मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत ओव्या| ओवी १९ कुलदैवत ओव्या ओवी १ ओवी २ ओवी ३ ओवी ४ ओवी ५ ओवी ६ ओवी ७ ओवी ८ ओवी ९ ओवी ११ ओवी १२ ओवी १३ ओवी १४ ओवी १५ ओवी १६ ओवी १७ ओवी १८ ओवी १९ ओवी २० कुलदैवत ओव्या - ओवी १९ मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत ओवी १९ Translation - भाषांतर कापराची जोत करते लाही लाहीचवर्याच्या गडावर मामाभाश्याची लढाईकापराची जोत कवळी लस लसगेला परिमळ दूर भोळा शंकर झाला खूसउदाकापराचा परिमळ सुटला सुटलाचवर्याच्या गडावर देव गादीचा उठलाचवर्याच्या वाटीनं भले भले आजनगिरजा करे ताट संभा करे भोजनदेव महादेव सालाचा नवरा होतेहळदी कुंकवाचे थापे पाहाडले देतेशिवरातीच्या राती जिवाले काचनीसांगा सांगा भक्तजन संभाची बातनीशिवरातीच्या दिशी गिरजाई उपासीकशा सोडू मी बारशीकाळं काळं कुट समुदुराचं पानीझ्यारी बुडवता थराळली गिरजा रानीकाशी काशी करता काशीत काम हायेअत्मा सोधुनिया पाहे गंगा जटातुन वाहेकाशी काशी करे काशीतला गोटाशंकरावाचून देव कोनी नाही मोठाकाशी काशी करे काशीत काळं पानीशंकरावाचून देव नाही कोनी ग्यानीतान्ह्या माह्या बाळा ये माह्या जवळीतुले ठेवतो घरी मी जातो भवळागिरीतान्या माह्या बाळा लडू लडू आलागिरजा मातेनं तुले केला दूधपेढायेतो देवा येतो संगं लेकरं लेकरंचवर्याच्या गडावर तुह्या पायाचे चाकरयेतो देवा येतो अज्ञान लेकरुचवर्याच्या गडावरी माही दैना नोको करुयेतो देवा येतो येतो तुह्यावरीसोनियाची सुरी नोको ठेवू शातीवरीसोनियाची सुरी मारली छातीतआतड्याचे घोस गिरजाच्या वट्यातगोंगलाची पाटी गिरजाच्या डोक्यावरीरुप झाला होता थोर भारी नईवरीगिरजाईचा मोती हारपला रातीघेते खार्याची झडतीगिरजाईचा मोती हारपला कालघेते पोह्यावर जालतुझीया वाटेनं येळपाच्या रांज्याआपल्या तलपीले मांगे भगताले गांजाकलारनी बाई भट्टी लाव बेगीदारुच्या पान्यासाठी आला कैलासाचा जोगीकलारनी बाई भट्टीवर घोडादारुच्या पान्यासाठी संभू झाला येडाचाला जाऊ पाहू मुलताई बजारचुडा भरते वं तिथं भोळ्या शंकराची नारपह्यल्या पायरीले शेंदराचं बोटंयेड्या तू भगताले रस्ता सांगजो नीटबारा बारा कोस शंकराच्या जटागिरजाचा हिय्या मोठा जाऊन धरला आंगुठाबारा बारा कोस वाघ आसुलीचं भेवचौर्याच्या गडावर परभू नांदते महादेवगडावरी गड असे गड बारादुरुन दिसे जशा तलवारीच्या धारागडावरी गड असे गड कितीदुरुन दिसते नदी नर्मदीच्या भिंतीखांद्यावरी खार्या घेतो वैतागानंघरी हाये लेक सून भांडन करे रात्रंदिनखांद्यावरी खार्या घे माह्या मुलाका असा कोमावला गुलाबाच्या फुलाखांद्यावरी खार्या घेतल्या घाईघुईपाळन्यात तानी बाई तिची आशा मले नाहीखांद्यावरी खार्या घेतल्या का मूनघरचा वैताग पाहूननिंबानारळाच्या खार्या झाल्या जडकशी चह्यडू चौर्यागडनिंबानारळाच्या खार्या झाल्या भारीकशी चह्यडू पायरीमारुन झोडून घे माह परानकलीजा काहाडून देवा बांधीन तोरनपह्यला नमस्कार संभाले सांग जानिजला उठव जामहादेवी जातो खोबरं खायलेनारळाची बुची चौर्याच्या बाबालेमहादेवा जाता एक दिवस मोलाचाचौर्याच्या गडावरी नाही देहाचा भरोसामहादेवी जाता नाही पुसलं बापलेजातो संभाच्या तपालेमहादेवी जाता नाही पुसलं भावालेजातो संभाच्या गावालेमहादेवी जाता नाही पुसलं भायलेजातो संभाच्या भेटीलेमहादेवाच्या वाटीनं सांडला लसनपोहा चालला ठेसूनमहादेवाच्या वाटीनं भक्तिनी येलाच्याशेंगा खाते वालाच्या नाही वाटीनं चालाच्यामहादेवाच्या वाटीनं भक्तिनी साध्याभोळ्याबांधे कंबरीले चोळ्यामहादेवाच्या वाटीनं भक्तिनी डोंबड्याखाते भाताव कोंबड्यामहादेवाच्या वाटीनं भक्त हाये तानेधवळ्या नंद्यावर पाळनेमहादेवाच्या वाटीनं भगत ठकलेरामाकोन्यावरी नंदी पाठवा आपलेमहादेवाच्या वाटीनं भक्तिनी ठकल्यारामाकोन्यावरी धाडा पालख्या आपल्यामहादेवाच्या वाटीनं मुंग्यांचं सैन चालेलाडाची गिरजा बोले इतके भक्त कसे आलेमहादेवाच्या वाटीनं येळवाच्या रांज्यापारबती असून मांगे गिरजाले गांजामहादेवाच्या वाटीनं दवन्याचं रोपसंभाचं नाव घेता हारपलं दुखसंभा संभा करे संभा नाही दिसेभयान वनामंधी पोथी वाचत तो बसेसंभा संभा करे संभा नाही घरीसंभा गिरजाच्या माहेरीसंभाच्या पागुटीले पाहाडाचा येढाअहेरी बसला माह्या नाजुक केवढासंभाच्या लगनाच्या अक्षीदा आल्या मलेन्याचारी संवसार काय घेऊ अहीरालेदेव महादेव सालाचा नवरा होतेहळदी पाहाडाले देते कुकवाचे थापेचवर्याचा गड चहडता बिल्लणउतरत्या पायरीले झाला दुसरा जलमशाईचे तांदूळ अवघ्या देवाईलेउरले तांदूळ चवर्या बाबालेगडावरी गड गड चवर्याचा भारीउतरत्या पायरीले आली डोळ्याले अंधारीगड चवर्याचा दिसे सोभिवंतखाली उतरता लागे नाही त्याचा अंतमहादेवा जाता गा जानं नोह्यतं मनीसपनी येऊनी कशी टाकली मोह्यनीसंग्राहक: प्रा. रु. पा. पाजणकरमहादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बेलगंगारामतीर्थावर भेट देजो पांडुरंगामहादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बंधानगीरजा माही माय तोडे पापाचे बंधनमहादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी बेल नारदुरुन दिसते नदी नर्मदेची धारमहादेवाच्या वाटेनं देवा गा आडवी भयसासंबाच्या दर्शनाले जाऊ देसीन काइसामाहा नमस्कार देवा गा निशान गडालेनाही येनं झालं सीवरातीच्या पारन्यालेमाहा नमस्कार देवा गा पाह्यरीला केलाकैलासीचा पोहा दरबारी गेलादेवामंधी देव देवा गा नागदुवर पावलापाचा नारयाचा झेला तोरनी लावलाझाडी वर्हाडाची देवा गा जागा हे थोपचीचिंतामनापासी जोत जये कापुराचीपश्चमदार देवा गा पश्चम करजोलाह्यार्या मोठ्यावर देवा किरपा ठेवजोअगीन दार देवा गा अगनीचं दारभोया भक्तिवाना तू गा दुरुन पाया परसुतायाची कांडी देवा गा उडे वरच्यावरवडाची पारंबी चित्र शायेवरपोहा गेला देवदरबारी देवा गा झाला पारोपारीचित्र शायेवर भरली देवाची कचेरीगडावरी गड देवा गा कितीक रचलेकैलासीचे राजे जाऊन सिखरी बैसलेगडामधी गड देवा गा चवर्याचा बाकातोंडी आला थुका तुम्ही धुनी टाकू नकाचला जाऊ पाहू देवा गा गिरजाची रांधनीतिच्या सयपाकाले आहे सुक्कीर चांदनीचला जाऊ पाहू देवा गा गिरजाचा ईरोलासव्वा खंडीचा रोठ केला अवघा कैलास जेवलागडावरी गड देवा गा गडाखाली आडरेसमाचा दोर पानी भरे गिरजा नारसव्वा मनाची कुदयी देवा गा मनाचा वासलाअवधापर्यंत तासला वर चवर्या बसोलामायची घेतली चोयी देवा गा बापाचा घेतला सेलाकैलासी राजा लेक तीर्थासी गेलाखांदावरी पडशी देवा गा घे माह्या चातुराघे माह्या चातुरा तुही पह्यली यातरानिंबानारश्यानं देवा गा पडशी झाली जडपडशी झाली जड कैसा येंगू चवर्या गडमहादेवाच्या वाटेनं देवा गा दवना मोठा दाटभगत अरवट दवना मोडून केली वाटमहादेवाच्या वाटेनं देवा गा दवना आला फुलादवना आला फुला बास शंकराले गेलामहादेवाच्या वाटेनं दवना आला गोंडाकैलासीच्या राजा तुहा तिही लोकी झेंडानदीले आला पूर देवा गा जाब मारे थोपभोया शंकुर टाके गयातला गोफपानी पडू पडू गा देवा हिरवं झालं रानहिरवं झालं रान सुटलं गवयाचं धनपानी पडू पडू गा देवा हिरवा झाला चाराहिरवा झाला चारा सुटला गवयाचा गोर्हासकायच्या पाह्यरा देवा गा गिरजाले चेव येतेगिरजाले चेव येते चवदा भुवान झाडतेमहादेवा राजा देवा गा जातीचा बनियासोन्याचा ताजवा त्यानं तोलली दुनियामहादेवा जातो देवा गा आखीन येईनतुह्या सतवानं चवदा भुवान पाहीनयेतो देवा येतो रे देवा गा येतो तुयावरीसवर्नाची सुरी नको ठेवू गयावरीभुईकुंडावरी देवा गाय चितीन पसरलीगिरजा आंगोईले गेली साडी चोयी इसरलीमहादेवा़च्या वाटेनं देवा सांडलं खाखससांडलं खाखस पोहा चालला हासतमहादेवा जातो देवा गा संगं काय नेताघरी माता पिता आहे सोन्याच्या मुदतागिरजा मायेचा चुडा, देवा गा कोर्या कागदातउजीड पडला त्याईचा चवदा भुवनातगिरजा मायेचा चुडा देवा गा कशानं टिचलाचवसर खेलता हात दुमता पडलागिरजा मायेचा चुडा देवा गा दुधाची उकयीगिरजा माही माय मनाची मोकयीसकायच्या पाह्यरी देवा गा कोमावला बागकोमावला बाग गिरजा पानी वलू लागपानी वलू वलू देवा गा हिरवा झाला बागकेयीच्या पानावर लेहेरा मारे डोम्या नाग N/A References : N/A Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP