काव्यरचना - गृहकार्यदक्षता

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
आद्यापेक्षां जास्त खर्च जे करीती ॥ ऋणकरी होती ॥ जिवा कांच ॥१॥
सोयरेधायरे मार्गे पुढें येती ॥ तुकडे मोडीती ॥ दिमाखानें ॥२॥
मतलबी स्नेही रसाळ बोलती ॥ भोंदुनीयां खाती ॥ संधी येतां ॥३॥
गृहकार्यदक्ष होऊं विसरला ॥ चोंबडयानीं खाल्ला ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
सर्व ठायीं दक्ष असे परिमीत ॥ तोच सुरक्षीत ॥ जगामाजी ॥१॥
सत्संगती निरोगी संतती ॥ पळती विपत्ती ॥ रानोमाळ ॥२॥
मेल्यामागे कोणी दोषी ठरवीना ॥ आनंद संताना । चीर केला ॥३॥
गृहकार्यदक्ष सर्वदा जपला ॥ मान निर्मिकाला ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP