TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
गौरीहर

स्त्रीगीत - गौरीहर

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


गौरीहर पूजतांना
बसे नाहुनि मासुनी । पूजायासी गौरीहर
नव वधू ही सुंदर । भाग्यशाली ॥१॥
मांडवाच्या दारावरी । झुले नारळी तोरण
विवाहाचे आमंत्रण । सकलासी ॥२॥
आली मंगल घटिका । वाद्ये वाजती सुस्वर
हृदयात हुरहुर । बालिकेच्या ॥३॥
येतिल बाई मिरवत । आता माझे प्राणनाथ
जन्माची माझी गांठ । त्यांच्यासंगे ॥४॥
कसा असेल हा जीव । कशी ठेवण चित्ताची
माझ्या चित्ताला साजेशी । असेल कां ॥५॥
माझ्या डोळ्यातले भाव । कळतिल काय त्यांना
एकरुप भावनांना । होतील कां ॥६॥
माझ्या अंतरीचे बोल । काय त्यांना रूचतील
नाही कां हसतिल । माझ्या बोला ॥७॥
गृह राज्याची स्वामीनी । बाई उद्या होईन का
सुफलित होतिल कां । मनोरथ ॥८॥
पाठ राख अंबाबाई । सारे पुरवोनी हेत
जोडियेले दोन्ही हात । तुझे पाई ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-19T23:29:34.3230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

mucilage sac

  • श्लेष्मकोश 
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.