TransLiteral Foundation

अध्याय ३
श्री-विद्या बळ मत्त प्रभु शुंभनिशुभं जाहले होते ॥
शक्रादि लोकपाळां करवीं च पदासि लाहलें हो ते ॥१॥
काळातें हि न भीतीं जे ते मीतील दैत्य कां पवितें ॥
तद्वळ सुरांसि कांपवि जेविं दरिद्रसि शैत्य कांपवितें ॥२॥
तीतें शक्रादि सुर स्तविती जाउनि तदा हिम नंगातें ॥
जीच्या वात्सल्यांतें सर्व मु कविंचें सदा हि मन गातें ॥३॥
सुर जन करीत होता केवळ दीनां जना सम स्त्वन ॥
तद्रचितस्तवनादें नादमय चि होय तें समस्त वन ॥४॥
तो त्या स्थानी गौरी ये गंगा तोय मज्जन कराया ॥
जी त्या हिमालयातें ह्मणतें हो होय मज्जनक राया ॥५॥
जी ह्मणते निज दासा हुनि सुरभीचा न वत्स भासुर हो ॥
ती त्यांसी पुसे करिती कोनाचा स्तव भवैत्सभा सुर हो ॥६॥
तों तच्छरीरकोशा पासुनि सहसा निघे शिवा मग ती ॥
स्तवुनि मज ह्मणे केलें शुंभ निशुंभमादिशत्रुनीं अगती ॥७॥
झाली शरीरकोशा पासुनी या स्त्व वि कौशिकी नामें ॥
तद्दशेनीं च आलीं जीं नव्हतीं तो सुरव्रजीं धोमें ॥८॥
निघतां चि शिवा झाली कृष्ण जी तप्त कांचन च्छावे ती ॥
गौरीस कालिका हें ठेवुनि अभिधान या स्तवें स्तविती ॥९॥
होती हिमाऽचलीं श्री जगदंबा परमसुंदरी तींतें ॥
खळ चंड मुंड देखति जे वश सुंदोपसुंदरीतीतें ॥१०॥
ते दृष्ट भृष्ट तेथुनि जाऊनि कुशील मद्यकुंभातें ॥
स्व स्वामीतें भेटुनिं ऐसें प्रार्थुनि वदति शुंभातें ॥११॥
सुमनोहराकृति महा राजा आह्नीं विलोकिली महिला ॥
शोभवितो निरुपम निज देह द्युतिनें हिमाऽद्रिच्या महिला ॥१२॥
उत्तम रुप तसें तो कोणीं कोठें न देखिलें होतें ॥
जाणों न करें विधिनें चतुरें चित्तें चि रेखिलें हों तें ॥१३॥
ती कोण स्त्री प्रभुने शीघ्र निपुन शोध करुनि जाणावी ॥
देखावी स्वामीनें घ्यावी निज मंदिरासि आणावी ॥१४॥
देवा देह द्युतिने ती युवति दिशा दहा हि शोभविते ॥
जसि चंद्रिका चकोरा तसि जो प्रेक्षक तयासि लोभविते ॥१५॥
रत्‍नें मणि गज वाजी जे जे उत्तम पहार्थ लोकांत ॥
ते त्रे सर्व हि सांप्रत शोभति शुंभा तुझ्या ति ओंकांत ॥१६॥
ऐरावत गज रत्‍न दुम रत्‍न हि पारिजात हय रत्‍न ॥
उच्चेःश्रवा हि शक्रा पासुनि त्वां आणिला करुनि यत्‍न ॥१७॥
जें अत्यऽदुत दिव्य ब्रह्मायाचें हम्स युक्त अजि राया ॥
तुझिया विमानरत्‍न हि सेवितसे सर्वकाळ अजिरा या ॥१८॥
निधि मुख्य महापद्म हि धनदा पासुन आणिला आहे ॥
तुजला दिली समुद्रें माला अल्मान पंकजा बा हे ॥१९॥
वारुण कनक स्त्रावी छत्र तुझ्या मदिरीं असें स्वामी ॥
पूर्वी प्रजापतीचा जो रथ वर तोहि या असे धामीं ॥२०॥
त्वां मृत्युं शक्ति हरिली जीचें उत्क्रांतिदा असे नाम ॥
कोणा अर्था विषयी सकळ झाला प्रभो तुझा काम ॥२१॥
पाश सलिल राजाचा तव अनुजाच्या परिग्रहीं धन्या ॥
ज्या ज्या समुद्र जाता त्या त्या सद्रत्‍न जाति ही अन्या ॥२२॥
तैशीं च अग्निशौंचें दर्हनें ही तुज दिलीं प्रभो वस्त्रें ॥
या परि सकळें रत्‍नें त्वां प्रभुनें स्पष्ट जोडिली शस्त्रें ॥२३॥
मग रत्‍नभुग्वरें त्वां ऐसें स्त्रीरत्‍न कां न जोडावें ॥
या लाभा करितां तों कुशलें सर्वस्व तुच्छ सोडावें ॥२५॥
खळ भृत्य कथित कुमत श्रवत करुनि दृष्ट मति सुराकुंभ ॥
न करुनि विचार काहीं निजदुततें असें ह्मणे शुंभ ॥२५॥
सुग्रीवा शीघ्र करीं जेणें वश होय रत्‍नभुता तें ॥
सांगे मदांऽध जैसा वेताळ सुधाति यत्‍नभुतातें ॥२६॥
कासार असे समुचित तो तव संगमसुरापगे लाहो ॥
ऐसें ह्माणावया त्या परमशिवे प्रति सुराप गेला हो ॥२७॥
दुत ह्मणे देवि जसा जलनिधि पानें प्रसिद्ध कुंभज या ॥
त्रैलोक्य, त तसा चि प्रख्यात असे करुनि शुंभ जया ॥२८॥
जो, अहताज्ञ सुरांत स्वजना बहु देतसे मर्ह हताऽरी ॥
असुरांप्रताप ज्याचा व्यसनीं ह्मणउनि परा अहह तारी ॥२९॥
दैत्येश्वर परमेश्वर माझ्या वदनें करुनि आपण तो ॥
श्रवण करावें त्वां तें देवि त्वदेनुग्रहार्थ जें ह्मणतो ॥३०॥
त्रैलोक्य सकळ माझें मजला झालें समस्त सुर वश तें ॥
यश ऐकिलें जगें जें विश्रुत गंधर्व राज सु स्व शंतें ॥३१॥
इंद्रादिदेवता मी सेवितसें सर्व यज्ञ भागांतें ॥
माझा प्रताप दुःसह अहितांतें गरुड जेविं नागांतें ॥३२॥
लोकत्रयांत रत्नें जीं जीं ऐराअतादि गज रत्नें ॥
होतीं ज्यांची त्यांही आणुनि मज तीं समर्पिलीं यत्नें ॥३३॥
क्षीरधिमथनोद्भव जो नामें उच्चेःश्रवा यशें सजला ॥
हरि वाहन हरि रत्‍न प्रणव सुरांही समर्पिला मजला ॥३४॥
जें रत्‍नें देवांची गंधर्वांची तशी च नागांचीं ॥
तों झालीं प्राप्त मला व्हावीं च फळे जशी स्व यागांचीं ॥३५॥
स्त्री रत्‍न मानितों तुज लोकीं मी रत्‍न मात्र सेवितसें ॥
ये मज कडे चि आले रत्‍नाऽतर निज यशोऽर्थ देवि तसें ॥३६॥
स्त्री रत्‍न ह्मणुनि भज तुं मज करित्या शत्रु हानि शुंभातें ॥
कीं गुरुपराक्रमा या मत्तुल्या मदनुजा निशुंनातें ॥३७॥
तुं मत्परिग्रहास्तवं परमेश्वर्यासि पात्र होशील ॥
व्हावासि मत्परिग्रह तुज वरि च तुझें प्रसन्न हो शीलं ॥३८॥
दुर्जनदुतोक्त असें ऐकें ऐकों नये कधीं परि तं ॥
गंभीर अंतरीं स्मित करुनि भगवति स्वयें वदे अरितें ॥३९॥
दुता किमापि न मिथ्या तु वदलासि स्व वृत्ति हित साच ॥
त्रैलोक्याचा अधिपति शुंभ जसा तो निशुंभहि तसाच ॥४०॥
तरि कां अवश्य न ह्माणशिं ऐसें वदशीलं सांगतं परिस ॥
सोडुं नेये प्रतिज्ञा धर्म नसे सत्य भाषणा परिस ॥४१॥
अल्पमीतत्वें आपण हा पण दुता मनांत म्यां पहिला ॥
केला आहे अनुता भ्यावें तितुकें भिऊं नये अहिला ॥४२॥
जो मज जिंकील रणीं मम गर्वातें करील जो दुर ॥
तो मज समबळ माझा भर्त होईल जनांत जो शुर ॥४३॥
ऐसा मत्पण या स्त्व करुनि रणीं गर्व हानि शुंभानें ॥
किंवा शीघ्र धरावा जिंकुनि मज पाणि हा निशुंभानें ॥४४॥
दुत ह्मणे गर्विष्ठे न वद असें मज पुढें कसें व्दसी ॥
शुंभ निशुंभ सदुर्जय कंप द पविपाणिलाहि कि तदसी ॥४५॥
त्रिजगीं कोन पुरुष तो शुभं निशुंभा समोर राहिल ॥
पाहेल घुक रविला काय शश हरि प्रहार साहेल ॥४६॥
अन्या दैत्याही पुढें सर्व सुरांचेहि कांपती काथ ॥
मग शुभांदिसमक्ष स्त्री जी न धरील कांप ती काय ॥४७॥
जाशील एकली स्त्री तुं कैसी त्या समोर उत्साहें ॥
स्पष्ट तुझें तुज देईल जोडुनि अविचार शील कुत्सा हें ॥४८॥
अभिमान मनीं धरिला तो द्याया दुःखरौखा जागे ॥
देवि न होऊनि कैशा कर्षणनिर्घृतगौरवा जा गे ॥४९॥
देवी ढुतासि ह्मणे वदलासि जसे तसेंचि हें आहे ॥
शुंभ तसाचि निशुंभ प्रभुपणही न स्व लंघना साहे ॥५०॥
काय अकरु मी केली न विचार करुनि अशी प्रतिज्ञा त्या ॥
जा सांग असें कृत पण रक्षाऽर्थ धरुनि असिप्रति ज्ञात्या ॥५१॥
भ्यावें स्वःपणापुर्वीं म्यां आतां भिउनि काय गा होतें ॥
माझा निरोप सर्वहि सांग तया योग्य जें करो तो तें ॥५२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-01-28T09:53:37.4470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

stretching frequency

  • प्रतानन वारंवारता 
RANDOM WORD

Did you know?

जीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.