मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
उमा

उमा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


उमा.य० ६,६,६,४.
ती उमा कवि बोलति जी बहु आवडती गिरिशास सती ॥
तत्पदिं सात भ नामक हे गण शेवटिं एक गुरु असती ।
बाविस अक्षर दावि सदा पद लागुनि राहिल नेमचि या ॥
मीन जळाविण दीन तसा हरि हीन कृपेविण मी तुझिया ॥१॥
चरणांत अक्षरें २२. गण - भ, भ, भ, भ, भ, भ,ग.
उदाहरण * आनंदतनय .
यापरिचे भवतापविमोचन चापशरांकित भव्यमती ॥
पाहुनि सर्वनृपांहुनि उत्तम लाहुनि तोष पुसे नृपती ॥
कोण असे महिपाळकबाळक हे जगचालकसे सुचले ॥
सांग मला सहसागमनाशय चांग मनांत मला रुचले ॥१॥
१५ विकृति. पादाक्षरें २३.
उमा वृत्ताच्या गणांच्या शेवटीं एका गुरु अक्षराची भर घातली कीं मदिरव वृत्त होतें.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP