नवम स्कंध - अध्याय बारावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । स्वाहास्वधादक्षिणा । कलांशप्रकृतीचेजाणा । चरित्रपुसेनारायणा । देवऋषीनारद ॥१॥

तेव्हांहर्षेंनारायण । वदलापूर्वींस्वाहाख्यान । व्यासतेंचिनृपालागून । सूतसांगेऋषीशी ॥२॥

सृष्टिपूर्वींसर्वसुर । प्रार्थुनिजगत्पितर । मागतीतयांआहार । ब्रम्हाचिंतीहरीशी ॥३॥

स्वांशरुपेंनारायण । स्वयेजाहलाहुताशन । नामत्याचेचियज्ञ । ब्राम्हणदेतीहवीत ॥४॥

तेकादानहोयहुत । देवांसिनोहेंप्राप्त । पुन्हांविधीसीसांगत । नमिळेम्हणतीआम्हांते ॥५॥

धाताकरीतसेध्यान । श्रीकृष्णांगेलाशरण । कृष्ण आज्ञेकरुन । स्तविलीतेणेंप्रकृति ॥६॥

अंशरुपेंप्रगटली । स्वाहानामपावली । रमांशांतीप्रसन्नझाली । विधीसम्हणेमागवर ॥७॥

विधीम्हणेतुजवांचून । दाहींअशक्तहुताशन । दाहिकातूंहोऊन । तृप्तकरीदेवासी ॥८॥

तेव्हांतीहोयखिन्न । म्हणेमीकृष्णावांचून । अनृतमानितेंदृश्यभान । तेथेंकेवीरमावे ॥९॥

पुरीतुजदिलेंवचन । सार्थतेंचिकरीन । एवंतयासीबोलून । लक्षवर्षेंतपलीती ॥१०॥

श्रीकृष्णझालाप्रसन्न । म्हणेतूंअग्नजितीहोऊन । वाराहकल्पीमजवरुन । सुखभोगकरिशील ॥११॥

ममांशतोहुताशन । दाहिकाशक्तीहोऊन । त्यासीव्हावेंत्वांरममाण । देवतृप्तकरावें ॥१२॥

ब्रम्हदत्तमंत्रजपून । अग्नीकरीपूजन । आरंभिलेंतेणेंस्तवन । वेदवाक्येंकरुनिया ॥१३॥

वन्हिप्रियावन्हिजाया । संतोषकारिणीशक्तिक्रिया । कालरात्रीपरिपाककार्या । ध्रुवागतीदाहिका ॥१४॥

दहनक्षमासंसारसारा । घोरसंसारममुद्धरा । देवजीवनप्रकारा । देवपोषणकारिणी ॥१५॥

षोडशनामेंस्तविली । पावकासीतुष्टली । दाहिकाहोऊनरमली । तयासहशतवर्षे ॥१६॥

द्वादशवर्षेगर्भधारण । प्रसवलीतीपुत्रतीन । दक्षिणाग्नीप्रथमजाण । गार्हपत्य आहवनीय ॥१७॥

ऋषिमुनीद्विजजन । स्वाहानाम उच्चारुन । करुलागलेजेव्हांहवन । प्राप्तझालेदेवासी ॥१८॥

स्वाहादेवीचेंआख्यान । श्रवणकरितांपठण । षोडशनाम उच्चारण । करितांलाभेसर्वसिद्धी ॥१९॥

आतांऐकस्वधाचरित । विधातारचीपितराप्रत । चाररचिलेंमूर्तिमत । तेजोमयतिघासी ॥२०॥

कव्यवाह अग्निष्वात्त । बर्हिषदहेतेजयुक्त । सोमसोमपयममूर्त । अर्यमाऐसेचारहे ॥२१॥

त्याचेतृप्त्यर्थचतुरानन । निर्मीतसेश्राद्धतर्पण । अन्हिकविप्रालागुन । उपदेशीलेविधीनें ॥२२॥

स्नानसंध्याऔपासन । स्वाध्यायश्राद्धतर्पण । पूजावैश्वदेवबलिहरण । नवकर्मेंनित्यहीं ॥२३॥

जोगृहस्थगृहांतरी । राहुनिंनित्यकरी । तोअशुचिजन्मवरी । ऐसेंबोलेविधाता ॥२४॥

चारप्रकारेअसेस्नान । मानसमंत्रभस्मलेपन । चौथेंजलावगाहन । देहमलशुध्यर्थं ॥२५॥

संध्यागृहस्थासितीन । कीजेउत्तमकालसाधन । प्रातर्मध्यान्हसायंतन । अर्ध्योपस्थानजपक्रमें ॥२६॥

आहिताग्नीमाजीहवन । सायंप्रातःक्रमान । स्थालीपाकादियजन । औपासनयानांव ॥२७॥

वेदोक्तविधीकरुन । नित्यकरणेंब्रम्हयज्ञ । स्वाध्यायतोचिवेदाध्ययन । श्राद्धतर्पण ऐकिजे ॥२८॥

यमाचेनित्यतर्पण । त्याचेनाममंत्रेकरुन । तयानांवश्राद्धतर्पण । अन्यभेदसांगतों ॥२९॥

श्रद्धायुक्ततेंश्राद्धजाण । षण्णवत्यादिलक्षण । श्राद्धसूत्रींवर्णन । असेंतेथेंदेखिजे ॥३०॥

देवऋषिआचार्यगण । आणिआपलापितृगण । स्वशाखोक्तजेंतर्पण । नित्यकरणेंगृहस्थें ॥३१॥

उमाशिवरमापती । सूर्य आणिगणपती । पंचब्रम्ह अभेदमती । पूजनकीजेविधीनें ॥३२॥

गायमित्रतैसाअतिथी । यांशींपूजिजेअतिप्रितीं । तेथेंहोतांवक्रमती । कालसूत्रमिळेतया ॥३३॥

वेदींगाइलेपंचयज्ञ । देवभूतपितृयज्ञ । मनुष्य आणिब्रम्हयज्ञ । लक्षणयांचेंसांगतों ॥३४॥

ब्रम्हयज्ञतेवदेपठण । देवयज्ञदेवपूजन । पितृयज्ञश्राद्धतर्पण । भूतयज्ञभूतबली ॥३५॥

मनुष्यासींदेतांअन्न । त्यानांवमनुष्ययज्ञ । वैश्वदेवेंदेवयज्ञ । अन्नसंस्कारहोतसे ॥३६॥

पांचहत्यानित्यघडती । त्यांचीव्हावयानिष्कृती । वैश्वदेवहोमनिश्चिती । करणेंलागेब्राम्हणा ॥३७॥

वैश्वदेवरहित अन्न । देवनकरितीभोजन । तेजाणावेंराक्षसान्न । घृतरहितसर्वथा ॥३८॥

करितांनित्यबलिहरण । पूर्णहोतीचारयज्ञ । जोकरीसदाचरण । तोचिब्राम्हणजाणिजे ॥३९॥

असोहेंप्रासंगिक । ऋषीकरितीश्राद्धादिक । नमिळेपित्रांकणएक । ब्रम्हसभेसीतेगेले ॥४०॥

विधीनेंऐकतांवृत्त । मानसींकन्यानिर्मित । स्वधानामठेवित । प्रकृत्येशसुंदरी ॥४१॥

पितरपूजितीतिशी । भावेंकरितीस्तवाशी । करितीमंत्रानुष्ठानाशीं । प्रसन्नझालीतेधवा ॥४२॥

पित्रांचीतूंप्रियप्राण । ब्राम्हणाचीतूंजीवन । श्राद्धाचेंतूंअधिष्ठान । फलदात्रीनमोस्तु ॥४३॥

तूंपुण्यरुपासत्या । उत्तमव्रतातूंनित्या । सृष्टिलयींप्रगटगुप्ता । होसितुजनमोस्तु ॥४४॥

सर्वकर्मांचीपूर्णता । व्हावयातूंषडदेवता । रुपेंधरिसीतत्वता । कर्मटासीप्रसन्न ॥४५॥

प्रणव आणिस्वस्ती । नमः ऐसेंतुजम्हणती । स्वाहास्वधासर्वतृप्ती । सर्वपूर्तिदक्षिणा ॥४६॥

ऐसीकरितांस्तुती । प्रगटलीतीप्रकृती । विधीदेतपितराप्रती । तृप्तझालेतेधवा ॥४७॥

स्वधापल्लवेंपित्राशी । स्वाहापल्लवेंदेवासी । तृप्तकरीभुवनेसी । स्वधाख्यानपावनहें ॥४८॥

दक्षिणाहेसुशीला । रुपवतीगोपीअबला । जाणेंसर्वकामकला । गोलोकींरासमंडळी ॥४९॥

राधाअसतांसमोर । बैसलीकृष्ण अंकावर । कोपलीराधातिजवर । भयेंगुप्तकृष्णझाला ॥५०॥

राधेसीपाहूनकोपवती । गोपगोपीशरणयेती । सुशीलापळालीपरती । शापदेईतीसराधा ॥५१॥

जरीगोलोकींयेशील । तरीभस्मचिहोशील । श्रीकृष्णासीतेवेळ । हाकमारीश्रीराधा ॥५२॥

सुशीलेनेंतपकरुन । रमादेहींझालीलीन । इकडेविप्रकरितीयज्ञ । परीफळकांहींचनहोय ॥५३॥

आलेधात्यासीशरण । ब्रम्हदेवेंकेलेंध्यान । प्रगटझालेदेहांतून । नारायण आणिलक्ष्मी ॥५४॥

लक्ष्मीचेदक्षिणांशांतून । सुशीलाप्रगटेजाण । दक्षिणानाम ठेऊग । रमादेतविधीशी ॥५५॥

विधिदेतयज्ञासी । यज्ञकरीपूजनाशी । जपोनतिच्यामंत्रासी । स्तवनकेलेंसप्रेमें ॥५६॥

तुजवांचूनकर्मफल । देण्यासदेवहीदुर्बल । ऐसीतूंशक्तीसबळ । नमोदेवीदक्षिणे ॥५७॥

तूंचिहोयमाझीशक्ती । मजठाईकीजेप्रीती । एवंवदुनीतिजप्रती । तुष्टावरिलीतीयज्ञें ॥५८॥

झालातिसीरममाण । पुत्रफलनामेंशोभन । कर्महोतांपरीपूर्ण । फलहोयकर्त्याशी ॥५९॥

कर्महोतांचिपूर्ण । दक्षणादीजेतत्क्षण । वेदोक्तफलसंपूर्ण । तयालाभेनारदा ॥६०॥

होतांकर्मसमाप्त । मध्येंजातांमुहूर्त । दक्षणातेद्विगुणहोत । एकरात्रींशतगुण ॥६१॥

त्रिरात्रहोतांव्यतीत । अयुतगुणदक्षणाहोत । सप्तरात्रजरीजात । दोन अयुतवाढतसें ॥६२॥

मासजातांलक्षगुण । वत्सरेंत्रिकोटीगुण । व्यर्थकर्मसर्वजाण । ब्रम्हस्वहरीतोम्हणवे ॥६३॥

एवंहेंदक्षिणाख्यान । करितांयाचेंजोश्रवण । सांगत्याचेंकर्मजाण । यथाशक्तिदक्षणेनें ॥६४॥

एकूणनव्वदएकशत । स्वाहास्वधादक्षिणाचरित । येथेंबोलिलेंप्राकृत । सारभूतरसाळ ॥६५॥

श्रीदेवीविजयेनवमेद्वादशः ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP