नवम स्कंध - अध्याय तेरावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नारदम्हणेनारायणा । षष्ठीमंगलचंडीआख्याना । मनसादेवीविधाना । कृपाकरुनसांगिजे ॥१॥

नारायणसांगेचरित । षष्ठीदेवीचेंवेदोक्त । राजाअसेप्रियव्रत । पुत्रस्वायंभुवमनूचा ॥२॥

तोयोगीशूरज्ञानी । भार्यानामेंमालिनी । पुत्रनहोयपाहुनी । कश्यपकरवीपुत्रेष्ठी ॥३॥

चरुदेतमांलिनीशी । भक्षितांधरिगर्भाशी । पुत्रझालाद्वादशवर्षी । परीमृतचीउपजला ॥४॥

अतिरुपस्वर्णकांती । पाहतांसर्वहीरडंती । रायेंनेलास्मशानाप्रती । मांडीवरीघेतला ॥५॥

त्याचेंमुखपाहून । शोककरीरावगहन । विसरलासर्वज्ञान । पुत्रशोकेकरुनिया ॥६॥

करुंनदेत्याचेविसर्जन । म्हणेंसवेंचिप्राणदेईन । तवपाहिलेंविमान । शुद्धस्फटिकशोभले ॥७॥

अनेकभूषणेभूषित । क्षौमवस्त्रेंवेष्टित । पुष्पमाळावरीरुळत । क्षुद्रघटांवाजती ॥८॥

उतरलेतेंभूमीवरी । आंतबैसलीदिव्यनारी । सख्यावारितीचामरी । कोणीदेतीतांबूल ॥९॥

श्वेतचंपकाचिकांति । दिव्यभूषणेंशोभती । तीयोगसिद्धमूर्ति । कृपार्णवापरांबा ॥१०॥

पाहतांचितीसनृपवर । बाळठेविलातेणेंदूर । करुनियानमस्कार । प्रार्थुनीमगविचारी ॥११॥

तूंकोणाचीकोण । कोणाचीकन्यापतीकोण । धन्यामान्यातेजगुण । तुजसमनाहींमजवाटे ॥१२॥

तेव्हांबोलेदेवसेना । ब्रम्हदेवांचीमानसीकन्या । दिलीमजषडानना । मातृकाजाणमजलागी ॥१३॥

मूळप्रकृतीचाषष्ठांश । तेणेंषष्ठीनामविशेष । पुत्रदामीअपुत्रास । दरिद्रासीधनदामी ॥१४॥

ऐसेंतयाबोलोनी । बाळाजीववीतत्क्षणी । पुन्हांनृपासीपुसूनि । बाळासहजाऊंपाहे ॥१५॥

हर्षलानृपपाहून । उद्विग्नझालामागुत्यान । तिचेंपाहूगमन । स्तवनकरीसप्रेमें ॥१६॥

मगहोऊनप्रसन्न । म्हणेकरीमाझेंपूजन । करवीसर्वप्रजेहांतून । तरीदेईनपुत्रतुझा ॥१७॥

लक्षनागबलयासीं । करीलशतयज्ञाशीं । सुव्रतनामसुयशी । सर्वगुणसंपन्न ॥१८॥

घेऊननृपाचेंवचन । बाळतयासीदेऊन । मंगलचंडीनिघून । गेलीवेगेंस्वस्थानां ॥१९॥

रावघेऊनबाळाशी । गृहींआलाअतिहर्षी । वृत्तसांगेभार्येसी । बाळदेत आनंदें ॥२०॥

स्वयेंकेलेपूजन । मासींमासींभक्तीन । त्याच्याआज्ञेंसर्वजन । पुजाकरितीसप्रेमें ॥२१॥

सूतिकेचेंगृहातरी । मूर्तिकाढूनभिंतीवरी । अथवाशस्त्रस्थापूनसमोरी । सहावेंरात्रीपूजन ॥२२॥

मंत्राचाजपकरुन । रायेंकेलेंपूजन । दिव्यस्तोत्रेंकरुन । स्तवनकेलेंनृपानें ॥२३॥

नमोदेवीमहासुखदा । षष्ठीदेवीतूंमोक्षदा । षष्ठांशतूंमहासिद्धा । मूलप्रकृतीनमोस्तु ॥२४॥

महामायातूंयोगिनी । शारदेसारदेभवानी । परेबालेकल्याणी । कल्याणपदेनमोस्तु ॥२५॥

प्रत्यक्षाकर्मफलदा । देवरक्षिणीबलदा । स्कंदकांतामानदा । शुद्धसत्वेनमोस्तु ॥२६॥

पुत्रसुखयशमान । कीर्तिधर्मबलधन । भूमीपशूइष्टकल्याण । देईमाझेंनाशीरिपू ॥२७॥

एवंकेलेंस्तवन । हेंकरितांश्रवण । सर्वसिद्धकल्याण । पुत्रादिदेतसर्वही ॥२८॥

मंगलचंडीकथानक । ऐकमुनेसुखदायक । चतुराजीमंगलदायक । मंगलचंडीनामतिचे ॥२९॥

मंगलाचीअभिष्टदा । मंगलनृपाचीकामदा । शिवाचीजीयशोदा । मंगलचंडीभवानी ॥३०॥

दुर्गेचीहीभिन्नमूर्ति । प्रत्यक्षहीप्रकृती । त्रिपुरयुद्धींइजप्रती । शिवेंपूजिलीप्रथमतः ॥३१॥

भूमिपुत्रेमंगले । दुसर्‍यानेंदुजपूजिले । मनुस्रुतेमंगले । तृतीयपूजाकेलीसे ॥३२॥

चौथ्यासुंदरीपूजिती । पांचव्यानेंसर्वघ्याती । सर्वेष्टदापरंज्योती । पराशक्तिचित्कला ॥३३॥

विधिविष्णुचेआज्ञेनी । शिवेंपुजीलीभक्तिनी । मंत्र इचाजपूनी । स्तवमगकरीतसे ॥३४॥

हेमातेमंगलचंडिके । विपत्तिराशिहारिके । सर्वमंगलेनमोस्तु ॥३५॥

हेसंसारसुमंगले । मोक्षदेस्रुखदेनिर्मले । पूज्येधन्येअतिबले । मोहनाशेनमोस्तु ॥३६॥

हेंस्तवन ऐकून । शिवासीझालीप्रसन्न । शिवेंघेऊनवरदान । त्रिपुरवंधस्वयेंकरी ॥३७॥

हेमंगलचंडीआख्यान । सर्वमंगलाचेंस्थान । भक्तिनेंकरितांश्रवण । अमंगलेनासती ॥३८॥

वदेमुनीमानसकथा । ऐकतांचिहरेव्यथा । कश्यपऋषिचीहीसुता । मनापासूनप्रगटली ॥३९॥

मनसानामपावली । तीनयुगेंतपेतपली । सर्वांगेतीकृशजाहली । श्रीकृष्णझालाप्रसन्न ॥४०॥

जरत्कारुनामठेविले । श्रीकृष्णेंतीसपूजिले । नामसर्वत्रगाजलें । जगदगौरीऐसेंची ॥४१॥

शिवापाशीज्ञानशिकली । शैवीतेणेंम्हणविली । विष्णूचीभक्तीकेली । वैष्णवीनामयाकरितां ॥४२॥

नागचेकेलेंरक्षण । नागेश्वरीनामजाण । सर्पविषाचेंकरिहरण । विषहरीनामतियेचे ॥४३॥

सिद्धयोगझालेमुनी । नामझालेसिद्धयोगिनी । ज्ञानीअमृतसंजीवनी । आस्तीकमातानामतीचे ॥४४॥

जरत्कारुचीकामिनी । पतिव्रताशांतिखनी । संध्यासमईंनिजलामुनी । जागविलातियेनें ॥४५॥

निद्राभंगेंमुनीकोपला । शापूंपाहेरवीला । संध्येसहशरण आला । प्रार्थूनगेलापूषण ॥४६॥

स्त्रीसजावेंटाकुनी । प्रतिज्ञार्थ आलेमनीं । मनसादेवीप्रार्थीमनीं । तीनीदेवपातले ॥४७॥

विधिम्हणेमुनिवरा । भार्यात्यागवाटेबरा । पुत्रदेऊननिर्धारा । त्याग उचित असेकी ॥४८॥

ऐकतांचिऐसेंवचन । स्त्रीचीनाभीस्पर्शोन । बोलेतीसतपोधन । पुत्र आहेम्हणोनी ॥४९॥

गेलासवेंचिटाकुनी । मनसाआलीपितृसदनीं । पुत्रझालामहामुनी । आस्तीकनामठेविलें ॥५०॥

जन्मेजयाचेयज्ञकाळीं । इंद्रेमनसापुजिली । नागकुळेंतेव्हांरक्षिलीं । इंद्रासहतियेनें ॥५१॥

कलाजाणप्रकृतीची । मूर्तिकेवळशांतिची । इंद्रेपूजुनसाची । स्तवनकरीप्रीतीनें ॥५२॥

परात्परेमूळप्रकृति । दयालज्जाकृपाशांति । सत्याक्षमारमाकांति । सर्वदात्रीनमोस्तु ॥५३॥

मासांतिअथवापंचमीदिनी । तुजपूजितीलभक्तीनी । नागभयनसेसदनी । सर्वसुखप्राप्तहोय ॥५४॥

एवंकरुनस्तवन । भगिनीसदेऊनसर्वांभरण । स्वगृहींगेलाघेऊन । राहिलीतीपितृगृहीं ॥५५॥

तोसुरभीगोलोकांतून । दुग्धाभिषेककरीयेऊन । उत्तमज्ञानदेऊन । गेलीपुन्हास्वलोकां ॥५६॥

हेंमनसाचरित । प्रेमेंजोपठणकरीत । विषादिभयकिंचित । नुपजेवांछितमिळतसे ॥५७॥

नारदम्हणेस्रुरभीकोण । चरित्रकरीवर्णन । तेव्हांसांगेनारायण । जन्माख्यानधेनूचे ॥५८॥

एकदांराधेसह । गोपगोपीसवेंघेऊन । आलाजेथेंवृंदावन । भूवैकुंठभारतीजें ॥५९॥

करावेंगोक्षीरपान । ऐसीइच्छाकरीकृष्ण । सवेंचिकेलीउत्पन्न । गायएकवामांगें ॥६०॥

मनोरथवत्सयुक्त । सुदामादुग्धकाढित । अमृताहूनिगोडबहुत । प्राशनकेलेंश्रीकृष्णें ॥६१॥

तेंभांडेविसळिलें । क्षीरसरोवरझाले । शतयोजनविस्तारले । प्रसिद्ध असेंगोलोकीं ॥६२॥

तिचेलोमरंध्रांतून । लक्षावधीगाईउत्पन्न । झाल्याअसंख्यगोधन । वृषादिकजाहले ॥६३॥

यासुरभीचेंपूजन । मंत्रतिचापूजन । इंद्रेंआरंभिलेंस्तवन । दिव्यपदेंतेकाळीं ॥६४॥

नमोनमोकामदुघे । मातेसुरभीअनघे । गोरुपेगोसंगे । जगदंबेनमोनमः ॥६५॥

राधाप्रियेवत्सले । पद्मांकशयेदयाले । कृष्णप्रियेसर्वपाले । धेनुमातेनमोनमः ॥६६॥

शुभेसुभद्रेगोप्रदे । कल्पवृक्षरुपेयशोदे । धर्मबुद्धीकीर्तिदे । जन्महरेनमोनम ॥६७॥

स्तोत्रेंझालीप्रसन्न । पयकेलेंपरीपूर्ण । दधिघृतझालेउत्पन्न । यज्ञसाधनहव्यहें ॥६८॥

हेंसुरभीचेंचरित्र । ऐकतांकरीपवित्र । इह आणिपरत्र । सुखदेतभक्ताशी ॥६९॥

नव आणितीनशत । षष्ठीमंगलचंडीचरित । मनसासुरभीचेंवृत्त । वर्णनयेथेंसंक्षेपें ॥७०॥

देवीविजयेनवमेत्रयोदशः ॥१३॥

श्रीगणेशायनमः । श्रीराधादुर्गाविधान । रहस्यजेंआख्यान । नारदपुसेप्रेमेंकरुन । नारायणसांगतसे ॥१॥

प्राणबुद्धीपासून । प्रकृतीझाल्याउत्पन्न । सर्वांचेसांगोपन । होयज्यांच्याकटाक्षें ॥२॥

सर्वदोघींचेआधीन । त्यांचेप्रसादावांचून । नहोयमोक्षसाधन । तीनीदेव आराधिती ॥३॥

आधीराधिकेचेंध्यान । सांगेनतिचेंस्तवन । पूर्वींमूलदेवीपासून । मंत्रघेतलाश्रीकृष्णें ॥४॥

तेणेंदिलाविष्णुशी । विष्णूदेतविरचीशी । तोदेईंविराटाशी । धर्मादेईंविराट ॥५॥

धर्मेंमज उपदेशिला । परंपरेनेंलाधला । बहुवर्षेंमीजपिला । ऋषींझालोंमीतेणें ॥६॥

सामवेदानुसार । ध्यानपूजाप्रकार । स्तोत्र ऐकेंसाचार । विमलपद्येंसुंदरतें ॥७॥

श्रीकृष्णाचीप्राणप्रिया । रासेश्वरीमहामाया । रासमंडलवासप्रिया । त्रिलोकमातेप्रणतोस्मी ॥८॥

ब्रम्हविष्णूपदवंदिती । रुपेंतुचिसरस्वती । सावित्रीगंगापद्मावती । शंकरीतुजप्रभ० ॥९॥

षष्ठीतूंचतुलसी । मंगलचंडीतूंचिअससी । लक्ष्मीदुर्गामानसी । प्रकृतीतुजप्रभ० ॥१०॥

यासंसारसागरी । बुडतोंकाढीबाहेरी । अंबेआतांदयाकरी । श्रीराधेप्रभ० ॥११॥

हेंराधेचेंस्तवन । भक्तीनेजोकरीपठण । दुर्मिळतयाकायहोण । दुर्गास्तव ऐकीजे ॥१२॥

मंत्रनवाक्षरजपावा । सप्तशतीस्तवकरावा । स्वर्गमोक्षलाभघ्यावा । साधकानेंसहजची ॥१३॥

हेंसप्तशतीअनुष्ठान । उत्तमपरीकठीण । करणेंशास्त्रपाहून । नाश अन्यथाकर्त्याचा ॥१४॥

हेंसर्व आख्यान । नारदाकेलेवर्णन । नारायणेंस्वमुखान । व्याससांगेजन्मेजया ॥१५॥

सूतसांगेऋषीसी । शतश्लोकसंहितेशी । देवीवर्णीश्रोतयासी । नवमस्कंदसंक्षेपेंचतुर्दश अध्यायसमाप्त ॥१६॥

नवमस्कंदसमाप्त :

इति श्रीदेवीविजयेनवम स्कंदः समाप्तः ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP