मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|नवम स्कंध| अध्याय पांचवा नवम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा नवम स्कंध - अध्याय पांचवा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय पांचवा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । वेदवतीचेदिव्यचरित्र । नारायणसांगेपवित्र । नारदासिअतिचित्र । श्रवणेंकरीसुखातें ॥१॥मनुमुख्यदक्षसावर्णी । सुतत्याचाब्रम्हसावर्णी । तयाचाधर्मसावर्णी । रुद्रसावर्णीसुतत्याचा ॥२॥तत्पुत्रदेवसावर्णीं । त्याचातोइंद्रसावर्णी । तोमोठावैष्णवाग्रणी । वृषध्वजपुत्रत्याचा ॥३॥तोमोठाशिवभक्त । तिरस्कारीसर्वदैवत । शिवत्याचेघरीराहत । तीनयुगेंदेवांची ॥४॥भक्तिवश्यमहेश्वर । नेणेंभक्तदुराचार । वात्सल्यकरीनिरंतर । पुत्राहूनविशेषें ॥५॥भाद्र्पदीलक्ष्मीपूजन । माघमासींपंचमीदिन । करितिदेवपूजन । सरस्वतीचेआदरें ॥६॥रावकरीअनादर । तेणेंकोपलामिहीर । शापदीधलादुस्तर । भ्रष्टश्रीहोयम्हणे ॥७॥वृत्त ऐकतांचिहर । भक्तापराधेकोपेंफार । शूलघेऊनभयंकर । धाविनलासुर्यावरी ॥८॥आलापाहुनस्मरारी । भयेंपळालातमारी । कश्यपाशीनमस्कारी । म्हणेवाचीवमदगुरी ॥९॥पाठीआलापुरहर । पुत्रासहतोमुनिवर । पळालावेगेंसत्वर । शरणगेलाचतुरानना ॥१०॥तयाचेवाक्य ऐकून । दोघांसहविधीतेथून । वेगेंवैकुंठांजाऊन । वृत्तसांगेहरिसी ॥११॥अभयदेतनारायण । स्थीरव्हाआतांतिघेजण । भयनाहींहरापासून । रिघतांमाझेंपाठीशीं ॥१२॥तोहीदेवसर्वेश्वर । संतभक्ताचेमाहेर । भक्तवत्सलशंकर । भक्तापराधेंकोपला ॥१३॥शिव आणिसुदर्शन । प्रियमजप्राणाहून । तेजस्वीतयासमान । आहेकोणदुसरा ॥१४॥कोटिसूर्यकोटिरंचि । लीलामात्रेंजोरची । दुज्याससमतात्याची । करवेलकेवींसांगिजे ॥१५॥सदाह्रदईंमाझेंध्यान । करितोमीहीसदाचिंतन । भेदमानीजोकृपण । काळसूत्रेंत्याकरितां ॥१६॥एवंजोंहरीबोलत । तोंशिवपातलातेथ । वृषारुढत्रिशूलहस्त । रक्तनयन उग्रात्मा ॥१७॥वृषावरुन उतरला । नारायणतेणेंनमिला । वरचेवर उचलिला । आलिंगिलाश्रीरंगें ॥१८॥विधिकश्यप आणिमित्र । शिवपदवंदितीपवित्र । स्तुतीकरीविधिपौत्र । शंकराचीभक्तिनें ॥१९॥बैसविलादिव्यासनी । विष्णूनेंतेव्हांसन्मानुनी । श्वेतचामरेकरुनी । विष्णुपार्षदसेविती ॥२०॥अमृततुल्यगोडवचन । हळूंचपुसेनारायण । कायकोपाचेंकारण । येणेंकिमर्थजाहलें ॥२१॥शिवम्हणेमाझाभक्त । तयाचंडकरशापित । तेणेंकरावयाघात । तपनाचाधांवलों ॥२२॥तोआलातुजजवळी । भयनाहींचकदाकाळीं । परिवृषध्वजासशापबळी । केवींआतांकरावें ॥२३॥शिवासीम्हणेंनारायण । येथेंजाहलाएकक्षण । परीभूवरीकाळमान । एकवीसयुगेंगेलेसें ॥२४॥वृषध्वजपावलामरण । तत्पुत्ररथध्बजजाण । तोहीपावलामरण । हतश्रीककालयोगें ॥२५॥त्याचेसुतदोघेजण । धर्मध्वजकुशध्वजजाण । हतश्रीतेममभजन । लक्ष्मीसेवाकरिताती ॥२६॥लक्ष्मीप्रसादकरुन । होतीलतेश्रीसंपन्न । तवभक्तगेलामरुन । जाईंआतांशकरा ॥२७॥एवंविष्णूबोलून । सभाकेलीविसर्जन । सर्वपावलेस्वस्थान । शिवसूर्यमुनीविधी ॥२८॥लक्ष्मीचेजाहलेंवरदान । दोघेझालेश्रीमान्य । पुत्रराज्यऋद्धीधन । प्राप्तझालेंदोघांसी ॥२९॥कुशध्वजामालावती । रमणीअसेरुपवती । रमांशेंकन्यातिजप्रती । झालीदिव्यसुरुपा ॥३०॥बहुकालेंमालवती । झालीमोठीज्ञानवती । परिजन्मतांचिकन्येप्रती । ज्ञान असेंअदभुत ॥३१॥वेदम्हणेजन्मघेतां । वेदवतीनामतत्वता । सवेंचहोऊनसुस्नाता । द्वादशवर्षाजाहली ॥३२॥सर्वजनींनिवारिली । परीतेपुष्करागेली । महत्तप आचरली । मन्वंतरसमग्र ॥३३॥श्रमनसेतियेशी । धष्टपुष्ठजैशीतैशी । वाणीऐकेआकाशीं । जन्मांतरीहरिभर्ता ॥३४॥पुन्हाकरीतपदारुण । तेथेंपातलारावण । मोहलारुपपाहून । करधारिलातियेचा ॥३५॥वेदवतीनेंकोपून । केलेंतयाचेस्तंभन । हातपाय आकडून । गेलेंतेव्हांदुष्टाचे ॥३६॥रावणदेवीस्तवकरी । देवीतयामोकळीकरी । कन्याम्हणेतुझेंघरी । येऊननाशीनकुळासह ॥३७॥एवंतयाबोलून । देहगेलीटाकून । तीचपुढेंधरेंतून । सीतानामेंजाहली ॥३८॥श्रीरामसाक्षातहरी । तयासीतीसीतावरी । दैवयोगेंवनांतरीं । रामआलासीतेसह ॥३९॥अग्नीहोऊनब्राम्हण । रामासीसांगेयेऊन । आतांहोईलसीताहरण । दैवयोगेंअवश्य ॥४०॥देवीमजपाठविले । सीतारक्षीनयोगबळें । छायारुपएकवेगळे । तुजसमीपठेवीपा ॥४१॥वाक्य ऐकतांतैसेंकेलें । रामेपरीकोणानकळें । पुढेंपरीक्षेचेवेळें । रामाग्नीसपुसेछाया ॥४२॥माझीकायव्हावीगती । रामाग्नीतेव्हांसांगती । तपकीजेपुष्करांति । स्वर्गलक्ष्मीहोशीलतूं ॥४३॥तीगेलीक्षेत्रपुष्कर । तप आचरलीदुष्कर । देवाचीवर्षेंसाचार । तीनलक्षपर्यंत ॥४४॥तीजेव्हांतपकरी । कामातुरामागेंवरी । पतिदेऐसीवैखरी । पांचवेळावदती ॥४५॥भोळावरदशंकर । दिधलाछायेसीवर । पांडवपतीमनोहर । तुजहोतीलपांचहे ॥४६॥शिववरेंछायासती । द्रौपदीझालीविख्याती । स्वर्गलक्ष्मीझालीअंती । रामाग्नीच्यावरदानें ॥४७॥वास्तवसीतावेदवती । घेऊनरामतियेप्रती । अयोध्येचाझालानृपती । अकरासहस्रवत्सरे ॥४८॥सुखेंहरीसारमून । लक्ष्मीमाजीझालीलीन । रामहीसर्वांघेऊन । वैकुंठासीपातला ॥४९॥हेंवेदवतीआख्यान । नारदासांगेनारायण । तुलसीकथानिरुपण । अतःपरजाणिजे ॥५०॥चारवेदजिव्हेवरती । तीचजाणावेदवती । कलांशेंसाक्षात्प्रकृती । पद्मांशदेवीवरदाही ॥५१॥हेंसुरस आख्यान । जोकरीश्रवणपठण । विद्यायशधनधान्य । प्राप्तहोयतयाशीं ॥५२॥पंचदशोपरीशत । वेदवतीचेचरित । अंबाबोलेप्राकृत । रसभरितकथेसी ॥५३॥श्रीदेवीविजयेनवमेपंचमोध्यायः ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP