मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग ४| विठोजी भुजबळ यांस.... विभाग ४ जगन्नाथ यांना पत्न आदिसत्याच्या आरत्या इंग्लिश राज्य विठोजी भुजबळ यांस.... कुळंबीण स्वामी बंधू काव्यरचना - विठोजी भुजबळ यांस.... महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले विठोजी भुजबळ यांस.... Translation - भाषांतर ॥अखंड॥ १गांवढे गांवी गाढवी सुवासिनी । झाली रामजानी देवांगना ॥१॥स्वत: विद्याहीन देवरुषी होती । आसन घालिती टांकापुढे ॥२॥ऊदकापुरास सकल जाळिती । कपाळे लाविती उदी त्याची ॥३॥आळशाच्या परी अंगमोडे देती । दांत ओठ खाती वेडे जैसे ॥४॥दारुबाजापरी नित्य डुलताती । हात आपटीती भूमीवरी ॥५॥शुहू शुहू बोल उच्चार काढीती । हूं हूं हूं करीती घुमतांना ॥६॥ढोलाच्या तालांत धसाडे नाचती । तमाशा दावीती पोरा सोरा ॥७॥रोगी आजार्यास अंगारे लाविती । गंड घालविताती गळ्यामध्यें ॥८॥मोराचे कुंच्यानें झाडणी करीती । भूतास काढिती अंगांतून ॥९॥भूतांच्या नांदानें अज्ञान्या नाडीती । त्या हाती करवीती जत्राचार ॥१०॥देवरुषी...................।..............॥११॥देवरुषा नादें वैद्यास त्यागून । औषधांवांचून किती मेले ॥१२॥अशा अन्यायाचें तपास काढावे । कोर्टापुढे न्यावे न्यायासाठी ॥१३॥शाबीती होतांच काळे पाणी खास । शिक्षा भोदाडास जोति म्हणे ॥१४॥२धुमवी अंगास अंगी देव आणी । दगडास मानी देव खरा ॥१॥इराणी पायांचे धुळवणी पीई ॥ उष्टे त्यांचे खाई श्वानापरी ॥२॥आपल्या गोत्नाचा मोड नित्य करी । होय साह्यकारी पाखंड्याचा ॥३॥गोतासाठी नाहीं भुजबळ ज्यास । माताव्याली त्यास काय फळ ॥४॥वृक्षाला आजार आहे बांडगुळ ॥ देत नाहीं फळ जोती म्हणे ॥५॥३स्वजातीची दया तुला कशी नाहीं ॥ शुद्राकडे पाही कोण दशा ॥१॥उपाशीं तापाशीं शेती खपताती ॥ उघडी फिरती सर्व काळ ॥२॥कर्ज काढूनीया लग्नास लावीती ॥ ब्राह्मण भोंदीती द्र्व्य फार ॥३॥पुरें कर आतां खेळ गारुड्याचा ॥ बावन बिराचा छांछूं तुझा ॥४॥बंगल्यात दडे आर्य छांछूं सर्व ॥ करुं नको गर्व तळेगांवी ॥५॥धूर्त भटा परि बोटें नकों चाळूं ॥ नित्य माना पिळूं अज्ञान्यांच्या ॥६॥ग्रहामाजी शनी आकाशी रमला ॥ तुझ्या पायीं आला येथे कैसा ॥७॥कशासाठी डौल नाहीं भुजबळ ॥ अंतर निर्मळ नाहीं तुझे ॥८॥उष्ट्यासाठीं नको करुं द्विज किंव ॥ घुऊं नको जीव शुद्रांचारें ॥९॥अशा वर्तनानें अधोगती जाशीं ॥ पश्चातापी होशी अखेरीस ॥१०॥विठूच्या नांवाला लावूं नको बट्टा ॥ असत्याचा काटा काढी आतां ॥११॥सत्याकरी साह्य सार्थक जन्माचे ॥ बोल जोतीबाचे मनी तोल ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP