मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
अनुष्टुभ्

अनुष्टुभ्

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


अनुष्टुभ्‍ य० पा०.
अनुष्टुप्‍  छंद ते ज्याला ॥ एक नेम नसे गणीं ॥
अक्षरें चरणीं आठ ॥ देवा तार मला त्वरें ॥
चरणांत अक्षरें ८. गणांचा नियम नाहीं. उदाहरण क्रमिक पुस्तकांतील.
केलें पात्र सुवर्णाचें । कीं विरुपशि खापरी ॥
लावितां तेज संहारी । तम दीपशिखापरी ॥
२ जाति - बृहती. पादाक्षरें ९.
३ मणिबंध. य० पा०.
त्या मणिबंधातें धरिती ॥ भ म स यत्पादा वरिती ॥
अक्षरसंख्या यास नऊ ॥ सन्मन लोण्याहून मऊ ॥
चरणांत अक्षरें ९. गण - भ, म, स.
उदाहरण
द्रव्य मिळावें याकरितां ॥ कां हलक्यांना आर्जवितां ॥
काय नव्हे हो तो धनवान् ॥ ईश रमेचा जो भगवान्‍ ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP