TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
डोहाळे

स्त्रीगीत - डोहाळे

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


डोहाळे
लाजूं नकोस बाले,
बाले मज एक गुपित कळले
कळले ग दो मनांचे ॥धृ॥
देहास क्लेश होती
अंगास येइ सुस्ती
चढली ग गर्भकांती
मोदात जीव डोले ॥१॥
खाण्यास नवनवीन
देती तुला करून
मेवा फळे आणून
तव कोड चालविले ॥२॥
सखया विनोद करिती
बागेत तुजसी नेती
गाऊन रिझविताती
तुजसाठी सर्व सोहळे ॥३॥
हिरवा सुरेख शालू
वेणीत हार माळू
हिरवा चुडाहि घालूं
उटी अत्तरास दिधले ॥४॥
होवो सुपुत्र तुजसी
जो भूषवी कुळासी
हे सांगणे प्रभुसी
शुभ हेची मजसी गमले ॥५॥

Translation - भाषांतर

References : N/A
Last Updated : 2012-10-21T02:56:03.7070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बुरका

  • पु. 
  • मराठे , मुसलमान इ० च्या स्त्रिया तोंडावरुन घेतात तो वस्त्राचा पदर ; पडदा ; अवगुंठन . ( क्रि० घालणें ; घेणें ). 
  • ( पालखी , हत्ती इ० वरील ) वस्त्राचें आच्छादन . 
  • प्रवासी गाडीचा चवरडोल ; चांदवा ; घटाटोप . [ अर . बुर्कअ ] 
RANDOM WORD

Did you know?

mahameruyantrachi shastrashudh mahiti sangavi. Gharat thevnyasathiche mahameruyantra pokal ki bhariv ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site