विवेकसार - चतुर्थ वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


दुःख आगन्तुक प्रकरण

श्री राघव

श्र्लोक ——जने यद्दुःखमसत्येतत्किं स्वरूपमुतान्यतः ॥

सम्यगागन्तुकं वेति चिन्त्यते भाषया मया ॥१॥

प्राण्यास दुःख जें तें स्वाभाविक किंवा अगांतुक ऐसे म्हणाल तरि अगांतुक म्हणोनि बोलावे ॥ नाहीं स्वाभाविक म्हणून बोलू तरी तैसे बोलता नये ॥ का म्हणाल तरि स्वाभाविक म्हणून बोलल्यानें दुःखनिवृत्तिकारणें कोणीही यत्न तरी करिताहेत कीं म्हणून दुःख स्वाभावीक म्हणून बोलता नये ॥ आगांतुकच बोलावे ॥ दुःख जे ते स्वाभाविकही हो दुःखनिवृत्तिकारणें यत्नही करोत ऐसे म्हणाल तरि म्हणता नये ॥ स्वाभाविक म्हणजे स्वरूप झाले ॥ स्वाभाविक दुःखाचा नाश करितां स्वरूपनाश होतो ॥जाले तरी हो ॥ म्हणाल तरि निवृत्त दुःख होत्साता कोणीही नाहींसा होईल याकरितां दुःख स्वभाविक म्हणून बोलता नये ॥ दुःख स्वाभाविक जालें तरि जाऊ नये काय म्हणाल तरी जायेना ॥ ते कैसे म्हणाल तरी दृष्टांतपूर्वक निरोपितो ॥ तो दृष्टांत कोणता म्हणाल तरि निंबास कडूपण स्वाभाविक ते कडुपण जाऊन निंब राहावयाचें कोठें देखिलें नाहीं कीं ॥ तैसेंच आत्म्यास दुःख स्वाभाविक जाल्यानें जाऊ सकेना ॥ म्हणून आत्म्यास दुःख स्वाभाविक म्हणून बोलतां नये ॥ अगांतुक च म्हणून बोलावे ॥ दुःख स्वाभाविक हो त्याचि निवृत्तिही होते ॥ कैसे म्हणाल तरी अग्नीस उष्णत्व स्वाभाविक कीं अस्वाभाविक जे उष्णत्व त्याची मणिमंत्रादिकेकरून निवृत्ति ही आणि शितलतेचा अर्विभाव देखिला आहे की ॥ आणिखी येक दृष्टांत उदकास शैत्यपण स्वाभाविक त्या शैत्यतेचि अग्निसंपर्केकरून निवृत्तिही आणि उष्णतेचा आविर्भाव देखिला ॥ त्यासारिखें आत्म्यास दुःख स्वभाविक होऊन स्वाभाविक दुःखाची उत्कृष्टकर्मोपासानेकरून निवृत्तिही आणि सुखाचा आविर्भावीही होईल ॥ ऐसे म्हणू जरी म्हणता नये त्या दुःखास तात्काळिक परिभव मात्र हाईल परंतु अत्यंतिक होईना ॥ ते कैसे म्हणाल तरी सांगू ॥ अग्न्यादिकाचे तात्काळिक परिभवाते पावले जे उष्णादिक त्यांचा काळांतरि अविर्भाव जैसा होतो तैसेच आत्म्यासही उत्कृष्टकर्मोपासनाफळरूप जे सुख त्याचा नाश होत असतां पुन्हा दुःखचा अविर्भाव होईल ॥ दुःखाची अत्यंतिकनिवृति होणार नाहीं ॥ इतकेच नव्हे ॥ ऐसें बोलल्यानें मोक्षास जन्यत्वही येईल ॥ येईल तरि येऊ द्या म्हणाल तरी ते कोण्हासही संमत होणार नाही इतकेच नव्हे ॥ आत्मा आनंद स्वरूप म्हणून बोलणार ज्या अनेक श्रुति स्मृति इतिहासपुराणें आगमाभियुक्तवचनें जे यासही व्यर्थता येईल ॥ इतकेच नव्हे सुषुप्तिअवस्थेचेठाईंही समाधिअवस्थेचेठाईही आत्मा तृष्णीभूतअवस्थेठाईही आत्मा आहे म्हणून आत्म्यास दुःख जरी स्वाभाविक जाले तरी त्याही काळी दिसावे ॥ दिसत तरि नाही ॥ आणि या तिही अवस्थेचे ठाईही प्राण्यास मी दुःखी होतो ऐसा अनुभवही नाहीं ॥ म्हणून आणि सुखरूप होतो म्हणून अनुभव आहे याकरितां आत्म्यास दुःख स्वाभाविक म्हणून अंगिकार करितां नये ॥ अंगिकार केल्यानें या सुखास व्यर्थता येईल याकरितां आत्म्यास दुःख स्वाभाविक म्हणून बोलता नये ॥ तरी काय म्हणून बोलावे म्हणाल तरी दुःख अगांतुकच म्हणावे ॥ ऐसे जरी जाले हे दुःख कोणनिमित्येंकरून आले म्हणाल तर शरीरपरिग्रहास्त्व आलें ॥म्हणून जेथे जेथे शरीरपरिग्रह आहे तेथे तेथे दुःख आहे ॥ म्हणून व्याप्तिग्रहण आहे ॥ ऐसे बोलुये काय ॥ राजे आदि करून याचे ठाई सुख दिसते म्हणून शरीरपरिग्रह जेथे जेथे आहे तेथे तेथे दुःख आहे म्हणून कैसे म्हणावे ऐसे म्हणाल तरि म्हणुये ॥ ते कैसे म्हणाल तरि राजे आदिकरून याचे ठाई दुःखानुभवच दिसतो ॥ दुःखानुभव कोणता म्हणाल तरि राज्यादिकास शरीरास रोग आलिया दुःख लेकरे नाहीत तरी दुःख लेकरे म्हटिले नाइकेत तरि दुःख पित्याचि गोष्ट ऐकणारे पुत्र मेलिया दुःख ॥ शत्रु बलवंत होऊन राज्य घेतले म्हणून दुःख ॥ याप्रकारें पुत्रापासून स्त्रियापासून धनापासून याप्रकारें अनेक दुःखें असताहेत ॥ दुःखे असतांही आह्मी सुखी ऐसे मोहास्तव मानिताहेत मोहेकरून दुःख सुखरूप दिसते काय म्हणाल तरि दिसते ॥ ते कैसे म्हणाल तरी मजूरदार प्रातःकाळापासून सायंकाळपावेतो कष्टी होत असतांही बारा रुके मजुरी त्यास येक रुका अधिक आलिया आपणास सुखी मानितो ॥ याप्रकारे लाकडाचे वोझे वाहणार हे आदिकरून आपणास कष्टाचि मजुरी मिळालिया सुख मानितो मजुरी न मिळालिया दुःख मानिताहेत ॥याप्रकारे राजे आदिकरून याचे ठाई दुःख जे ते सुखासारिखे दिसते ॥ ऐसे असतां राज्याचा आश्रय करू आहेत जे मंत्री आदिकरून यास दुःख आहे म्हणावे लागते काय ॥ ऐसे जरी जाले विवेकी जो त्यासही दुःख आहे काय म्हणाल तरी दुःख आहेच ॥ ते कैसे म्हणाल तरी विकेकी जो तो शरीरी किंवा अशरीरी ॥ अशरीरी जरी म्हणावे त्यास विवेकी म्हणणे हा व्यवहारच घडेना ॥ म्हणून विवेकी शरीरीच म्हणावा त्यासही दुःख आहेच ते कैसे म्हणाल तरी विवेकी यासही क्षुधापिपासाशीतोष्णादिकद्वंद्वदुःख उदरशूळादिकरून शरीरक्लेश ही व्याघ्रसर्पादिकापासून भयकंपादिक दिसतच आहेत म्हणून विवेकी जो त्यासही दुःख आहे ऐसे जरी जाले विवेकीयास अविवेकीयास भेद कोणता म्हणाल तर भेदही आहे ॥ तो कैसा म्हणाल तरि विवेकी जो पुरुष तो सर्वदुःखास अंतःकरण आश्रय म्हणून आपण अंतःकरणादिकाचा साक्षी आपणास दुःख नाही म्हणून पाहतो ॥ अविवेकी तरी हे दुःख अवघेही आपले ठाई आरोपुन आणि पुत्र जरी सा तरी आपण सुखी पुत्र जरी मेला तरी आपण मेला याप्रकारे अन्यनिष्ठ सुखदुःखही आपले ठाई आरोपुन तापाते पावतो ॥ याप्रकारे विवेकीयास अविवेकीयास भेद आहे ॥ ऐसे जरी जाहले देवासही दुःख आहे काय म्हणाल तरि दुःख आहे ॥ ते कैसे म्हणाल तरी शरीर आहे ॥ देवास शरीर आहे म्हणून काशावरून जाणावे ॥ ऐसे म्हणाल तरी शास्त्रावरून जाणिजेते ॥ तेच शास्त्रे त्यासही दुःख आहे म्हणून बोलताहेत ॥ ते कैसे म्हणाल तरी परस्परे युद्धेकरून परस्परे शापेकरून बळेकरून येकाचे ऐश्र्वर्य येकानें घेणें आणि परस्परे स्त्रियाचा अपहार करणे राक्षसाची पीडा आदिकरून दुःखे देवासही आहेत म्हणून श्रुति स्मृति पुराणे बोलताहेत याकरिता देवासही दुःखे आहेत ॥ देवासही दुःख आहे जरी तरी आम्हास उपायस्य कैसे होतील आणि अम्हासि अभीष्ट फळे कैसे देतील म्हणाल तरी देतीलच ॥ ते कैसे म्हणाल तरि ॥ राजे आदिकरून आपण दुःखी असताही एश्र्वर्यसंपन्न म्हणून आम्हास उपायस्य होत्साते इष्टफळे देताहेत तैसे देवही आपण दुःखी असतांही योगऐश्र्वर्यसंपन्न आहेत म्हणून आम्हास उपास्यही आणि इष्टफळे देताहेत ॥ ऐसे जरी जाले तरि देव आनंदस्वरूप म्हणून शास्त्रें बोलताहेत ॥ त्या शास्त्रास तारतम्य कोणते म्हणाल तरि सांगु ॥ विवेकी पुरुष जो शरीरसंयोगेकरून दुःखी आहे जऱ्ही ॥ ते दुःख अंतःकरणनिष्ठ जैसा पाहतो तैसेच उत्कृष्ट देवे जे तेही दुःखमात्र अंतःकरणनिष्ठच पाहाताहेत ॥ म्हणून देव आनंदस्वरूप ऐसे शास्त्रे बोलताहेत ॥ ऐसे जरी जाले देवास दुःख आहे म्हणून जे शास्त्र बोलताहेत त्या शास्त्रांचे तात्पर्य कोणते म्हणाल तरि जेथें जेथें शरीरपरिग्रह आहे तेथे तेथें दुःख आहे ॥ म्हणून हिरण्यगर्भशरीरपर्यंत दुःखाक्रांत आहे म्हणून ॥ सशरीरमुक्तिकारणे यत्न करू नये अशरीरमुक्तिकारणे यत्न करायाचे तात्पर्य ॥ ऐसे जरी जाहले सशरीरीमुक्तिसारिखी अशीरीमुक्ति येक असेल तरि अशीरीमुक्तिकारणे यत्न करावा ॥ शरीरमुक्ति सारिखी अशरीरमुक्ति येक दिसत नाही की ॥ तरी कैसे म्हणाल तरि सशरीरमुक्ति होत्साते नक्षात्रादिक जे ते प्रत्यक्षासारिखे दिसेल जैसे तैसे अशरीरमुक्तिही त्यासारिखे प्रत्यक्ष देखिले नाहीत ॥ म्हणूनही आणि कोणी योगेश्र्वर जे ते योगमहिमेकरून लोकांतरास जाऊन सशरीर मुक्तपुरुष जो त्याते पाहुन आले म्हणून शास्त्राचे ठाई बोलिल्यासारिखे अशरीरमुक्त जो त्याते पाहुन आले ऐसे शास्त्राचे ठाई नाही सांगितले ॥ याकरितां सशरीरमुक्त जो तो मी अनेक काळ सशरीर मुक्त होऊन आलो ऐसे शास्त्राचेठाई बोलिल्यासारिखे अशरीरमुक्त जो तो मी अशीरमुक्त होत्साता कित्त्येक काल राहुन मी आलो ऐसे शास्त्रीं बोलिले नाही ॥ म्हणून ही यावरून सशरीर मुक्ति आहे अशरीरमुक्ति नाही ॥ ऐसे दिसते म्हणाल तरि ऐसे बोलता नये ॥ ते कैसे म्हणाल तरि सुषुप्तिसुख जे ते अवघियासही जैसे प्रत्यक्ष दिसते तैसेच अशरीरमुक्तिही प्रत्यक्षच ॥ सुषुप्तिसुख प्रत्यक्ष जाले जरि मुक्तिसुख प्रत्यक्ष होईल काय म्हणाल तरि होईलच ॥ अद्वितीय सुखस्वरूप असणे जे ते सर्व सुषुप्तिचेठाईही सम आहे म्हणून सुषुप्ति व मुक्ति म्हणून बोलु म्हणाल तरि सुषुप्तिचेठाई अज्ञान पुनःव्युत्थानही नाही म्हणून सुषुप्तिच मुक्ति म्हणता नये म्हणून सुषुप्तिसुखासारिखे मुक्तसुख प्रत्यक्षच आहे याकरिता सशरीरमुक्तिहुन अशरीरमुक्ति ही प्रत्यक्षच ॥ योगी जो तो सशरीरमुक्तिते पाहुन येथे येऊन सांगणे त्यावरूनही आणि अशरीरमुक्त जो पुरुष मी अशरीरमुक्त होऊन आलो म्हणून बोलणे जे यावरूनही अशरीरमुक्त आहे म्हणून बोलिजे ते सशरीरमुक्ति हे म्हणाल तरि याविषयइ जे नक्षत्रादिक प्रमाण म्हणून बोलिजेले ते अवघेही स्वर्गलोक विषय होऊन अनित्य होऊन प्रत्यक्ष दिसते ॥ याकरिता ब्रह्मलोक आदिकरून विषय नाहीसे जाले म्हणुन नक्षत्रादिकास शरीरमुक्ति आहे म्हणून म्हणण्याविषयी प्रमाण नव्हेत ॥ शास्त्र मात्रच प्रमाण ॥ शास्त्रावाचून प्रमाणानंतर नाही अशरीरमुक्तिचेविषई तरि शास्त्र युक्ति अनुभव आहे म्हणून अशरीरमुक्ति कारणे यत्न करावा सशरीरमुक्ति कारणे यत्न करू नये ॥ यत्न केला जरि हे दुःख जायेना म्हणायचे विषयी शास्त्रयुक्तिही बोलिजेल ॥ आता अनुभव सांगु ॥ तो अनुभव कोणता म्हणाल तरि सुषुप्तिअस्थेचेठाई शरीरपरिग्रह नाही म्हणून दुःखही नाही जागृतस्वप्नाचे ठाई शरीरपरीग्रह आहे म्हणून दुःखही अनुभविजेत आहे ॥ याकरितां जेथे जेथे शरीरपरिग्रह आहे तेथे तेथे दुःख आहे म्हणूनच अन्वयव्यातिरेकव्याप्तीकरून सिद्ध आहे ॥ याप्रकारे आत्म्यास शरीरपरिग्रहेकरून दुःख येते म्हणून दुःख स्वाभाविक म्हणून ऐसे बोलता नये ॥ अगांतुकच म्हणून बोलावे ॥ऐसे जरी जाले हे शरीर काशा करून येते म्हणाल तरि कर्मास मिळाली ऐसी जे पंचीकृत पंचमहाभूते करून आले ऐसे दिसते ॥ ऐसे का बोलावे ॥ केवळ पंचीकृत पंचमहाभूते करून आले ऐसे दिसते ॥ ऐसे का बोलावे ॥ केवळ पंचीकृत करून शरीर येते म्हणून बोलु तरि तैसे बोलता नये ॥ सर्वत्र पंचीकृत पंचमहाभूते आहेत तेथे तेथे शरीर उत्पन्न जाले पाहिजे ॥ उत्पन्न होत नाही ॥ केवळ पंचीकृतपंचमहाभूतापासुन शरीर उत्पन्न होते ऐसे बोलता नये ॥ आणिखीही पंचमहाभूते शुक्लशोणिताकारे परिणामाते पावताहेत तेथे शरीर उत्पन्न होते म्हणून ॥ तरि नित्यही स्त्रीपुरुषयोगेकरून शुक्लशोणित उत्पन्न होते तेथेही शरीर उत्पन्न जाले पाहिजे ॥ ऐसे तरि होत नाही ॥ याकरिता तैसे बोलता नये ॥ ऐसे जरि स्त्रीपुरुषसंयोगेकरून शुक्लशोणित उत्पन्नच होत नाही म्हणून तरि प्रत्यक्ष दिसते म्हणून बोलता नये ॥ ऐसे जरि जाले शुक्लशोणितासंयोगच नाही म्हणून बोलु तरि स्त्रीपुरुषास रतीच घडेना याकरिता संयोग नाही म्हणून बोलता नये ॥ ऐसे तरि प्राणिवैचित्र्य जे ते नाहीसे जाले पाहिजे ॥ प्राणीवैचित्र्य आहे काय म्हणाल तरि येकसारिखे येक दिसत नाही म्हणून प्राणियास वैचित्र्य आहे ॥ ऐसे जरि हे प्राणीवैचित्र्य जे ते देशकाळादिकेकरून येते म्हणून बोलु तरि ॥ देशकाळ सर्वां प्राण्यास साधारण आहे याकरिता जगद्वैचित्र्य देशकाळादिकेकरून बोलता नये ॥ ते देशकाळादिक साधारण कारण ही होत तेणे करून जगद्वैचित्र्यताही येवो म्हणाल तरि ॥ साधारणकारण देशकाळादीक जे येहीकरून घटवैचित्र्य दिसत नाही ॥ याकरिता त्या देशकाळादिकेकरून जगद्वैचित्र्य बोलता नये ॥ तरि काशावरून घटादिवैचित्र्य होते म्हणाल तरि असाधारणकारण कुल्लाळाचे व्यापार वैचित्र जे तेणे करून घटादिवैचित्र्य दिसते ॥ याकरिता पंचीकृतभूते शुक्लशोणिताकारे परिणामाते पाउन साधारणकारण देशकाळादि त्याची अपेक्षा असताही असाधारणकारण येक कारणांतर त्याची अपेक्षा करून विचित्रशरीरद्याकारेकरून परिणामाते पावताहेत म्हणून बोलावे ॥ तें कारणांतर कोणते म्हणाल तरि कर्मच म्हणावे ॥ ऐसे जरि जाले कर्मास येव्हडे सामर्थ्य आहे म्हणून केवळ कर्मेच करून शरीर येईल म्हणून बोलू ॥ तरि कर्म जे ते निराश्रय होउन राहेना म्हणुनही त्रिक्षणावस्थायि आहे म्हणुनही केवळ कर्मे करून शरीर येते म्हणून बोलता नये ॥ तरि कैसे बोलावे म्हणाल तरि कर्मास मिळुन जे आहेत पंचीकृत पंचमहाभूते तेहीकरून शरीर जाले म्हणून बोलावे ॥ ऐसिया बोलण्यावरून दो कारणे करून शरीर उत्पन्न जाले ऐसे बोलिजेल ॥ ते दोनि कारणे कोणति म्हणाल तरि कर्म आणि पंचीकृतपंचमहाभूते या दोन्ही कारणामध्ये निमित्यकारण जे कर्म त्या कर्मवैचित्रेकरून शरीरवैचित्र्य होताहेत ॥ या अर्थाचेठाई दृष्टांत आहे काय म्हणाल तरि आहे ते कैसे म्हणाल तरि ॥ घट उत्पन्नेचे ठाई केवळ उपादानकारण जे मृत्तिका तीणेकरून जैसे कार्य उत्पन्न होत नाही ॥ केवल कुल्लाळव्यापार जे तेहीकरून घट उत्पन्न होत नाही ॥ कुल्लाळव्यापार जे ते मृतिकेच्या आश्रये कार्ये जैसी उत्पन्न करिताहेत ॥ मृत्तिका येकरूप असताही कुल्लाळव्यापारेकरून कार्यवैचित्र्य दिसताहेत ॥ तैसेच दार्ष्टांतिकाचेठाइही केवळ पंचमहाभूतेकरूनही शरीर उत्पन्न होत नाहीं केवळ कर्म करूनही उत्पन्न होत नाही कर्मास मिळाली ऐसी पंचीकृतपंचमहाभूते जे तेहीकरून शरीर उत्पन्न होताहेत ॥ दृष्टांताचेठाई उपादानकारण मृत्तिका असताही निमित्यकारण कुल्लाळव्यापार नसता घटादिक जैसे उत्पन्न होत नाहीत ॥ तैसे दार्ष्टांतिकाचेठाई उपादानकारण ईश्र्वरसृष्ट पंचमहाभूते आणि कार्यभौतिकप्रपंचहि स्थापित असताही अद्वितीय आत्मा मी ऐसे जे ज्ञान येणेकरून निमित्तकारण कर्म ज्याचे नाशाते पावते त्यास शरीरसंबंध नये ॥ हा अर्थ सिद्ध ॥ प्रचंप जो तो काळत्रइ नसताही दिसतो ॥ दिसताही नाहीच म्हणून ज्या पुरुषास निश्र्चय होताहे त्यास जन्म होणार नाहीत ॥ हें बंधमोक्ष अन्वयव्यतिरेकेकरून सिद्ध आहे ॥ अन्वयव्यतिरेक कोणता म्हणाल तरि कर्म आहे तरी शरीर आहे कर्म नाही तरी शरीर नाही याचे नाव अन्वयव्यतिरेक ॥ हा अनुभव कोठे आहे म्हणाल तरी जाग्रत्स्वप्राचेठाइ स्थूळसुक्ष्मभोगप्रद कर्म आहे म्हणुन शरीरपरिग्रह आहे ॥ सुषुप्तित कर्म नाही म्हणुन शरीर नाही ॥ याकरिता कर्म जरी आहे तरी शरीर आहे कर्म जरि नाही तरी शरीर नाही ॥ म्हणायाविषयी श्रुति युक्ति अनुभवच प्रमाण येणेकरून अर्थसिद्ध ॥ सशरीस्य दुःखित्वव्याप्तिरव्याहतायतः ॥ अतोशरीरमुक्त्यर्थं यत्नं कुर्यादतंद्रितः ॥१॥ नभूतपंचकेनापि कर्मणः केवलादपि ॥ उभाभ्यां मीलिताभ्यांच शरीरमुपजायते ॥२॥ तच्छरीरानवासिश्र्च ज्ञानादेवनचान्यतः ॥ अतः सर्वप्रयत्नेन ज्ञानाभ्यासरतोभवेत् ॥३॥

इति श्रीमननग्रंथे चतुर्थवर्णकं समाप्तं ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP