मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग ४| आदिसत्याच्या आरत्या विभाग ४ जगन्नाथ यांना पत्न आदिसत्याच्या आरत्या इंग्लिश राज्य विठोजी भुजबळ यांस.... कुळंबीण स्वामी बंधू काव्यरचना - आदिसत्याच्या आरत्या महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले आदिसत्याच्या आरत्या Translation - भाषांतर १जय हो जय हो माझ्या आदीसत्या ॥ तुझ्या सत्तेनें शोधू उत्पन्नकर्त्या ॥धृ०॥विजयी द्वीज होतां क्षेत्नी निषेधीले ॥ विद्या बंद करुनी क्षुद्रवत केले ॥१॥आर्यांनी शुद्राला पशुवत केलें ॥ भूदेव होऊनी पाय पुजवीले ॥२॥अहंब्रह्म होऊनी भोंदीला मुढाला ॥ नाहीं भीत कधीं ते सद्वीवेकाला ॥३॥ब्राह्मणभोजन चंगळ करवीती ॥ ब्रह्मराक्षसाला मार्गे हटवीती ॥४॥मृतांच्या नांवानें दानधर्म घेती ॥ अधम होऊनी मधींच खाती ॥५॥खाऊं दिलें नाही श्रमी क्षुद्राला ॥ अंध पंगुसह पोरक्या मुलाला ॥६॥सत्योदय होतां कुंठे वेदमती ॥ पाहूं जातां अवघी दिसे खोटी ॥७॥सत्या तुझा महिमा पुराणें ऐकुनी ॥ तोडें करिती काळीं तेलमाखणांनीं ॥८॥तुला पाहून कुंठित होती पाखांडी ॥ लज्जित होऊन खालीं घाली मुंडी ॥९॥दया तुझी होतां मुढ जनांवर ॥ भूदेव कांपती मनीं थरथर ॥१०॥कृपेचा सागर बा तूं सत्य जाण ॥ मुक्त केले आम्हां ब्रह्मपाशांतून ॥११॥तुझ्या प्रसादानें मार्ग उमजलों ॥ मातापित्या आम्ही सेवूं लागलों ॥१२॥जय हो ०॥२सेवूं या सत्यूराजा ॥ महाप्रांजाळ तेजा ॥ शोधीती निर्वानी ॥ मन वेधीले काजा ॥लोपले सत्य जनीं ॥ हित नेणती कोणी ॥ धर्मं रचीले बहु ॥ आपहित साधूनी ॥शोधीतां सत्यवर्मा ॥ पावलों गुजवर्मा ॥ विटलों खोठ्या धर्मा ॥ त्यागीले नीच कर्मा ॥देवा नित्य स्मरुनी ॥ धरा सत्यमताला ॥ खोटा धर्म सोडूनी ॥ धरा बंधुप्रितीला ॥अहंब्रह्म होऊनी ॥ त्यागूं नको दीनाला ॥ सोवळे रे बनूनी ॥ चढूं नको गरवाला ॥इडापिडा मर्दून ॥ सेवा बळीराजाला ॥ स्वत: श्रम करुनी ॥ पोस स्वकुटुंबाला ॥सदा सत्य वदोनी ॥ सोड धूर्त मताला ॥ विद्या क्षुद्रा देऊनी ॥ लाजवी भू-देवांला ॥शुद्रजना सेऊनी ॥ अर्पी ईश्वराला ॥ भंडमत खोडनी ॥ जोती नमे ईशाला ॥सेवू.॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP