काव्यरचना - स्वामी बंधू

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.


येशु-उपमर्द करीं कशासाठीं ॥ कर पायपीटी । दारुमार्गे ॥१॥
स्वामी अध्यावारु तुझे जातवाले । मार्गावर आले । दाव आधीं ॥२॥
कावळ्याचे परी मढ्यास शोधीतो । आप्तांस घेरीती । लूट माप ॥३॥
आर्यवारु सारे पंगत पाडिती । मौजा मारिताती । घरीं त्याचे ॥४॥
दारुच्या तार्रंत स्वामी खाति पितो । नळ्या फोडीताती । गीधापरी ॥५॥
जातीचीं गिधाडें अधीं शुद्ध कर । मग नीति फेर । अज्ञान्यांत ॥६॥
नीति-अर्थ तुला कोठें उमजला । व्यर्थ नागवला । नांवासाठीं ॥७॥
पुढें लिहूं आतां होईल गोंधळ । सीमेपाशी पळ । आवांतरीं ॥८॥
सीमा उल्लंधीता बुजवील वारु । लाथा मारामारुं । स्वामीमध्यें ॥९॥
शुग्रप्रीति आहे येशूच्या धर्मांत । ईश भजण्यांत । भेद नाहीं ॥१०॥
शिंग्रावर येशू फिरे गांवोगांवी । अज्ञांना वळवी । सत्याकडें ॥११॥
आर्याचे धर्मांत बंधुप्रीति नाहीं । दंभ देऊं पाही । सर्व जगा ॥१२॥
आर्य धर्म सारा भटांनीं रचीला । देउळीं घेण्याला । स्लेंच्छ-बंदी ॥१३॥
पोटासाठी बहु राजरोस चोर । होती कंट्र्याक्टर । जगांमाजीं ॥१४॥
... ... .... .... ... ... ... ॥१५॥
आर्यवारुंतील अधीं काध घाण । मार्गावर आण । मग ख्रिस्ती ॥१६॥
ख्रिस्तानें केली मानवाची कींव । दिला ज्यानें जीव । मागां म्हारा ॥१७॥
स्वामी आर्यवारु आहेस तूं साव । म्हारा मांगां पाव । एकातरी ॥१८॥
बायबलमार्गे तुझे वेद सारीं । आण तूं माघारी । भट ख्रिस्ती ॥१९॥
मुंबापुरीं तुझ्या पंक्तीस बा घेई । हाकलून देई । शुद्र ख्रिस्ती ॥२०॥
आमंत्नण कर आम्ही तेथें येऊं । करामत पाहूं । तुझी सर्व ॥२१॥
सत्य नीति बोध आर्यवारुजीला । कमी भाजलेला ॥ बाट्या सोड ॥२२॥
यांत कांही माझें स्वत:चें असेल । लेखी सुधाराल । जोती म्हणे ॥२३॥
-स्वामी बंधू

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP