TransLiteral Foundation

घट

See also GHAṬA , घटती
ना.  कलश , गाडगे , घडा , घागर , डेरा , पात्र , भांडे , माठ , रांजण , सुगड , सुरई ;
ना.  आंतबट्टा , खोट , घसारा , झीज , तोटा , नुकसान , बटाव .
. घटीं बसणें To rest on the घट or pot--the divinity, in the ceremonies of नवरात्र. 2 Hence To be fixed to the house; to be obliged to stay at home. 3 In covert phraseology. To be under menstruation--a woman.
ghaṭa a Commonly घट्ट.
 पु. १ पाणी इ० ठेवण्याचें भांडें ; घडा ; घागर असे पृथ्वी । - ज्ञा १३ . ८७२ . २ नवरात्रांत उपास्य देवतेजवळ पाण्यानें भरून ठेवलेली मातीची घागर ; घडा ; कलश ; नवरात्र बसणें ; विशेष प्रकारची देवीची पूजा . ३ ( ल . ) विश्व ; ईश्वरानें निर्माण केलेलें यच्चयावत जगत ; शरीर इ० सृष्ट जीव , पदार्थ . म्हणौनि प्राणिजाताच्या घटीं । ४ वाद्यविशेष . दक्षिण हिंदुस्थानांत मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाटीवर दोन्ही हातांनीं तबल्यासारखें वाजवून गायनाची साथ करतात . ५ नवरात्राकरितां कुंभाराकडून मातीची घागर घेण्याचा हक्क . [ सं . घट ] ( वाप्र . ) घटीं बसणें - अक्रि . १ ( नवरात्र इ० कांत ) आराध्य देवता घटावर अधिष्ठित होणें ; देवतेची स्थापना होणें . २ घटस्थापन करणारा यजमान अथवा उपाध्याय यानीं घट असेपर्यंत व्रतनियमानें असणें . ३ ( ल . ) ( आजारामुळें - आळसानें किंवा कांहीं कारणानें ) घरांत बसून असणें . ४ ( स्त्रीनें ) विटाळशी होणें ; अस्पर्शपणामुळें निरुद्योगी बसून असणें . सामाशब्द -
 स्त्री. १ दागिने तयार करतांना , घासतांना , कानसतांना त्यांचे गोळा न करतां येण्यासारखे परमाणू उडाल्यानें मूळ वजनांत येणारी तूट . गाळणींत , घाट करण्यांत अगर वहिवाटींत लागलेली घट खर्च घालण्याची मंजूरी देणें . ( बडोदें ) खानगी खात्यांतील अंमलदारांचे अधिकार १७८ . २ धान्य मापतांना , तूप इ० पदार्थ तोलतांना मूळ मापांत - वजनांत होणारा कमीपणा ; तूट ; घस . आमचा माल निर्मळ असून त्यांत घट फार निघाली अशा प्रकारचे पुष्कळ बोभाटे नेहमीं पत्रांतून येतात . - मुंव्या प्रस्तावना ५ . ३ नुकसान ( गळती , नास , आटणी इ० मुळें झालेलें ); तूट . ( क्रि० येणें ; लागणें ). हाली शिक्याला घटती कीं बढती ? ४ ( सामा . ) र्‍हास ; उतार ; कमती होणें . ( क्रि० येणें ; लागणें ). ५ ( मातकाम ) घोटकाम करतांना किंवा कोरीव काम करतांना खालीं पडलेली माती . [ सं . घट = घासणें , हलवणें , मारणें ; हिं . घटना , घटती ]
 न. ( गो . ) सोंगटया वगैरेच्या पटांतील घर .
वि.  ( प्र . ) घट्ट , घट्ट पहा .
०क्रिया  स्त्री. ( गो . ) घटस्फोट पहा . तदनंपर हिंदूरीतिप्रमाणें विधियुक्त घटक्रिया करून ... - राजकार . ५ ( गोमंतकांतील रीतिभाती , भाषांतर १८८० . )
०करणें   सक्रि . ( ना . ) तोंडपाठ करणें ; घोकणें .
०वध  स्त्री. ( गु . ) ( वजन - माप - इ० कांतील ) तूट अथवा वाढ ; कमजास्तपणा ; [ घट = तूट + सं . वृध - वध = वाढ ]
०पट   घटंपटं - स्त्री . न . न्यायशास्त्रांत नेहमीं घट ( घडा ) व पट ( वस्त्र ) यांचीं उदाहरणें देण्याची चाल आहे . त्यांत घट व पट ( वस्त्र ) यांचीं उदाहरणें देण्याची चाल आहे . त्यांत घट व पट हे शब्द पुढील अर्थी रूढ आहेत - १ फुशारकीचें - शेखीचें - चढाईचें - पोकळ ऐटीचें - भाषण . २ असंबध्द , टाळाटाळीचे बोलणें ; लप्पंछप्पं ; थाप . ३ निष्कारण उरस्फोड ; वाचाळता ; व्यर्थ बडबड ; माथाकूट ; वितंडवाद ; शब्दावडंबर . उ० ( कवी निरंकुशतेचे भोक्ते असल्यामुळें नैयायिक व वैय्याकरणी यांनीं घातलेल्या भाषेवरील व्याकरणविषयक निर्बंधाच्या खटाटोपास घटपट असें हेटाळणीनें संबोधितात . कवींना साहजिकच व्याकरणविषयक सूक्ष्म निर्बंध म्हणजे व्यर्थ उरस्फोड , माथाकूट आहे असें वाटतें ). नल्गे व्याकरणाची न्यायाची घटपटादि खटपट ती । वैकुंठ पेठ मोठी नामावरि हीनदीन खट पटती । - कीर्तन १ . ३७ . [ घट + पट ] घटंपटा - स्त्री . ( व . ) खटपट ; अवडंबर ; लटपट ; त्याच्या लग्नाच्या वेळीं मोठी घटंपटा झाली .
०भंग  पु. घटाचा नाश ; घागर फुटणें . घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं । - ज्ञा १४ . ५४ .
०मठ  पु. १ घट आणि मठ . २ ( ल . ) सर्व सृष्ट वस्तू ( ज्यांत पोकळ अवकाश आहे अशा ) घटमठ नाम मात्र । व्योम व्यापक सर्वत्र । - ब २६२ . मजवरी घालती व्यर्थ आळ मी सर्वातीत निर्मळ । जैसें आकाश केवळ । घटमठांशीं वेगळें । - ह ७ . १५२ . घटाकाश आणि मठाकाश असे प्रयोग वेदांतांत ऐकूं येतात . [ घट = घागर + मठ = मठ - राहण्याचें ठिकाण ; घर ]
०माळ  स्त्री. नवरात्रांत देवीच्या पूजेकरितां स्थापन केलेला घट व त्यावर सोडलेली फुलांची माळ ; देवतांप्रीत्यर्थ वसविलेला माळेसहित घट . [ घट + माला ]
०वात  स्त्री. १ नवरात्रांत घट बसविणें व अखंड दिवा लावणें . २ या हक्काचें वेतन , मान . होलीस पोली व घटवात वगैरे मानपान जो घ्यावयाचा तो घेतो . - मसाप २ . १७२ . [ घट + वात ( दिव्यांतील बत्ती ) ]
०वांटप  पु. न . ( कों . ) घरदार , भांडींकुंडीं , जमीन जुमला इ० कांची ( भावाभावांत - नातेवाईकांत ) वांटणी ; [ घट + वांटणें ]
०स्थापना  स्त्री. घट बसविणें ; आश्विन शुध्द प्रतिपदेस मातीच्या स्थंडिलावर घट ठेवून त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यांत कुलदेवतेची स्थापना करून तिची नऊ दिवस पूजा करतात , दररोज घटावर फुलांची नवी माळ लोंबती बांधतात , अखंड दीप जाळतात . आणि सप्तशतीचा पाठ इ० कर्में करतात त्या विधीस घटस्थापना म्हणतात ; देव तेची घठावर स्थापना ; देवप्रतिष्ठा . [ घट + स्थापना ]
०स्फोट  पु. ( घागर फोडणें ) १ गुन्हेगाराचा जिवंतपणीं प्रेतविधि . जो पतित प्रायश्चित घेऊं इच्छित नाहीं त्याला वाळीत टाकण्याकरितां - समाजाच्या दृष्टीनें तो मेलेलाच आहे असें दर्शविण्याकरितां - मातीची घागर फोडणें इ० अशुभ क्रिया - विधि . २ जाति बहिष्कृत करणें . ३ नवरा - बायकोची फारकत ; पंचायतीच्या किंवा कोर्टाच्या मदतीनें विवाहाचें बंधन रद्द ठरवून नवरा - बायकोनीं स्वतंत्र होणें ; काडीमोड ; ( इं . ) डायव्होर्स . इंग्रज लोकांतील घटस्फोटाचे वाईट वाईट खटले कोर्टापुडें येतात .... - टि ४ . ९५ . जारकर्मात विधवा गरोदर सांपडली असतां तिला बहिष्कृत करून तिचा घटस्फोट नामक विधी करतात . - व्यनि २ . घटाकाश - न . ( वेदांत ) घटांतील पोकळी ; अवकाश , रिती जागा . कोणें धरोनियां आकाश । घरीं घातलें सावकाश । तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आलें । - एभा १३ . ७३२ . - दा ८ . ७ . ४९ . [ घट + आकाश = पोकळी ]
घट करणें
(ना.) तोंडपाठ करणें
घोकणें
घोकून घोकून पक्‍के करणें.
घटीं बसणें
१. आराध्यदेवता नवरात्रादिकांत घटावर अधिष्‍ठित होणें
यावरून देवतेची स्‍थापना होणें २. घटस्‍थापना करणारा यजमान व्रतस्‍थ स्‍थितीत राहणें. ३. आजार, आळस वगैरेमुळे घरात बसून राहणें. घराबाहेर पडतां येत नाही अशी स्‍थिती होणें. ४. स्‍त्री रजस्‍वाला होणें. ५. कोणतेहि काम काही काल एकाच स्‍थितीत स्‍थगित होणें
प्रगति न होणें.
 m  A vessel for holding water.
 f  Loss.
घटी बसणें   Be fixed to the house; be under menstruation.
 • नवरात्र पूजा घटस्थापना
  नवरात्र पूजा विधी : घटस्थापना
 • माहात्म्य
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • अथ मानस पूजा
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • विजयादशमी कथा
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • देवी पूजा विधी
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • घटस्थापना
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • नवदुर्गा स्थापना
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • सायंकाळची पूजा
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • हवन विधी आणि बलिदान
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
 • उत्थापन आणि विसर्जन
  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे. Navratri is a Hindu festival, during..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

biopharmaceutics

 • स्त्री. जैव औषधनिर्माणविद्या 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Are there any female godesses in Hinduism?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,893
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,717
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.