मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
नवरात्राचे गाणे

स्त्रीगीत - नवरात्राचे गाणे

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


नवरात्रीचा उत्सव । आज पहिली ग माळ
घट स्थापिला मंगल । सर्वारंभी ॥१॥
आज माळ ग दुसरी । अंबा करी अनुष्ठान
असुरांचे निर्दाळण करायासी ॥२॥
आज माळ ग तिसती । अंबा बैसली तपाला
त्रयो गुण प्रकृतीला । जिंकायाला ॥३॥
आज माळ ग चवथी । अंबा बैसलीसे स्थिर
वृत्ती जिंकुनि चत्वार । मनाचिया ॥४॥
आज माळ ग पाचवी । करा ललितापूजन
पंचेद्रियांना जिंकुन । अंबा दृढ ॥५॥
आज माळ ग सहावी । षड्गुणांना आवाहन
सदाचारांनी संपन्न । होई माता ॥६॥
आज माळ ग सातवी । विद्यादेवाची स्थापना
वेदशास्त्रांच्या ग्रंथांना । पूजियेले ॥७॥
आज माळ ग आठवी । महालक्ष्मी प्रगटली
अष्टभुजा सिध्द झाली । युध्दासाठी ॥८॥
आज माळ ग नववी । शस्त्रे अस्त्रे पूजियेली
तमोगुणांनी पेटली । जगदंबा ॥९॥
नवरात्र नऊ दिन । अनुष्ठान पूर्ण झाले
यश कार्यार्थ चिंतिले । देवर्षिनी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP