मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग १| मानवी स्त्रीपुरुष विभाग १ मानवांचा धर्म एक मानवी स्त्रीपुरुष आत्मपरीक्षण नीति धीर समाधान सहिष्णुता सद्विवेक उद्योग स्वच्छता गृहकार्यदक्षता काव्यरचना - मानवी स्त्रीपुरुष महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले मानवी स्त्रीपुरुष Translation - भाषांतर १.सारे स्त्रीपुरुष भावंडांत लेखी ॥ मांगम्हारा दु:खी ॥ करीताती ॥१॥ख्रिस्त महंमदा सत्यानें आळवी ॥ मानवा वळवी ॥ ईशाकडे ॥२॥धर्म-देश-जाती-भेद नाहीं तिला ॥ शोभे मनुजाला ॥ खरी माता ॥३॥अशा मानवीस सत्स्त्री म्हणावी ॥ तिची कीर्ती गावी ॥ जोती म्हणे ॥४॥२.आत्मज्ञान नाहीं ब्रह्यराक्षसाला ॥ पिंडी सर्वत्रांला ॥ सोंवळयानें ॥१॥स्वत: सुखदु:ख पराशीं तोलणें ॥ मेळ बैसवीणें ॥ त्यास कैचें ॥२॥यालाच म्हणावें अहंब्रह्य झाला ॥ गर्वाने फुगला ॥ वाया गेला ॥३॥मानवास बट्टा यानेंच लाविला ॥ दुर्गुणी आगळा ॥ जोती म्हणे ॥४॥३.निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी ॥ सदा सत्याचारी ॥ प्रपंचांत ॥१॥सूर्यापरि सत्यप्रकाशा पेरीतो ॥ शांती सर्वा देतो ॥ चंद्र जैसा ॥२॥होईना भूदेव जती मारवाडी ॥ मानवा न पीडी ॥ सर्पवत ॥३॥अशा सज्जनास मानव म्हणावें ॥ त्याचे गुण गावे ॥ जोती म्हणे ॥४॥४.जगी अमंगळ खळ संसारांत ॥ जाई एकांतांत ॥ मुक्त म्हणे ॥१॥मुक्त झाले त्यांनीं ग्रंथ कसे केले ॥ पाखंडें नॊंदीलें ॥ आर्यहीत ॥२॥आर्य श्रेष्ठ केले शूद्र नागवीले ॥ नित्य वागवीले ॥ दासापरी ॥३॥मानवाचे द्वेष्टे धूर्त सर्वोपरी ॥ पहा ग्रंथांतरीं ॥ जोती म्हणे ॥४॥५.सत्यवर्तनानें सर्व सुखी होती ॥ आर्य झुरताती ॥ मनीं सर्व ॥१॥कष्टाळू स्वभाव ब्राह्यणांचा नाहीं ॥ भांबावून पाही ॥ शूद्राकडे ॥२॥भोंदाडू स्वभाव मुळींच जाईना ॥ योजी फितुरांना ॥ सर्व कामीं ॥३॥कष्टकरी करा ऐशा ऐदी भटा ॥ उपटावा कांटा ॥ जोती म्हणे ॥४॥६.सत्यानें वर्तावें मानवांचा धर्म ॥ ठावें नाहीं वर्म ॥ ब्राह्यणास ॥१॥कष्टाळू शुद्रांचे लक्ष्मी पाय दाबी ॥ म्हणे ना कुणबी ॥ त्यास कधीं ॥२॥सुख देणे घेणें सर्व सुखी होती ॥ अरिष्टें पळती ॥ वारा वाटा ॥३॥कष्टाळू मानव शूद्र बंधू खरा ॥ त्यांचे हीत करा ॥ जोती म्हणे ॥४॥७.सत्य अनुग्रह स्वत: ज्यास झाला ॥ छळीना कोणाला ॥ तिळमात्र ॥१॥कायावाचामनें ब्राह्यण होईना ॥ श्रेष्ठत्व दावीना ॥ शुद्रादीकां ॥२॥कुळअभिमानी मधी ना मिरवी ॥ कोणास न दावी ॥ अर्थदंभ ॥३॥अशा मानवास गुणज्ञ म्हणावें ॥ त्यासंगें वर्तावें ॥ जोती म्हणे ॥४॥८.शिरीं जटाभार मृगचर्मी वस्त्र ॥ वाची आर्यशास्त्र ॥ साधु झाला ॥१॥ताबुतीं चितारे सोंग रंगवीलें ॥ घरांत खेळले ॥ वाघापरी ॥२॥साधुपरी व्याघ्र मनुष्य बा केला ॥ गांठी ना कुत्र्याला ॥ धावतांना ॥३॥सत्यावीण साधु मानव बनले ॥ सर्व वाया गेले ॥ जोती म्हणे ॥४॥९.मातापित्यामुळें होईना कुलीन ॥ दुर्गुणाची खाण ॥ जगामाजीं ॥१॥द्रव्याच्या बळानें दारुस सोडीना ॥ पाळी वेसवांना ॥ लाज गेली ॥२॥ब्राह्यण म्हणूनी उन्मत्त तो झाला ॥ नाडितो शुद्राला ॥ सर्वोपरी ॥३॥दुर्गुणापासून मुक्त नाहीं झाला ॥ त्यागा पातक्याला ॥ जोती म्हणे ॥४॥१०.स्त्रीपुनविवाह करण्याची बंदी ॥ अन्यायाची धुंदी ॥ थांग नाहीं ॥१॥खोटया नोटा खतें आर्याजी करीती ॥ लांच बहु खाती ॥ अन्यायानें ॥२॥अन्य शूद्रा लोकां पुराणें सांगतीं ॥ बंड करविती ॥ हितासाठी ॥३॥अन्यायी ब्राह्यण बहु ठाई होती ॥ दु:ख सर्वा देती ॥ जोती म्हणे ॥४॥११.म्लेंच्छाचे धर्मास हेव्यानें निंदीती ॥ ग्रंथानें लिहिती ॥ त्यांची निंदा ॥१॥नित्य शूद्रा तुच्छ गर्वानें मानीती ॥ त्यास वापरीती ॥ पशुपरी ॥२॥शूद्रास निंदून त्याचें सर्व खाती ॥ त्यांच्याशी वागती ॥ सोवळयानें ॥३॥निंदकाचें घर ब्राह्यणी सोहळा ॥ खरा हा वाटोळा ॥ जोती म्हणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP