TransLiteral Foundation

कुलदैवत ओव्या - ओवी ११

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


ओवी ११
अंगण भरुनी वाळती साळी दाळी
देवा शंकराचा आला उत्सव जवळी
उशीर लागला शंकराचे देवळी
बोलत व्हत्ये गुज पारबती जवळी
जिवाला जडभारी नका आणू वैदवाणी
देवा शंकराच्या न्हाणीचं आणा पाणी
शंभू शंभू म्हणून हाका मारिते दांगट
हातात बेल तांब्या गिरजा येंगं मुंगी घाट
माहेरीचा देव आम्हा लेकीला कशासाठी
बाईनं माज्या केले नवस भाच्यासाठी

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-17T07:22:55.3530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

(दोन) पाटया टाकणें

  • उपरणें झाडून मोकळें होणें 
  • ठराविक मजुराप्रमाणें काम करणें 
  • आपलें म्हणून काळजीनें काम न करणें. ‘उपरणें झाडून मोकळें होण्याच्या किम्वा दोन पाटया टाकण्याच्या क्षुद्र वृत्तीनेंच शिक्षक काम करत असेल तर त्याला त्या धंद्यांत कांहींच किफायत नाहीं.’ 
  • आमच्या इंदूचें शिक्षण,पा.९९. 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.