विवेकसार - द्वितीय वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


साधन चतुष्टय प्रकरण

॥ श्री गुरुभ्यो नमः ॥

श्र्लो ॥ यः स्यात्साधनसंपन्नः ईश्र्वरस्य प्रसादतः ॥

यज्ञादि कर्म करणात्सोऽधिकारी निरूप्यते ॥१॥

टीका ॥ वेदांत विचाराचे ठाइं साधनचतुष्टसंपन्न तोचि ज्ञानास अधिकारी म्हणोनि बोलिले ॥ बृहस्पतिसवन इष्टीस ब्राह्मणवर्ण्च अधिकारी ॥ राजसूय यज्ञास जैसा क्षेत्रीय

अधिकारी वैश्यस्तोम यज्ञास जैसे वैश्यच अधिकारी ॥ तेसा वेदांत विद्येस चतुष्टयसाधनसंपन्न अधिकारी ॥ चतुष्टयसाधन कैसे ॥ तरि नित्यानित्यवस्तुविवेक ॥ इहामुत्रार्थ फलभोगविराग ॥ शमादिष्ट्कसंपत्ति ॥ मुमुक्षुत्व ॥ हे चतुष्टय ॥ नित्यानित्यवस्तुविवेक म्हणिजे परब्रह्म जे तेच नित्य येर सर्वही अनित्य ऐसें श्रुतिस्मृतिगुरुमुखें जाणावें ॥ इहामुत्रार्थफलभोग . विराग म्हणिजे कर्मजन्य अनित्य विषयसुख स्वर्गसंसार वमनपुरीषाचे परि इच्छा नसणे ॥ शमादिषट्क शम दम उपरति तितिक्षा समाधान श्रद्धा ऐसें षट्क ॥ शम म्हणिजे शब्दादिविषयासक्तित्यक्त करून अध्यात्मशास्त्रश्रवण करणें ॥ दम म्हणिजे इंद्रियाचे व्यापार नियम आत्मपरायण बुद्धिप्रवर्तणें ॥ उपरति म्हणिजे वर्णाश्रमधर्म फलविध्युक्त करून सोडणें ॥ हाच संन्यास ॥ तितिक्षा म्हणे प्रारब्धास्तव जे सुखदुःखें आली त्यांची अनुभवें निवृत्ति करणें ॥ समाधान म्हणिजे विषयवासना निवृत्त होऊन राहणें ॥ श्रद्ध म्हणिजे सकळही सत्कर्में आणि उपासनाविश्र्वास होता तो सद्गुरुचे ठाई ठेवणें । मुमुक्षुत्व म्हणिजे तापत्रयाग्निकरूनतापला होत्साता नर येथून सोडविता सदगुरुचि तदनुकूळ साधने संपादणे हे मोक्षेच्छा ॥ एवं चतुष्टयसाधनाव्यतिरिक्त ज्ञानाधिकारी नाही ॥ आणि शूद्रवर्ण यागादिव्रतबंधास अनधिकारी तैसा साधनचतुष्टयें अयुक्त त्यासि तत्वोपदेश अनुपयोगी ॥ हें चतुष्टय सद्गुरुमुखें आधी संपादिजे तरी येक नित्यनित्य विवेकेच आत्मसिद्धि होईल ऐसे म्हणतां शास्त्रज्ञ पंडीत त्यास नित्यनित्यवस्तुविवेक असतां विषयासक्त होऊन काम्यकर्मच अनुष्ठिताहेत तेणें आत्मसाधन नव्हे तस्मात् इहामुत्रफलभोगविराग अपेक्षित ॥ तरि दोसाधनेचि आत्मसिद्धि म्हणतां ऋषितपस्वी नित्यानित्यवस्तुविवेक इहामुत्रफलभोगविरागसंपन्न असतां क्रोधसंतापयुक्त असताति यास्तव शमादिषट्क अपेक्षित ॥ तरी ति साधनेचि आत्मसिद्धि होईल म्हणता कबरीभार कृष्णाजिन इत्यादि चिन्हे संपादून संसृतिविरक्त प्रतिग्रहरहित होऊन असतां वेदांतश्रवणाचे ठाईं अनासिक्त तेहि निश्र्चये अनधिकारी ॥ म्हणोनि मुमुक्षुत्व अपेक्षित ॥ मुमुक्षासह साधनचतुष्ट अगत्य पाहिजेत । चतुष्टयसाधनसंपन्न तो वेदांतवचिरी अधिकारी । हे तरी केवळ मनोव्यापाररूप असे । कायिक वाचिक इंद्रियव्यापाररूप नव्हेत । विषयई दोषदृष्टि जालिया चतुष्टय सुलभ ॥ यासि संमति ।

यावदन्यं न संत्यक्तं तावत्सामान्यमेवहि ॥

वस्तु नासाद्यते लोके स्वात्मलाभे तु का कथा ॥१॥

सहेतुसफलं कर्मांनर्थंमूलमशेषतः ॥

त्यजतैवाहि तत् ज्ञेयं त्सक्तुः प्रत्यक् परं पदम् ॥२॥

॥ इति द्वितीयवर्णकं समाप्तम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP