Dictionaries | References अ अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें Script: Devanagari Meaning अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी खळखळ करीत असलें म्हणजे तें फार खोल नाहीं, उथळ आहे हें सहज कळतें व त्यापासून भीति बाळगण्याचें कारण नसतेंपण तें संथ असून त्याचा तळ दिसत नसेल तर तें किती खोल आहे याचा अंदाज करतां येत नाहीं व त्यामुळें अशा पाण्यांत प्रवेश करणें फार धोक्याचें असतें. त्याप्रमाणें एखादा मनुष्य बोलका असला म्हणजे तो आपल्या मनांतील सर्व विचार बोलून टाकतो, मनांत कांहीं ठेवीत नाहीं. त्यामुळें त्याच्या उद्देशाबद्दल शंका वाटत नाहीं. पण तोच जर अबोलका, खोल मनाचा, गंभीर चेहर्याचा असेल तर त्याच्या मनांत काय आहे याचा थांगपत्ता लागत नाहीं. तेव्हां अशा मनुष्याबद्दल स्वाभाविकच मन साशंक असतें. तु ० -Still water runs deep. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP