विवेकसार - द्वादश वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥अथ सच्चिदानंदखंडत्वप्रतिपादन प्रारंभः॥

श्रीगणेशायनमः ॥ वक्रतुंडप्रसन्न ॥

अखंडत्वं सदा सच्चिदानंदानां यथाभवेत् भिन्नवत् गुणवद्भासमानानां वर्ण्यतेतथा ॥

पूर्वी आत्म्यास सच्चिदानंदरूपता निरूपिली । आता तो सच्चिदानंद स्वरूप आत्मा जो त्यास अखंडत्व जे ते निरूपितो ॥ अखंडत्व म्हणिजे काय म्हणाल तरी ॥ देशे करून काळेकरून वस्तुकरून अपरिच्छिन्नत्व जे ते अखंडत्व ॥ या अखंडत्वास तीनि विशेषणें कां बोलावी येक दोनि विशेषणे पुरेनात काय ॥ म्हणाल तरि आत्म्यास देशेकरून अपरिछिन्नत्व जे तोचि अखंडत्व म्हणुन बोलावे तरि आकाश जे ते व्यापक या करिता त्या आकाशासही अपरिछिन्नत्व आहे म्हणुन आकाशास अखंडत्व घडेल ॥ आकाशाचे अखंडत्व निराकारण करावयाकारणे आत्म्यास काळेकरून अपरिछिन्नत्व बोलिले ॥ त्या आकाशास काळेकरून अपरिछिन्नत्व नाही काय म्हणाल तरि ॥ आकाश जे ते उत्पत्तिनाशवंत आहे याकरितां त्या काळेकरून अपरिछिन्नत्व नाही म्हणुन आत्म्यास काळेकरूनही अपरिछिन्नत्व म्हणुन दोनि विशेषणे पाहिजेत ॥ हे दोनि विशेषणे पुरेनात काय म्हणाल तरी ॥ काळ जो तो विभु आहे याकरिता देशेकरून अपरिछिन्नत्व आहे ॥ आपणाकडून आपणास अपरिछेद घडेना याकरिता काळेकरून अपरिछिन्न जाला ॥ याकरिता काळास देशेकरून काळ जो तेणेकरून अपरिछिन्नत्व आहे म्हणुन काळासही अखंडत्व घडेल म्हणुन त्या काळाचे अखंडत्व निराकरण करावयाकारणे आत्म्यास वस्तुकरून अपरिछिन्नत्व म्हणून तिसरे विशेषण बोलिलो ॥ या काळास वस्तुकरून अपरिछिन्नत्व नाही काय म्हणाल तरि काळ जो आकाशादिवस्तु जाला नाहीं ॥ याकरिता काळास वस्तुकरून अपरिछिन्नत्व नाही म्हणुन आत्म्याव्यतिरिक्त काळादिकास त्रिविधपरिच्छेदशून्यत्वरूप अखंडत्व नाही ॥ नव्हे हो त्यादेशामध्ये आहे त्या देशामध्ये नाही म्हणून देशेकरून ॥ मी शुक्लसंवत्सरी जन्मलो ॥ काही काळांतरे जात आहे ॥ म्हणून काळा जो तेणेकरून हे वस्तु मी होय हे नव्हें म्हणुन वस्तूकरून परिछिन्न दिसतों ॥ जो आत्मा यास त्रिविधपरिछेदशुन्यत्व कैसे घडेल म्हणाल तरी या देशामध्ये आहे ॥ या काळी जन्मलो ॥ हे वस्तु मी नव्हे ॥ ऐसा जो त्रिविधपरिच्छेद देहाते अपेक्षुन येत आहे याकरिता देहाव्यतिरिक्त आत्मा जो यास देशकाळवस्तु करून अपरिछिन्नत्व घडतच आहे ॥ आत्म्यास देशेकरून अपरिछिन्नत्व कैसे म्हणाल तरी घटःसन् पटःसन् कुसूलःसन् पृथिवीसती आपःसत्यः तेजःसत् वायुःसन् आकाशःसन् म्हणौन भूतभौतिक समस्तप्रपंचाचाठाइं सद्रूप आत्म्याची अनुवृत्ति आहे म्हणून आत्मा व्यापक आहे याकरिता हा जो व्यापक आत्मा त्यास देशेकरून अपरिछिन्नत्व आहे ॥ आत्म्यास काळ जो तेणेकरून अपरिछिन्नत्व कैसे म्हणाल तरी आत्मा अनादि आहे याकरिता भूतकाळेकरून परिछिन्नत्व नाही ॥ आत्मा नित्य आहे याकरिता भविष्यकाळेकरून परिछिन्नत्व नाही ॥ आत्मा देहाव्यतिरिक्त आहे म्हणून वर्तमानकाळेकरून परिछिन्नत्व नाही ॥ आत्म्यास वस्तुकरून अपरिछिन्नत्व कैसे म्हणाल तरी ॥ आत्मा सर्वात्मक आहे म्हणून वस्तुकरून परिछिन्नत्व नाही ॥ वस्तु म्हणिजे काय म्हणाल तरी सजातिय विजातिय स्वगत ऐसे तिप्रकारेकरून आहे यास दृष्टांत आहे काय म्हणाल तरी ॥ वृक्षास वृक्ष सजातीय ॥ सिळदीक विजातीय ॥ त्या वृक्षाचे पत्र फळादिक स्वगत ॥ याप्रकारे आत्म्यास सजातीय विजातीय स्वगत नाहीत याकरिता सजातियादि भेद नाही ॥ घटःसन् पटःसन् देवतात्मा यज्ञदत्तात्मा चैत्रात्मा म्हणुन सजातीय सजातीय भेदही ॥ पृथ्वी आप तेज वायु आकाशादिकरून विजातीय विजातीय भेदही ॥ इच्छा द्वेष सुखःदुःख सत्व रज तम म्हणुन स्वगत स्वगत भेदही ॥ त्रिविध परिच्छेद आत्म्यास असता ॥ स्वजातीय विजातीय स्वगत भेद नाही म्हणुन कैसे बोलावे ॥ म्हणाल तरी हे सजातियादि भेद आत्म्यास उपाधिकरून आले आहेत परमार्थतः ॥ आत्म्यास सजातीय भेद कैसा नाही म्हणाल तरी येकच आकाशास घटामठादि उपाधिकरून घटाकाश मठाकाश म्हणुन अनेक प्रकारे व्यवहार होत आहे ॥ तैसा आत्माही उच्चावच शीरीरोपाधीकरून देवदत्त यज्ञदत्त कृष्ण राम म्हणुन अनेकात्मरूपेकरून दिसतो ॥ परमार्थता विचारून पाहता त्या आकाशासारिखे सजातीय सजातीय भेद नाहीत ॥ परमार्थतः ॥ विजातीय भेद कैसा नाही म्हणाल तरि सद्रूप जो आत्मा यास असत्यप्रपंचेकरून विजातीय भेद बोलावा की ॥ तो असत्यप्रपंच शशविषाण वंध्यापुत्र गगनारविंदाचेपरि असत् आहे म्हणून त्या असत्प्रपंचेकरून आत्म्यास विजातीय कैसे बोलिजेल ॥ बोलिजेत नाही म्हणुन परमार्थतः आत्म्यास विजातीय नाहीसे जाले म्हणुन विजातीयभेद नाहीच ॥ परमार्थतः आत्म्यास स्वगतभेद कैसा नाही म्हणाल तरी आत्म्यास स्वगत भेद बोलाव्याचे इच्छा द्वेष सुख दुःख अवघे अंतःकरणगुण दिसताहेत म्हणुन आत्मगुण नव्हेत याकरिता त्या इच्छागुणेकरून सच्चिदानंदस्वरूपमात्र ऐसा जो आत्मा यास स्वागत भेद नाही ॥ भिन्न जे सच्चिदानंद येणेकरून आत्म्यास भेद नाही काय म्हणाल तरी सच्चिदानंद अन्योन्यभिन्न होतिल तरि भेद होईल ॥ भिन्न नव्हेत ॥ म्हणुन त्या सच्चिदानंदेकरून आत्म्यास भेद नाही सच्चिदआनंद म्हणुन शब्दभेद अर्थभेद आहे म्हणून ही ॥ हस्त कर पाणी शब्दाचे वाणी पर्याय शब्द नव्हेत म्हणूनही या सच्चिदानंदास येकार्थत्व कैसे घडेल म्हणाल तरी ॥ दीपास रोहित्तोष्णप्रकाश म्हणुन शब्दार्थेकरून भिन्नासारिखे व्यवहार केला जरी हस्तकरपाणि शब्दाचे वाणी पर्यायशब्द नव्हेत तरी हे रोहितोष्णप्रकाश दीपास स्वरूपच आहेत म्हणुन हे रोहितादिक प्रकार परस्परेभिन्न जैसे नव्हेत तैसे सच्चिदानंद जे ते शब्दार्थेकरून भिन्नासारिखे व्यवहाराते पावले जरी आत्म्याचे स्वरूप होउन आहेत म्हणून या सच्चिदास भेद नाही ॥ ऐसे जरि जाले सच्चिदास भेद नाही जरी आत्मा सद्दप म्हणुन श्रुति इतुकी बोलिलि सद्रूपचचिद्रूप आनंदरूप म्हणून काशास बोलावे भेद नाही तरी ऐसे बोलेल काय म्हणाल तरी सच्चिदानंद म्हणुन श्रुति बोलिलि इसि या तिहीस भेद बोलावयाचेठाइं तात्पर्य नाही ॥ तरि कोण्या तात्पर्येकरून बोलिली म्हणाल तरी ॥ आत्मनिष्ठ जे सत्यत्व असज्जगनिष्ठ होउन आत्मनिष्ट जे चिद्रूपत्व जडबुध्यादिनिष्ठ होउन आत्मनिष्ट आनंदत्व दुःखरूप पुत्रभार्यादिनिष्ट होउन दिसते जगनिष्ठ असद्रूपत्व बुध्यानिष्ठ जडरूपत्व पुत्रभार्यादिनिष्ट दुःखरूपत्व आत्मनिष्ट ऐसे दिसते ॥ मी मेलो मी जड ॥ मी दुःखी ऐसी जे विपरीतभ्रांति इचे निवारण करावयाकारणे आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप म्हणून श्रुति बोलते ॥ इतुकेच नव्हे द्वैतवादी अवघेही आत्मा जडरूप म्हणुन अंगीकार करून त्यास सत्ता धर्म म्हणुन चित्सुख गुण म्हणुन बोलताहेत याकरिता त्यास निवारण करावया कारणेही आत्मा सच्चिदानंद म्हणून श्रुति बोलते परंतु त्या सच्चिदानंदास भेद म्हणुन श्रुति बोलावयाचे तात्पर्य नाही ॥ म्हणुन सदच चिद चिदच आनंद म्हणुन श्रुतितात्पर्य पर्यालोचनेकरून सिद्ध जाले श्रुति मात्रेकरून सद्चचिद् चिदच आनंद म्हणून सिद्ध जाले ॥ युक्तिकरून सिद्ध जाले नाहीकी ॥ म्हणाल तरी युक्ति करूनही सद्चचिद चिदच आनंद म्हणुन सिद्ध होत आहे ॥ ते कैसे म्हणाल तरि ॥ सद् जे ते आपणच भासते की आणखी येकाकरून भासते म्हणून विचारू आपणच भासते म्हणुन बोलिलो जरि सदच चिद म्हणुन सिद्ध होत आहे ॥ नाहीतरी अन्य जो तेणेकरून भासते म्हणून बोलावे तरि तो अन्य जो तो सद्विलक्षण कीं सदंतर कीं ॥ सद्विलक्षण म्हणिजे असत् असत् जे सद्विलक्षण तेणेकरून सत् भासते म्हणुन जरि बोलिले तरि ॥ असत् शशविषाणादिक जे तेहीकरून सत्घटादिक भासावे ॥ ऐसे भासत नाही की म्हणुनि सद्विलक्षण असणे जे तेणेकरून सत्भासते म्हणुन बोलता नये ॥ ऐसे जरि जाहाले सदंतरेंकरून सत् भासते म्हणून बोलिले तरी तें सदंतर आपण स्वता भासत होत्सातें सदास भासवितें किंवा आपण सदंतरेंकरून भासत होत्सातें सदास भासवितें किंवा आपण सदंतरेंकरून भासत होत्सातें सदास भासवितें म्हणाल तरि ॥ आपण आणखी एका सदंतरेकरून भासुन सदास भासविते म्हणुन बोलावे जरि ते सद काशाकरून भासते त्या सदास भासविणार जे सत् काशाकरून भासते ऐसे अनवस्थादोष प्राप्त होत आहेत म्हणुन ॥ ते सदंतर स्वतः भासत होत्साते सदास भासविते म्हटले तरि ॥ आत्म्यास उपाधीवाचुन सदंतर नाही म्हणुन स्वतः आपण भासत होत्साते आहे जे सदंतर ते कोणाकरूनही सद् भासते म्हणुन बोलता नये ॥ ऐसें विचारितां आत्मसत्तेते भासवितें म्हणुन असद् जें सद्विलक्षण सदंतर जे सदंतरेकरून स्वतः सदंतर आपण भासत होत्साते भासविते म्हणुन बोलतां नयेसें जाले ॥ म्हणुन आत्मसत्ता जे ते स्वतः भासते म्हणुन बोलावें ॥ एसें बोलिले जरि तरि सदच चिद म्हणुन सिद्ध होत आहे ॥ऐसे जरि जाले चिद्रूप जे सत् त्यास आनंदत्व कैसे सिद्ध होते म्हणाल तरि आत्म्यास द्वितीयत्वसंपादक येकही वस्तु नाही म्हणुन आनंदत्व सिद्ध होत आहे ॥ सदंतरेकरून हो सद्विलक्षणेकरून हो आत्म्यास सद्वितीयत्व बोलता नये काय म्हणाल तरी उपाधीवाचुन स्वतः सदंतर नाही म्हणुन सदंतरेकरून सदास द्वितियत्व बोलता नये ॥ सद्वितीयलक्षण म्हणिजे रज्जु सर्पाच्या वाणी असत् म्हणून तेणेकरून चिद्रूप जे सत् त्यास सद्वितीयत्व बोलता नये ॥ म्हणुन चिद्रूप जे यास सद्वितियत्व संपादावयाकारणे सदंतर सद्विलक्षणावाचुन आणखि येक पदार्थांतर नाही म्हणून त्या चिद्रूपास अद्वितीयत्व सिद्ध जाले ॥ ते अद्वितीयत्वच आनंदरूपत्व म्हणून ॥ जेव्हा अद्वितीयत्व सिद्ध जाले तेव्हा आनंदरूपत्व सिद्ध जाले याप्रकारे युक्तिकरून सद् च चिद्च आनंद म्हणुन सिद्ध जाले ॥ ऐसे जरि जाले श्रुतियुक्तिकरून कीं सदचिद्चिद्च आनंद म्हणुन सिद्ध होणे परंतु अनुभवेकरून सिद्ध नाहीकी म्हणाल तरी ॥ अनुभवेकरूनही सदच चिदचिदच आनंद सिद्ध होत आहे ॥ कैसे म्हणाल तरी सुषुप्तीचेठाइ अवघे प्राणी जे तेहीकरून येक सुख अनुभविजे तसे दिसताहे ते सुख जाग्रत्स्वप्नाचेठाई भासाव्याच्या सुखासारिखे नानारूपेकरून नसून सर्वसुषुप्तिचेठाइं येकरूप होऊन आहेच म्हणून ते सुषुप्तिसुखच सद् जाले ॥ ते सद्रूप जे सुषुप्तिसुख यासच चिद्रपत्व कैसे म्हणाल तरी ॥ आपणही भासत होत्साते आपल्याठाइ आरोपिले जे सर्वपदार्थ त्यातेही भासविताहे म्हणून त्या सुषुप्तीसुखास चीद्रूपत्व सिद्ध आहे ॥ आणखी सुषुप्तिहून उठला जो पुरुष तेणेकरून मी सुखे निजेलो ॥ येका सुखावाचुन आणखी काही जाणत नाही म्हणून येक अज्ञानही स्मरिजेत आहे ॥ हें स्मरण अनुभवावाचुन घडेना म्हणुन हे सुख अज्ञानसुषुप्तिकाळाचे ठाइं अनुभविले ऐसे दिसताहे ॥ ते सुखस्वरूप म्हणुन सुखाते अनुभविजेत आहे म्हणायाचे मोह मात्र ॥ अज्ञान मात्र अनुभविजेत आहे ॥ अनुभविले जे अज्ञान कोणाकरून भासले म्हणाल तरी सुषुप्तिअवस्थेचेठाइं प्रकाशसाधन आदित्य चंद्र नक्षत्र वन्ही चक्षुरादिक नसताही सुखमात्र आहे म्हणुन त्या सुखेकरून अज्ञान भासते म्हणुन बोलावे ॥ नाही तरी त्या अज्ञानेंकरून सुख भासते म्हणुन बोलु म्हटिले तरी अज्ञान जड अज्ञानेकरून सुख भासते म्हणुन बोलता नये । ते सुख आपण होत्साते अज्ञानास भासविते की आपण भासुन अज्ञानास भासविते काय म्हणाल तरी आपण न भासता अज्ञानास भासउ सकेना ॥ म्हणून आपण भासुन अज्ञानास भासविते ॥ या अज्ञानामध्ये सकळही प्रपंच लीन आहे म्हणुन त्या अज्ञानाचेच भासवणेकरून त्या सुखास सकळपदार्थावभासकत्वही सिद्धच आहे ॥ हेच आत्म्यास सर्वज्ञत्व म्हणुन सुषुप्त्यावस्थेचेठाइ सद्दप जे सुख यास चिद्रूपत्व सिद्धच आहे ॥ यास आनंदत्व कैसे म्हणाल तरी निरूपाधिक निरतिशयसुखरूपत्व या सुषुप्तिसुखास आहे म्हणुन आनंदत्वही सिद्धच आहे म्हणुन अनुभवेकरूनही सदच चिद् चिद्च आनंद म्हणुन सिद्ध आहे ॥ हे सच्चिदानंद आत्म्यास स्वरूप जाले म्हणुन स्वरूपभूत सच्चिदानंदेकरून आत्म्यास स्वगतही स्वगतभेदही नाही आत्म्यास विजातीय अनात्मा असत् जाला म्हणुन त्या अनात्म्याकरून आत्म्यास विजातीयभेदही नाही ॥ आत्म्यास आत्मांतर नाही म्हणुन सजातीय स्वगतरूप वस्तुकरून परिछेद नाही याप्रकारेकरून आत्मा त्रिविध परिछेदशून्य आहे म्हणुन सच्चिदानंदस्वरूपत्व आत्मा जो यास अखंडत्व सिद्धच जाले आहे या विचारास फळ काय म्हणाल तरी ॥ समस्त प्राण्यासही देह मी म्हणुन दृढनिश्र्चय आहे ॥ तैसी देहाचेठाइं आत्मत्वबुद्धि न येऊन तो सच्चिदानंदस्वरूप आत्मा मीच ऐसा दृढनिश्र्चय येणे ॥ या विचारास फळ ॥ या प्रकारे विचारून आत्मस्वरूपच मी म्हणुन जो जाणतो तो सर्व संसारापासून सूटला तोच कृतकृत्य तोच परिपूर्ण ब्रह्म म्हणुन सकळ श्रुतिस्मृतिइतिहासपुराणागमाभियुक्त आचार्य वचने जे ते घोष करिताहेत या अर्थाचेठाई संशय नाहीं सिद्ध ॥ हा अर्थ कोण मानितील म्हणाल तरी ज्यास अनुभव आहे ज्यास गुरुवेदांतशास्त्राचेठाइं विश्वास ज्यास आहे ते मानितील एतद्विपरित मानणार नाहीत हा अर्थ सिद्ध ॥ संग्रहश्र्च ॥

भूतभौतिकभावेषु स्वकार्येषु सदात्मना ॥

व्यापीदृष्टांततो ह्यात्मा देशान्नास्यपरिछितः ॥१॥

अदेहत्वादनदित्वादबाध्यत्वान्न विद्यते ।

वर्तमानागामिभूतकालेभ्योस्यपरिछितिः ॥२॥

सर्वाभिन्नस्वरूपेण सर्वात्म्त्वात्सदात्मनः ।

सर्वेभ्यो वस्तुजातेभ्यः परिच्छित्तिर्त विद्यते ॥३॥

न व्यापित्वाद्देशतोऽतो नित्यत्वान्नापि कालतः ।

नवस्तुतोपि सर्वात्म्यादानंत्यं ब्रह्मणित्रिधा ॥४॥

अखंडात्माहमेवायमित्ये वं यो विजिज्ञवान् ।

स सर्व संसृतेर्भुक्तो ब्रह्मानंदं समश्रुते ॥५॥

किमनेन बहुक्तेन निर्णितौ द्वौ महात्मभिः ।

अविचाराद्धि संसारो विचारान्मोक्ष इत्युभौ ॥६॥

प्रमादादप्रभादाद्वा यदृशानान्मयेरितम् ।

तत्क्षम्यंतु समालोक्य पण्डिताः समदर्शिनः ॥७॥

इतिद्वादशवर्णकंसमाप्तम् ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP