ब्राह्मणांचे कसब - चाल तिसरी

हिंदुस्थानात ब्राह्मण सत्ताधारी होण्यापूर्वी या पुण्यक्षेत्री परशुरामाने महारांना महाअरीत पाताळी कसे घातले याविषयी हा पोवाडा.


॥अभंग ॥
मागणीच्या वेळीं जोशीबुवा येई ॥
राशीबळ पाही दिमाखीनें ॥१॥
स्वहिताची आस न्यून कल्पोनियां ॥
ग्रह योजूनिया जप स्थापी ॥२॥
लग्न वर्तवितां दुकान मांडलें ॥
गणपती केले सुपारीचे ॥३॥
खारका खोबरे नैवेद्याचा भार ॥
दक्षिणा रीतसर पैसालूट ॥४॥
टिपी कागदांत तिथी नेमिलेल्या ॥
कुंकें शोभविल्या हातीं दिल्या ॥५॥
वर्ष वय गूण तोलून पाहाणी ॥
नाहीं येत मनीं ज्याच्या लेश ॥६॥
लग्नाचे आधीं मोठी गडबड ॥
धावे दुडदुड दोहींकडे ॥७॥
सुरवात केली वरा वस्त्रें देई ॥
भाळीं टिळा लावी देऊळांत ॥८॥
उठे झडकरी मांडवांत जाई ॥
बोले लवलाहीं त्वरा करा ॥९॥
हातीं शस्त्रें देई पाठराखे केले ॥
मामा नेमियेले परस्पर ॥१०॥
मध्ये उभा राहे हातीं अंतरपाट ॥
मंगळाचा पाठ सुरु केला ॥११॥
टाळयांच्या गोंधळी वाद्यांचा दणाण ॥
म्हणे शुभ लग्न सावधान ॥१२॥
वधूवर दोघे बिचारे अज्ञानी ॥
दिले गुंतवूनी जन्मभर ॥१३॥
अगांतुक बाकी धांदलीनें येती ॥
हात पसरिती पैशासाठी ॥१४॥
सूत गुंडाळूनी वधूवरां कोंडी ॥
दक्षिणा ती तोंडी बीजमंत्र ॥१५॥
काडयामुडया जाळी लज्जाहोम केला ॥
नाही मनीं धाल लज्जाहीन ॥१६॥
उभयतांच्या काळ तेलसाडी देता१ ॥
नाक मुरडतां वेळ जाई ॥१७॥
फार थोडी ह्यणे मांडवखंडणी ॥
घेई तो भांडूनी अखेरीस ॥१८॥
परजातीवर तुह्यी सोपूं नका ॥
बुडवितां फुका धर्ममीष ॥१९॥
वडील धाकुटे स्नेही उभयतांचे ॥
पंच स्वजातीचे निवडुनी ॥२०॥
वर्ष वय गुण प्रित परस्पर ॥
पाहा सारासार तपासुनी ॥२१॥
देवा प्रार्थूनिया घालवावी माळ ॥
मेळऊनी मेळ आनंदाचा ॥२२॥
ब्राह्यणांचे येथे नाहीं प्रयोजन ॥
द्यावे हाकलून जोती ह्यणे ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP