TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
पाळणा मुलाचा

स्त्रीगीत - पाळणा मुलाचा

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


पाळणा मुलाचा
जोजो रे बाळा गाई । गाई
हलविते पाळणा झोकात आई ॥धृ॥
सुकुमार सुंदर तूं बाळराजा
माझिया जिवाचा अससि कालिजा
मुळी आता रडायच नाही । नाही ॥१॥
माझिया भाग्याचे उघडे दालन
तुजसम बहुमोल लाभले रत्न
न्हाते मी मोदात आई । आई ॥२॥
पाळणा रंगित बघ सजविला
वरी मोतियाचा चांदवा केला
हौशीला वाण ती नाही । नाही ॥३॥
कुंचीला शिविले पिंपळपान
मोतियाच्या डुलांनी शोभती कान
घातले वाळे हे पायी । पायी ॥४॥
कशिद्याची चादर रेशमी शेला
साखळी सोन्याची घालुं दे गळा
थोरांची जणु ही पुण्याई ॥५॥
हो भाग्यवंत, गुणवंत बाळा
तुझिया यशाचे कौतुक मला
स्वप्नात दंग ही आई । आई ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-22T10:42:57.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कासाड

  • १ स्त्रीअव . ( व .) कुंदा गवताच्या लहान मुळ्या ; दुर्वांच्या मुळ्या . ' संशयाचा काशा गोळा करुन ' - भज १२२ . एभा ३१ . ३९२ . हातीयेरां दुकाळ पडला । मग यासी नांगर सांपडला । सैन्य नांगरावयां आला । वीर काशिया काढित । ' एरुस्व १० . ७४ . २ कडव्याचे बुडखे ; यांचा उपयोग सरपणाकडे होतो ( एकवचन काशी - कचित उपयोग ). ( सं . काश ) 
  • ०भरडणें बरळणें ; बडबडणें ; शिव्या देणें ; शिव्या हासडणें . 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.