TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

एप्रिल २० - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खास ॥

बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधि । त्यांसि त्रासू नये कधी । हीच जाणीव उघड समाधि ॥ सावली मातीत पडली । तिला धुऊन नाही घेतली । तसेच खरे आहे देहाचे । पण ते संतांनाच साधे ॥ सर्व संकल्प वर्ज्य करुन । अवस्था असावी बालकवृत्तिसमान ॥ सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्ही परमप्राप्ति ॥ मारुनी खोटी कल्पनावृत्ति । रामनाम अखंड चित्ती । समाधान संतोष शांति ॥ देवासी सर्व करी अर्पण । करी स्वानंदयुक्त परमात्मचिंतन । हीच सिध्द साधूची खूण ॥ वासना जाळून शुध्द चित्त । अहंभाव सोडून होई निभ्रांत ॥ आता मी रामाचा , राम माझा । हे जाणावे पूर्ण ॥

संतसहवास त्याला पाही । जो देहबुध्दि टाकून राही ॥ संतास न पाहावे देहात । आपण देहापरते होऊन पाहावे त्यास ॥ नामात ठेवा प्रेम । हीच संतांची खूण ॥ जे जे आपले संगती आले । संताने त्यांचे सार्थकच केले ॥ साधूने देह ठेवला । तरी सत्तेने जागृत राहिला ॥ त्याची ठेवावी आठवण । सेवा करावी रात्रंदिन ॥ संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खास ॥ संतचरणी विश्वास । त्याने भगवंत जोडला खास ॥ लक्ष ठेवावे संताकडे । देह लावावा प्रपंचाकडे ॥ नाम घ्यावे श्वासोच्छवास । संत संतुष्ट होईल खास ॥ सांगावे संतास नमस्कार । जो जगताचा आधार ॥ संताच्या देहाची प्रारबध्दगति संपली । काया आज दिसेनाशी झाली । परि अजरामर राहिली ॥ राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगात संत ऐसे वर्तती । जेणे दुसर्‍यास मार्गदर्शक होती ॥ संतांचे करावे अनुकरण । घ्यावे त्यांचे दर्शन । सांगावे आलो आहे आपण । विचाराव्या कठिण वाटा । जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता ॥ रामापरता नाही लाभ । हे धरले ज्याने चित्ती । त्यास लाभली खरी संतांची संगति ॥ त्यांचा आदर्श ठेवावा पुढे । कधी न होईल वाकडे ॥ स्वत : चे पावावे समाधान । त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण ॥ संताशी व्हावे अनन्य शरण । दुसरीकडे जाण्याचे नाही कारण ॥ भाग्याने संत घरी आला । अभागी न मानी त्याला ॥ सूर्याचा प्रकाश झाला । आंधळ्याला उपयोगी नाही आला । तैसी विषयी झाली ज्याची वृत्ति । संताची संगत न त्याला न लाभती ॥ रामनामावाचून ज्याचा वेळ जात नाही । तोच जीवन्मुक्त पाही ॥ देहाचे ठिकाणी विरक्त । विषयाचे ठिकाणी नसे अहंममत्व । त्यालाच म्हणतात मुक्त ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-05-20T21:31:55.6400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

decretal amount

  • स्त्री. हुकूमनाम्याची रक्कम 
  • स्त्री. हुकूमनाम्याची रक्कम 
  • हुकूमनाम्याची रक्कम 
  • स्त्री. डिक्रीची रक्कम 
RANDOM WORD

Did you know?

जन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.