ब्राह्मणांचे कसब - चाल आठवी

हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.


ब्राह्यण शुद्रास प्रतिवर्षी भाद्रपदमासी पक्षांत व वर्षातील साधारण सणावारांत व सूर्यचंद्राच्या ग्रहणकाळी कशा भुलथापी देऊन बुडवितो याविषयीं.
॥अभंग॥

शेती दास केला सोडीना शुद्राला ॥
कर बसविला वर्षासन ॥१॥
वसुलाचा थाट भाद्रपद मासीं ॥
सोडीना पुत्रासीं जन्मभर ॥२॥
संक्रातीं पाडवा भोके सर्व सणीं ॥
लाज नाहीं मनीं वाटोळयाच्या ॥३॥
तीर्थयात्रेठायीं बगळयाचे परी
द्रव्यहीन करी भाविकास ॥४॥
व्यत्तिपात पुत्र रिकामक्या वेळीं ॥
फिरे आळोमाळी भीकमाग्या ॥५॥
ग्रह आकाशींचे सोंग उभे केलें ॥
लळिती आणिलें द्रव्यलोभे ॥६॥
लाथाबुक्या बाकी१ दान सर्व घेई ॥
बुडवुनी जाई कुणब्यास ॥७॥
तगाद्याची तुम्ही वाट पाहूं नका ॥
मारा बोंबा हाका जोशा नांवें ॥८॥
व्याजबट्टयासुद्वां नाटक्याची बाकी ॥
फेडा बीनचुकी रोखारोखी ॥९॥
आतां तरी तुम्ही शुद्रा भोंदु नका ॥
जोतीबाचा ठोका ऐकुनिया ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP