विवेकसार - षष्टम वर्णकम्

श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्रामेन्द्र यांचे शिष्य श्रीमद्वासुदेवेन्द्रस्वामी या सत्पुरूषांनी संस्कृत भाषेत " विवेकसार " गद्यग्रंथ रचला .


रागद्वेषादिविचारप्रकरण

॥श्रीः॥

॥श्रीगणेशायनमः॥

रागाद्यैः श्रद्धयायुक्तो बद्धोमुक्तो भवेन्नरः ॥

तद्रागादिः कतिविधः केन स्यादिति चिन्त्यते ॥१॥

ज्या रागद्वेषेकरून प्रेरिली होत्साती त्रिविधकरणे ही त्रिविधकर्मे करिताहेत ते रागद्वेष कित्या प्रकारिचे म्हणुन विचारितो ॥ राग म्हणुन द्वेष म्हणुन कामक्रोध आणि लोभ मोह मद मात्सर्य आणि तृष्णा असुया आणि दंभ दर्प आणि अहंकार इच्छा आणि भक्ति श्रद्धा या प्रकारे सोळा याचे भेद सांगु स्त्री विषयक जे चित्तवृत्ति तीचे नाम राग ॥ येकाने अपकार केलिया त्या अपकाराचि प्रतिक्रिया करावी म्हणुन ऐसी जे चित्तवृत्ति तिचे नाम द्वेष ॥ गृह आराम क्षेत्र धनधान्य हें संपादावें ऐसी जी चित्तवृत्ति तीचे नाम काम ॥ आपणे संपादिले जे पदार्थ त्यास कोणी विघ्न करितो त्याचे ठाई व्यग्ररूप जे चित्तवृत्ति इचे नाम क्रोध ॥ संपादिले जे पदार्थ ते कोणासही देउ नये म्हणुन जे चित्तवृत्ति तिचे नाव लोभ ॥ ऐश्र्वर्यमदेंकरून कृतकृत्य न कळोन राहवयाची जे चित्तवृत्ति तिचे नाम मोह ॥ अवघिया संपत्ती मज आहेत मी जे करीन तें होईल ऐसी जे चित्तवृत्ति तिचे नाम मद ॥ येखादा आपणापरीस अधिक कोणीं असिल्यां त्याचा उत्कर्ष न साहायाची जे चित्तिवृत्ति तिचें नाम मात्सर्य ॥ दुसरियास दुःख न येतां आम्हांस दुःख येउ ये काय म्हणुन याव्याचि जे चित्तवृत्ति इचे नाम ईर्षा ॥ आम्हास जैसें दुःख जालें तैसे दुसरियास होऊ नये काय ऐसी जे चित्तवृत्ति तीचे नाम असुया ॥ आपणे जो केला धर्म तो चौघाजणी ऐकुन भले म्हणावे ऐसी जे चित्तवृत्ति तीचे नाम दंभ ॥ आपण मोठा हे अवघे मजबरोबरिचे नव्हे ऐसी जे चित्तवृत्ति तीचे नाम दर्प ॥ अरे मज जाणत नाहीस काय मज तु सिक्षा करणार काय मी धरिले कार्य सोडणार नाही ऐसि जे चित्तवृत्ति तिचे नाम अहंकार ॥ अनिवार्य शौच्यादिक करावे म्हणुन येणार जे चित्तवृत्ति तीचे नाम इच्छा ॥ गुरुदेवतादि याचेठाई प्रीति तीचे नाम भक्ति ॥ गुरुवेदांतवाक्य यागादिकक्रियेचेठाई जो विश्र्वास त्याचे नाम श्रद्धा ॥ याप्रकारे रागद्वेषाचे स्वरूप ॥ या विचाराचे फळ काय म्हणाल तरि राग आदिकरून अहंकारपर्यंत तेराही यत्न केल्या वेगळेच येताहेत ॥ यास वश्य होऊन त्रिविधकरणेकरून कर्म केले जरी त्यास नर्कापासुन सुटका नाही श्रद्धा भक्तिरूप केलियाने कर्में करून सिघ्रच संसारबंधनापासुन मुक्त होईल . याकरिता इच्छा श्रध्दा भक्ति संपादावी इच्छेकरून करावयाच्या ज्या क्रिया क्षुत्पिपासानिवृत्ति मुत्रपुरिषविसर्जन न करि तरी तात्कालिकच बाध होइल केलियाने तात्काळिक साधकही होइल इतुकी करून स्वर्ग नर्क प्राप्तिही नाही ऐसे जाणावे ॥ हे रागद्वेषादिक सुषुप्तिअवस्थेचेठाई आणि तूष्णी भूतावस्थेचेठाइ समाध्यवस्थेचेठाइ नाहीत ॥ याकरितां कर्महि नाही ॥ जाग्रत्स्वप्राचेठाइ रागद्वेष आहेत म्हणून कर्मेंही आहेत ॥ याकरितां रागद्वेष आहे तरि कर्म आहे रागद्वेष नाही तरी कर्मनाही ऐसे अन्वयव्यतिरेकेकरून सिद्ध ॥ हे रागद्वेषादि काशाकरून येताहेत म्हटिले तरि अभिमाने करून येताहेत म्हणुन बोलावे ॥ समस्त जनासही अभिमानपूर्वक रागद्वेषादिकेकरून प्रवृत्ति होताहे काय म्हणाल तरि तत्पूर्वकच होताहे ॥ ते कैसे म्हणाल तरि स्त्री जनास मी स्त्री म्हणून अभिमान ज्या काळी येतो त्या काळी रागादिपूर्वक भर्तृशुश्रुषेचेठाई ग्रहकृत्याचेठाइ प्रवृत्ति दिसते ॥ तैसेच पुरुषासहि मी पुरुष ऐसा अभिमान जेव्हा येतो तेव्हा रागादिपूर्वक दारादिपरिग्रहाचेठाई धनधान्याचे आर्जनाचे ठाइ प्रवृत्ति दिसते तैसेच समस्त जनासही वर्णाद्यभिमानेकरून स्वस्वोचितव्यापाराचेठाइ रागादिपूर्वक पूर्वक प्रवृत्ति दिसते ॥ याकरिता रागादिकास अभिमानच कारण ॥ तरि या विचारास फळ काय म्हणाल तरी मुमुक्षु पुरुष जो तेणे त्यास सर्व वस्तूचे ठाइ रूढ अभिमान टाकावा ॥ टाकिल्याने दुःखापासुन मुक्त होईल ॥ याकरिता अभिमान जरी आहे तरि रागद्वेषादिक आहेत अभिमान जरि नाही तरि रागाद्वेषादिक नाहीत ॥ याचा अन्वयव्यतिरेक जाग्रत्स्वप्रसुषुप्तीचेठाइ पाहुन घेणे ऐसे जरि जाले हा अभिमान काशा करून येतो म्हणाल तरि अविवेकेकरून येतो ॥ तो कैसा म्हणाल तरि समस्त जन जे यास मि ब्राह्मण मि क्षत्रीय मि वैश्य मि शुद्र म्हणुन ब्राह्मणत्वाद्यभिमान येताहे कि ॥ हा अभिमान काशास अवलंबुन येतो हे म्हणायाचा विवेक कोणासही नाहि ॥ याकरितां हाच अविवेक ॥ ऐसे जरि जाले हा अभिमान काशास अवलंबुन येतो म्हणाल तरि शरीरास अवलंबुन येतो ॥ म्हणुन बोलूं म्हटिलें तरि ॥ शरीर तरि क्षेत्रियादिकासही साधारण आहे याकरिता त्यासही ब्राह्मण ऐसा अभिमान आला पाहिजे ॥ ऐसा तो येत नाहिकी ॥ म्हणून ब्राह्मणत्वादि अभिमान शरीरास अवलंबुन येतो म्हणुन बोलता नये ॥ नाही तरी शिखायज्ञोपवितास अवलंबुन ब्राह्मणत्वादि अभिमान येतो म्हणाल तरि व शिखायज्ञोपवितादि इतर कुळासही साधारण आहे त्यासही आम्ही ब्राह्मण म्हणुन अभिमान आला पाहिजे ॥ म्हणुन बोलता नये ॥ एकेका अवयवास ब्राह्मण त्वाद्यभिमान बोलुं म्हटिले तरि त्या त्या अवयवास वेगळी नामें आहेत म्हणुन आणि ते ते अवयव इतर कुळास साधारण आहेत म्हणुनही त्या त्या अवयवास ब्राह्मणत्वाद्यभिमान बोलतां नये ॥ ऐसे जरि जाले विशिष्ट मातृपितृकुलजनकत्वेकरून आले जे शरीर शिखायज्ञोपवितादिक अवयवास अवलंबुन ब्राह्मणत्वाद्यभिमान येतो म्हणुन बोलुं म्हटिले तरि ॥ विशिष्ट मातृपित्रादिकी सांडिलीं जे मळमुत्रादिकें त्यासही ब्राह्मणत्वादि व्यवहार यावा । तैसे दिसत नाहीं म्हणुन एकासहि ब्राह्मणत्वादि नियमेंकरून बोलतां नये ॥ ऐसे जरि जाले हा ब्राह्मणत्वादिव्यवहार कोणास बोलावा तरि शोभन म्हणुन उत्सव म्हणुन हाट म्हणुन अनेक वस्तु समुहास ते ते नामें जैसी येताहेत तैसें अनिर्वचनीय देहोंद्रियसंघातास व्यवहाराचे ठाइ ब्राह्मण म्हणुन नाम तैसेच क्षेत्रीय वैश्यशूद्र दिक्षित अवघानि गुर्जर महाराष्ट्र म्हणून इत्यादिक समस्त नामेही देहेंद्रियादिसंघातास विषयेंकरून येताहेत याकरिता देहेंद्रियसंघातासच नामें ॥ आत्यास कालत्रयाचेठाइहीं हे नाम नाहीत ॥ म्हणून जाणता राहणे जे हाच अविवेक ॥ या अविवेकेकरून अभिमान येत आहे या विचारास फळ काय म्हणाल तरि ॥ आत्म्यास काळत्रयाचेठाइही ब्राह्मणत्वादिक नाहीत ॥ देहेंद्रियादिकाचे संघातासच ब्राह्मणत्वादिक धर्म ऐसे जाणने ॥ या विचाराचे फल हा अविवेक काशाकरून आला म्हणाल तरि अज्ञानें करून येत आहे ॥ अज्ञान म्हणिजे काय म्हणाल तरि आपणास आपण न जाणुन राहणे हे अज्ञान ॥ आपणास आपण जाणत नाही काय म्हणाल तरि नाही जाणतच ॥ ते कैसे जाणत नाही म्हणाल तरि मी ब्राह्मण म्हणुन मी शूद्र या कुळि उत्पन्न जालो यागोत्रि जालो याप्रकारे हें जें शरीर तेंच मी म्हणुन जाणताहेत ॥ परंतु शरीरव्यतिरिक्त आत्मा मी ऐसे कोणहीही जाणत नाही ॥ शास्त्रज्ञ जे ते आपण शरीरव्यातिरिक्त म्हणून जाणत असता कोणीही नाही जाणत म्हणुन कैसे बोलावे म्हणाल तरि ॥ ते अवघेही मी कर्ता भोक्ता सुखी दुःखी लोकांतरास जाणार येणार जो जीव तो मी ऐसे जाणताहेत इतकेच ॥ परंतु मी अकर्त्ता अभोक्ता असंग असंसारी अद्वितीय वेदांतवेद्य ऐसा जो आत्मा तो मी ऐसे जाणत नाहीत ॥ ऐश्यास न जाणने जें हेंच अज्ञान ॥ या अज्ञानेंकरून तो अविवेक जो तो येताहे ॥ हे अज्ञान काशावरून येताहे म्हणाल तरि अनादि म्हणुन येकेकरून येते म्हणुन बोलता नये ॥ तरि या अज्ञानाचे स्वरूप काय म्हणाल तरि सांगु हे अज्ञान सत् म्हणुन बोलता नये ॥ असत् म्हणुन बोलु तरी मी अज्ञ म्हणुन अनुभविजे तें यास्तव आणि शशशृंगारसारिखे न दीसे सारिखे जाले नाही ॥ म्हणुन असत् म्हणता नये ॥ सदसत् म्हणुन बोलु म्हणाल तरि विरुद्ध म्हणुन ऐसे ही बोलता नये ॥ सावएव म्हणुन बोलूं तरि मूळ कारण नव्हेसें होईल ॥ मूळ कारण दिसतें म्हणुन सावएव म्हणतां नये ॥ निरवएव म्हणुन बोलू तरि जगदाकारें करून परिणामातें पावलें न पाहिजे ॥ परिणामाते पावते म्हणुन याकरिता निरवएव बोलता नये ॥ उभयात्मक बोलु म्हटल्याने तरि विरूध्द म्हणून उभयात्मक बोलता नये ॥ भिन्न म्हणून बोलु म्हटिले तरि अद्वितीयत्वास हाणि येइल ॥ आलि तरि येवो म्हणाल तरि आत्मा अद्वितीयत्वास हाणि येइल ॥ आलि तरि येवो म्हणाल तरि आत्मा अद्वितीय म्हणून बोलणार जे श्रुति त्यास व्यर्थता ये इल इतकेच नव्हे मायेस आत्मसत्तेव्यतिरिक्त सत्ता नाही याकरिता आत्म्याहुन भिन्न पदार्थ म्हणून बोलता नये ॥ अभिन्न म्हणून बोलू तरि आत्मशक्ति म्हणून बोलणार ज्या श्रुती त्सास व्यर्थता येइल इतकेच नव्हे मायेस चेतनत्वही यावे अचेतनत्व न यावे आत्म्यास चेतनाचेतनत्वही येउन पडेल ॥ माया म्हणुन न बोलता असावे आत्माच म्हणुन बोलावें आत्माच म्हणून बोलिजे ते म्हणाल तरि माया म्हणुन प्रकृति म्हणुन प्रधान म्हणुन अविद्या प्रलय महासुषुप्ति तम अज्ञान म्हणुन आत्मप्रतिपादव्यतिरिक्त जे शब्द तेणेकरून बोलिजेते ॥ याकरिता आत्मा म्हणून बोलता नये ॥ यास्तव मायेस अभिन्न म्हणून बोलता नये ॥ भिन्नभिन्न म्हणुन बोलु म्हटिले तरी विरूद्ध यास्तव भिन्नाभिन्न म्हणुन बोलता नये ॥तरि काय बोलावे अनिर्वचनिय म्हणून बोलावे ॥ अनिर्वचनीय ऐसे जे अज्ञान तेणेकरून अविवेक येत आहे ॥ अविवेकेकरून अभिमान येते ॥ अभिमानेकरून रागद्वेषादिक रागद्वेषेकरून कर्म येते ॥ कर्मास्तव शरीरपरिग्रह येतो ॥ शरीपरिग्रहेकरून दुःख येतसे ॥ या दुःखास अत्यंतनिवृत्ति केव्हा येइल म्हणाल तरि सर्वात्मना शरीरपरिग्रह नाहीसा होइल तरि दुःखनिवृत्ति होइल ॥ सर्वात्मनाशरीरपरिग्रह केव्हा नाहीसा होइल तरि सर्वात्मना कर्म नाहीसे होइल तेव्हा होइल ॥ हे कर्म केव्हा नाहीसे होइल म्हणाल तरि सर्वात्मना केव्हा जातिल म्हणाल तरी सर्वात्मना अभिमान जाइल तरी जातील ॥ हा अभिमान सर्वात्मना केव्हा जाइल म्हणाल तरि सर्वात्मना अविवेकनिवृत्ति होइल तरि जाइल ॥ हा अविवेक सर्वात्मना केव्हा जाइल म्हणाल तरि अद्वितीय ब्रह्मात्मैक्यज्ञानेकरून जाइल ॥ आणिखि काशाकरून जायेना काय म्हणाल तरि जायेना ॥ ते कैसे म्हणाल तरि कर्मेंकरून अज्ञानाची निवृत्ति होइल म्हणाल तरि कर्मास अज्ञानासही विरोध नाही म्हणून कर्मेरकरून अज्ञानाचि वृध्धीच करिल ॥ ते कैसे म्हणाल तरि अमावास्येचा अंधकारासी विरोधी नव्हे ऐसे जे मेघाचरण अंधाराची निवृत्ति न करून आंधारास निबिडत्व जैसे करिते तैसे कर्मही अज्ञानास वृघ्धि करिते ॥ परंतु निवृत्ति करू न शके तो अंधकार आपणास विरोधी सूर्यप्रकाश जो तेणेकरून निवृत्तिते पावतो तैसा अज्ञानविरोधी अद्वितीयब्रह्मात्मैक्य ज्ञानेकरून अज्ञानाचि निवृत्ति ॥ आणिखी काशाकरून निवृत्ति घडेना ॥ हे ज्ञान काशाकरून येते म्हणाल तरि आत्मानात्म विचारे करून येते ॥ आणिखी काशाकरून नये । कर्म उपासना योगेकरून ज्ञान न ये काय म्हणाल तरि ज्ञानवस्तुतंत्र याकरिता पुरुषतंत्र जे कर्म तेणेकरून अंतःकरणशुद्धिच येइल परंतु ज्ञान नये ॥ आणखीही ज्ञान प्रमाणजन्य म्हणुन मानसक्रियारूप जे उपासना तेणेंकरून चित्तयेकाग्रता होइल ॥ परंतु ज्ञान होइना ॥ योगही मानसक्रियारूप म्हणून अणिमाद्यैश्र्वर्यास संपादिल ॥ ज्ञानास ज्ञानफळरूपकृतकृत्यता जे इस विघ्नच करील इतकेच ॥ परंतु ज्ञान उत्पन्न करू न शके ॥ ऐसे तरि ज्ञान आणिखी काशाकरून येइल म्हणाल तरि आत्मानात्मविचारेकरून यावे ॥ ते कैसे म्हणाल तरि गायत्री शालग्राम रत्नादिक याचे तत्वज्ञान त्यास त्यास उचित परिक्षा निघर्षण विचारेकरून जैसे ज्ञान होते ते स्नानसंध्याप्राणायामे करून तैसे ज्ञान होत नाही ॥ तैसे आत्मतत्वज्ञानही आत्मानात्मविचारेकरूनच होईल ॥ परंतु कर्मोपासनादिकेकरून होणार नाही ॥ याकरिता मुमुक्षु जो तेणे सर्वदा सर्व प्रयत्ने करूनही आत्मानात्मविचारच करावा ॥ ऐसे केलियाने संसारबंधनापासून शीघ्रच सुटेल आणि जीवन्मुक्तिसुखाते पावेल ऐसा वैदिक सिद्धांत ॥ दुःखहेतुर्हिदेहःस्यात् देहहेतुश्र्च कर्म तत् ॥ कर्महेतुश्र्च रागादिमानो रागादिकारणं ॥१॥ अविवेकोमानहेतुराज्ञानं तस्य कारणं ॥ ज्ञानान्नश्येत्तदज्ञानं तत् ज्ञानं स्याद्विचारतः ॥२॥ अज्ञानबीजमविवेक महांकुरंयो ॥ देहाभिमान विटपं बहुरागशाखम् कर्मवज्रस्तबकदेहशलाटुमेनम् ॥ ज्ञानासिनास्थिरसमेषु सुधीः छिनत्ति ॥३॥

इति श्रीमननग्रन्थे षष्ठमवर्णकं समाप्तं ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP