काव्यरचना - सहिष्णुता

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
विपत्तींत खंती मुळींच मानीना ॥ हिमतीचा राणा ॥ क्रोधावीण ॥१॥
रोगग्रस्त होता संतापा पेटेना ॥ घरांत करीना ॥ कुरकूर ॥२॥
अहीत कृत्यांची हेळणा करीना ॥ उपाय योजीना ॥ सुडासाठीं ॥३॥
त्यास उपदेश करीतां सोडीना ॥ वादास पेटेना ॥ त्यांच्या संगें ॥४॥
सहिष्णुतावीण सुखास भोगीना ॥ संतोषी होईना ॥ जोती म्हणे ॥५॥
२.
इराणी भटजी बळीत्यानीं आले ॥ क्षत्रिया जिंकिलें ॥ द्रव्यलोभ ॥१॥
वेदामध्यें आहे त्याचा मागमुद्या ॥ शिपायाचा धंदा ॥ आये केला ॥२॥
जिंकील्या मानवा स्पर्शी केली बंदी ॥ घेई ना सावली ॥ द्वेषवृद्वी ॥३॥
विद्या बंद केली अज्ञानीं ठेवीलें ॥ लंड धनी झाले ॥ लुटमाप ॥४॥
सहिष्णुता खरी मांगमहाराची ॥ फजीती आर्याची ॥ जोती म्हणे ॥५॥
३.
दुष्ट वर्तनानें नष्ट कर्मी होती ॥ संकटे भोगीती ॥ क्लेशासह ॥१॥
दु:ख क्लेश होतां देवा दोष देती ॥ निर्मीका निंदीती ॥ सर्वोपरी ॥२॥
जन्ममृत्यूसह सुखदु:ख देता ॥ कर्ताकरविता ॥ त्याची लिला ॥३॥
केली दुष्ट कर्म सांगण्यास भीती ॥ देवाची फजीती ॥ करी मुळ ॥४॥
सहिष्णता नाहीं अशा सोंगाडयास ॥ ख-या नास्तीकास ॥ जोती म्हणे ॥५॥
४.
मानव सारिखे निर्मीकें निर्मीले ॥ कमी नाहीं केले ॥ कोणी एक ॥१॥
कमी जास्ती बुद्वी मानवा वोपीली ॥ कोणा नाहीं दिली ॥ पीढीजादा ॥२॥
शुद्रादीक नाही कशामध्ये उणा ॥ अवयवीं खणा ॥ आर्यापरी ॥३॥
मानवाचे हक्क ते कां विसरले? ॥ अति शूद्र झाले ॥ पशूवत ॥४॥
शुद्र् केव्हां झाले आर्याचे दास ॥ बाकी अनुदास ॥ कसे झाले ॥५॥
आर्यलोभ मूळ तंटयाचें कारण ॥ ग्रंथ तपासून ॥ पाहूं जातां ॥६॥
मूळ धर्मभेद मानवा नसावा ॥ एकोपा असावा ॥ जगामाजी ॥७॥
सार्वत्रिक सत्य ग्रंथ रचीयेला ॥ त्यास छापण्याला ॥ द्रव्य तुटा ॥८॥
शुद्रादीक-किंव येतांच मानवा ॥ देशस्थ बांधवा ॥ मर्दापरी ॥९॥
ग्रंथ छापण्याची केली सुरुवात ॥ प्रती वीस शत ॥ एकदम ॥१०॥
विक्री झाल्यावर दाम घेण बोली ॥ टोंचणी ही दिली ॥ चिक्कू शुद्रां ॥११॥
मोरो विठठल वाळवेकर धेंड ॥ सहिष्णू अखंड ॥ मुंबापुरीं ॥१२॥
सदसदविवेकी सुबोधाचा दाता ॥ गृहिणीचा पिता ॥ जोतीमित्र ॥१३॥
५.
थोडे दिन तरी मद्य वर्ज करा ॥ तोच पैसा भरा ॥ ग्रंथासाठीं ॥१॥
ग्रंथ वाचीतांना मनीं शोध करा ॥ देऊं नका थारा ॥ वैरभावा ॥२॥
खोटया धर्मा नाहीं सत्याचा आधार ॥ व्यर्थ बडीवार ॥ स्वार्थासाठीं ॥३॥
सत्य सोडूनीयां धर्मवादी होती ॥ संग्रामी करीती ॥ रक्तपात ॥४॥
लढण्याचा कित्ता संताना घालीती ॥ पिढीजादा देती ॥ दु:ख जगा ॥५॥
सहीष्णुतेवीण नाहीं समाधान ॥ एकीस बंधन ॥ जोती म्हणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP