचीवाट बघते ब्राह्मणाचीपूजेसाठी ॥१०१॥अश्वत्थाचा पारकुणी झीजवीलापुत्रासाठी नवस केलाउषाताईने ॥१०२॥पिंपळा प्रदक्षिणाकोण घालीते एकलीआहे पुत्राची भुकेलीउषाताई ॥१०३॥नवस मी केलाअंबाबाईला पाळणापुत्र होऊ दे खेळणाउषाताईला ॥१०४॥देवाच्या देऊळीपुत्रांचे पर्वतएक द्यावा हो त्वरितउषाताईला ॥१०५॥नारायण देवाजीचाझाडीत होत्ये जामदारखानासापडला मोतीदाणागोपूबाळ ॥१०६॥नारायण देवाजीचाझाडीत होत्ये पलंगपोससापडला मोतीघोसगोपूबाळ ॥१०७॥लाखावरी सावकारतुझ्या माडीला आरसेपोटी नाही पुत्रफळझाले द्रव्याचे कोळसे ॥१०८॥लाखावरी सावकारतुझ्या ओसरी दिवा जळेपोटी नाही पुत्रफळतुझ्या ओटीवर कोण खेळे ॥१०९॥वाजंत्री वाजतीकोणत्या आळीलाताईबाई सावळीलान्हाण आले ॥११०॥देवाच्या देऊळीमोकळया केसांचीन्हालेल्या दिवसांचीउषाताई ॥१११॥पहिल्याने न्हाणन्हाण आले ते आजोळीमखराला जाळीमोतियांची ॥११२॥पहिल्याने न्हाणहिरव्या साडीवरीमखर माडीवरीघालतात ॥११३॥पहिल्या न्हाणाचीसासू करीतसे हौससखे मखरी तू बैसउषाताई ॥११४॥पिवळे पातळसाळ्याला सांगितलेन्हाण आले आईकलेउषाताईला ॥११५॥ केळी कंडारल्यातेथे का गं उभीपहिल्या न्हाणाजोगीउषाताई ॥११६॥पहिले न्हाण आलेआले ते सासराकेळी धाडिल्या उशिरामखराला ॥११७॥पहिल्याने न्हाणआले हासता खेळतामखर गुंफितारात्र झाली ॥११८॥पहिल्याने गर्भारहिरवा शालू घेऊबागेमध्ये नेऊउषाताईला ॥११९॥पहिल्याने गर्भारनारळी हिचे पोटडाळिंबी नेस चीटउषाताई ॥१२०॥पहिल्याने गर्भारआली माहेरालाआनंद मनी झालामायबापा ॥१२१॥पहिल्याने गर्भारऔषधे ठेवा घरीबाळी आहे सुकुमारीउषाताई ॥१२२॥हिरव्या खणासाठीरुपया सारीलाचोळी गर्भार नारीलाउषाताईला ॥१२३॥पहिल्याने गर्भारकंथ पुशितो आडभिंतीतुला महिने झाले कितीउषाताई ॥१२४॥पहिल्याने गर्भारकंथ पुशितो गोठ्यातहिरवे डाळिंब ओटीतउषाताईच्या ॥१२५॥गरभार नारीगर्भच्छाया तोंडावरीहिरवी चोळी दंडावरीउषाताईच्या ॥१२६॥गरभार नारीउकाडा होतो भारीझोपाळा बांधा दारीअप्पाराया ॥१२७॥पहिल्याने गर्भारडोहाळे धाड मलामाझ्या बागेचे पेरु तुलाउषाताई ॥१२८॥तीनशे साठ पाटकाढिले कारणालातुझ्या डोहाळ जेवणालाउषाताई ॥१२९॥ डोहाळे तुला होतीसांगून धाद मलाबागेची लिंबे तुलापाठवीन ॥१३०॥आंबे आले पाडाचिंचाबाई कधी येशीडोहाळे पुरवीशी उषाताईचे ॥१३१॥आंबे आले पाडापहिल्या पिकाचेडोहाळे लेकाचेउषाताईला ॥१३२॥बांगड्या भर रे कासाराहिरवा कारलातुला नववा गं लागलाउषाताई ॥१३३॥बांगड्या भर रे कासाराबांगडी हिरवी दुधारपहिल्याने गर्भारउषाताई ॥१३४॥सोनसळे गहूठेवीले कारणालाडोहाळे जेवणालाउषाताईच्या ॥१३५॥हिरव्या खणाचीमला गरज लागलीगर्भिणी ऐकिलीउषाताई ॥१३६॥रुपया मोडलाहिरव्या खणालातुझ्या डोहाळेजेवणालाउषाताई ॥१३७॥आणावी घोंगडीआणावे कांबळयेईल माझी बाळबाळंतपणा ॥१३८॥बाज करा नीटकरा साफसूफ खोलीयेईल माझी बाळीबाळंतपणा ॥१३९॥पहिल्याने गर्भारनको भिऊ तू जिवालातुझी काळजी देवालाउषाताई ॥१४०॥पहिल्याने गर्भारका गं नारी चिंताक्रांतउद्या होशील पुत्रवंतउषाताई ॥१४१॥पळी पंचपात्रीकुठे जातोस ब्राह्मणापुत्र झाला यजमानादादारायांना ॥१४२॥पुत्र झाला म्हणूनदादाराया खोतादणका केला मोठासोहळ्याचा ॥१४३॥ पुत्र झाला म्हणतीआम्हा कळले बावीवरीसाखर गावावरीवाटीयेली ॥१४४॥पुत्र झाला म्हणतीआम्हा साखर नाही आलीपुत्र नाही कन्या झालीउषाताईला ॥१४५॥जोशाला बोलवाआधी पंचांग बघावेजातक करावेतान्हेबाळाचे ॥१४६॥पाचवी सहावीकरावी आधी पूजानको दृष्ट माझ्यातान्हेबाळा ॥१४७॥नातू झाला म्हणूनवाटतात पेढेनातवासाठी वेडेलोक होती ॥१४८॥बाळंतिणी बाईनको येऊ दारालागेल तुला वारादक्षिणेचा ॥१४९॥बाळ बाळंतीणआहेत खुशालउषाताईच्या पतीलाभाईराया पत्र घाल ॥१५०॥चला सखियांनोहळदी कुंकवालामाझ्या ग उषाताईलाभाग्याचा पुत्र झाला ॥१५१॥सोळा सोमवारकेले सतरावा उजवारत्नाच्या पालखीमाझ्या बाळाला नीजवा ॥१५२॥मला हौस मोठीताईबाईला पुत्र व्हावाबाळंतवीडा न्यावाकडीतोडे ॥१५३॥मला हौस मोठीताईबाईला पुत्री व्हावीबाळंतवीड्यावरीजरीची कुंची न्यावी ॥१५४॥तुम्हा घरी गं कारणेआम्हा घरी ग बारसंमाझं येणं होतं कसंशांताबाई ॥१५५॥देवाघरचे बाळआले आकार घेऊनत्याला ठेवू नावसखी पालखी घालून ॥१५६॥देवाघरचे बाळआले सगुण साकारनाव ठेवा मनोहरउषाताई ॥१५७॥सवाष्णींची दाटीबाळ पालखी घालतीरामकृष्णाच्या म्हणतीपाळण्यांना ॥१५८॥पालखी घालूनसखीया झोके देतीपाळणे गोड गातीआंदुळता ॥१५९॥माझे घर मोठेकेर लोटता लोटेनासभा बैसली उठेनागोपू बाळाची ॥१६०॥माझे घर मोठेहंडेघंगाळांचेवडील मामंजींचेनाव मोठे ॥१६१॥माझे घर मोठेधुराचा कोंडमारकोमेजली सुकुमारउषाताई ॥१६२॥माझे घर मोठेहिंडती दारी गडीभरली मोठी माडीपाहुण्यांनी ॥१६३॥माझे घर मोठेपन्नास बाहालांचेपाहुण्याउण्यांचेवावरण ॥१६४॥माझे घर मोठेपन्नास येती जातीहाती रुपयांची वाटीगोपू बाळाच्या ॥१६५॥मोठेमोठे लोकउठून उभे राहतीलोडाशी जागा देतीमाझ्या बाळा ॥१६६॥मोठे मोठे लोकसामोरे येतातस्वागत करितातमाझ्या बाळाचे ॥१६७॥मोठ मोठे लोकसरकारे अडविलेएक्या शब्दे सोडविलेमाझ्या बाळे ॥१६८॥कचेरीच्या पुढेहिरवा कंदील डोलतोनवा साहेब बोलतोमाझा बाळ ॥१६९॥कचेरीच्या पुढेहिरवा कंदील कोणाचानवा साहेब पुण्याचामाझा बाळ ॥१७०॥कचेरीच्या पुढेकाय गुलाबा तुझी हवावास घेणारे गेले गावादादाराया ॥१७१॥ बारा बैल वाहातीएवढा कोण शेतीचार गावाची ग खोतीगोपू बाळाची ॥१७२॥बारा गं बैलांचीदावण आली घरानिजला जागा करागोपूबाळ ॥१७३॥बारा बैल वाहातीबाप्पाजींच्या नांगरालाजिरेसाळ डोंगरालापेरियेली ॥१७४॥आवाज मोठा आलामोठा गाडा घडघडलाखोतीचा गल्ला आलाबाप्पाजींचा ॥१७५॥बाप्पाजी काकाजीकरा भाताचा व्यापारमोत्यांचा चंद्रहारद्यावा मज ॥१७६॥नाचण्यांनो तुम्हीकोंकणीचे राजेत्याने भाई माझेसावकार ॥१७७॥नाचण्यांनो तुम्हीकोंकणीचे गहूअंतर नका देऊभाईरायाला ॥१७८॥सभेमध्ये ग बसलेउंच पगडी लहानथोरसभेमध्ये माझे दीरशोभतात ॥१७९॥पशाने पायलीसवाईची दिढी झालीकंठी छातीला भीडलीदादारायांच्या ॥१८०॥पिकलेला अननसहिरवा त्याचा देठखोतांना आली भेटअप्पारायांना ॥१८१॥पाटील पट्टी करीयेतील सचणीलाहिरवी शाल खोतिणीलाअक्काबाई ॥१८२॥माझ्या ओटीवरीखोतापाटलांची दाटीतुमच्या नावासाठीबाप्पाजी हो ॥१८३॥हातीच्या अंगठयाकशाने झिजल्याराशी मोहरांच्या मोजिल्यागोपूबाळाने ॥१८४॥माझ्या ओटीवरचांदीचे गडवे पेलेमैत्र तुझे पाणी प्यालेगोपूबाळा ॥१८५॥माझ्या ओटीवरसतरंज्या लोळतीमैत्र तुझे रे खेळतीगोपूबाळा ॥१८६॥माझ्या ओटीवरकशाचा केर झालाजाई मोडून तुरा केलाभाईरायाला ॥१८७॥माझ्या ओटीवरकागदाचा केरलिहिणार सुभेदारमामाराया ॥१८८॥माझ्या ओटीवरकागद किती पाहूलिहिणार माझे भाऊकारभारी ॥१८९॥अंगात सदरा कोटपायात कुलपी बूटतुझ्या चालण्याची ऐटगोपूबाळा ॥१९०॥लहानसा कारकूनसाहेबाच्या डावीकडेपहिल्या पगाराचे तोडेउषाताईला ॥१९१॥लहानसा कारकून साहेबांपुढे उभातुमच्या स्वारीजोगागोपूबाळ ॥१९२॥लहानसा कारकून साहेबाला आवडलापगार वाढविलागोपूबाळाचा ॥१९३॥लहानसा कारकूनसाहेबाची खुशीपहिल्या पगाराची ठुशीउषाताईला ॥१९४॥लहानसा कारकून बैसे साहेबाच्या कडेपहिल्या पगाराचे पेढेवाटीयले ॥१९५॥माझ्या अंगणातबैसलासे हिरासखे तुझा ग नवराउषाताई ॥१९६॥कचेरीच्या पुढेआवळीचे झाडसावळा सुभेदारगोपूबाळ ॥१९७॥दळणीची पाटीअखंड जात्यावरीअन्नछत्र तुझ्या घरीगोपूबाळा ॥१९८॥कारागिरी टोपीआली दारावरीगोपूबाळा पारावरीमोल करी ॥१९९॥ शेरभर सोनेलेखणीच्या टाकाहिशेब देतो बापागोपूबाळ ॥२००॥मंदिरी सप्ताहभागवत चालेबाप्पाजी तेथे गेलेऐकावया ॥२०१॥मंदिरी सप्ताहझालासे आरंभमामंजी त्यात दंगऐकावया ॥२०२॥हरदास आलेपुण्याचे वाईचेअलोट लोकांचेजाती थवे ॥२०३॥आले हरदासराजधानीहूनऐकाया कीर्तनसंत जाती ॥२०४॥संत आले गावादर्शना चला जाऊघरी नका कंथा राहूसखी सांगे ॥२०५॥संत आले गावाचला त्यांची करु सेवाहेत माझा पुरवावाएवढा की ॥२०६॥दागिना मागत्येम्हणून म्हणता वेडीकोण माझी हौस फेडीतुम्हावीण ॥२०७॥काळी चंद्रकळाघेऊन मला द्यावीहौस माझी पुरवावीतुम्ही कंथा ॥२०८॥काळी चंद्रकळाशोभेल गोर्या अंगाम्हणाल आली रंभास्वर्गातून ॥२०९॥नको हो पैठणीनको मला शालू शेलेभाळ असो भरलेलेकुंकवाने ॥२१०॥नको मला बिंदीनको तो चंद्रहारपुरे एक अलंकारमंगळसूत्र ॥२११॥दागिना मागत्येएक आज तुम्हांपाशीजन्मोजन्मी ठेवादासीला या पायापाशी ॥२१२॥दागिना मागत्येकंथा नाही म्हणू नकापत्नी प्रेमाची भुकेलीनको तिला पैसा रुका ॥२१३॥दागिना मागत्येपरस्त्रीला माना माताकंथा आपण साधू यासंसारात परमार्था ॥२१४॥देशील रे देवादेशील ते थोडेमी मागते रोकडेहळदीकुंकू ॥२१५॥पुतळ्यांची माळपडते चिर्यांवरीकंथाच्या राज्यावरीउषाताई ॥२१६॥आयुष्य मी चिंतीसासुबाईच्या हो नीरीमाझ्या कुंकवाची चिरीजन्मवेरी ॥२१७॥देई देवा मजदेशील तितुके पुरेअक्षय माझे चुडेजन्मवेरी ॥२१८॥देई देवा मजसंततीला सोनेविश्रांतीला बाळ तान्हेमांडीवरी ॥२१९॥देई देवा मजहळदीचे तेजकुंकवाचे राज्यजन्मवेरी ॥२२०॥देवाच्या देऊळीउभी मी जागत्येआयुष्य मागत्येचुडेयांना ॥२२१॥माझे हे की चुडेवज्री घडवीलेसाक्ष ठेवियेलेचंद्रसूर्य ॥२२२॥माझे हे की चुडेबत्तीस बंदांचेतेतीस कोटी देवाजींचेआशीर्वाद ॥२२३॥चुडेयांच्या बळेन भी कवणालालंकेच्या रावणालादेईन जाप ॥२२४॥माझे चुडेयांचेसोने आहे सुरतेचेवडिल्यांच्या पालखीचेदादारायांच्या ॥२२५॥माझे चुडेयांचेसोने बरफीची वडीपारख्यांना शालजोडीबाप्पाजींना ॥२२६॥सासुरवाशिणीचेतोंड दिसे हसतमुखतिला भ्रताराचे सुखउषाताईला ॥२२७॥गळ्यात मंगळसूत्रगळा दिसे तालेदारकंथ तुझा सुभेदारउषाताई ॥२२८॥काळी गळेसरीदेवाने मला दिलीभूषणासाठी केलीसोनियाची ॥२२९॥आमच्या वैनीबाईगंगाबाई कोठे गेल्याउन्हाने कोमेजल्याजाईजुई ॥२३०॥भोळा की भ्रतारमाझ्या उषा ग बाईचातिने पिंपळ दारीचापूजीयेला ॥२३१॥शेजी देई फूलसखी घाली ना केसांतआपुल्या कंथाच्यानेऊन देतसे हातात ॥२३२॥शेजी देई फुलसजवाया वेणीनेऊन देतसेनिज कंथाला कामिनी ॥२३३॥कंथ गं रुसलाकशाने समजवावाहाताने विडा द्यावाउषाताई ॥२३४॥भ्रताराचा रागदुधासारखा उतू गेलाहसुनी शांत केलाउषाताईने ॥२३५॥तोंडात तोंड घालीराघूची लाल चोचआवडीची मैना तूचउषाताई ॥२३६॥तोंडात तोंड घालीउषाबाई चेडीआली राघवाची उडीदादारायांची ॥२३७॥दादाराया घोड्यावरवयनीबाई माडीवरीतेथून खुणा करीविड्यासाठी ॥२३८॥तांबडे पागोटेबांधितो सोडितोराणीला खुणावितोदादाराया ॥२३९॥माडीखाली माडीमाडीखाली झरातेथे तोंड धुतो हिराउषाताईचा ॥२४०॥माडीखाली माडीमाडीला चंदन ताटल्यातबकी तुझ्या पाटल्याउषाताई ॥२४१॥ माडीखाली माडीमाडीखाली शिडीपुतळी आहे जाडीउषाताईची ॥२४२॥भ्रताराची सेवाकाय करिता चुकलीपाया पडता देखलीउषाताई ॥२४३॥भ्रताराची सेवाकरावी आदरानेपाय पुशी पदरानेउषाताई ॥२४४॥भ्रतार पुसतोकोठे गेली प्रियसखीमागे उभी हसतमुखीउषाताई ॥२४५॥भ्रतार पुसतोकोठे गेली राणी राधाहसत मुख सदाउषाताईचे ॥२४६॥कंथ विचारितोराणी वल्लभा कोठे गेलीनंदादीपा तेल घालीउषाताई ॥२४७॥कंथाची ग खूणदोहींच्या मधूनदेत्ये सुपारी शोधूनउषाताई ॥२४८॥चिकणी सुपारीतुझ्या कंथाला आवडदिवा घेऊन निवडउषाताई ॥२४९॥चिकणी सुपारीदादारायांना लागलीवारा घालता भागलीउषाताई ॥२५०॥पाचपानी खाई विडात्याची बत्तीशी रंगलीत्याची सुरत चांगलीगोपूबाळाची ॥२५१॥पाचपानी खाई विडाडेखापासून लावी चुनाबापापरीस लेक शहाणागोपूबाळ ॥२५२॥रात्रीची चांदणीजाते कापुरालाविडा देत्ये चतुरालाउषाताई ॥२५३॥दिवाणाशी जातावैरी पाहती तोंडाकडेमाझ्या गं कंथाच्याविड्याला रंग चढे ॥२५४॥टिचकी वाजवितोखिडकी उघडितोराणीला खुणवितोगोपूबाळ ॥२५५॥ काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावीकुंकवाची चिरी माझ्या जन्माला असावी ॥२५६॥काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावीसार्या जन्माला असावीमायबाई ॥२५७॥काळी चंद्रकळापदरी मोतीजाळीनेसली सायंकाळीउषाताई ॥२५८॥काळी चंद्रकळा कण्हेरी काठाचीबुधवार पेठेची आणियेली ॥२५९॥काळी चंद्रकळा पदरी रामबाणनेसली सूर्यपानउषाताई ॥२६०॥ काळी चंद्रकळा जशी काजळाची वडीत्याची आज घडी मोडीउषाताई ॥२६१॥काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावीसार्या जन्माला पुरवावीउषाताई ॥२६२॥काळी चंद्रकळा नेसता लागे मऊभूषणाजोगे भाऊराज्यधर ॥२६३॥काळी चंद्रकळा कशी नेसू मी एकटीमाझी बहीण धाकुटीआहे घरी ॥२६४॥काळी चंद्रकळा धुऊन धुऊन विटलीनाही हौस ग फीटलीउषाताईची ॥२६५॥काळी चंद्रकळा धुऊन धुऊन झाला कचरारुपये दिले साडेसतराकाकारायांनी ॥२६७॥काळी चंद्रकळा ठेवीली भुईवरीरुसली आईवरीउषाताई ॥२६८॥काळी चंद्रकळा ठेविली बाकावरीरुसली काकावरीउषाताई ॥२६९॥काळी चंद्रकळा ठेवीली दारावरीरुसली दिरावरीउषाताई ॥२७०॥काळी चंद्रकळाठेविली जात्यावरीरुसली आत्यावरीउषाताई ॥२७१॥काळी चंद्रकळाठेवली खुंटीवरीरुसली कंथावरीउषाताई ॥२७२॥काळी चंद्रकलाठेवली मापावरीरुसली बापावरीउषाताई ॥२७३॥काळी चंद्रकळादोन्ही पदरी रामसीतानेसली पतिव्रताउषाताई ॥२७४॥काळी चंद्रकळाजसे काजळाचे बोटघेणाराचे मन मोठंदादारायांचे ॥२७५॥काळी चंद्रकळाजसे रात्रीचे गगनघेणाराचे मोठे मनदादारायांचे ॥२७६॥मला हौस मोठीजरीच्या पातळाचीपेठ धुंडिली सातार्याचीमामारायांनी ॥२७७॥मला हौस मोठीगोटापुढे गं तोड्याचीकाळी चंद्रकळाचोळी धोतरजोड्याची ॥२७८॥गोटपाटल्याचीघडण सातार्याचीलाडकी भ्रताराचीउषाताई ॥२७९॥हाती गोटपाटल्यामागे पुढे सारीतापत्या चोळीवरीबाजूबंद ॥२८०॥हाती कांकणपाटल्याजवे दोरे गजरे गोटसुभेदारिणी तुझा थाटउषाताई ॥२८१॥काशीदाची चोळीअंगी झाली तंगसखी चवळीची शेंगउषाताई ॥२८२॥मोठे मोठे डोळेहरिणीबाईचेतसे तुझ्या रे आईचेगोपुबाळा ॥२८३॥ठुशाटीकांखालीसरीबाई तू दोराचीराणी जहागीरदाराचीउषाताई ॥२८४॥ जोडव्या झणत्कारबिरवल्यांना बारा ठसेचालताना रुप दिसेउषाताईचे ॥२८५॥कशी द्याची चोळीअंगी की फाटलीसखी सासर्या भेटलीउषाताई ॥२८६॥ठुशापेट्यांखालीकंठीचे झाले पाणीमागते तन्मणीउषाताई ॥२८७॥ठुशापेट्यांखालीकंठ्याचे झाले जाळेमागते तायतळेउषाताई ॥२८८॥उठा उठा जाऊबाईदिवा लावावा तुपाचादारी पलंग रुप्याचाभावोजींचा ॥२८९॥उठा उठा जाऊबाईदारी उजाडलेआपल्याला वाण आलेहळदीकुंकू ॥२९०॥उठा उठा जाऊबाईरथाचे धरु चाकशंभरी करु आंखचुडेयांना ॥२९१॥उठा उठा जाऊबाईरथाची धरु दोरीशंभरी करु पुरीचुडेयांना ॥२९२॥सहांच्या पंगतीलापितांबराचे झळाळतूप वाढते वेल्हाळउषाताई ॥२९३॥सहांच्या पंगतीलाकशाला हव्या तिघीआपण वाढू दोघीउषाताई ॥२९४॥सहांच्या पंगतीलानको भिऊ परातीलायेते तुझ्या संगतीलाउषाताई ॥२९५॥माझ्या दारावरनंकोण गेला झपाट्यानेकुसंबी पागोट्याचाअप्पाराया ॥२९६॥माझ्या दारावरनंकोण गेली पातळाचीगळा माळ पुतळ्यांचीउषाताई ॥२९७॥माझ्या दारावरनंमुलांचा मेळा गेलात्यात मी ओळखीलागोपूबाळ ॥२९८॥माझ्या दारावरनंहळदी कुंकवाचा नंदी गेलाखडा मारुन उभा केलाभाईरायांनी ॥२९९॥पुतळयांची माळगोपूबाळाच्या नारीलासून शोभते गौरीलाअक्काबाईला ॥३००॥हात भरले अंगठीनेकान भरले कुडक्यांनीशृंगार केला चुलत्यांनीउषाताईला ॥३०१॥मागील दारी आंबापुढील दारी चिंचमाडी बांधा उंचदादाराया ॥३०२॥दादाराया घर बांधीवैनीबाई तो बोलेनातेथे उपाय चालेनाकाही केल्या ॥३०३॥दादाराया घर बांधीआपुल्या हिंमतीवाडा शोभतो श्रीमंतीथाटमाटे ॥३०४॥दादाराया घर बांधीआपुल्या हिंमतीकिती पारवे घुमतीमाडीवरी ॥३०५॥माडीवरती माडीमाडीला दहा दारेबैसुनी घेती वारेवैनीबाई ॥३०६॥माडीवरती माडीमाडीला चंदनशिडीपुतळी केस झाडीउषाताई ॥३०७॥माडीवरती माडीमाडीला तक्तपोशीतबकी तुझी ठुशीउषाताई ॥३०८॥मामाराया माडी बांधीसुतारांना दिला चहामाडीचा बेत पाहावैनीबाई ॥३०९॥हौशाने हौस केलीजाई लावल्या जिन्यामध्येफुले पडती मेण्यामध्येदेवाजीच्या ॥३१०॥हौशाने हौस केलीफुले लाविली जिन्यातफुले पडती ताम्हनातबाप्पाजींच्या ॥३११॥हौशाने हौस केलीफुले लाविली दारातफुले पडती हातातउषाताईच्या ॥३१२॥हजाराचा घोडात्याला पन्नासाची झूलवर बसणारजणू गुलाबाचे फूल ॥३१३॥हजाराचा घोडात्याला विसांचा चाबूकवर बसणारफुलावाणी ग नाजूक ॥३१४॥धुणे धुई रे परीटालिंबे घे ताजी ताजीधोतरजोडा अमदाबादीगोपाबाळाचा ॥३१५॥धुणे धुई रे परीटाधुण्याला काय तोटामाझ्या गं आप्पारायांचारुपयांनी भरला ओटा ॥३१६॥धुणे धुवी रे परीटालिंबू साबण लावी त्यालानेसणारा भाऊ माझाअप्पाराया ॥३१७॥धुणे धुई रे परीटाइस्तरीची घडी करनेसणार सावकार गोपूबाळ ॥३१८॥कानीचे कुडूकहालती वार्यानेबोलते तोर्यानेउषाताई ॥३१९॥कानीचे कुडूकहालती लुटुलुटुबोलते चुटुचुटुउषाताई ॥३२०॥पायी सांखळ्या तोरड्यापाय भरले चिखलातलेकी दिल्या कोकणातबाप्पाजींनी ॥३२१॥चंद्रहार ग तुटलाटिकल्या झाल्या खोलीभरपदराने गोळा करउषाताई ॥३२२॥तिन्हीसांजा झाल्याआले लक्षुमीचे धनीदिवे लावा खणोखणीझगमगीत ॥३२३॥तिन्ही सांजा झाल्यालक्ष्मीचा डामडौलबाळराजासाठीगवळ्याचा वाडा खोल ॥३२४॥तिन्हीसांजा झाल्यादिव्यांची जलदी करालक्षुमी आली घरामोत्यांनी ओटी भरा ॥३२५॥तिन्हीसांजा झाल्यादिवा ओसरीबाईलासोड वासरे गायीलागोपूबाळा ॥३२६॥ तिन्हीसांजा झाल्यादिवा लावू कोठे कोठेचिरेबंदी वाडे मोठेबाप्पाजींचे ॥३२७॥तिन्हीसांजा झाल्याकामाची झाली घाईगोवारी आणी गायीरानातून ॥३२८॥तिन्हीसांजा झाल्याघालू चुलीत विस्तवआधी बाळाला निजवउषाताई ॥३२९॥तिन्हीसांजा झाल्यादिवा राईबाईगवळी बांधी गायीमथुरेचा ॥३३०॥तिन्हीसांजा झाल्या दिव्याला भरवण वाचिती रामायणदादाराया ॥३३१॥तिन्हीसांजा झाल्यादिवे लावू कोठे कोठेचौसोपी वाडे मोठेबाप्पाजींचे ॥३३२॥लक्षुमीबाई आलीतिन्ही सांजाच्या भरातकुंकवाचा पुडासाक्ष ठेवील घरात ॥३३३॥लक्षुमीबाई आलीतांब्याने दूध घालीबाळा राजसाच्याघराला मानवली ॥३३४॥तिन्हीसांजा झाल्यागुरांच्या गोंधळीलक्षुमी पूजिलीतांदुळांनी ॥३३५॥देणे देवाजीचेमनुष्याने काय द्यावेमाझ्या गं बाळालालक्षुमीचे साह्य व्हावे ॥३३६॥लक्षुमीबाई आलीशेताचा बांध चढेहाती गोफण पाया पडेगोपूबाळ ॥३३७॥लक्षुमी की आलीपांगळ्या पायांचीबाळाजवळ बोली केलीकधी नाही मी जायाची ॥३३८॥लक्षुमी चंचळ हिंडते बाजारधरिते पदरगोपूबाळाचा ॥३३९॥लक्षुमी चंचळघर शोधता भागलीमाझ्या घरात राहिलीदादारायांच्या ॥३४०॥लक्षुमी की आलीबैसली ती बाजेमाझे घर तिला साजेखरोखर ॥३४१॥लक्षुमी की आलीआली मागील दारानेधाकट्या बाळानेबोलविले ॥३४२॥लक्षुमी की आलीबाळाच्या पायगुणाभाईरायाच्या शांतपणामानवली ॥३४३॥लक्षुमी की आलीहाती मोहरांचे ताटपुशी कचेरीची वाटगोपूबाळाच्या ॥३४४॥लक्षुमी की आलीआलेली जाऊ नकोधरला पदर सोडू नकोगोपूबाळाचा ॥३४५॥लक्षुमी की आलीशेताच्या बांधावरीशेत्या म्हणून हाका मारीगोपूबालाला ॥३४६॥वाटेवरलं शेतजशी हळद लोटलीकोठे लक्षुमी भेटलीगोपूबाळा ॥३४७॥वाटेवरलं शेतनका खुडू त्याची पातधनी आहे हो रागीटदादाराया ॥३४८॥वाटेवरलं शेतनको मोडू त्याची काडीयेते सावकारा गाडीगोपूबाळाला ॥३४९॥वाटेवरला आंबाकोणी ओळंबीलासखा सासुरवाडी गेलागोपूबाळ ॥३५०॥वाटेवरलं घरआल्या गेल्या गूळपाणीवडिलाची सून शहाणीउषाताई ॥३५१॥वाटेवरलं घरआल्या गेल्या ताकभातवडिलांचे नाव राखगोपूबाळ ॥३५२॥वाटेवरलं घरआल्यागेल्याचे माहेरमिळे मीठ नी भाकरसर्व लोका ॥३५३॥भावोजी हो दिरामाझ्या मनीचे एक करादारी बाग पेराद्राक्षियांची ॥३५४॥भावोजी हो दिरासांगत होत्ये नानापरीस्वस्त झाल्या राजापुरीचंद्रकळा ॥३५५॥भावोजी दिरांनीआणिली केतकेमी मागत्ये कौतुकेभावजयी ॥३५६॥भावोजी हो दिरामाझ्या मनीचे सांगतेतुमच्यापाशी मी मागत्येकुडीजोड ॥३५७॥भावोजी हो दिरामाझ्या मनीचे जाणावेमाझ्या वेणीतले आणावेगंगावन ॥३५८॥काय मी पुण्य केलेभावासारखा हो दीरकमळा रघुवीरपूजियेला ॥३५९॥काय मी पुण्य केलेबहिणीसारखी नणंदकमळा गोविंदपूजियेला ॥३६०॥काय मी पुण्य केलेआईपरी सासूबाईकमळी अंबाबाईपूजेयिली ॥३६१॥काय मी पुण्य केलेबापासारखा सासराकमळी हरिहरापूजेयेले ॥३६२॥काय मी पुण्य केलेबापासारखा सासराकमळी सोमेश्वरापूजेयेले ॥३६३॥काय मी पुण्य केलेबापासारखा सासरासरीखाली ग दुसराचंद्रहार ॥३६४॥मामंजी सासूबाईतुम्ही तुळशीची झाडेआम्ही तुमच्या उजेडेराज्य करु ॥३६५॥मामंजी सासूबाईतुम्ही तुळशीची मुळेआम्ही परक्याची बाळेसांभाळा हो ॥३६६॥लक्षुमी लक्षुमीहाका मारितो सासरातुझ्या कामाचा पसारावैनीबाई ॥३६७॥लक्षुमी लक्षुमीहाका मारी दीरकाढ ओसरीचा केरवैनीबाई ॥३६८॥ब्राह्मण जेवतीउत्तम झाला पाकपवित्र तुमचा हातसासूबाई ॥३६९॥मामंजी म्हणतीधन्य ग सूनबाईकुळाला कळा येईतुझ्या गुणे ॥३७०॥मामंजी म्हणतीधन्य ग सूनबाईनातू दिला लवलाहीमांडीवरी ॥३७१॥मामंजी म्हणतीसून ही गुणाचीहोती राशी हो पुण्याचीमाझ्या बाळाची ॥३७२॥मामंजी म्हणतीसूनबाई जेव आधीवाढतो पोटामधीकुळतंतू ॥३७३॥मामंजी म्हातारेरागाने होती लालजाईल कोणा जवळविस्तवाच्या ॥३७४॥माहेरा आलीसनको करु कामधंदातुझ्या सांग पुरवीन छंदातान्हेबाळी ॥३७५॥माहेरा आलीसनको करु काम काहीआता विसावा तू घेईउषाताई ॥३७६॥माहेरा आलीसआता बाळे हास - खेळसुखाने नेई वेळउषाताई ॥३७७॥माहेरा आलीसकाय तुझ्यासाठी करुपिकला आंबा चिरुउषाताई ॥३७८॥माहेरा आलीससांग तुला देऊ कायखाई दुधावरची सायतान्हेबाळा ॥३७९॥माहेरा आलीसनीज आता नको उठूकरी बाळे गुरंगुटीउषाताई ॥३८०॥माहेरा आलीसकिती गेली स सुकोनीकिती आलीस दिसांनीतान्हेबाळे ॥३८१॥माहेरा आलीसराहावे चार मासयेऊ दे थोडे मासअंगावरी ॥३८२॥माहेरी आलीसतुला सखी काय देऊबैंगणी खण घेऊंउषाताईला ॥३८३॥दिवाळसणालाजावई घरी आलासल्ल्यांचा जोड दिलाबाप्पाजींनी ॥३८४॥दिवाळसणालाजावयाला आणासखीच्या समाधानाउषाताईच्या ॥३८५॥पाहुण्याला पाहुणचारमेहुण्या मेजवानी कंथ तुझा समाधानीउषाताई ॥३८६॥पाहुण्या पाहुणचारमेहुण्या बुंदी - लाडूएक पंक्ती दोघी वाढूवन्संबाई ॥३८७॥सावळ्या मेहुण्याचापलंग पितळेचावर ठसा पुतळीचाउषाताईचा ॥३८८॥पाहुण्या पाहूणचारमेहुण्या बुंदी - लाडूनका माझी आस मोडूवैनीबाई ॥३८९॥माझ्या माहेरालाजशी कोकुळीची वजाकारभारी मामा तुझातान्हेबाळा ॥३९०॥माझ्या माहेरालाताटवाट्यांची चळतीजेऊन उठलेमाझे भाऊ तुझे पती ॥३९१॥माझ्या माहेरालाराही सदा उघडे दारआल्या गेल्या पाहुणचारहोत असे ॥३९२॥माझ्या माहेरालानकार नाही कोणाआला गेला पाहुणानित्य आहे ॥३९३॥माझ्या माहेराचीसांगू मी किती कीर्तीलाज वाटे सखीकशी सांगू माझ्या ओठी ॥३९४॥माझ्या माहेरालाकेवढी आंबराईआंब्यांना तोटा नाहीकधी काळी ॥३९५॥माझ्या माहेरालानारळी पोफळीत्यांची छाया ग दाटलीअंगणात ॥३९६॥माझ्या माहेरालानाही कोणा सासुरवाससूना लेकीच्यापरीसवागविती ॥३९७॥पाऊसपाण्याचीधरणीमाय वाट पाहेतशी मला आस आहेमाहेराची ॥३९८॥दिवस मावळलाकर्दळी आड झालामला माघारा ना आलामाहेरीचा ॥३९९॥माझ्या माहेरालाडोलते मोठी बागवाटेल ते तू मागवैनीबाई ॥४००॥माहेरी जाईनबसेन अंगणीजशा लवती कामिनीभावजया ॥४०१॥अंगणात खेळेदणाणली माझी आळीलेकुरवाळी आलीमाहेराला ॥४०२॥जेवण मी जेवीभाजीभाकरीचेमायेच्या हातीचेगोड लागे ॥४०३॥जेवण मी जेवीजेवण जेवते पोळीचेपाणी माहेरच्या गावीचेगोड लागे ॥४०४॥माहेरच्या वाटेमऊ गार हरिक दाटेसासरल्या वाटेटोचती कुचकुच काटे ॥४०५॥जाईन माहेरीबसेन खांबापाशीधाकट्या भावापाशीगुज बोलू ॥४०६॥जाईन माहेरीबाप्पाजींच्या घराघुसळीन डेराअमृताचा ॥४०७॥जाईन माहेरीपदर घेईन पुरतासभे बैसला चुलताकाकाराया ॥४०८॥जाईन माहेरीपदर घेईन दोन्ही भुजावडिलांपरीस धाक तुझाकाकाराया ॥४०९॥जाईन माहेरीबैसेन बाजेवरीविसावा तुझे घरीमाउलीये ॥४१०॥जाईन माहेरीबैसेन मी खाटेविसावा तुझे घरीमाहेरास ॥४११॥मजला माघारीतुजला का न येजोडीने जाऊ सयेमाहेराला ॥४१२॥मजला माघारीमदनाचे घोडेसदनाचे पुढेगोपूबाळ ॥४१३॥काळी चंद्रकळाधुऊन धुऊन विटलीनाही हौस फिटलीमाहेराची ॥४१४॥दळण मी दळीहळदीवीण फिक्केमायेवीण सख्खेकोणी नाही ॥४१५॥बाप्पाजींच्या गं बहिणीनको बोलू तुझे माझेएक माहेर तुझे माझेआत्याबाई ॥४१६॥माहेरीचा देवकशाने ओळखावानिशाणी मोती लावासोमेश्वराच्या ॥४१७॥माहेरीचा देवतुझा माझा एकपूजा बांधू समाईकआत्याबाई ॥४१८॥बाप तो ईश्वरमायबाई काशीनंदी आहे पायांपाशीभाईराया ॥४१९॥आजोळच्या ओटीवरीआजीबाई बसेघराला शोभा दिसेमामारायांच्या ॥४२०॥बारीक दळणाच्यासभेमध्ये गेल्या गोष्टीघरीची रीत मोठीमायबाईच्या ॥४२१॥बारीक दळणाचीभाकरी चवघडीआठवण घडीघडीमायबाईची ॥४२२॥मामेयाच्या घरीभाची मी पाहुणीसमया लावुनीथाट केला ॥४२३॥मामा की हो पुसेभाची केवढीशी झालीचुनाडी रंगविलीकमळाबाईला ॥४२४॥साखरेचा पुडामुंग्यांनी फोडीलातुझ्या मामाने धाडीलातान्हेबाळा ॥४२५॥मोगर्या फुलांनीभरले देवघरपूजीले रघुवीरबाप्पाजींनी ॥४२६॥गुलाबाची फुलेशंकर बाळाच्या ओंजळीत्याची तुला पुष्पांजळीगणेराया ॥४२७॥देवांचा देव्हाराफुलांनी भरलामंत्रांनी पूजीलाबाप्पाजींनी ॥४२८॥काशीतले कागदआले लखोट्यानेवाचीले घोड्यावरीचंदुबाळाने ॥४२९॥मामेयाचे घरीआले उडाउडीवाचीले घोड्यावरीमामारायांनी ॥४३०॥मामेयाचे घरीभाचे कारभारीशेले जरतारीपांघुरती ॥४३१॥मामेयाचे घरीभाचे कारकूनवस्त्रे घ्या पारखूनमधुबाळाला ॥४३२॥बहिणीचे बाळमला म्हणे मावशीबाईउचलुन कडे घेईलीलाताई ॥४३३॥शेजारिणीबाईतुला शेजार चांगलानाही मला आठवलामायबाप ॥४३४॥शेजारिणीबाईएका दारी दोघी वागूमाझी मैना तुझा राघूखेळतील ॥४३५॥शेजारिणीबाईधन्य तुझ्या शेजारिणीसय नाही माहेराचीबारा वर्से ॥४३६॥शेजारिणीबाईमाझी वेणी हो घालावीआईच्या हातांचीआठवण मज द्यावी ॥४३७॥शेजीच्या घरी गेल्याशेजी बोलली रागानेकोवळे मन माझे नेत्र भरले पाण्याने ॥४३८॥शेजीच्या घरी गेल्येजाऊ नये जाणे आलेतिच्या बोलण्यानेमन माझे दुखविले ॥४३९॥शेजीने दिली भाजीदिली अंगणातकाढी भांडणातवारंवार ॥४४०॥शेजरिणीबाईगर्वाने दाटलीपाने केळीची फाटलीवारियाने ॥४४१॥शेजारिणीबाईनको करु गर्व फाररोज गं बघत्येदिव्याखाली अंधकार ॥४४२॥शेजारिणीबाईचल जाऊ नदीवरधुण्याची धुऊ मोटकरु मोकळे अंतर ॥४४३॥शेजारिणीबाईतुमचे झाले उपकारकसे फेडू सांगामनी ठेवावा आभार ॥४४४॥शेजारिणीबाईघरी का आज सुनेदूर ग देशा गेलेमाझे सौभाग्याचे सोने ॥४४५॥शेजारिणीबाईआज कसली केली भाजीआज कसली भाजीस्वारी गेली स्वारीमाजी ॥४४६॥शेजीच्या घरी गेल्येतिला आला होता ताठादुःखाचा माझा वाटादैव माझे ॥४४७॥शेजीच्या घरी गेल्येशेजीला झाला गर्वपराड्मुख होती सर्वअभागिया ॥४४८॥शेजारिणीबाईनको हो मला हसूयेतील तुझ्या आसूलोचनांना ॥४४९॥शेजारिणीबाईगर्वाचे घर खालीगोष्ट ही कधी काळीविसरु नको ॥४५०॥शेजीचे बोलणेसदा उरफाटेबोचती माझ्या काटेकाळजाला ॥४५१॥शेजीचे बोलणेझोंबले ह्रदयाशेजीला दयामायानाही ठावी ॥४५२॥शेजारिणीबाईमनी अढी धरु नकापुन्हा गोड होऊएकमेका देऊ सुखा ॥४५३॥शेजारिणीबाईमाझेच चुकलेआता धरिते पाऊलेसोड राग ॥४५४॥संक्रांतीचा तिळगूळचला देऊ घेऊशेजी प्रेमे आपण राहूसार्याजणी ॥४५५॥तीळ घे गूळ घेविसर मागील भांडणशेजी आता हे अंगणतुझे माझे ॥४५६॥तीळ घे गूळ घेआपण विसरु मागचेशेजी नवीन प्रीतीचेनाते जोडू ॥४५७॥तीळ घे गूळ घेआता विसर मागीलशेजी प्रेमाचे पाऊलदोघी टाकू ॥४५८॥माझ्या अंगणातशेजीचे पाच पुत्रत्यात माझे मंगळसूत्रवैनीबाई ॥४५९॥प्रेमाचा ओलावापाहून जवळ गेलीतहान नाही हो भागलीशेजीबाई ॥४६०॥मैत्रिणीकडे गेल्येमैत्रिणीला गर्व भारीपायांनी पाट सारीबसावया ॥४६१॥मैत्रिणीकडे गेल्येमैत्रिणीच्या दारा कडीतिच्या मनामध्ये अढीराहिलीसे ॥४६२॥प्रेमाच्या नात्याशीराहील कशी अढीचंद्राशी नाही कधीअंधकार ॥४६३॥जीवाला माझ्या जडसांगू मी कोणापाशीसखी राही दूरदेशीशांताताई ॥४६४॥जीवाला माझ्या जडनका सांगू एकाएकीघाबरी होईल सखीशांताताई ॥४६५॥जीवाला माझ्या जडनका सांगू मैत्रीणीसपडले धरणीस शांताताई ॥४६६॥ जीवाला माझ्या जडनका सांगू वाटेसखी गहिवरे दाटेशांताताई ॥४६७॥जीवीची मैत्रीणपडली दूर स्थळीदृष्टीला नाही पडलीबारा वरसं ॥४६८॥माझ्या गं मैत्रिणीआहेत देशादेशीआषाढी एकादशीभेटी झाल्या ॥४६९॥आपण मैत्रिणीजाऊ ग बारा वाटेजसे नशिबाचे काटेफुटतील ॥४७०॥आपण मैत्रिणीपुन्हा भेटी कधीआठवू मनामधीएकीमेकी ॥४७१॥वारियांच्या संगेआपण पाठवू निरोपपोचेल आपोआपमैत्रिणीला ॥४७२॥आपण मैत्रिणीमनात आठवूपत्रे ती पाठवूवार्यावरी ॥४७३॥जिवीची मैत्रीणदेवा खुशाल ठेवावीसुखात नांदावीसासर्याला ॥४७४॥माझ्या आयुष्याचीदोरी आहे बळकटसखी मला कधी भेटदेईल हो ॥४७५॥माझ्या गं मैत्रिणीआहेत दहाबाराएक दिली सुभेदाराशांताताई ॥४७६॥माझ्या ग मैत्रिणीआहेत दोघीतीघीत्यात माझ्या मनाजोगीमनुबाई ॥४७७॥माझ्या गं मैत्रिणीआहेत वीसतीसएकीला द्यावा खीसखोबर्याचा ॥४७८॥माझ्या गं मैत्रिणीआहेत गोर्यागोर्याकपाळी लाल चिर्याकुंकवाच्या ॥४७९॥माझ्या गं मैत्रिणीआहेत शंभरत्यात पहिला नंबरकमळाताईच ॥४८०॥माझ्या गं मैत्रिणीआहेत सात आठएकीला द्यावा पाट बसावया ॥४८१॥माझ्या गं मैत्रिणीआहेत किती पाहाकिती देऊ चहासांगा तुम्ही ॥४८२॥गोंडियांची वेणीमोगर्या दाटलीसखी सासर्या भेटलीमैनाताई ॥४८३॥मैत्रिणींच्या मेळ्यामध्येचांगली कोण दिसेहिरवा जी शालू नेसेशांताबाई ॥४८४॥मैत्रिणींचा मेळावेशी खोळंबलाशृंगार नाही झालाअजुनी माझा ॥४८५॥तुझा माझा मैत्रपणामैत्रपणा काय देऊएका ताटी दोघी जेऊ मनूबाई ॥४८६॥तुझा माझा मैत्रपणाएका घागरीतले पाणीनको कपट धरु मनीशांताताई ॥४८७॥तुझा माझा मैत्रपणामैत्रपणा काय देऊएक लवंग दोघी खाऊमनुबाई ॥४८८॥तुझा माझा मैत्रपणामैत्रपणा काय देऊएका घोटे पाणी पिऊमनूबाई ॥४८९॥माझ्या गं मैत्रिणीसाधुसंतांच्या बायकात्यांच्या मुखीचे आयकारामनाम ॥४९०॥मैत्रिणीकडे गेल्येमैत्रीण गुंतली कामातहार गुंफीते रामालातुळशीबागेच्या ॥४९१॥मिळाल्या भेटल्यागुजाच्या गुजकरणीलहानपणीच्या मैत्रिणीताई माई ॥४९२॥आपण गूज बोलूकशाला हवा दिवाआहे चांदण्याचा हवाशांताताई ॥४९३॥तिन्हीसांजा झाल्यादिव्यातील वात डोलेसखी माझी गोष्ट बोलेह्रदयातील ॥४९४॥आपण मैत्रिणीये गं बोलू गूजसुखदुःख तुझं माझंशांताताई ॥४९५॥किती ग वरसांनीभेटलो दोघीजणीसाठले किती मनीबोलू आता ॥४९६॥काय तू पुससीपळसा तीन पानेसंसारी समाधानेनांदू सखी ॥४९७॥कधी रागावतीबोलती कधी गोडमैत्रिणी अशी खोडकंथा माझ्या ॥४९८॥रुप ना लावण्यएक नाही गुण अंगीसंसार त्याच्या संगीकरणे दैवी ॥४९९॥रुप ना लावण्यनाही धन ग संपदाचुरिते परी पदाउषाताई ॥५००॥रुप ना लावण्यसोडीना कधी माडीकरितो नासाडीजीवनाची ॥५०१॥रात्र ना दिवसचंदन वेलीलाविळखा देऊन राहिलानाग जेवी ॥५०२॥कधी उजळे पुनवकधी काळी गं अवसमैत्रिणी काय सांगूमिळे सुधा मिळे वीख ॥५०३॥कधी फुले ग वसंततुझी सखी तेव्हा खुलेकधी वैशाख वणवाहरणी तुझी होरपळे ॥५०४॥मैत्रिणी काय सांगूगोड मी करुनी घेत्येदिवस रोज नेत्येमोजूनीया ॥५०५॥काय विचारीशीहोते धूसपूसमैत्रिणी येते घूसघरा कधी ॥५०६॥आधणाचे पाणीत्यात भात शिजवितेरुसवे फुगवेत्यात सुख पिकविते ॥५०७॥आधणाचे पाणीओतिते विसावणपतीच्या रागातमिसळते प्रेमगुण ॥५०८॥दूध वर येतापाणियाने खाली जाईकंथाचा ग राग सखीहसण्याने नष्ट होई ॥५०९॥कंथ रागावता सखीहळू हसून बघत्येक्रोधी मुद्रा मोहावतेक्षणामाजी ॥५१०॥शत गं जन्मांचीपुण्याई आली फळामाझ्या कुंकवाची कळासूर्या सारी ॥५११॥लाखात एखादातसा सखा माझा पतीअनुरक्त परी व्रतीभाग्य माझे ॥५१२॥पुरविती हौसमैत्रिणी विचारुनआम्ही गं नांदतोदोघे हसून खेळून ॥५१३॥काय विचारिशीकधी ना सखी तंटाजीवेभावे ओवाळीनप्रेमरंगा माझ्या कंथा ॥५१४॥काय विचारिशीआहे हो खरी सुखीतुझ्या गळ्याची शपथकसे खोटे बोलू सखी ॥५१५॥समुद्राच्या काठी सखीमोती पोवळ्याच्या वेलीदैवाची उणीवकडू वेल हाती आली ॥५१६॥जीवाली देत्ये जीवजीव देऊ पाहिलापाण्यात पाषाणअंती कोरडा राहीला ॥५१७॥फोडीले चंदनत्याच्या केल्या बारा फोडीस्त्रियांची जात वेडीपुरुषांना माया थोडी ॥५१८॥सेवेला करित्येझटून झिजूनचीज त्याचे करी कोणमैत्रिणी गे ॥५१९॥हसेना बोलेनाकोणी सासरी गं मशीमैत्रिणी जीवासीकंटाळल्ये ॥५२०॥गळा घालू गळाये ग रडू पोटभरीपुन्हा जायाचे सासरीचारा दिशी ॥५२१॥नको गं रडू गडेहोईल सारे भलेअवसेचे काळेकोठे राहे ॥५२२॥नको रडू गडेहोईल तुला सुखप्रार्थीन गजमुखतुझ्यासाठी ॥५२३॥नको रडू गडेहोईल सखी भलेचिखली कमळेफुलतात ॥५२४॥नको रडू गडेजरी वरुन पाषाणझिरपे आतूनफुटतील ॥५२५॥मैत्रिणी भेटतीहसती रडतीफिरुन दूर जातीसंसारात ॥५२६॥मैत्रिणी भेटतीजीवाचे बोलतीफिरुन दूर जातीसंसारात ॥५२७॥पुत्रनिधनाचेदुःख दारुण कठीणबरे त्याहून मरणमाये वाटे ॥५२८॥अपत्याचा लाभत्याहून नाही सुखआणि त्याचा ग वियोगत्याच्याहून नाही दुःख ॥५२९॥नको ग बाळे रडूकिती तू रडशीलपुन्हा ग फुलतीलफुले दारी ॥५३०॥नको नको रडूडोळे झाले लालहोईल पुन्हा बाळसावळीये ॥५३१॥नको नको रडूधर गे मनी धीरशोभेल पुन्हा घर माझ्या बाळे ॥५३२॥नको नको रडूरडे आपुले आवरहा सेल तुझे घरतान्हेबाळे ॥५३३॥पुरे हो रडणेधीर ना सखी सांडीशोभेल पुन्हा मांडीतान्हेबाळाने ॥५३४॥नको नको रडूपुन्हा कळी गं फुलेलपुन्हा पाळणा हलेलतुझ्या घरी ॥५३५॥नको नको रडूबघ तू माझ्याकडेआवरी बाळ रडेविवेकाने ॥५३६॥आंबे मोहरतीसारे कुठे गं फळतीफळती तितुके ना पिकतीकिती सांगू ॥५३७॥दूर गं देशीचावारा येतो संथसुखी आहे तुझा कंथमनूबाई ॥५३८॥निरोप मी धाडीगोपूबाळाच्या आईलामाझ्या उषाबाईलासांभाळावी ॥५३९॥निरोप मी धाडीशंकरपंतांना कानी सांगाआठ दिवसांची रजा मागाउषाताईला ॥५४०॥ सूर्याच्या समोरमाझ्या अक्काबाईचे घरओसरीला दारचंदनाचे ॥५४१॥जीव माझा गेलाचोळी पातळ दांडीवरीजीव गेला मांडीवरीभाईरायाच्या ॥५४२॥राखी राखी देवादिव्यातला दीपकमाझ्या भाईरायाचा एकगोपूबाळ ॥५४३॥राखी राखी देवादिव्याची की ज्योतमाझ्या भाईरायाची लेकउषाताई ॥५४४॥नेसा माझ्या वैनीबाईहिरवा शालू कमळाचाकडे पुत्र जावळाचाचंदूबाळ ॥५४५॥काय सांगू बाईभाईरायाचा खोली माचाकिल्ल्या कुलपाचादरवाजा ॥५४६॥सोंगट्या खेळतानाफासे आले हारीमामा तुझे रे कैवारीगोपूबाळा ॥५४७॥देवाचे देऊळीरुद्रजप पारायणकंथा तुझा नारायणउषाताई ॥५४८॥नाकीची ग नथपडली ताकातमामारायांच्या धाकातमामीबाई ॥५४९॥माझ्या घरी गं पाहुणामांडा करीन साईचाआला माझा मामारायाभाऊ माझ्या गं आईचा ॥५५०॥माझ्या घरी गं पाहुणीकरीन करंजी सायीचीआली माझी मावशीबाईबहीण माझ्या गं आईची ॥५५१॥एका छत्रीखालीमामाभाचे चौघेजणधाकुट्याला लिंबलोणमधुबाळाला ॥५५२॥धाडा माघारी पाहुणासाखर - साईचाभाऊ माझ्या हो आईचामामाराया ॥५५३॥चल शिंगीबाईतुझी चाल पाणेयाचीवर स्वारी तान्हेयाचीमधुबाळाची ॥५५४॥नदीपलीकडेशालूच्या त्या कोणलेक माझी तुझी सूनसखी दोघ्या ॥५५५॥पाया पडू आलाभावजयांचा घोळकात्यात धाकुटी ओळखाअप्पारायाची ॥५५६॥पाया पडू आलीआशीर्वाद काय देऊजन्मसावित्री पुत्र होऊउषाताईला ॥५५७॥पाया पडू आलीआशीर्वाद काय द्यावाअक्षयी चुडा व्हावाउषाताईचा ॥५५८॥पाया पाडू आलीभाचेसून माझीराजसा राणी तुझीगोपूबाळा ॥५५९॥माझ्या अंगणातचांदीचे फुलपात्रसंध्येला झाली रात्रबाप्पाजींच्या ॥५६०॥मला हौस मोठीताईबाईला आणावीनवी पालखी विणावीरेशमाची ॥५६१॥उठा उठा वैनीबाईदारी उजाडलेआपुल्याला वाण आलेहळदीकुंकू ॥५६२॥माझ्या दारावरुनबेलाच्या पाट्या जातीशंकराची भक्ती मोठीबाप्पाजींना ॥५६३॥माझ्या दारावरुनकोण गेली सवाशीणकाजळकुंकू बाळंतीणमामीबाई ॥५६४॥हाती गोटतोडेमागे पुढे सारित होत्येभावांना वाढीत होत्येपंचामृत ॥५६५॥जीवाला देते जीवप्राणाला होते राजीसखी माय बहीण तुझीगोपूबाळा ॥५६६॥शेवंती फुललीफुलली पाकळीनिघाला आजोळीगोपूबाळ ॥५६७॥मामाच्या रे घरानको जाऊ कामावीणयेऊ दे बोलावणंगोपूबाळा ॥५६८॥मामाच्या रे घरानको जाऊ लडालडायेऊ दे गाडीघोडागोपूबाळा ॥५६९॥चंदन चंदनचंदनाची बारा नावेउंची चंदन मला द्यावेभाईराया ॥५७०॥माझ्या अंगणातकोण बैसली दुलाबाईवडिलांची वाट पाहीसुधाबाई ॥५७१॥लगीनसराईकापडाची महागाईनेस माझा वैनीबाईपीतांबर ॥५७२॥सासूचा सासुरवासनणंदा तुम्ही हळू बोलामाझा दमून भागूनकंथ बाहेरुनी आला ॥५७३॥उठा उठा जाऊबाईदिवे लावा गच्चीवरीभावोजी हत्तीवरीघरी आले ॥५७४॥गावातल्या गावातउषाताईचे सासरेगाडीला जुंपिली वासरेदादारायाने ॥५७५॥गावातल्या गावातकिती घेशी बोलावणीअभिमानाच्या बहिणी उषाताई ॥५७६॥आधी मूळ धाडालांबच्या अक्काबाईलाजवळच्या सखुबाईलादांडी डोल्या ॥५७७॥माझ्या घरी ग पाहुणीजिलबी केली ग साईचीबहीण माझ्या ग आईचीमावशीबाई ॥५७८॥खाऊ मी धाडीलाबत्तासा रेवडीचाभाचा माझ्या आवडीचामोरुबाळ ॥५७९॥नदीपलीकडेकोण ग दिसतंहाती तांब्याची परातमावशीबाई ॥५८०॥गोपूबाळ वसंत बाळहे दोघे जोडीचेशेले चुनाडीचेपांघुरले ॥५८१॥शंकर बाळ मोरु बाळहे दोघे जोडीचेमाझ्या आवडीचेदोन हिरे ॥५८२॥शंकर बाळ मधू बाळहे दोघे गडी गडीजशी भीमार्जुनाची जोडीघरामध्ये ॥५८३॥एका छत्रीखालीकोण ग चालतीमामेयाच्या संगेभाचे बाहेर निघती ॥५८४॥गंगूबाई रंगूबाईया दोघी मावश्याभाच्याडोकीवरील कुंच्यारेशमाच्या ॥५८५॥धाकटी वैनी मोठी वैनीभांडती कडाकडामध्ये साखरेचा खडागोपूबाळ ॥५८६॥धाकटी वैनी मोठी वैनीजावांचा गं जोडाकोथिंबीरी चुडाभरियेला ॥५८७॥भांडशी भांड गड्यातुझ्या तोंडाची जाते वाफभल्या बापाची मी लेकनेदी जाप ॥५८८॥शेजारी भांडतोकरितो हमरी तुमरीबोले ना उषाताईथोरामोठ्याची ग नारी ॥५८९॥सारखरेचे लाडूवाटेच्या पाहुण्यांनाश्रीधरपंत मेहुण्यांनाएकादशी ॥५९०॥सावळे मेहुण्यांनासमई नाही दिलीचंद्रज्योत उभा केलीशांताताई ॥५९१॥मनोहरपंत मेहुणेआपल्या आईचे बालकदिली पुतळा ठळककमळाताई ॥५९२॥हाती दौतलेखणीकलमदानी गोंडेकारकून हिंडेबाप्पाजींचा ॥५९३॥माझे ओटीवरबुकांचे की ओझेवकील नाव तुझेअप्पाराया ॥५९४॥चौसोपी माझे घरकितीदा काढू केरमाझे भाग्यवंत दीरघरी आले ॥५९५॥माझा नव्हे कोणीमाझ्या बहिणीबाळेचाहिरा मोहनमाळेचागोपूबाळ ॥५९६॥माझा नव्हे कोणीमाझ्या बहिणीचा होशीमला मावशी म्हणशीचंदूबाळ ॥५९७॥माझ्या गं घरातसदा येती आप्त इष्टमाझ्या घराचे अभीष्टचिंतितात ॥५९८॥नदीपलीकडेकोणाच्या मोर्या गायीआजोबा आजीबाईदान देती ॥५९९॥नदीपलीकडेकोणाची वासरेतेथे तुझे गं सासरेउषाताई ॥६००॥चिठी बरोबरआंबे द्या पाठवूनत्यात ठेवावे लिहूनउषाताईला ॥६०१॥लेकी झाल्या लोकीसुना झाल्या लेकीहातीचे काम घेतीमायबाईच्या ॥६०२॥लेकी झाल्या लेकुरवाळ्यासुनांना आली न्हाणेदैवाची देते वाणेअक्काबाई ॥६०३॥नातवंडे पंतवंडेभरली ओसरीदैवाची बैसलीआजीबाई ॥६०४॥नातवंडांची आजीपंतवंडांना दूध पाजीदैवाची आहे माझीआजीबाई ॥६०५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP