Dictionaries | References

गोड

   
Script: Devanagari

गोड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जातूंत साकरीचो वा म्होंवाचो सुवाद आसता अशें   Ex. हें फळ खूब गोड आसा
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
म्होंवाळ
Wordnet:
asmমিঠা
benমিষ্টি
gujગળ્યું
hinमीठा
kanಸಿಹಿಯಾದ
kasموٚدُر
malമധുരമുള്ള
marगोड
mniꯑꯊꯨꯝꯕ
nepगुलियो
oriମିଠା
panਮਿੱਠਾ
sanमधुर
tamஇனிப்பான
urdمیٹھا , شیریں , رسدار
adjective  मनाक बरें दिसता अशें   Ex. विदेशी कांय गोड यादी दवरून गेलो
MODIFIES NOUN:
अस्तीत्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
म्होंवाळ
Wordnet:
asmমিঠা
bdगोदै
benমিষ্টি
kanಪ್ರಿಯವಾದ
kasمیٖٹھ , موٚدُر , خۄشوُن
malമധുരമായ
mniꯈꯣꯏꯊꯨꯝꯅꯔꯕ
nepरमाइलो
panਮੀਠਾ
sanमधुर
telతీయని
urdشیریں , میٹھا , دلچسپ
noun  उशीच्या रोसाचो शेंके म्हणसर कडोवन केल्लो पदार्थ   Ex. कैलास सद्दां दांत घांसतकच गोड खावन उदक पिता
ATTRIBUTES:
गोड
HOLO COMPONENT OBJECT:
तिळांचो लाडू
MERO STUFF OBJECT:
रोस
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুড়
gujગોળ
hinगुड़
kanಬೆಲ್ಲ
malശര്ക്കര
marगूळ
oriଗୁଡ଼
panਗੁੜ
sanगुड़ः
tamவெல்லம்
telబెల్లం
urdگڑ
See : म्होंवाळ, गोडें

गोड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gōḍa a Sweet--throughout its applications in English: viz. not sour; luscious; fragrant; melodious; beautiful; not salt; soft; mild; not stale or stinking; grateful, pleasing, delightful. 2 Neat, pretty, right, regular, proper, correct, classical &c.; as गोड-प्रयोग-उदाहरण-वाक्य-कवन-भाषण-जाब- साल &c. Pr. गोड करून खावें मऊ करून निजावें Make the best of hardships. Pr. गेलें नाहीं तंववर जड खाल्लें नाहीं तंववर गोड Untried or unknown things are always exquisite. गोड करून घेणें To receive well; to take sweetly, kindly, in good part. गोड गोड गुळचट Very very sweet. दिल्हें घेतलें गोड It is good to be social.
as opp. to कडू. 2 Any thing sweet or saccharine matter in general considered as an item in diet. Ex. त्या औषधास गोड वर्ज्य.

गोड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sweetthroughout its applications in English, viz., not sour, luscious, fragrant, melodious, beautiful, soft, mild, pleasing, delightful.
  Anything sweet, considered as an item in diet.
गोड करून खावें मऊ करून निजावें   Make the best of hardships.
गोड करून घेणें   Receive well; take kindly, in good part.

गोड     

वि.  चवदार , मधाळ , मधुर , स्वादिष्ट ;
वि.  मंजुळ , साजिरे , सुंदर ( रूप );
वि.  संतोषदायक , सुखकारक ( मनाला ).

गोड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  कानास गोड लागणारा   Ex. गीता गोड आवाजात गायली
MODIFIES NOUN:
ध्वनी
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सुरेल मंजूळ सुमधुर मधुर
Wordnet:
asmসুৰীয়া
bdमिलौदो
benসুরেলা
gujસુરીલું
hinसुरीला
kanಸುಸ್ವರ
kasمٔدٕر
kokम्होंवाळ
malമധുരമായ
mniꯅꯨꯡꯁꯤꯕ꯭ꯈꯣꯟꯊꯣꯛ
oriମଧୁର
sanसुस्वर
tamஇனிமையான
telమధురమైన
urdسریلا , شیریں , خوش الحان
adjective  मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा   Ex. ही द्राक्षे फारच गोड आहेत
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
मधुर महुर महूर
Wordnet:
asmমিঠা
benমিষ্টি
gujગળ્યું
hinमीठा
kanಸಿಹಿಯಾದ
kasموٚدُر
malമധുരമുള്ള
mniꯑꯊꯨꯝꯕ
nepगुलियो
oriମିଠା
panਮਿੱਠਾ
sanमधुर
tamஇனிப்பான
urdمیٹھا , شیریں , رسدار
adjective  मनाला आवडणारा   Ex. आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.
MODIFIES NOUN:
अस्तित्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
मधुर
Wordnet:
asmমিঠা
bdगोदै
benমিষ্টি
kanಪ್ರಿಯವಾದ
kasمیٖٹھ , موٚدُر , خۄشوُن
malമധുരമായ
mniꯈꯣꯏꯊꯨꯝꯅꯔꯕ
nepरमाइलो
panਮੀਠਾ
sanमधुर
telతీయని
urdشیریں , میٹھا , دلچسپ
adjective  खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला   Ex. हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಸಿಹಿಯಾದ
kokगोडें
tamஇனிப்பான
urdمیٹھا
See : गोजिरवाणा

गोड     

 न. १ षडरसांतील मधुर रस . २ ( व . खा . ) मीठ . वरण अलोणी झालें गोडाशिवाय बरें लागत नाहीं . [ तुल० सं . मिष्ट - मीठ ] ३ ( वैद्यक ) पथ्याला अनुसरून मधुर किंवा साखरेनें युक्त असा पदर्थ त्या औषधास गोड वर्ज्य . - पु . ( गो . कों . ) गुळ . - वि . १ मधुर ( आंबट , तिखट , खारट नव्हे असें ); स्वादिष्ट . २ सुवासिक . ३ मंजुळ ; सुंदर ; साजिरे . ४ मृदु . ५ सौम्य . ६ सुखकारक ; संतोषदायक . मनास गोड वाटत नाहीं . ७ नीटनेटकें ; नियमित ; योग्य ; चांगले ; शुध्द ( भ्रष्ट नसलेलें ). जसें :- गोड - प्रयोग - उदाहरण - वाक्य - कवन इ० ८ ( तंजा . ) चांगलें ; सुरस , चवदार . चटणी गोड आहे . ९ औरस ( लग्नाच्या स्त्रीची ) संतति ; हिच्या उलट कडू ( दासीपुत्र - कन्या ). १० शुभदायक ; मंगलकारक . सत्वाचा गोड जाहला अंत । - विक ८ . [ सं . गुड ; प्रा . गोडु ; फ्रें . पो . जि . - गुडलो , गोळास ] ( वाप्र . ) करून घेणें - कसेंहि असलें तरी गोडीनें , चांगल्या हेतूनें स्वीकारणें ; मान देणें ; अव्हेर न करणें . गोड गुळचट - अतिशय गोड . दिल्हें घेतलें गोड - मिळून मिसळून वागणें चांगलें .
 पु. ( काशी ) तंगडी ; पाय . [ प्रा . दे . हिं . ]
०वणें   गोडावणें - सक्रि . १ गोड करणें ; होणें , खारट , आंबट नाहीसें करणें ( जमीन , पाणी , फळें इ० ) २ मिठ्ठी बसणें ( गोड पदार्थ खाल्ल्यानें जिभेस ). ३ ( काव्य ) गोडी लागणें ; लुब्ध होणें ; लालचावणें . भक्तीचिया सुखां गोडावली । ४ पाड लागणें ; पिकणें ( फळ ). म्ह० १ गोड करून खावें मऊ करून निजावें = अडचणींतहि सोय करून घ्यावी . २ गेले नाहीं तंववर जड , खाल्लें नाहीं तंववर गोड = माहीत नसलेलें सर्वच चांगलें असतें . सामाशब्द -
०उंडी  स्त्री. एक झाड .
०करांदा  पु. खाण्याला गोड लागणारा करांदा ; करांदा पहा .
०गळा  पु. १ ( संगीत ) गाण्याला मधुर आवाज . २ मधुर गायन , गाणें . घांस - पु . १ जेवणाच्या शेवटीं खाण्यासाठीं ठेवलेला आवडत्या पदार्थाचा घांस . २ सुग्रास ; मिष्ट भोजन . त्याचे एथें गोड घांस मिळतो , तो टाकून तुमचेकडे कशाला येऊं ? ३ अप्रिय , दु : खद गोष्टीचा शेवट गोड करणारा मुद्दा , प्रकार .
०घाशा   खाऊ - वि . १ सदां गोड खाण्यास पाहिजे असा ; गोड गोड खाण्याची आवड असलेला . २ चोखंदळ ; मिजाजी .
०जेवण   तोंड - न . वधूपक्षानें वरपक्षास अथवा वरपक्षानें वधूपक्षास दिलेली मेजवानी . २ मृत माणसाचें सुतक धरणार्‍या नातेवाइकांस आणि इष्टमित्रांस , सुतकाच्या १४ व्या दिवशीं ( सुतक फिटल्यावर ) मुख्य सुतक धरणार्‍यानें दिलेलें ( विशेषत : गुळाच्या पक्वान्नांचें ) जेवण . ३ पक्वान्नाचें जेवण . गोड जेवण केलें तर पाण्याचा शोष लागणारच .
०दोडकी  स्त्री. ( भाजी ) घोसाळी ; घोषक यांची एक जात हिचीं फुलें पांढरीं असतात .
०धड  न. नेहमींच्या पेक्षां थोडेसें गोडाचें चांगलें जेवण ; पक्वान्न ; मिष्टान्न . उद्यांसण आहे , तर कांहीं तरी गोडधड करा .
०निंब  पु. ( व . ) कढीनिंब .
०बोल्या वि.  मृदु , सौम्य भाषण करणारा ; तोंडचा गोड ; दुसर्‍याला आवडेल असेंच बोलणारा . म्ह० गोड बोल्या साल सोल्या = बोलणारा मिठ्ठा परंतु मानकाप्या . गोडरें - वि . गोड ; गोडवें . बायकां गोडरें प्रिय अन्न । - गीता २ . १७५ . गोड लापशी - स्त्री . दुधांतील लापशी ( ताकांतील नव्हे ).
०वणी  स्त्री. गोडें पाणी . हिंग पडतांचि रांजणीं । गोडवणी होय हिंगवणी । - भारा बाल १० . ३६ .
०वा   गोडा - वि . १ सापेक्षतेनें गोड ; विद्यमान पदार्थात - गोष्टींत अधिक , विशेष गोड . २ ( ल . ) कोरा ; असडा ; अपेट ; अस्पष्ट ; कोंवळा इ० . ३ ताजें ( पाणी , खारट नव्हे असें ); क्षारयुक्त नसणारें ; मधुर . ४ बिनकांटेरी ; किडयांना प्रिय ( झाड , वनस्पती ). ५ मऊ ; नरम ( लांकडाचा नारावांचून बाहेरचा भाग ). ६ बिन खारवट ; क्षार , लोणा नसणारी ( जमीन ). ७ गोडें ( तीळ , कारळे याचें तेल याच्या उलट उंडी , करंज यांचे कडवें तेल ). ८ सात्त्विक ; सुस्वभावी ; सौम्य ( माणूस ). ९ जितें ; जीवंत ( मांस - मुरदाड , मृत नव्हे असे ). १० सौम्य ( खाजर्‍या , उष्ण , तिखट , नव्हत अशा सुरण इ० भाज्या ). ११ मादक नसणारी ( हरीक , खडसांबळी इ० वनस्पतींतील प्रकार ). १२ निर्विष ( साप ). १३ कोमल ; नाजुक ; रोगाला बळी पडणारे ( शरीर , अवयव ), १४ नदींतील , गोडया पाण्यांतील ( मासा ). १५ खारवणातील नसलेलें ; गोडया जमीनींत तयार केलेलें ( गोडें भात ). १६ जिव्हाळयाचें ; नाजूक ; मर्माचें ( अंग , गोडे अंग - जांघ , यस्ती , अंड इ० ). १७ खारट नसलेला ( मराठा माणूस ), ( कडव्याच्या उलट . गोडवा - पु . स्तुति ; प्रशंसा . गोडवा गाणें गोडवे गाणें गोडवा सांगणें गोडवे सांगणें - १ दुसर्‍याच्यासाठीं आपण केलेल्या चांगल्या कृत्यांचा पाढा वाचणें ; ( उपकृत कृतघ्न झाला असतां विशेषत : ) दुसर्‍यावर केलेले उपकार किंवा अनुग्रह यांचा उपन्यास करणे ; आपलें एखाद्यावर प्रेम असून तो तें विसरला असतां त्याच्यसंबंधानें आपल्या मुखांतून निघणारे उद्गार . जिष्णु म्हणे त्वद्रचितें मज मिळतिल हे न गोडवे दास्यें । - मोआदि ३६ . ७४ . २ एकाद्याच्या कृत्यांची स्तुति करणें ; प्रशंसा करणें ; नांवाजणें . गोडवे गाणें ( सांगणें नव्हे ) - ( औप . ) कुरकूर करणें ; निंदा करणें . गोडवी गोडी - स्त्री . भूक व तोंडास रुचि असल्यानें जेवण्यासंबंधींची इच्छा ; रुचि ; याच्या उलट वीट ; कंटाळा ; तिरस्कार ; गोडशें - न . ( गो . ) मिठाई . गोडसर गोडसरसा - वि . थोडेसें गोड ; मधुर . जे आंगेंचि पदार्थ गोडसे । - ज्ञा १७ . १२६ .
०सांदणें   सांधणें - न . दुधांत , गर्‍यांच्या रसांत तयार केलेलें ( ताकांतील नव्हे ) सांदणें . गोडासाण - स्त्री . ( गो . ) गोडी .

गोड     

दिल्‍हें घेतलें गोड
मिळून मिसळून वागणें
देऊन घेऊन परस्‍पर स्‍नेह संपादन करणें.

गोड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गोड  m. m. (= गोण्ड) a fleshy navel, [L.]

Related Words

गोड   गोड बोल्‍या, ढोंपर (साल) सोल्‍या   गोड बातमी   गोड खावपी   सोबती गोड बोलला आणि केसानें गळा कापला   कडु खावुनु गोड खांवका   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   केळी गोड म्‍हणू साल्‍यो खावंच्यो वे?   गोड बोलतां वाचें, तुझें काय वेंचे   आंबट गोड   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   गोड पुरी   गोड अंब्‍याची कोय, ती खायास अयोग्‍य   गोड बोलणें आणि भोक पाडणें   गोड बोलणें आणि साल काढणें   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   गोड शब्‍दे करून, मूर्खाचें होय मनरंजन   आलस्याक बिकंडं भाजि म्हळ्यारि, हरियि खाल्यारि गोड   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड, मुळ्या सोड   नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   घरचे गोड आमशें, शेजारची आमसाणि गोडि   गोड उलोवप   गोड खबर   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   गोड गोळी   गोडमें गोड गरज, और कडूमें कडू करज   गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल   गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें   आवड गोड आहे   आवडत्याक मसण गोड   कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा   बांयिंतुलें उदाक चवळु जाल्यार अडसळींतुलें गोड जाईद कशी?   पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू   वरलीं जड, सोयरीक गोड   गोड करून घेणें   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   गोड ना जाल्‍यारि गोड उत्तर नावे?   गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   गोड दारूची खाटी, सहज होती   गोड बोलणें सौजन्याचें, कडू बोलणें हट्टाचें   गोड वस्तू   गोड सोडा   ज्‍याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें   ज्‍याचा अंत गोड, तें सर्वच गोड   आधीं कडू, मग गोड   गोड करून खावें, मऊ करून निजावें   गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो   आई गोड की खाई गोड   एका वालिचीं फळां, एक कोडृ आनि एक गोड जाता?   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   लाळेन चणे गोड   लाळेनें चणे गोड करावे   आडांत कडू तर पोहर्‍यांत कुठलं गोड   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आईचा हात, शिळा गोड भात   बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे   न्हाणवणीला गोड मिळे, विटाळशीला तुकडे शिळे   आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड   ओटी जड, पाहुणा गोड   केले नाहीं तोंवर जड, खाल्‍ले नाहीं तोंवर गोड   गोडघाशा   गोडखाण   हंसुन गोड (साजरें) करणें   गोड उलोवपी   गोड गळा   गोड गोड पक्‍वान्नें पाहिल्‍यावर भूक वाढते   गोड घास   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   गोड बोलणारे लोक नेहमीच मित्र असूं शकत नाहीत   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   गोड शब्‍द कोणा बोलतां, पोट मनाची न होय तृप्तता   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   हाट गोड कीं हात गोड   हात गोड कीं हाट गोड   हात गोड नाहीं, हाट गोड   हाताचा जड आणि बोलून गोड   हाताचा जड तोंडाचा गोड   हा संसार गोड, पुढचा काय घोर   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   गोंडे हालैतना गोड, बायिले पोस्‍तना रड   आपली आवड, आपल्याला गोड   आळशा, भिकणा भाजून खा, हरवीं खाल्यार गोड लागता   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   आवडत्याचा शेंबूड गोड   जीवु गोडु की गोड गोड   जुलूम पण गोड   जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्‍हणे मला नरटींत गोड लागतें   जेवरे पुता वाटींत माका गोड करटींतु (गो.)   जेव रे पुता वाटीतु, माका गोड करटींतु   जेवून सेवा गोड   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP