मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|सप्तशती आर्या| अध्याय २ सप्तशती आर्या अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ सप्तशती आर्या - अध्याय २ मोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत. Tags : moropantsaptashatआर्यामोरोपंतसप्तशती अध्याय २ Translation - भाषांतर देवी अरी बळ नाशें धावें कोपोनि ह्मणत चिक्षुर हा ॥जाणो करेणुंसि ह्मणे भंगाचा काम धरुनि इक्षु रहा ॥१॥मेरु शिरीं तोयदसा देवी वरि तो महेषु वृष्टि करी ॥सिंहीतें माराया वाटे झटतो मंदांऽध दृष्टि करी ॥२॥देवीं ते शर तोडुनि सोडुनि निज शत्रु काय हानि कर ॥लीलेनें चि अरिसि करि विरथ् ह्मणति देव काय हा निकर ॥३॥हय सारथि चाप ध्वज नाशें अत्यंत पाप तो खवळे ॥अपराधंकरी जैसा द्याया आशींस साप तोख वळे ॥४॥तीव्रत्वें क्षुरं चिक्षुर तो घेउनि खडग चर्म नव द्यावे ॥देवी ह्मणे असे म्यां न विलोकुनि शरकर्म न वधावे ॥५॥आघीं करी हरि शिरीं तो समरीं चिक्षुर प्रहारातें ॥जरि ही ल्याला होता या समरें चिक्षुरप्र हारातें ॥६॥मग जो वर तेजाचा लावण्याचा हि सव्य भुज गाभा ॥खंगे करुनि हाणी चिक्षुर त्या परमभव्यभुजगाभा ॥७॥देवी बाहु स्पर्शें गेला तत्काळ उडुनि करवाल ॥तरुण रवि ज्यांत लोपे त्या तेजीं काय उडु निकर वाल ॥८॥सोसे न तिची त्या जसि काशीची नीचमद्रका लीला ॥क्षेपी शुल क्षोंमें लक्षुनि तो क्षुद्र भद्रकालीला ॥९॥अहि वरि गरुड तसा ती त्या वरि निज शुल अंबिका घाडी ॥ताडी त्या शुलातें भस्म करुनि चिक्षुरासि ही पाडी ॥१०॥महिष चपुपति मरतां त्रिदशार्दन मत्तसिंधुरारुढ ॥चामर पामर टाकी शक्ति महाशक्ति वरि महामुढ ॥११॥शक्ति पडे की तीचा मद हुंकारे चि चंडिका उतरी ॥वाटे मुर्छित पडली ती सिंहींने दटाविली कुतरी ॥१२॥खंडी शुल ही दुर्गा ज्यासि झुगरी अंराति चामर तो ॥न वधीं स्वयें तयां कीं सापडतो मृगवरा तिच्या मरतो ॥१३॥तों तो चढला आरिच्या हस्ति शिरीं सिंह उडुनि वेगानें ॥ज्या उदनगाग्रगशशि सदृशाच्या सर्व उडु निवे गानें ॥१४॥असुरांची काळ मुखीं द्याया भय पर मनीं चमु ढकली ॥जो हरि करी तयाशी तो चामर परम नीच मुढ कली ॥१५॥मेळविती सुभट यशें करुनि तनु त्याग ज्या वरुनि महितें ॥भुजयुद्ध करित दोघे ते आले त्या गजा वरुनि महितें ॥१६॥हरि शिरला द्रुत कंदुकें महि वरुनि उडुनि जसा नभीं शिरतो पुनरपि पडोनि उडवी तत्काळ चि त्या सुराऽरिचेंशिर तो ॥बाधिला वृक्षाशिळांहीं दुर्गेने तो उदग्र समरांत ॥जेणें तेज मिरविलें होतें हो तें असह्या अग्ररांत ॥१८॥मथिला कराळं हि रणीं व्यापरुनि स्व्दंत मुष्टितळें ॥केलें सुयश करावेम जीवां द्यायासि जेविं तृष्टि तेळें ॥१९॥कोपोनि उद्धतातें चुर्ण करी इश्वरी गदा पातें ॥तें कुतुक देखत्याचें बा एक हि न लवलें तदा पातें ॥२०॥तैसें चि भिंडिपाळें रण रंगी बाष्कळांसि ती निवटीं ॥जीची स्मृति न उरों दे दुःखासि पुढें तमा जसे दिवटी ॥२१॥चुर्ण करे बणांही ताम्रासि तसें च अंधकेलाही ॥पक्षीश्वरद्दष्टिपुढें केवळ होतो चि अंध कालाऽही ॥२२॥उग्रास्य उग्रवीर्य त्रिदशांचा रिपु महोहनु हि तिसरा ॥हे मारुनि त्रिशुलेंत्यांस ह्मणे पुर्व कुमातिला विसरा ॥२३॥त्या ही बिडालक्षाचें केलें खंगें शिरोऽब्ज कर्तन हो ॥कीं हर्षे विधि हरि हर लोकपतिसमांत गान नर्तन हो ॥२४॥दुर्घर दुर्मुख हि रणींबाणांही यमगृहासि पाठविले ॥ज्यांचे अपकार सदा देवांही हाय ह्याणुनि आठविले ॥२५॥बळ नाशें महिषासुर खवळे पापाग मोह ल्याला जो ।तो कां न ह्याणेल निपट बाळ यमाच्या गमो हल्या लाजो ॥तो कोप आंत बाहिर ह्याणवाया त्रिभुवना अहह ल्याला ॥गण बळ मर्दी तेव्हा प्रळयींचे लाजले अह हल्याला ॥२७॥किती गण तुंडाघातें वधिले महिषाऽसुरें रणीं रागें ॥कितिक खुर क्षेपांही पद्म जसें मर्दिजें महानागें ॥२८॥पुच्छें किर्ती लोळविले किति शृंगाहीं विदारिले क्रुरें ॥निश्वास वेग नाद भ्रमणांहीं कितिक नाशिले शुरें ॥२९॥झालें प्रथम बळ पतन सर्व सविस्तर न बोलवे गा तें ।धांवे हरिशि वधाया पवनाच्या करुनि फोल वेगाते ॥३०॥येतां निजसिंहा वीर पाहे कोपोनि अंबिका याला ॥झालें चि ह्मणे याच्या मित्र जल तृणाऽग्रलंबि कायाला ॥३१॥तें महिष करी चेष्टित करितो सोडुनि सोय रेडा जें ॥सुर ह्मणति शेवटींचे सुखवाया गृध्र सोयरे डोजें ॥३२॥शृंगांहीं गिरि उडवी वेग भ्रमणें चि भुमिला फाडी ॥उसळोनि जलधि बुडवि तो पुच्छे त्यासि जेधवां ताडी ॥३३॥त्याच्या शृगांघातें बहु झाले खड खंड घन झडले ॥श्वासे उडोनि गगनीं गेले तृणसे पुन्हा अचळ पडले ॥३४॥या परि बळ मायांच्या फुगला होता मनीं लुलाया शतें ॥किती वर्नावं कथितों जगदंबेचें नृपा तुला यश तें ॥३५॥कोप करी आंगा वरी येतां पाहोनि चांडिका यातें ॥कांपवि बांधुनि पाशें प्रबळा ही जेविं थंडि कायातं ॥३६॥तत्काळ बद्ध होतां असुरांचा भुप रुप तें सोडी ॥हरि होय तोंचि खंगें त्या शत्रुशिरासा ती सतीं तोडी ॥३७॥तों खंग चर्म घर तो होय पुरुष परम दक्ष मायावी ॥त्यासि शरांही मारी न च हरितां पर मद क्षमा यावी ॥३८॥मग होय महागज तो गर्जे ओढी हरिस धरुनि करें ॥कर तोडिला कृपाणें जैसा रंभाऽमिघानँ तरु निकरें ॥३९॥पुनरपि हिता गमे त्या दुर्मातिच्या चाकरासि कासरता ॥दुसरा मागें येतां अमरत्वाचा करा सिका सरता ॥४०॥त्रैलोक्य तसें चि पुन्हा तो महिष क्षोभवुन मीनाच ॥बहुधा म्हणे शिवा सुर मुनिस कलह लोभवु नभीं नाच ॥४१॥कोपोनि जगन्माता पान करी अरुन लोचना मग ती ॥हांसे पुनः पुन्हा पर भर वरुनि हर्षवावया जगती ॥४२॥बळवीर्यमदोद्धत तो असुर हि गजोनि शैल शृंगानीं ॥उडवी तिज वरि वरिलें जींचें पद पद्म साधुं भृंगानीं ॥४३॥परमेश्वरी ही सोडुनि खरतर शर निकर बहु तिही तुर्ण ॥द्वोषि प्रेषित पर्वत सर्व तदुत्साहसह करी चुर्ण ॥४४॥कवि सुर गंधर्व जिच्या पद भक्ति प्राप्त पद नरा गाती ॥अस्पष्टाऽक्षर बोले पानमदोद्भुत वदन रागा ती ॥४५॥पीतें मधु तो मुढा गर्ज क्षण भरि घरुनियां गर्वा ॥म्यां तुज वधितों येथें गर्जातिल क्षिप्त देवता सर्वा ॥४६॥वदुनि असें उडुनि चढे पृष्ठा वरि जारि हि तो महिष झाडी ॥पादें आक्रमण करुनि कंठिईं शुलें करुनि ती ताडी ॥४७॥झाली त्रिभुवन सुखदा ते अति अद्भुत करुनि कर्म असी ॥तों निज वदना पासुनि असुर निघाआ घरुनि चर्म असी ॥४८॥अर्ध विनिर्गत होतां केला. तो आद्य शक्तिनें रुद्ध ॥शुद्ध यशोर्थ तसा ही श्रीदुर्गेशीं करीं महायुद्ध ॥४९॥तेव्हा दिव्य कॄपाणें मस्तक खंडन करुनि असु रहित ॥तो महिष पाडीला श्री देवीनें जो सदैव असुर हित्त ॥५०॥ज्या धाया सु कवि मनी निर्दयपत्यंककोपमा यावी ॥वधिला देवीनें या परि तो अत्यंत कोप मायावी ॥५१॥महिष वधें खळबळलें वातें बहि जेविं तोय खळबळतें ॥हाहा ह्मणुनि पलायन पर चि निहतः शेष होय खळ बळतें ॥५२॥सुरगण सकळ सबळ खळ महिष वर्धे जाहले परम हर्षीं ॥स्तविती जगदंबेतं नारद सनकादि जे पर महर्षी ॥५३॥जे नटति अप्सरोगण ते मोर चि गान तो अनघ न टाहो ॥निववी यशोमृतातें वर्षुणि जी ती शिवा घन घटा हो ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : January 28, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP