मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|सप्तशती आर्या| अध्याय ४ सप्तशती आर्या अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ सप्तशती आर्या - अध्याय ४ मोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत. Tags : moropantsaptashatआर्यामोरोपंतसप्तशती अध्याय ४ Translation - भाषांतर प्रकुपित दुत सविस्तर शुंभासि शिवोक्त सर्व आयकवी ॥विघ्नित काम खळावा वर्णील क्रोध वेग काय कवी ॥१॥त्या दुतोक्तश्रवणें कोपें अत्यंत तापला खळ गा ॥व्यसनांत आपणाला पाडी मद जेविं आपला खळगा ॥२॥व्यावें फूंटकें तुंबी, फळ गंगा लंघनाऽर्थं बाहुनीं ॥हें कार्यं तसेंसांगे मुढा असुराऽधिपास बाहुनीं ॥हें कार्यं तसें सांगें मुढा असुराऽधिपास बाहुनीं ॥३॥हे धुम्रलोचना त्वां पाने मानेंही नित्य जी तृष्टा ॥स्वचमु घेउनि सत्वर जावें जेथें असेल ती दुष्टा ॥४॥केशंतें धरुनि बळें आकर्षुनि करुनि विव्हळा वीरं ॥आणावी जाणावी आज्ञा निःसंशया तुवां धीरें ॥५॥तीतें रक्षाया तरि तेथें कोणी उठेल जो दक्ष ॥मारावाचि असो पर तो सुर गंधर्वराज कीं यक्ष ॥६॥साठ सहस्त्र असुर बळ घेऊनि लंघावायासि तो मलयघी ॥पावं श्रेदुर्गेतें वेळेतें खवळला जसा जलवी ॥७॥जी व्यसन आश्रितांस न बाधों दे जेविं घन घटा ऊन ॥त्या भगवतीस तो खळ बळ मत्त असे वदे दटाऊन ॥८॥शुंभ नुशुंमापाशीं चाल तिळहि हित नसे दुरामिमानीं ॥त्या प्रभुच्या आज्ञेतें सर्वस्व हितावहा सुरभि मानीं ॥९॥प्रभुचे आज्ञा मोडिशि आवडली तुज नवीच कां चाल ॥प्रभुवाग्वशांसि ह्मणे नय कीं पाशीं पडोनि कांचाल ॥१०॥तुं नीतिनें जरि न त्या मत्स्वामि समीप धरुनि मद येशी ॥केशीं कवळुनि ओढुनि नेईन कीं कुजन पात्र न दयेशी ॥११॥जगदंबा त्यासि ह्मणे दैत्यैद्रे धाडिलासि या काजा ॥तुंचि बळी बळ वेष्टित जरि नेसिल यत्नकाय तरि माजा ॥१२॥नेसिल बळेंचि मज कीं तुं बळवानु ज्ञानधर्म नय शस्त्रे ॥कलह करुनि पुरुषाशी तेजें साधी न शैमं न यश स्त्री ॥१३॥तो समजे देवींनें रचिल्या विपुला निजोपहाससी ॥तीवरि धावं व्याघ्री वरि ओतुतसा सकोप हा सासी ॥१४॥हुंकारेंचि तयातें सहसा परमेश्वरी करी मसित ॥प्रकटि यश दरहिमकर दुग्धब्धितरंगहरहरिभसिन ॥१५॥क्रोधं तेहि खवळले गर्वे कोठेंहि जे न पर माती ॥पर माती करि त्यांची तत्काळाचे सहमृगेंद्र परमा ती ॥१६॥त्या धुम्रलोचनाचा तत्सैन्याचाही नाश कळला हो ॥शुंभ ह्मणे ती दृष्टा या कर्माचें यथार्थ फ्ळें लाहो ॥१७॥आज्ञा करी शिवेवरि जाया तो शुंभ दैप्त पुंडातें ॥जेणें निवेदिली ती त्या चंडातें तयाहि मुंडातें ॥१८॥रे चुंडमुंद हो जा सत्वर घेऊनि विपुल सैन्यातें ॥आणा खाणा तन्मद गद द्या धिक्कार करुनि दैन्यातें ॥१९॥यानंतर अंबेतें ओढुनि बळें धरुनियां वेणीं ॥किंवा बांधुनि आणा वृकचि तुह्मी असुर वीर ती एणी ॥२०॥अथवा गांठुनि समरीं अमुरांही शस्त्र शत गणें अल्पा ॥सिंह वधुनि करावी ती सर्वांहीं झटोनि हतकल्पां ॥२१॥मग करुनि कठिन निजमन बंधन युवतीस बळकट कर हो ॥तुमचें असावध स्त्री ती धरिल्याही न पळ कटक राहो ॥२२॥कार्य करा भुर्त्यावर पुर्ण प्रभुच्या प्रसाद हे जाणा ॥साधु असाधु करा परि बहु सत्वर मत्समीप ती आणा ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : January 28, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP