विवेकसार - प्रथम वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥श्री गणेशाय नमः॥

॥श्री सरस्वत्यै नमः॥

॥श्री गुरुभ्यो नमः॥

अध्यायरोपापवादप्रकरण

यस्यात्मभूतस्य गुरोः प्रसादादहं विमुक्तोऽस्मि शरीरबन्धात् ॥

सवौपदेष्टुः पुरुषोत्तमस्य तस्यांध्रिपद्मं प्रणतोऽस्मि नित्यम् ॥१॥

अनुग्रहाणां मर्त्यांना संस्कृतानधिकारिणाम् ॥

विवेकसारः श्रोतृ रच्यते भाषया मया ॥२॥

मुमुक्षु जो तेणे अध्यारोपापवादेकरून परब्रम्हाते

जाणावे हे संमत वेदांतशास्त्रिचे असे ॥ श्र्लो .

स्थूलसूक्ष्मादिदेहानामात्मन्यारोप एव च ।

अपवादस्ततोप्येषां सभ्यगत्र प्रदर्शितः ॥

टीका .

प्रथम अध्यारोप स्पष्टत्व ॥ वस्तूचे ठाई अवस्तुचा आरोप तो अध्यारोप ॥ जैसे सिंपि रुपे दोरि सर्व स्थाणु पुरुष सूर्यकिरणि जळ आकाशि निळिया तैसा निष्प्रपंच आत्म्याचे ठाई प्रपंचारोप ॥ ही किंनिमित्य म्हणता ॥ आत्मस्वरूप अज्ञानास्तव ॥ अज्ञानस्वरूप कोण म्हणता तरि त्यासि प्रकृति माया अविद्या तम अनेक नामे ॥ आतां प्रकृतीस्वरूप कैसे म्हणता त्रिगुणाचि साभ्यावस्था ते प्रकृती ॥ कीं पांढरे तामडे काळे सुत येकठाई वळणे जैसे ॥ इयसीची प्रळयावस्था माहासुषुप्ती हे दोनि नामे ॥ इये प्रकृतिमध्ये अनेक कोटि जीवराशी स्वस्वकर्मवासनात्मक प्रारब्धेसहित लयस्थ राहाताति ॥ जैसे मधुमैळि हेमरज कि सुषुप्तिअवस्थेमध्ये इंद्रिये ॥ तैसे जीवराशि लिन राहाणे उत्पत्तिकाली प्रकृतीशुद्धसत्वगुणे प्रकट होणे ते गुणक्षोभिणी मायेचे स्वरूप ॥ ते माया मायेचेठाई प्रतिबिंब चैतन्य मायाधिष्ठान चैतन्य हे तिन्ही मिळोन ईश्र्वर ऐसे नाम ॥ यास अन्तर्यामि अध्याकृत दोनि नामे ॥ हाचि जगत्स्रष्टा ॥ तरि सृजनास उपादान निमिला दोनि कारणे पाहिजेत । घटादिकास मृत्तिका उपादानकारण व्यापारसहित कुल्लाळ निमित्यकारण ॥ पष्टुस तंतु उपादानकारण सव्यापार कोष्ठा निमित्यकारण ॥ ऐसी प्रवृत्ति कैसी घडे तरि माया उपादानकारण ईश्र्वर निमित्यकारण ॥ ऐसे म्हणता श्रुतीस विरोध येतो । आणि विवेक उपादानकारण सत्य पदार्थ असावा । माया आणि आत्मा दोनि सत्य जालि तेव्हां अद्वैत विरोध आला आहे असंभाव्य ॥ आता माया निमित्यकारण चेतनास असावे । अचेतन मायेस कैसे घडेल । चेतन म्हणता अद्वैतहानि येईल तरि कैसे ॥ उभयकारणी माया योग्य होऊ न सके । द्वयकारणी समर्थ ईश्र्वरच । ते कैसे म्हणतां । उर्णनाभि शरीर प्रधान होत्साता उपादान कारण आणि बुद्धिप्रधान होत्साता निमित्यकारण ॥ ईश्र्वर तमोगुणप्रधान मायेसि मिळोन उपादानकारण आणि सत्वगुणप्रधान मायेसि मिळोन निमित्यकारण ॥ उभयपक्षे जग निर्माण जाले । तमोगुणप्रधान मायेते इक्षण केले तेथे मिळाले जे चैतन्य त्यापासून त्रिगुणात्मक शब्दरूप आकाश ॥ आकाशव्यापक चैतन्य तेथून त्रिगुणात्मक स्पर्शरूप वायु ॥ वायुव्यापक चैतन्य तेथे त्रिगुणात्मक रसरूप जळ ॥ जळव्यापक चैतन्य त्यापासाव गंधरूप पृथ्वी उत्पन्न ॥ यासच अपंचीकृत सूक्ष्मभूतें तन्मात्रा हे तिनि नामे ॥ यापासून समष्टिव्यष्टयात्मक लिंगशरीर उत्पन्न ॥ सत्रा अवयवाचे । ते कोणते म्हणता ॥ श्रोत्र त्वक् चक्षु जिव्हा घ्राण वाक् पाणि पाद उपस्थ वायु प्राण अपान व्यान उदान समान चित्तसहित मन अहंकारसहित बुद्धि । एवं लिंग सत्रा कळाचे ॥

आता उत्पत्ति

आकाशादि पाचाच्या सत्वांशापासून अनुक्रमें कर्मेंद्रियें जाली । या आणि पांचहि भूतसात्विकांश समूहापासून अंतःकरण जाले । ते वृत्तिभेदे करून चतुर्धा जाले ॥ वियदादि पंचकाच्या रजोंशापासून अनुक्रमें कर्मेंद्रियें जाली । या पांच रजोंशासमुदायापासून प्राण जाला ॥ तो वृत्तिभेदेंकरून पंचधा जाला ॥ पंच उपप्राणहि प्राणादिकाचे अंतर्भुत आहेत ॥ हे समष्टिव्यष्टयात्मक लिंगशरीर । याचा अभिमानी जो ईश्र्वर तो हिरण्यगर्भ । यास सूत्रात्मा प्राण दोनि नामे । एवं सूक्ष्म सृष्टि ॥ तमोगुणप्रधान अपंचीकृत भूतें दोनि भाग जाली । आला अर्धभाग सोडून शेषार्ध भागाचे पांच भाग होऊन आपला भाग ठेउन उरले च्यारि भागे चौ भूतामध्ये मिळाली तेव्हां पंचीकृत जाली यास स्थूळ महाभूते ऐसे नाम ॥ या स्थूळमहाभूतावरि ईश्र्वरेक्षण केले तेणें स्थूळसृष्टि जाली । ते ब्रह्मांड बोलिजे । त्यांत चौदा लोक निर्माण । आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ ॥ भूर्लोक भुवर्लोक महर्लोक जनलोक तपोलोक सत्यलोक हे सप्तक ऊर्ध्वलोक ॥ एवं चौदा लोक । त्या त्या लोकास उचित उद्भिज स्वदेज अंडज जारज हे चतुर्विध भूतग्रामे जाली । एवं स्थूलप्रपंच । याचा अभिमानी जो ईश्र्वर त्यास विराट बोलिजे ॥ यास वैश्र्वानर वैराज दोनि नामे । हे समाष्टिचे रूप ॥ आतां व्यष्टिस्वरूप । समष्टिचे मध्यें व्यष्टि अंतर्भूत । तरि जाणावया व्यक्त करणे लागले तरि जाग्रदावस्था स्थूळशरीरी जो आत्मा अभिमानी त्याचे नाम विश्र्व ॥ त्यासच व्यावहारिक चिदाभास दोनि नामे ॥ स्वप्नावस्था लिंगशरीरी जो आत्मा अभिमानी त्याचे नाम तैजस ॥ यासिच प्रतिभासिक स्वप्नकल्पित दोनि नामे ॥ सुषुप्तिअवस्था कारणशरीरी -अभिमानी जो आत्मा त्याचे नाव प्राज्ञ ॥ त्सासिच परमार्थिक अवच्छिन्न दोनि नामे ॥ हे व्यष्टिस्वरूप ॥ एवं स्थूळ -प्रपंच -उत्पत्तिकाळीं रजोगुणें ब्रह्मा । स्थितिकाळी सत्वगुणें विष्णु । प्रळयकाळि तमोगुणें रुद्र जाला ॥ विराटी ब्रह्मा ॥ हिरण्यगर्भि विष्णु ॥ कारणि रुद्र या तिहि तिनि देव अन्तर्भूत जाले हे सर्वहि अध्यारोप ॥ आता अपवादरूप कैसे । म्हणता तरि । घटशरावादि मृदू व्यतिरिक्त नाही । तंतुवाचुनि पष्टु कटकमुकुटादि अयःपिंडावाचुन शस्त्रादि नाहीत । तैसा आत्मा जाला प्रपंच तो आत्मव्यतिरिक्त नाही ॥ ती प्रकारे चतुर्विध भूतग्रामसहित चवदा भुवनें ते ब्रह्मांड पंचीकृत भूताव्यतिरिक्त नाहीं ॥ ते पंचीकृत भूते समष्टिव्यष्टयात्म्क लिंगशरीर अपंचीकृत भूताव्यति रिक्त नाहीत ॥

अपंचीकृत पंचमहाभूतप्रकार

पृथ्वी जळि जळ तेजी वायवी वायु आकाशी भिन्न नाही हे अपंचीकृत पंचमहाभूतें गुणमयी मायेसी भिन्न नाहीत ॥

ते मायेचे स्वरूप कैसे ॥ ते संत ना असंत ना सदंसंत ॥ भिन्न ना अभिन्न ना भिन्नाभिन्न ॥ निरवयव ना सावयव ना उभयात्मक ॥ ते कैसी ॥ काळत्रयाचे ठाई नाही म्हणोन संत नव्हे । मी अज्ञ आहे ऐसा अनुभव आहे म्हणोन असंत नव्हे । विरुध्द म्हणोनि सदसंत नव्हे । स्वसत्ता नाहि म्हणोनि भिन्न नव्हे । अचेतन म्हणोन अभिन्न नव्हे । विरूद्ध म्हणोनि भिन्नाभिन्न नव्हे । जग परिणामले म्हणोनि निरवयव नव्हे । अकारणत्वें सावययव नव्हे । विरुद्ध म्हणोनि उभयात्मक नव्हे ॥

एवं अनिर्वचनी माया ॥ अनिर्वचनीय नामे मिथ्यास्वरूप ॥ श्रुतिः —— या मा सा माया न विद्यते सा अविद्या ॥

तऱ्हि चिन्मात्रव्यतिरिक्त वस्त्वंतर नाही । तें चिन्मात्रस्वरूप जानि होणे तोचि मुक्त हा वेदांत सिद्धांत ॥

स्थूळ सूक्ष्मादि देहानामात्मन्यारोप एव च ।

स्थूळ सूक्ष्मादि देहानामात्मन्यारोप एव च ।

अपवाद स्ततोप्येषां सम्यगत्र प्रदर्शितः ॥

॥ इति प्रथम वर्णकं समाप्तम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP