विवेकसार - दशम वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


॥श्रीगणेशायनमः॥

किंरूपाः पंचकोशाः स्युः का वा तद् व्यतिरिक्ता ।

आत्मानश्र्चेति तर्त्स्व सदृष्टांतं विचार्य ते ॥१॥

आत्म्यास पंचकोशव्यतिरिक्तत्व जे ते कैसे म्हणून विचाकरितो ॥ पंचकोश जे त्याते न जाणून आत्म्यास पंचकोशव्यातिरिक्तत्व घडेना म्हणून आधी पंचकोश जे त्याते निरूपितो ॥ ते कैसे म्हणाल तरी ॥ अन्नमयकोश म्हणून मनोमयकोश म्हणून विज्ञानमयकोश म्हणून आनंदमयकोश म्हणून ॥ पांचकोश ॥ यामध्ये अन्नमयकोश कोणता म्हणाल तरी ॥ अन्नजन्य होत्साता स्तंभासारिखा स्थूळ होत्साता करचरणाद्यवएवाकार होत्साता षड्भावविकारवंतहोत्साता षट्कोशात्मक होत्साता भासते जे स्थूळशरीर तो अन्नमयकोश ॥ प्राणमयकोश कोणता म्हणाल तरि दाहा अवयवासी मिळुन आहे तो प्राणमयकोश ॥ दाहा अवयव कोणते म्हणाल तरी कर्मेंद्रिये जे तेही पांच पांच प्राणही मिळुन दाहा अवयव ॥ मनोमयकोश कोणता म्हणाल तरि मन जे ते ज्ञानेंद्रिये जे ते ॥ मिळुन सा अवयवाचा मनोमयकोश ॥ विज्ञानमयकोश कोणता म्हणाल तरि बुद्धि आणि ज्ञानेंद्रिये जे तेही मिळुन सा अवयवाचा विज्ञानमयकोश ॥ आनंदमय कोश कोणता म्हणाल तरि प्रिय प्रमोदादि वृत्तिसि मिळुन आहे जो अज्ञान तो आनंदमयकोश ते प्रियमोद प्रमोदादिक म्हणिजे कोणते म्हणाल तरि इष्टवस्तु पाहिल्याचेमात्रेकरून येणार जो संतोष त्यास प्रिय म्हणोन नाम ॥ ते वस्तु प्राप्त जाल्यानंतर येणार जो संतोष त्यास मोद म्हणावे ॥ ते वस्तु अनुभविल्यानंतर येणारे जो संतोष त्यास प्रमोद म्हणुन नाम ॥ हा आनंदमयकोश यास कोश म्हणुन नाम किंन्निमित्य आले म्हणुन म्हणाल तरि कोशासारिखे आत्मा जो त्याते न जाणणें ऐसे केले म्हणून कोश म्हणुन नाम आले ॥ ते कैसे म्हणाल तरि दिळे जे ते तेणे जैसे तरवार जे तीते जैसे झाकले ॥ गवसणीने तुंबुरियास जैसे झाकिले ॥ कोसळल्याने किड्यास जैसे झाकिले ॥ टकोराने चिंचेस जैसे झाकिले ॥ झग्याने पुरुषास जेसे झांकिले ॥ तैसेच पंचकोश जे तेही आत्म्यास झाकिले म्हणून यास कोश म्हणुन नाम आले ॥ नव्हेहो दृष्टांताचेठाई दळै आणि तरवार गवसणी आणि तंबुरा कोसळा आणि किडा टकोर आणि चिंच झगा आणि पुरुष समानसत्ताकहोत्साती आहेत ॥ येकाते उपजीवून येक नाहीत म्हणून ते दळोआदिकरून पदार्थ जे ते त्या खड्गादिपदार्थाते झांकावया समर्थ होयतच ॥ दाष्टाताचेठाई तरि समानसत्ताक नव्हेत म्हणुन आत्मसत्तेते उपजीउन भासाव्याचे पंचकोश जे ते आत्म्यास झाकाव्यासाठी कैसे समर्थ होत आहेत म्हणाल तरि समर्थ होत आहेतच ॥ ते कैसे समर्थ होताहेत म्हणाल तरि आदित्याचे किरण परिणामविशेष मेघ जे ते त्या आदित्याच्या सत्तेते उपजउन भासत असताही त्या आदित्याते जैसे झााकिताहेत ॥ आणि अग्निच्या सत्तेते उपजीउन भासाव्याचा जो धूम त्या अग्निस जैसा झाकितो तैसे आत्मसत्तेते उपजीवउन भासायाचे जे पंचकोश तेही आत्म्याते झाकलीतच ॥ याप्रकारे पंचकोशांही आत्म्यास झाकिले म्हणुन यास कोश म्हणुन नाम आले ॥ तरि आत्म्यास पंचकोशव्यतिरिक्तव्य कैसे म्हणाल तरि दृष्टांताचे ठाई बोलिले जे दळे तरवार आदिकरून येक ऐसे व्यवहार करीत असताही ते तर वारादिक जैसे त्यादळादिकाहुन भिन्न आहेत तैसा आत्माही या पंचकोशास येक होऊन व्यवहार करीत असताही आत्मा पंचकोशाहुन काळत्रयाचेठाई व्यतिरिक्त होउन असणे ॥ हेच आत्म्यास पंचकोशाहुन व्यतिरिक्तत्व ॥ मिळुन आहे जो आत्मा त्यास का व्यतिरिक्तत्व बोलिलेत ॥ आत्म्यास पंचकोशास मिळणे आहे काय म्हणाल तरी आहे ॥ ते मिळणे काशाकडुन घडले म्हणाल तरी अन्योन्याध्यासेकरून घडले अन्योन्याध्यास कोणता म्हणाल तरि या वस्तुचे धर्म त्या वस्तुचेठाई आणि त्या वस्तुचे धर्म या वस्तुचेठाई भासणें अन्योन्याध्यास ॥ या पंचकोशास आणि आत्म्यास अन्योन्याध्यास आहे काय म्हणाल तरी आहे ॥ तो कैसा म्हणाल तरि अन्नमयकोशासी आत्म्यासी अन्योन्याध्यास आलें लक्षण सांगतो ॥ मी मनुष्य मी स्त्री मी पुरुष मी जन्मलो आहे मी वाढलो मी इतका लांब जालो मी वृद्ध मी नाशाते पावतो मी ब्राह्मणक्षत्रीयवैश्यशूद्र मी ब्रह्मच्यारी गृहस्थावानप्रस्थ सन्यासी मी तैलंगमहाराष्ट्र मी खानदेशीचा मी वऱ्हाडदेशिचा ॥ मी भारद्वाजगोत्री काश्यपगोत्री मी विश्र्वनाथभट्ट मी रघुनाथभट्ट मी काळा गोरा मी पुष्ट मी रोड मी पातळ मी ठेंगणा मी लांग मी शैव मी भागवत हे आदिकरून अन्नमयकोशनिष्ठधर्म अवघे आत्म्याचेठाइ भासताहेत म्हणुन आत्मधर्म सच्चिदानंद जे ते माझे स्थूळशरीर बरवे भासताहेत म्हणुन आत्मधर्म सच्चिदानंद जे ते माझे स्थूळशरीर बरवे भासताहे म्हणून अन्नमयकोशाचेठाई आत्मधर्म दिसतो याकरिता अन्नमयकोशासी आणि आत्म्यासी अन्योन्याध्यास घडला ॥ प्राणमयकोशासी आणि आत्म्यासी अन्योन्याध्यास कैसा म्हणाल तरी मी क्षुधावान् पिपासावान् मी शक्तिवंत मी वीर्यवंत मी क्रियावान ॥ मी वक्ता मी दाता गंता विसृजैता आनंदैता मी मुका विहस्त पंगु षंढक हे आदिकरून प्राणमयकोशानिष्ठधर्म जे ते आत्मनिष्ठ होऊन दिसताहेत ॥ आत्मधर्म जे सच्चिदानंद माझा प्राण बरा दिसताहें म्हणुन प्राणमयकोशनिष्ठ दिसतो याकरिता प्राणमयकोशासी आत्म्यासी अन्योन्याध्यास घडला ॥ मनोमयकोशासी आत्म्यासी अन्योन्याध्यास कैसा म्हणाल तरि संकल्पवान् मी विकल्पवान् मी शोकी मोही कामी क्रोधी द्वेषी मी इच्छावान् मी श्रोता स्पृष्टा द्रष्टा रसइता घ्राता मी बधीर कुष्ठी अंध अजिव्ह विगतनाशिक हे आदि करून मनोमयकोशनिष्टधर्म आत्म्याचेठाई दिसताहेत ॥ याकरिता आणि आत्मधर्म सच्चिदानंद जे ते माझे मन बरे दिसताहे म्हणुन मनोमयकोशानिष्ट होऊन दिसताहे याकरिता मनोमयकोशासी आत्म्यासी अन्योन्याध्यास घडला ॥ विज्ञानमायकोशासि आत्म्यासी अन्योन्याध्यास कैसा म्हणाल तरी ॥ मी कर्ता निश्र्चयवान् बुद्धिमंत उहापोहाचेठाईं चतुर मी येक संथाग्राही मी श्रोत्रिय विरक्त पंडित लोकांतरासजाणनार हे आदिकरून विज्ञानमयकोशधर्म जे ते आत्मनिष्ठ हे दिसतात ॥ आत्मनिष्ठ सच्चिदानंद जे ते माझी बुद्धि बरी दिसताहे ऐसे विज्ञानमयकोशनिष्ठ दिसताहेत याकरिता विज्ञानमय कोशास आत्म्यास अन्योन्याध्यास घडला आहे ॥ आनंदमयकोशासी आत्म्यासि अन्योन्याध्यास कैसा म्हणाल तरि मी भोक्ता संतुष्ट सुखी मी सात्विक राजस तामस मी जड अनृत अज्ञ मूढ असंतुष्ट मी षठ मोहित अविवेकी भ्रांत हे आदि करून अज्ञानधर्म आत्म्याचेठाई आत्मधर्म सच्चिदानंद जे ते माझे अज्ञान बरे दिसताहे म्हणून आनंदमय कोशनिष्ठ दिसतो याकरिता आनंदमयकोशासी आत्म्यासि अन्योन्याध्यास आहे ॥ याप्रकारे पंच कोशासी मिळणे जाले ॥ म्हणून पंचकोशाहुन आत्म्यास वेगळे करून जाणावे लागले ॥ आत्म्यास वेगळे करून जाणाव्याचा प्रकार कैसा ॥ दृष्टांतपूर्वक निरूपितो ॥ कैसा म्हणाल तरी माझी गाय माझे वासरु माझा पुत्र माझी लेकि माझी स्त्री म्हणुन आपल्या संबंधेकरून भासावयाचे पश्र्वादिक आपण जैसा नव्हे तैसेच दार्ष्टांतीं माझे शरीर माझा प्राण माझे मन माझी बुद्धी माझे अज्ञान ऐसे आपल्या संबंधेकरून भासाव्याचे जे पंचकोश आपण नव्हे पंचकोशाहुन व्यतिरीक्त म्हणुन जाणूये दृष्टांताचेठाई गाय पुष्ट आहे वासरु तापातें पावताहें पुत्र सांगितल्यागोष्टीसारिखे ऐकेना लेंकि केवळ मूर्ख आहे सिक्षा केलिया रागास येउन सोजारियाचे घरास जात आहे स्त्री माझी धन माझे लेकरू माझे म्हणून कोणासही धन देऊ नको आपणासहित येकही कार्य करू देत नाही ॥ सांगितली गोष्टि ऐकत नाही याप्रारे पश्र्वादिनिष्ट विकार अवघे पश्र्वादिकाच्या धण्यास जैसे स्पर्श करू सकत नाहीत ॥ तैसे अन्नमयकोशनिष्टमनुष्यत्वादि विकार प्राणमयकोशनिष्ठ क्षुप्तिपासादिक ॥ मनोमयकोशनिष्ट संकल्पादिक ॥ विज्ञानमयकोशनिष्टकर्तृत्वादिक ॥ आनंदमयकोशनिष्ठभोक्तृत्वादिक कोशाहून व्यतिरिक्त साक्षी जो आपण ॥ आपणास स्पर्श करू सकत नाहीत ॥ याप्रकारे करून जाणावयाचे पंचकोशव्यतिरिक्तत्वज्ञान ॥ नव्हेहो दृष्टांचेठाईं पश्र्वादिक आपणासी न मिळुन आपणाहुन बाह्य आहेत याकरिता त्या पश्र्वादिकाहुन आपणास व्यतिरिक्तत्व ज्ञान येऊये ॥ दार्ष्टांतिकाचेठाईं तरि पंचकोश आपणासी मिळुन आहेत याकरिता पंचकोशाहुन आपणास व्यतिरिक्तत्व कैसे घडेल म्हणाल तरी दृष्टांतपूर्वक निरूपितो ॥ अध्ययन काळाचे ठाईं अध्ययन करणार जो पुरुष त्याकरून उच्चारिताहेत जे शब्द ॥ हा शब्द याचा हा शब्द याचा म्हणून हाताने वेगळे करिता नये तऱ्ही विवेकयुक्त श्रोत्रेंद्रियजन्य बुद्धि जे तीकरून हा शब्द याचा हा शब्द याचा म्हणुन प्रत्येककरून जैसे जाणतो ॥ आणि उदकाचेठाईं मिळाले आहे जे उष्णत्व ते हातेकरून वेगळे करिता नये तरी त्वगेंद्रियद्वारा निर्गळीतजाली जे विवेकयुक्तबुद्धि तीनेकरून जळास उष्णत्वास वेगळेकरून जैसे जाणतो ॥ आणि भिंतीचेठाई चित्र यामध्यें निळपतीतादिक वर्ण हातेकरून वेगळे करिता नयेत तरि ही चक्षुकरून पाहून विवेकयुक्तबुद्धि जे तीनेकरून हे भिंति हे निळपीतादिक चित्र म्हणुन जैसे जाणावे वेगळे करून ॥ आणि उदकामध्ये जे मिळाले तिखटखारटगोडपण हे अवघे ऐसे हातेकरून वेगळे करिता नये तरी ही रसनेकरून हे खारट गोड ऐसें वेगळेकरून जैसें जाणतो ॥ आणि वस्त्राते आश्रायुन गंध विशेष आहेत जे ते हाताने वेगळे करिता नये तरी आघ्राणून मग विवेकयुक्तबुद्धीकरून हे सुगंध हे दुर्गंध म्हणून गंधविशेष जे ते वेगळे करून जैसा जाणतो तैसे पंचकोशासी मिळाला जो आत्मा याते हाते करून वेगळे करिता नये तरिही विवेकबुद्धीकरून पंचकोशाचे स्वरूप ऐसे आहे आत्म्माचे स्वरूप ऐसें आहे ॥ पंचकोशासि आत्म्यासि काळत्रइं संबंध नाही म्हणून वेगळेकरून जाणूये ॥ येथपर्यंत व्यवहारकाळाचेठाइं पंचकोश वेगळे येक आहेत ॥ आत्म्याहुन येक वेगळा आहे ऐसे अंगिकारकरून आत्म्यासी पंचकोशासी वेगळालीक सांगितली वस्तुतः विचारुन पाहता रज्वादिकाचेठाई आरोपित जे सर्पादिक त्या रज्वादिव्यतिरिक्त नाहीत तैसे आत्म्याचेठाईं आरोपित पंचकोशाहि आत्माव्यतिरिक्त नाहीत ॥ नव्हेहो रज्वादिक ज्ञान जे ते जाल्यानंतर सर्पदिप्रतीतिही सर्पांदिव्यवहाराही जैसा नाही तैसे पंचकोशाहुन आत्माव्यतिरिक्त म्हणुन जाटिल्यानंतर पंचकोशाची प्रतीतिही पंचकोशाचा व्यवहारही नासिला पाहिजे तैसे तरी नाही म्हणुन आरोपित जे पंचकोश त्याते ही अधिष्ठानभूत आत्मा त्याहून वेगळा नाही म्हणून बुद्धिचे ठाई कैसे आरूढ होईल ॥ आरूढ होउये कैसे म्हणाल तरि मृदादिकाचेठाई आरोपीत घटादिक जे ते मृदादिव्यतिरिक्त होत्साते नाहीत म्हणुन जाटिले तरीही ॥ घटादिक भासत होत्साते व्यवहारास जैसे येत आहेत तैसे आत्म्याचेठाईं आरोपिले जे पंचकोश जे तेही अधिष्ठानभूत ऐसा जो आत्मा त्याव्यातिरिक्त नाहीत म्हण्ाुन जाटिले जरी पंचकोश जे याची प्रतिती व्यवहारही येउये ॥ दृष्टांताचियेठाइ घटादिक भासत होत्साते व्यवहारास आले जरी सूक्ष्मबुद्धि ज्यासि आहे त्सास मृदादिव्यतिरिक्त होत्साते घटादिक नाहीत म्हणुन बुद्धीचेठाई जैसा निश्र्चय होऊन येतो ॥ तैसे दर्ष्टांतिसूक्ष्मबुद्धि ज्यास आहे त्यास पंचकोश जे तेही भासत होत्साते व्यवहारास आले जरी सूक्ष्मबुद्धि ज्यास आहे त्यास पंचकोश जे तेही आत्माव्यतिरिक्त होत्साते नाहीत म्हणून बुद्धिचेठाइंही निश्र्चय होऊये ॥ याप्रकारे जाणने जे ते पंचकोशाव्यतिरिक्तत्वज्ञान या विचारास फळ काय म्हणाल तरि ॥ अवस्थात्रयाचेठाइंही आत्मा अनुस्यूत आहे ॥ पंचकोश जे ते अवस्थात्रयाचेठाइही अनस्युत होत्साते नाहीत ॥ व्यावृत्त होत्साते पंचकोश जे ते भासत होत्साते व्यवहारास आले जरी पंचकोश जे ते आत्मव्यतिरिक्त होत्साते नाहीत म्हणुन जाणणे तेच या विचारास फळ याप्रकारे पंचकोश जे ते त्याते आत्मा जो त्याते भिन्न म्हणून विचारकरून पंचकोश जे ते भासले जरिही आत्मव्यतिरिक्तत्वेकरून नाहीत म्हणून जो पाहातो तो कृतार्थ तोच विद्वांस तोच जीवन्मुक्त म्हणून सकळशास्त्रीं सिद्धांत याअर्थि संशय नाहीसिद्ध ॥

॥शुक्लशोणितसंभूतो देहोन्नमयउच्यते ॥

प्राणादिपंचक प्राणमयः कर्मेन्द्रियैर्युतम् ॥१॥

ज्ञानेंन्द्रियैर्मनोयुक्त मनोमय इतीरितम् ।

बुद्धिज्ञानेन्द्रियैर्युक्ता विज्ञानमयशब्दभाक् ॥२॥

प्रियादियुक्तमज्ञानमानन्दमयमुच्यते ।

एतेभ्यो व्यतिरिक्तोयमात्मा सर्वातरत्वतः ॥३॥

कौशाश्र्चै ते ह्मनात्मानो ममता विषयत्वतः ।

धेनु तद्वत्स पुत्र स्त्री कन्यादय इवनिशम् ॥४॥

मृदारोपितकुंभाद्या भाता अपि न तप्तपृथक् ।

आत्मन्यारोपिताः कोशाभाता अपि पृथक्नहि ॥५॥

एवं कोशादिरिक्तत्वमात्मनो यो विविच्यते ।

स संसारीव भातोपि परंब्रह्मैव नान्यथा ॥६॥

इति श्री मननग्रंथे वेदान्तसारे पंचकोशाविवरणं नाम दशमवर्णकं समाप्तम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP