Dictionaries | References

युक्त

See also:  युक्ति
वि.  जोडलेला ( संयुक्त ), मिसळलेला ( आम्रयुक्त श्रीकंड );
वि.  उचित , जुळणारा , ठीक , न्याय्य , बरोबर , योग्य , रास्त , शोभेलसे ;
वि.  संलग्न , सहित .
. 4 Occupied in the performance of योग. 5 Suited or suitable, becoming, agreeing, fitting.
वि.  
 स्त्री. 
जोडलेला ; मिळवलेला ; मिसळलेला ; जुळविलेला .
शक्कल ; खुबीदार कल्पना ; शोधकबुद्धि .
सहित ; संपन्न . ( समासांत ) चिंतायुक्त ; शोकयुक्त ; संशययुक्त ; खेदयुक्त ; हर्षयुक्त ; कामयुक्त ; जलयुक्त ; शर्करायुक्त इ० .
कसब ; खुबी ; कल्पना ; कौशल्य ( शक्तीच्या विरुद्ध ).
( एखाद्या यंत्रांतील ) कळ ; मख्खी ; किल्ली ; मखलाशी .
तत्पर ; तयार ; ( अभ्यासांत अगर कामधंद्यांत ) गुंतलेला ; गढून गेलेला ; सदोदित लक्ष देत असलेला . पार्थहितीं मुरारि युक्त सदा । - मोकर्ण २३ . २५ .
योगांत निमग्न झालेला ; योगाभ्यासी .
उचितपणा ; योग्यपणा ; औचित्य ; विवेक ; प्रमाण ; नियमितपणा . तरि तत्सत्तेविषयीं उपमन्यो कोणती असे युक्ति । - मोअनु ३ . ३१ .
ऐक्य ; मिश्रण ; मिळणी ; एकत्रीकरण ; एकी .
योग्य ; रास्त ; बरोबर ; उचित ; शोभेसा ; जुळणारा . [ सं . युज = जोडणें ] युक्ताथिला - वि . आस्तिक्य भावना असलेला - हंको . [ युक्त + आथिला ] युक्तायुक्त - वि . योग्य आणि अयोग्य ; बरें आणि वाईट ; साजेसा व न शोभणारा . [ सं . युक्त + अयुक्त ] युक्ताहार - पु . बेताचें अगर पचेल तेवढें खाणें ; मिताहार ; योग्य रीतीचें पथ्यकर आणि मित भोजन . [ युक्त + आहार ] युक्ताहारी - वि . बेताचें खाणारा ; योग्य अन्न योग्य प्रमाणांत घेणारा .
निष्काम कर्म करण्याची हातोटी . जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महा सुखाचा निमथा । वहिला पावे । - ज्ञा ५ . ३२ . [ सं . युक्ति ] ( वाप्र . ) युक्तीच्या पोटीं - क्रिवि . युक्तीनें ; मुत्सद्देगिरीनें ; कौशल्यानें . युक्तीस येणें - मनास पसंत पडणें ; योग्य , युक्त वाटणें , दिसणें . बहु बोलणें तयांचें धर्माच्या येइनाचि युक्तिस तें । - मोशांति ३ . ८४ . युक्तीयुक्तीनें करणें , घेणें - त्वरा अथवा दांडगाई न करतां सोईनें करणें . सामाशब्द -
०कौशल्य  न. उपाययोजनेंतील कौशल्य ; तोड काढण्यांतील प्रावीण्य .
०घोष  पु. बंधरुपी मंत्रघोष . तेथ संयमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें । यजिती उदंडें । युक्तिघोषें । - ज्ञा ८ . ५० . त्रय न . ( योगशास्त्र ) वज्रासन , जालंदर आणि उड्डियान असे तीन बंध . - ज्ञा ४ . १२७ .
०प्रयुक्ति  स्त्री. नानाप्रकारच्या युक्त्या ; बरेवाईट उपाय . [ सं . ] युक्तिप्रयुक्तीनें क्रिवि . बर्‍यावाईट उपायांनीं ; कोणत्याहि मार्गानें ; कांहींहि करुन ; या नाहीं त्या उपायानें .
०बाज   मान वंत वान - वि . युक्त्या जाणणारा ; युक्त्या लढविणारा ; हुषार ; सुपीक डोक्याचा ; शोधक ; निरनिराळे उपाय योजणारा .
०वता   क्रिवि . कौशल्यानें ; युक्तीनें ; खुबीनें ; हुषारीनें ; लबाडीनें . [ युक्ति + वत , वाट ]
०वाद  पु. युक्तीनें केलेला वाद ( तर्कशास्त्रास अनुसरुन नव्हे पण सामान्य व्यवहारास पटेल असा )
०सार वि.  बरोबर ; योग्य ; रास्त ; पटण्यासारखें ; औचित्याला धरुन असलेलें . युक्त्या वि . कसबी ; हुशार ; युक्तिबाज ; सुपीक डोक्याचा ; चलाख ; निरनिराळे बेत , मसलती , उपाय योजणारा . - क्रिवि . युक्तीनें ; कौशल्यानें ; लबाडीनें ; हुशारीनें .
n.  रैवत मनु के पुत्रों में से एक ।
  United. Endowed with. Suitable. Intent on.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP