काव्यरचना - धीर

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता ॥ चित्तास स्वस्थता ॥ जेथें आहे ॥१॥
जेथें जागा धीर सदा ह्रदयांत ॥ सत्यवर्तनांत ॥ खर्ची घाला ॥२॥
पिडा दु:खें सोशी संकटें निवारी ॥ गांजल्यास तारी ॥ जगामाजीं ॥३॥
धीर धरुनीयां सर्वां सूख देती ॥ यशवंत होती ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
धीर सोडीतांच शुद्रां दांस केले ॥ आर्याजी ताठले ॥ ऐश्वर्यात ॥१॥
भित्रे शुद्र वेडे अज्ञानी बापुडे ॥ आर्य पाई पडे ॥ लज्या गेली ॥२॥
अज्ञानी म्हणूनी म्लेच्छशीं लढले ॥ प्राणाशी मुकले ॥ आर्यापाई ॥३॥
शुर मांगम्हारा आर्ये नागवीलें ॥ प्रशूवत केले ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
धीर असल्यानें प्रसंग पडतां ॥ निर्धारें वर्ततां ॥ यश येई ॥१॥
निश्चयानें जे कां हिंमत धरीती ॥ संकटें वारीती ॥ जगामाजीं ॥२॥
मोठमोठे गुण दृढ करीं धीर ॥ करीं पुष्ट कर ॥ नियतींत ॥३॥
सत्यानें वर्ततां आरिष्टे पळती ॥ देशोधडी जाती ॥ जोती म्हणे ॥४॥
४.
दुष्ट आचाराने मनीं भय वसे ॥ चिंताक्रांत दिसे ॥ मुद्रा त्यांची ॥१॥
नष्ट कर्मे सर्व उघडीं पडतां ॥ होईल फजीती ॥ मनीं भय ॥२॥
सरळ स्वभाव सत्य-आचारण ॥ नसे त्यावांचून ॥ समाधान ॥३॥
निर्मीकाचें भय घेई जो आधार ॥ खरा त्याचा धीर ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
अंतर निर्मळ भार ईशावर ॥ सत्य वर्तणार ॥ जगामाजीं ॥१॥
धर्म जातीभेद निर्दाळी मनांत ॥ सुखी मानवांत ॥ धन्य तोच ॥२॥
सत्य वर्णण्याचा आर्या नाहीं धीर ॥ धूर्त अगोचर ॥ खरा भंड ॥३॥
खोटे वेद मनू अंत्यजा दावीना ॥ मैदानी आणीना ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP